☆ कवितेचा उत्सव ☆ शिशीर-शिणगार ☆ श्रीशैल चौगुले ☆
शिशीर-शिशीर मनात रानात
दव पांघरुन काळीज पानात.
धुके पहाटेचे डोळेच आभाळ
थंड शरीरास किरणे वनात.
तेज पूर्वदिशी झाकून अलोक
मंद पावलात गारवा कानात.
हळू चिवचिव पाखरे अंगणी
ऊडे भुर्रकन थवाच तृणात.
मोती साठलेले कळी फुलांवर
थोडी खसबस कावळा मौनात.
तरी शिडकावा सजवी निसर्ग
भूमी सातरंगी सौंदर्य तैनात.
ऋतू शिशीराचा हिमाचा मज्जाव
नभी आर्यरथ स्वर्ग सदनात.
स्मृती शिणगार शिशीर शिवार
माया हिरवाई सकाळ अधनात.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈