श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 64 – होलिकोत्सव विशेष – नकोस देऊ आज साजना ☆
नकोस देऊ आज साजणा भास नव्याने सारे।
आठवणींच्या मोर पिसांचे रंग उधळती तारे।
मऊ मुलायम कुरणावरती प्रीत पाखरू येई।
साद घालता ओढ लाविते नित्य जिवाला कारे।
शब्दतार तव नाद छेडती धुंद जणू हे गाणे।
मुग्ध जाहला देह स्वरांनी भाव अनामिक न्यारे।
गुंजन करितो भ्रमर कळीशी गूज तयांचे चाले।
अधर थरथरे अवचित जुळता नयन राजसा घारे।
तव स्पर्शाची किमया न्यारी गाली येई लाली।
स्पर्श फुलांचा गंध दरवळे दाही दिशांत वारे।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈