मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू….मी… ☆ श्री शरद कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ तू….मी… ☆ श्री शरद कुलकर्णी☆ 

तू बरसात श्रावणाची ,

पाऊस मी वळीवाचा.

आकाश एक दोघांचे,

का भेद अविष्काराचा.

तू तरु धुंद बहराचा ,

मी वृक्ष पानगळीचा.

समजून घे जरासा,

फरक हा ऋतूंचा .

मी स्वैर शब्दशब्द,

तू नेमकी कविता .

जलप्रपात कोसळणारा मी,

तू नीरव शांत सरिता .

तू झुळुक शीतलगंध,

मी बेधुंद वादळवारा .

तम गहिवरला मी अवघा,

तू स्थिर नभीचा तारा.

 

©  श्री शरद कुलकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वेळ अशी का जुळून येते? ☆ श्री गौतम कांबळे

☆  कवितेचा उत्सव ☆ वेळ अशी का जुळून येते? ☆ श्री गौतम कांबळे ☆ 

म्हणत असता सुंदर जगणे वेळ अशी का जुळून  येते

मनी पाहिले स्वप्न देखणे क्षणात सारे पळून जाते

 

कुणाकुणाचे हट्ट सगळे पुरवत जाणे कसे जमावे

चुकून घडता चूक कशाने कष्ट वांझुटे  छळून जाते

 

दगडालाही म्हणे फुटतो पाझर  ओझे पेलत असता

छिन्नीचेही रूप देखणे घावासंगे  गळून जाते

 

ठिणगी पडता संघर्षाची अग्नी भिडतो आकाशाशी

शीतलतेचे रूप चांदणे पौर्णिमेला जळून जाते

 

होत राहते सुधारणाही असता पाळत सहनशीलता

वागताना न तारतम्याने वेळ अंतीम टळून जाते

 

©  श्री गौतम कांबळे

सांगली

९४२१२२२८३४

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर /श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कथा आणि कविता ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ कवितेचा उत्सव ☆ कथा आणि कविता ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

कथा आणि कविता

दोघी माझ्या खूप लाडक्या

 

कथा अघळपघळ बोलणारी

कविता नीट नेटकं…

जेव्हढ्यास तेव्हढं!

 

कथा स्पष्ट, रोकठोक, दिलखुलास…

कविता लाजरी….पेक्षा बुजरीच जास्त….

 

कथा एक प्रसंग सांगायला शंभर शब्दांना वेठीस धरते

कविता दोनच ओळीत

शंभर शब्द बोलून जाते.

 

कथा आवडते, कारण

मनानं अगदी मोकळी.

लपवाछपवी हा तिचा

स्वभावच नाही..

सगळं शब्दभांडार लेवून

नखशिखांत सजलेली….

 

कविता ही आवडते, कारण कधी फुलांमागून खुद्कन हसते तर कधी पापण्या मिटून टिपं अडवते. अव्यक्त भावनांना ह्रदयापर्यंत पोचवते……….

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 76 – वृत्त- वंशमणी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 76 ☆

☆ वृत्त- वंशमणी ☆

कशास  आले, कुठून आले कोठे

वादळ दाटे अंतरात या मोठे

या जगण्याला अर्थ न उरला आता

कुणी न वाली,कुणी न माझा त्राता

 

मी एकाकी मूक पाखरू  आहे

झाडाखाली ,तरी  उन्हाळा साहे

घाव जिव्हारी पुन्हा पुन्हा हे ताजे

कसे सावरू आयुष्याचे ओझे

 

मी मरणाला नित्य मारते हाका

अन जगण्याचा पुन्हा  बदलते ठेका

मी शापित की कुणी कलंकित  आहे

गतजन्मीचा स्रोत इथूनच वाहे

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्रोधाचे घर ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

☆ कवितेचा उत्सव :  क्रोधाचे घर  ☆ श्री मुबारक उमराणी ☆

घर क्रोधाचे छानच

नाकावर माशी जसा

राहा सावध नेहमी

भांडूनच दुखे घसा

 

हट्ट रागाची बहिण

हिंसा पत्नी सदा लढे

अंहकार त्याचा भाऊ

भय पिता घेई धडे

 

निंदा चुगली त्या मुली

एक लागे तोंडी सदा

दुजी भरी दोन्ही कान

देई ठोसे जशी गदा

 

वैर मुलगा क्रोशाचा

त्याची पत्नी इर्षा झाली

घृणा नात त्याची शोभे

आई उपेक्षा ती भ्याली

 

तुम्ही सारे रहा दूर

घरी नांदेल मंगल

सुख संपत्ती मांगल्य

शांती फुलेल जंगल

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 75 ☆ टेन्शन काय यायचं ? ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 75 ☆  टेन्शन काय यायचं ? ☆

समोर येईल ते खायचं

आणि गप्प राहायचं

वय झालं वेड्या तुझं

टेन्शन काय घ्यायचं ?

 

संसाराच्या डबक्यात

नाही तू बुडायचं

लग्न असो बारसं असो

गप्प बसून राहायचं

 

लक्ष देतो तुझ्याकडं

कोण इथं फारसं

कष्टानं घेतलेल्या

कौतुक नको कारचं

 

धोतर झालं जुनं आता

विरळ ते व्हायचं

उलटून गेली साठी आता

गाठी मारत जायचं

 

घरी नको अडचण

देवळात बसायचं

एकच काम तुला आता

रामनाम घ्यायचं

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घरोघर ईश्वर…☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

☆ कवितेचा उत्सव ☆ घरोघर ईश्वर… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

कुंदकळ्या सांडती मुखातून, जेंव्हा बोलते लेक

लडिवाळ किती तीअसते पहा, नजरेची तिच्या ती फेक..

डाळिंबाचे दाणे दात हो, नजरेतून ती सुमने

पाहता क्षणीच जिंकून घेते, साऱ्यांचीच ती मने..

 

आभाळातील जणू चांदणी, उतरून येते घरी

निळ्या नभातील चंद्रकोर ती, कोमल सुंदर परी

मायेचे ते कोंदण असते, भरजरी रेशमी शाल

जणू लक्षुमी घराघरातील, करते मालामाल…

 

नक्षत्रे नि तारे सारे, तिच्या पुढे हो लटके

छुन छुन पायी चाळ वाजवत,पहा कशी ती मटके

आनंदाचा असतो ठेवा, प्रसन्न असतो वारा

सुगंधित ती करून टाकते, घर नि परिसर सारा…

 

बागडते नाचते नि गाते, बनून जाते माय

जणू तापल्या दुधावरील ती, स्निग्ध मायाळू साय

लळा लावूनी जाते निघूनी, सावरण्या परघर

तुटत नाही माया तरीही, जरी राहते दूर….

 

जीव गुंततो माहेरी पण, गृहलक्ष्मी सासरची

प्रतीमाता ती … पाठवतो हो …

घरोघर ईश्वर …ती …

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि:१४/०९/२०२०, वेळ:सकाळी :०९:४३

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 27 ☆ शाळा सुटली… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 27 ☆ 

☆ शाळा सुटली… ☆

शाळा फुटली पाटी फुटली

गाणे पुन्हा पुन्हा आठवते

शाळेचा तो वर्ग भरतो

त्यातील माझी जागा भेटते

 

अलगद तिथे जाऊन बसतो

पाटी डोक्यावर ती पुसतो

ओरडतात मास्तर मजला

त्यांच्याकडे कानाडोळा होतो

 

हसायला येते मज्जा वाटते

शाळेत मग जाऊ वाटते

शाळेच्या ह्या आशा आठवणी

अंग अंग पुलकित होते

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंदाज ☆ मेहबूब जमादार

☆ कवितेचा उत्सव ☆ अंदाज ☆ मेहबूब जमादार

मला माझं म्हणून क‌ा जगता येईना

मनातल्या प्रश्नांच उत्तर काही मिळेनां….

 

कोणी म्हणेल मग कशाला केलं लग्न

स्वप्नात मी बायकोला हा विचारला प्रश्न

मी म्हणून टिकले तिचा हेका काही सुटेना…१

 

बसताय कुठे निवांत, पहिलं घ्या पोरानां

पेपर द्या फेकून डोळं जातील वाचतानां

पोराबाळांच घर आपलं एवढं पण कळेनां?..२

 

मी कुठे जायचं तर खर्चाचा पडतो भार

माहेरा जायचं की ती सदैव असतें  तयार

मला सारं कळतं पण तिला का समजेना…३

 

कोणाशी बोलावे तर कोण ती तुमची

शंकाकुशंका ने हालत बिघडते माझी

होतो तळतळाट परी सांगावे कोणा?….४

 

थोडे कांहीं बोलले तर धरी अबोला

विनवले किती?सोडत नाही हट्टाला

म्हणे सोडतेे हट्ट पण घ्या मला  दागिना….५

 

मी आजारी पडता घायाळ ती होते

रात्रभर बिछान्यावर बसून ती रहाते

अशा तिच्या वागण्याचा अंदाजच येईनां….६

 

वय वाढलं तसं प्रेम ही वाढू लागलं

आपणाला कोण? हे दोघानां पटू लागलं

आतां माझ्या शिवाय तिचं पान ही हलेनां….७

 

© मेहबूब जमादार

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे फूल कळीचे झाले गं… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ हे फूल कळीचे झाले गं… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

बालपणीच्या कुंजवनातून

यौवन पुलकित वैभव घेऊन

वसंत उधळीत आले ग

हे फूल कळीचे झाले गं

 

        दिवस संपले भातुकलीचे

        सत्य जाहले स्वप्न कालचे

        नयनापुढती रूप तयाचे

        कसे अचानक खुलले ग

       हे फूल कळीचे झाले गं.

 

परीकथेतील परी मी झाले

राजपुत्र ‘ते’मनात ठसले

निशा लाजली,जरा हासली

खुणवीत मजला आली गं

हे फूल कळीचे झाले गं.

 

         पाऊल पडते नव्या जीवनी

         नव्या भावना येती खुलूनी

         गीत प्रीतिचे नवे,माझिया

         ओठावरती आले गं

         हे फूल कळीचे झाले गं.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print