मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कुणाला काय सांगावे ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ कुणाला काय सांगावे ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

कुणाला काय सांगावे !

कुणाला काय बोलावे !

सनातन संस्कृतीसाठी

आता आयुष्य तोलावे .

*

विश्वविख्यात हा धर्म

तयाची संस्कृती मोठी

तीला सुरूंग लावाया

किती चालल्या लटपटी

*

स्वतःहून देश हा मोठा

देशाचा धर्मही मोठा

खुर्चीसाठी देश पणाला

लावणार्यांचा नाही तोटा 

*

 डोळे उघडून वागायाला

 शिका आतातरी व्हा जागे

 देशाला कुरतडणार्यांना

 लोकशाहीने खेचू मागे

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “स्वत्व…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

(मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित काव्यस्पर्धा – विषय : “अजून स्वाभिमान जाज्वल्य” – आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सुश्री राधिका भांडारकर यांची या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेली ही कविता. आपल्या ई-अभिव्यक्ती समूहातर्फे राधिकाताईंचे हार्दिक अभिनंदन आणि असंख्य शुभेच्छा.💐)

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वत्व…” ☆ सौ राधिका भांडारकर 

(दिंडी वृत्त)

नकोच वाटते मला दया माया 

आहेत वाटा कितीतरी अजून 

चालेन त्यावर जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून..

*

सारे मुखवटे भासतात मजला 

का घ्यावे दान मी त्यांच्याकडून 

कशाला व्हावे मिंधे कोणाचे 

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून 

*

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून 

धमन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून 

स्वत्वच राखेन प्रश्नाला भिडून 

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी

केले कुणी तर त्यांना डावलून 

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला 

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझे असे काय ? ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सौ. नेहा लिंबकर

? कवितेचा उत्सव ?

☆ माझे असे काय ? ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

काय वाहू तुझे चरणी 

देवा, माझे असे काय?

*

तन, मन, धन सारे 

तुझे देणे हाय 

काय वाहू तुझे चरणी 

माझे असे काय ?

*

आस, ध्यास, श्वास सारे 

तुझ्या कृपे न्याय्य 

काय वाहू तुझे चरणी 

माझे असे काय?

*

दया माया बुद्धी गुणे 

पावो तुझे पाय

काय वाहू तुझे चरणी 

माझे असे काय?

*

याची देही पाहू डोळा 

तूच माझी माय 

काय वाहू तुझे चरणी 

माझे असे काय? 

*

रूप चित्ती राहो सदा 

नाम सर्वकाळ 

काय वाहू तुझे चरणी 

माझे असे काय?

*

श्रद्धा, भक्ति पूजेवरी 

पाव एक वार 

काय वाहू तुझे चरणी 

माझे असे काय?

देवा, माझे असे काय 

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

मो – 9422305178

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “स्वर्गास प्राप्त मी” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वर्गास प्राप्त मी” ☆ श्री आशिष मुळे ☆

स्वर्गास प्राप्त मी

विटली जेव्हा स्वर्ग कथा

विरघळली हवेत व्यथा

दिशाहीन जेव्हा होती दिशा

*

कोठून आलो कुठे चाललो

कुठे होतो कुठे पोहोचलो

फकीर प्रश्न हे निरर्थक

फाट्यावर त्यांना मारत राहिलो

*

स्वर्गास प्राप्त मी

शांतीस प्राप्त गाजावाजा

मतास त्यांच्या माझा मंत्राग्नी

माझ्या गतीचा मीच राजा

*

नको माप कोणाचे

नाही मोजले कधी स्वतःचे

मापातही मारती हात

काय वजन त्या मापाचे

*

स्वर्गास प्राप्त मी

क्रूर चेष्टा कळे निसर्गाची

काळही असे मतीभ्रष्ट

जाण नाही त्यास दिशांची

*

लाखो आले लाखो गेले

लाखो येतील लाखो जातील

धर्म-अधर्म करता करता

सगळेच एकदा माती होतील

*

स्वर्गास प्राप्त मी

मानवांस निरुपयोगी मी

ढुंकूनही बघू नका इकडे

स्पर्धेसाठी नाही उत्सुक मी

*

तुझे खरे की माझे खोटे 

कोण जिंकले कोण हरले

मुकुट सगळे तूच घाल

माझे तर मी श्राद्ध घातले

*

स्वर्गास प्राप्त मी…

नरकाने मज हेच शिकवले..

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आतुरता आगमनाची… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? कवितेचा उत्सव ?

☆ ✍️ आतुरता आगमनाची… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

(काय विरोधाभास हा.. )

जीवन खरा विरोधाभास 

कधी नको काही मजला 

कधी व्याकूळ आस 

जीवन खरा विरोधाभास||धृ||

*

“श्रेयस” शिकता शिकता,

 “प्रेयस” निसटले काही

“प्रेयस” शिकले जेव्हा

 “श्रेयस” निसटते काही

“उभय” साधले जेव्हा 

नाही कोणती आस..

जीवन खरा विरोधाभास||१||

*

प्रेम करू गेलो तर द्वेष मनी उमटला 

द्वेष करू गेलो तर प्रेम हृदयी ठाकले 

“उभय” साधले ( निर्लेपता) जेव्हा नाही कोणती आस 

जीवन खरा विरोधाभास||२||

*

ज्ञानार्जन करता करता 

अध्यात्म कसा विसरलो

अध्यात्म साधता साधता 

ज्ञान कसे सुटले? 

“उभय” साधले जेव्हा नाही कोणती आस 

जीवन खरा विरोधाभास||३||

*

“मी मी” म्हणता म्हणता 

“परमात्मा” कसा निसटला

परमात्मा आतच असूनी 

(जीव )दूर कसा भरकटला

“उभय” साधले जेव्हा 

नाही कोणती आस 

जीवन खरा विरोधाभास||३||

*

विरोध हाच “भास” आहे 

हेच समजले जेव्हा 

वर्तूळ जाहले पूर्ण 

“मी पण” सुटले जेव्हा 

“उभय” साधले जेव्हा 

नाही कोणती आस 

जीवन खरा विरोधाभास||४||

*

विरोधातच जीवन फुलते 

“अद्वैत” कळण्याकरता

अद्वैत शिल्लक उरले 

विरोध संपण्याकरिता 

“उभय” साधले जेव्हा 

नाही कोणती आस 

जीवन खरा विरोधाभास||५||

*

आतच ईश्वर आहे 

रममाण जीव हा झाला 

“मी मी” करता करता 

“आतच” तल्लीन झाला 

उभय साधले जेव्हा 

नाही कोणती आस 

जीवन “नाही” विरोधाभास || ६||

*

जीवन पूर्णत्वाची रास

जीवन पूर्णत्वाची आरास…

नरनारायण मीलन घडता

“नाही” विरोधाभास…..

☆ 

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणरायास विनवणी… ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ गणरायास विनवणी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

विनवी तुजला, श्री गणराया

अज्ञाना मम दूर कराया ||धृ||

*

चतुर्थीला रे पूजिती तुजला

श्रीगणेशा, पावसी सकला

चौदा विद्या, चौसष्ट कला

देशी तू रे, तुज भक्ताला ||१||

*

गजानना रे मंगल कार्या

निमंत्रिती तुज पूर्ण कराया

हेरंबा रे, प्रार्थिती तुजला

वरदहस्त हा द्यावा सकला ||२||

*

भावभक्तीचे पुष्प अर्पण्या

अधीर जाहली अवघी काया

मनोभावे वंदन तुजला 

लोटांगण रे तुझिया पाया ||३||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक २१ ते ३४) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक २१ ते ३४) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् ।

कारणं गुणसंगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ २१ ॥

*

अधिष्ठित होऊन प्रकृतीत पुरुष गुणा भोगितो

गुणसंयोग अनुसार योनीत भिन्न जन्म घेतो ॥२१॥ 

*

उपद्रष्टाऽनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।

परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥ २२ ॥

*

पुरुष भिन्न प्रकृती भिन्न पुरुष श्रेष्ठ परमात्मा

देहरूपी क्षेत्रात बद्ध प्रकृती कार्य साक्षात्मा

क्षेत्राचे करुनीया पोषण सुखदुःखा भोगितो

प्रकृतीच्या या क्रीडेचा सूत्रधार तो असतो ॥२२॥

*

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।

सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ २३ ॥

*

पुरुष निर्गुण सगुण प्रकृती जया जाहले ज्ञान

कर्म करी वर्तमानात तया पुनरपि ना जन्म ॥२३॥

*

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।

अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ २४ ॥

*

ध्यानाद्वारे योगी पाहत हृदयांतरी आत्मा

ज्ञानयोगे वा कर्मयोगेही प्राप्त होत आत्मा ॥२४॥

*

अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते ।

तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥ २५ ॥

*

नसेल ज्यांच्या ठायी याचे कसलेही ज्ञान

तरती मृत्यू उपासनेने श्रवण करोनी ज्ञान ॥२५॥

*

यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजङ्गमम् ।

क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ २६ ॥

*

स्थावर-जंगम वा काही निर्मिती जगात

क्षेत्र-क्षेत्रज्ञ संयोगाने जाणुनी घे भारत ॥२६॥

*

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्र्वरम् ।

विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ २७ ॥

*

अंतरी सर्व भूतांच्या वास समान परमेश

नाश जाहला भूतांचा तरी तयाचा न नाश

या तत्वाला जो जाणी तोचि खरा ज्ञानी

प्रज्ञा त्याची जागृत झाली तोची ब्रह्मज्ञानी ॥ २७॥

*

समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।

न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ २८ ॥

*

समप्रज्ञेने जाणतो सर्वत्र ईश्वर समान व्यापितो

आत्मघात ना होतो त्यासी श्रेष्ठ गतीला तो पावतो ॥२८॥

*

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।

यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥ २९ ॥

*

प्रकृती समस्त कर्मांची कर्ता आत्मा हा अकर्ता

ऐसे ज्ञान जया जाहले तत्वज्ञानाचा तो ज्ञाता ॥२९॥

*

यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।

तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥ ३० ॥

*

भिन्न भूतांची रूपे एक तयांचा आत्मा

ज्ञानाने ऐश्या होई प्राप्त तयासी ब्रह्मात्मा ॥३०॥

*

अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्माऽयमव्ययः ।

शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ ३१ ॥

*

आदि न अंत निर्गुण तथा निर्विकारी हा परमात्म

देहस्थ जरी तो कौन्तेया अकर्मी गुणांपासुनी अलिप्त ॥३१॥

*

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।

सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ ३२ ॥

*

सूक्ष्मत्वाने चराचरात जरी आकाश कुठे ना लिप्त

तद्वत् समस्त देह व्यापूनी आत्मा गुणासि ना लिप्त ॥३२॥

*

यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः । 

क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशति भारत ॥ ३३ ॥

*

रवि एक प्रकाशितो विशाल समस्त या जगताला

एक क्षेत्रज्ञ प्रकाशितो अगणित साऱ्या क्षेत्राला ॥३३॥

*

क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा ।

भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥ ३४ ॥

*

ज्ञानचक्षुने अवलोकिले क्षेत्र-क्षेत्रज्ञामधील भेद

भूतप्रकृती मोक्ष जाणुनी प्राप्त तयासी परमपद ॥३४॥

*

॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ‘ क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो ‘ नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३॥

*

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी क्षेत्रक्षेत्रज्ञयोग नामे निशिकान्त भावानुवादित त्रयोदशोऽध्याय संपूर्ण ॥१३॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “माझा बाप्पा… घरी येता…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “माझा बाप्पा… घरी येता… ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

बाप्पा रे बाप्पा 

तू घरी असता 

मला नाही चिंता 

कशाचीच आता…

*

तुझ्या माझ्या गप्पा

होतीलच आता

मनातलं सारं

येईल तुला सांगता…

*

तुझ्याकडे आता वेळच वेळ

तुझा माझा छान बसेल मेळ 

घरीच रंगेल प्रत्येक खेळ

सोबतीला गोड गोड प्रसादाची भेळ…

*

तू घरी आल्यावर

कोणीच नाही मला ओरडत

छोट्या छोट्या खोड्यांनी 

कुणाचे काही नाही बिघडत…..

*

घरी सर्वांना गडबड घाई

मला कोणी ओरडत बसत नाही

गोड खाऊ न मागताच हातावर येई

तुझ्यासोबत माझीही चैन मग होई….

*

तुझी माझी जमते गट्टी

मी ही नाही वागत मग हट्टी

अभ्यासाला हळूच घेऊन सुट्टी

शाळेला ही कधीतरी मारतो बुट्टी….

*

म्हणूनच देवा मी तुझी वाट पाहतो

तुझ्या येण्याची छान तयारी करतो

माझा बाप्पा मला हवाच असतो

गणेश चतुर्थीला तो माझ्याच घरी राहतो….

*

वाजत गाजत येतो

हसत खेळत राहतो

मना प्रसन्न ठेवतो

दुःख सारे संपवून टाकतो….

*

सर्वांना बुध्दी छान देतो

आम्ही सगळे त्याचेच ऐकतो

म्हणूनच मोठ्यांच्या ओरड्यापासून 

मी रोज रोज बचावतो….

*

देव बाप्पा देव बाप्पा

मला वाटते आता

तू नेहमीच आमच्या घरी रहावा

मोठ्यांनाही थोडं लहानपण दे गा देवा….

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गाई गुणगान आवडीने… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ गाई गुणगान आवडीने ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

आगमन आज | श्री गणपतीचे ||

 प्रसन्न मनाचे | आवडीने ||1||

*

 छान सजावट | बाप्पाच्या समोर ||

रांगोळी सुंदर | रेखीयेली ||2||

*

 लाईट पताका | चमकती भारी |

मूर्ती ही साजरी |. दिसतसे ||3||

*

 मनोभावे पूजा | आज दिनी करी |

नैविद्यास पुरी | अर्पियेली ||4||

*

दुर्वा जास्वनंद | वहावी भक्तीने |

बाप्पा आरतीने | नाचतसे ||5||

*

 मोदक उकडी | गूळ खोबऱ्याचे |

गुण प्रसादाचे | दावीयेती ||6||

*

रूप मनोहर | दिसतसे फार |

जरी पितांबर | नेसलासे ||7||

*

 कंठात माणिक | मोतीयांच्या माळा |

 पायात हो वाळा | शोभतंसे ||8||

*

 गाई गुणगान | आवडीने देवा |

 वृंदाचा ठेवा | सोनियाचा ||9||

 – दत्तकन्या

© सौ. वृंदा गंभीर

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दयाघना तूच सांग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ दयाघना तूच सांग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

पाणावले डोळे,

पापणीस पूर.

ऊर फाटून विदीर्ण,

सोडताना घर.

*

असे कसे झाले,

पाणी अनावर.

बंध संयम तोडून,

आला महापूर.

*

उघड्या डोळ्यांनी सताड,

मृत्यू सोहळे पहावे.

अशा निर्दयी पाण्याला,

कसे जीवन म्हणावे?

*

आर्ततेने आता,

हाक कोणास मारावी?

दयाघना तूच सांग,

कशी प्रार्थना करावी.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print