मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवाळी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ कवितेचा उत्सव ☆ दिवाळी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दिवाळी आली.. दिवाळी आली

आली दिवाळी आली……..

 

तेजोमय ही वसने ल्याली

मंगलमय अति सुभग पाऊली

आनंद उधळत आली

आली, आली दिवाळी आली…

 

दारावरती तोरण

अंगणी ताजी सडा रांगोळी

अवतीभवती लखलखती

सांगती पणत्यांच्या ओळी

आली, आली दिवाळी आली…

 

पाऊल ठेवे जिथे जिथे ती

समृद्धीला येई भरती

दीप उजळूनी तिची आरती

करण्या सृष्टी सजली

आली, आली दिवाळी आली…

 

दूर तिथे पण काय जहाले

दिवाळीचे का पाऊल अडले

घुसमटलेले सावट आले

जीवांची किती काहिली

तेथे दिवाळी भांबावली……….

 

चोहीकडे दारिद्र्यची सांडे

अज्ञानाचे जमले तांडे

मनातले ते मनात मांडे

आयुष्य काळोखली

तेथे दिवाळी ही थबकली…….

 

वर्षामागुन वर्षे सरली

दुभंगून जणू सृष्टी गेली

सधन- निर्धनामधली पोकळी

वाढतची राहिली

तेथे दिवाळी जणू हरवली…….

 

फुलू दे हिरवळ समानतेची

झुळझुळ लकेर मानवतेची

विश्वबंधुता मनात फुलता

मिटेल ही पोकळी

येईल इथेही दिवाळी ……….

येऊ द्या इथेही दिवाळी…….

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – वेध दिवाळीचे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य – वेध दिवाळीचे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

( मुक्तछंद )

मांदियाळीचे

वेध दिवाळीचे

भाव काव्य मनीचे.. . . !

प्रकाश सण

दिवाळीचे क्षण

ठेवी जपोनी मन….!

आकाश दिवा

आठवांचा थवा

उत्साही रंग नवा ….!

दिवा पहिला

त्या एकादशीला

प्रारंभ दिवाळीला. . . . !

धेनू मातेचा

दिन बारसेचा

प्रेमळ गोमातेचा…!

धन तेरस

तिसरा दिवस

यश कीर्ती कलश….!

नरकासूर

विघ्ने सर्वदूर

निर्मळ अंतःपूर . . . . !

लक्ष्मी पूजन

समृद्धी सृजन

सुख, शांती, चिंतन.. . !

येई पाडवा

आनंद केव्हढा ?

मनोमनी गोडवा ….!

दिस बीजेचा

भाऊ बहिणीचा

मांगल्य वर्धनाचा.. . !

दिवाळी रंग

परंपरा बंध

भावमयी सुगंध …..!

दीप ज्योतीचा

सण दिवाळीचा .

ओलावा अंतरीचा.. . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसर्गाची ‘दीपावली’ ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ निसर्गाची ‘दीपावली’ ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी ☆ 

हिरवळीच्या अंगणात या

सोनपावले अवतरली

मेघमुखातून समृद्धीच्या

गर्जत आली दीपावली…

 

तृणा डोई तेजोमयी ते

आकाशपाळणे लखलखती

दवबिंदूंपरी आळवित जाते

गीत चराचे मनातूनी…

 

पंख जाहलो फुलपाखरांचे

स्नेह स्फुरले तनातूनी

रंग तयाचे गेले रेखीत

ह्रदयावरी या रंगावली…

 

अतिथीसम इंद्रधनु हा

पहा गृही मज डोकावितो

चैतन्याची कमान दारी

मोद अखंडित पाझरतो…

 

डोंगर उंची सद्गुणांची

अशी भिडते आकाशी

प्रकाश लेणी दीपसणाची

उजळीत जाते काळीजकुशी…

 

©  श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

मिरज, जि. सांगली

मोबाईल : 9922048846

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 72 – उत्सव पर्व ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 72 ☆

☆ उत्सव पर्व ☆

एका केशरी पहाटे

तू भेटलास-

एकाकी सुनसान रस्त्यावर

युगानुयुगे भ्रमंती केल्यावर

जसा भेटावा

कुणी मुसाफिर

जन्मजन्मांतरीचं नातं सांगणारा  !

तुझ्या डोळ्यात जादूगरी

आणि ओठांवर

ओळखीचं हसू!

ते इवलंसं हसू

मी मुठीत गच्च धरून ठेवलं-

तेव्हा पासून सुरू झालं

एक उत्सव पर्व-

तुझ्या माझ्या प्रीतीचं!

आता माझी प्रत्येक पहाट

असतेच रे केशरी

अन् प्राजक्त फुलासारखी

सुगंधीही !

दरवळतात मनात

रातराणी चे सुवासिक सोहळे!

तुझ्या क्षात्रतेजाने

गात्रागात्रात

उजळतात लक्ष लक्ष दीप

अन् काजळरात्र ही बनते

लखलखती दीपावली!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फक्त एक प्रश्न ☆ आर्कि. ओंकार केशव कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ फक्त एक प्रश्न ☆ आर्कि. ओंकार केशव कुलकर्णी ☆ 

काठ दाटून आले की, पूर आलाय हे साहजिकच?

डोळ्यातून पाणी येण्या पूर्वीचा क्षण काय सांगत असतो बरं खरचं?

मनाला सांगायचं असतं का खूप काही आणि बरचं?

की ह्रदय नावाचा अवयव ,फक्त हुंदकायचा करतो खर्च?

गलित झालेली गात्रे आखडून घेतात का स्वतः, की बळबळचं?

जाणीवांना भावनांचा ओलावा मिळतो की हे घडते सहजचं?

अजूनही वाटतं शेक्सपिअर जिवंत आहे , जगावं की नये हाच?

जोवर हा प्रश्न जिवंत आहे ,तोवर तो क्षण काय सांगत असतो खरचं?

 

© आर्कि. ओंकार केशव कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 71 ☆ नालस्तीची भिती …☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 71☆

☆ नालस्तीची भिती … ☆

तुझे आरशा स्वप्न भंगते

कुठे कुणाला जरा भावते

 

सूर्य चंद्र अन् नकोत तारे

मज जगण्याची भिती वाटते

 

कडकडून ते मला भेटले

नजरबंदिने पंख छाटले

जागेवरती फडफड माझी

उडण्याचीही भिती वाटते

 

डोळे खिडक्या त्यावर पडदे

गुडघ्यांचे या पडले मुडदे

थरथर करते काठीसुद्धा

उठता बसता भिती वाटते

 

शुभ्र कापूस डोक्यावरती

त्याची सांगू काय मी कीर्ति

प्रेमाने मी तेल चोळतो

सोबत सुटता भिती वाटते ?

 

दार मृत्युचे तिथे उभा मी

कसा कुणाच्या येऊ कामी

आत घेइना कोणी मजला

नालस्तीची भिती वाटते

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळजाच्या पायथ्याला…..☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ कवितेचा उत्सव ☆ काळजाच्या पायथ्याला…..☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

काळजाच्या पायथ्याला, वेदनेचा गाव आहे

सांगती ना पहा कुणी ही माणूस हा साव आहे…

 

कुढती किती ते अंतरी पण,पण मुखावरी ते हास्य आहे…

लाचार चेहरा माणसाचा हाय ! नशिबी दास्य आहे…

 

काळजाची वेदना ती हात हृदयालाच घाले

कळ येते जीवघेणी मन माणसाचे सोले

 

झाला जरी घायाळ कोणी हसून करतो साजरे

दहशत आहे भोवताली,घोट घेती मांजरे..

 

त्या परी हृदयात आहे कोंडलेले ते बरे

उसवताच त्याच जखमा फाडून खाती मांजरे

 

शिवून घेती आत आत दाखविती ते दात हो

भळभळणाऱ्या साऱ्या जखमा ..

मखमली तयांचा पोत हो …

 

गाठोडे ते घेऊन जाती सरणावरी ते थेट हो

दु:ख्ख आणि वेदनेची माणसाशी मोट हो

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि: १३/१०/२०२० वेळ: रात्री: ११:३०

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 23 ☆ सरी वर सरी… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 23 ☆ 

☆ सरी वर सरी… ☆

 (अंत्य-ओळ काव्य)

उन्हाळा हिवाळा पावसाळा

अनमोल दातृत्व निसर्गाचे

उन्हाळा संपता संपता

आगमन ते पर्जन्याचे…०१

 

आगमन ते पर्जन्याचे

सरी सर सर येती

सरी वर सर पडतांना

तुषार पाण्याचे उडती…०२

 

तुषार पाण्याचे उडती

इंद्रधनू सुरेख खुले

पाठशिवणीचा खेळ

ऊन सावलीचा चाले…०३

 

ऊन सावलीचा चाले

खेळ हा जन्मोजन्मीचा

निसर्गाच्या करामती

जन्म तोकडा माणसाचा…०४

 

जन्म तोकडा माणसाचा

क्षणभंगुर आयुमान हे

नावालाच ती शंभर वर्षे

स्वप्न जन्म-जन्मांचे पाहे…०५

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हरवलेली कविता ☆ श्री राजेंद्र परांजपे

 ☆ कवितेचा उत्सव ? हरवलेली कविता ? श्री राजेंद्र परांजपे ☆ 

मधुघट पडले कोरडे अन् काव्य झाले सूने !

कवितेस माझिया माझेच घर भासतसे नवे !

 

ना शब्दांची आस ती ना अर्थाचा जिव्हाळा !

कुठे हरवली मम प्रतिभा, पडे प्रश्न मनाला !

 

बहु दिसात न झरले, उतरले काही मनीचे !

नकळे का असे हे जीवघेणे रुसणे शब्दांचे !

 

सांडले ते विषयही अवघे दूर अन् कोठेतरी !

सोडीली साथ माझी, का रुद्ध माझ्यावरी?

 

पाहतो वाट मी, पुन्हा कधी ती प्रसववेदना !

कधी पुन्हा माझ्यावरी होईल प्रसन्न शारदा !

 

अंतर्यामी हरवले जे, ते पुन्हा गवसेल का?

हृदयातली कविता हृदयातूनी प्रसवेल का?

 

© श्री राजेंद्र परांजपे

०७ सप्टेंबर २०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 53 – घडू दे दर्शन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 54 – घडू दे दर्शन ☆

तुच द्रौपदी, आहिल्या,

सीता, तारा, मंदोदरी।

किती युगे पालटली

कसोटीच्या त्याच परी।

 

इथे लागते  पणाला

रोज द्रौपदी नव्याने ।

कान्हा विसरला आज

धावा ऐकून  धावणे।

 

किती शापीत आहिल्या

शीलारुप गावोगावी।

तया उध्दारीना कोणी

आज रामाच्या अभावी।

 

दिला शब्द पाळणारा

हरिश्चंद्र ना जगती।

रोज लिलाव मांडण्या

हवी त्यास तारामती।

 

लाखो रावण मातले

पेटविल्या सीता किती।

हातबल राम आज

विसरला बाण भाती।

 

ज्ञानी योद्ध्या रावणास

उमजेना मंदोदरी।

पातिव्रत्य दानवाचे

सांभाळते घरोघरी.।

 

सत्व परीक्षा सोडून

करी असूर मर्दन।

काली दुर्गा भवानीचे

पुन्हा घडू दे दर्शन।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares