श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत भावप्रवण कविता “शौकिनांचे शहर”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 48 ☆
☆ शौकिनांचे शहर ☆
कधी गाव होते नगर आज झाले
वहात्या नदीवर कहर आज झाले
इथे रोज जन्मास येतात रस्ते
किती वृक्ष येथे अमर आज झाले
इथे काल होती वने टेकड्याही
तिथे शौकिनांचे शहर आज झाले
कधी भ्रष्ट म्हणुनी तुरुंगात गेले
पुन्हा मुळपदावर हजर आज झाले
दुकानात मंदी मला हे कळेना
पुढारी कशाने गबर आज झाले
नको ना बखेडा जरी मी म्हणालो
तुझा हट्ट होता समर आज झाले
अशोकास मुक्ती कशाने मिळाली
तिचे मोकळे हे अधर आज झाले
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८