मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – स्वप्नपाकळ्या # 14 ☆ गुलाबी ☆ श्री प्रभाकर महादेवराव धोपटे

श्री प्रभाकर महादेवराव धोपटे

ई-अभिव्यक्ति में श्री प्रभाकर महादेवराव धोपटे जी  के साप्ताहिक स्तम्भ – स्वप्नपाकळ्या को प्रस्तुत करते हुए हमें अपार हर्ष है। आप मराठी साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। वेस्टर्न  कोलफ़ील्ड्स लिमिटेड, चंद्रपुर क्षेत्र से सेवानिवृत्त अधिकारी हैं। अब तक आपकी तीन पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं जिनमें दो काव्य संग्रह एवं एक आलेख संग्रह (अनुभव कथन) प्रकाशित हो चुके हैं। एक विनोदपूर्ण एकांकी प्रकाशनाधीन हैं । कई पुरस्कारों /सम्मानों से पुरस्कृत / सम्मानित हो चुके हैं। आपके समय-समय पर आकाशवाणी से काव्य पाठ तथा वार्ताएं प्रसारित होती रहती हैं। प्रदेश में विभिन्न कवि सम्मेलनों में आपको निमंत्रित कवि के रूप में सम्मान प्राप्त है।  इसके अतिरिक्त आप विदर्भ क्षेत्र की प्रतिष्ठित साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं के विभिन्न पदों पर अपनी सेवाएं प्रदान कर रहे हैं। अभी हाल ही में आपका एक काव्य संग्रह – स्वप्नपाकळ्या, संवेदना प्रकाशन, पुणे से प्रकाशित हुआ है, जिसे अपेक्षा से अधिक प्रतिसाद मिल रहा है। इस साप्ताहिक स्तम्भ का शीर्षक इस काव्य संग्रह  “स्वप्नपाकळ्या” से प्रेरित है ।आज प्रस्तुत है उनकी एक  भावप्रवण कविता “गुलाबी“.) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  – स्वप्नपाकळ्या # 14 ☆

☆ गुलाबी

 

गुलाबी चेह-यावरी गुलाबी, छटा दिसते मज अशी

अंबरातुनी फुले बरसली, तुझ्या तनुवर जशी

 

हि-यातुनी किरणे फाकावी, तसे तुझे ते स्मीत

त्या किरणांनी प्रीत बहरली, जगावेगळी रीत

 

तुझ्या तनुची झाक गुलाबी,ओठांची तव फाक गुलाबी

श्वासासोबत अवतीभवती, सुगंधही दरवळे

 

फूलपाकळ्या अशा विखुरल्या, जणू फूलपाखरे

साडीवर तव येऊनी बसल्या, खोटे की हे खरे

 

मनातला हा गुलाब आता, विसावला बघ तिथे

मृदू कठोरचा संगम होई ,गुलाबी गाभा जिथे

 

©  प्रभाकर महादेवराव धोपटे

मंगलप्रभू,समाधी वार्ड, चंद्रपूर,  पिन कोड 442402 ( महाराष्ट्र ) मो +919822721981

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विडंबन कविता – दिवस ‘सेल’चे ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)

आज प्रस्तुत है वरिष्ठ कवी स्व ग ह पाटील जी की उत्कृष्ट कविता लेझीम पर आधारित आपकी एक विडंबन कविता – दिवस ‘सेल’चे हम भविष्य में भी आपकी सुन्दर रचनाओं की अपेक्षा करते हैं।

 

☆ लेझीम ☆

(जुने श्रेष्ठ, कवी  कै. ग.ह. पाटील यांची उत्कृष्ट कविता.)

दिवस  सुगीचे  सुरू जाहले।

ओला चारा बैल माजले।

शेतकरी मन प्रसन्न झाले

खळखळ, छुमछुम,डुमडुम, पटडुम

लेझिम  चाले जोरात ।।

 

☆ विडंबन कविता— दिवस ‘सेल’चे ☆

 

दिवस सेलचे सुरु जाहले ।

जिकडेतिकडे बोर्ड झळकले ।

बायांचे मन प्रसन्न झाले ।

पटकन, झटकन, भर्कन, सर्कन

विक्री होतसे  जोरात  ।।

न ऊ  वाजता शटर उघडती

गाद्यागिरद्या  स्वच्छ करती

सुंदर साड्या बाहेर टांगती

इकडून, तिकडून, नटून, थटून

सेल्स गर्ल्स  येती  झोकात  ।।

नाश्ता, सैपाक, धुंदीत उर्कून

‘त्या’च्या कडुनी रक्कम उकळून

फोन वरुनी  मैत्रीणी  जमवून

भरभर,तरतर, लवकर, गरगर

फिरति सख्या बाजारात  ।।

इथे  ‘हकोबा ‘तिथे ‘बांधणी’

गर्भ रेशमी किंवा ‘चिकणी’

साड्यांची राणी हि पैठणी

सुळुसुळु,झुळुझुळु, हळूहळू, भुळभुळु

ढीग संपतो तासात  ।।

विटकी,फाटकी  कुठे कुठे

घरि आल्यानंतर कळते ।

कपाट जरि भरभरुन वाहते ।

भुलवी,झुलवी, खुळावतो हा

सेल अखेरी महागात  ।।

© मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे # 36 –वटपौर्णिमा व जागतिक पर्यावरण दिवस – वृक्षवल्लरी लावु चला या ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। दिनांक ५-६-२० वटपौर्णिमा व जागतिक पर्यावरण दिवस के अवसर पर आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी की रचना  “ वृक्षवल्लरी लावु चला या”।  उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है।  ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )

☆ केल्याने होतं आहे रे # 36 ☆

☘️ ? ☘️ वृक्षवल्लरी लावु चला या ☘️ ? ☘️  ☆ 
दिनांक ५-६-२० वटपौर्णिमा व जागतिक पर्यावरण दिवस

 

माझ्या वृक्षवल्लरी लावु चला या कवितेतील पहिले कडवे :-

 

चला चला रे चला चला..

वृक्षवल्लरी लावु चला……!!धृ.!!

 

वटवृक्षाची आगळीच शान !

हिरव्या हिरव्या पानांत बुंदके लाल छान !

वटपौर्णिमेला ह्यालाच मान !

आधारवड हा पांतंस्थांचा ,पक्षीगणांचा !

रक्षण त्यांचे करु चलाऽऽ….

चला चला रे चला चला………

 

©️®️उर्मिला इंगळे

सातारा

दिनांक: 05 -06-20.

!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 39 ☆ गावाचेच घेतो नाव ☆ सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

(सौ. सुजाता काळे जी  मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं। वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं।  उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है  सौ. सुजाता काळे जी  द्वारा  रचित एक अतिसुन्दर भावप्रवण  कविता  गावाचेच घेतो नाव। )

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 39 ☆

गावाचेच घेतो नाव  

अधुन मधुन वळतो मी

बघण्या माझा गाव

वडाच्या पारंब्यावर

झोक्याची झुकलेली मान

 

रहाटाच्या दोरीचे वळ

तळहातावर अजून

सरपण काढताना

उठलेले व्रण ठासून

 

रोज चोळून घासतो

हातावरचा डाग

आईने फेकून मारलेल्या

जळत्या लाकडाचा डाग

 

निखारा तो धगधगतो

गाव सोडला तरीही

कोरभर भाकरीसाठी

आई वडिलांची गरीबी

 

ही गरीबी दूर करण्या

गेलो सोडून मी गाव पण

माझी ओळख सांगण्या

गावाचेच घेतो नाव .

 

© सुजाता काळे

पंचगनी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – विजय साहित्य – हरवलाय  मित्र माझा.  . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है  आपकी एक भावप्रवण कविता  “हरवलाय  मित्र माझा.  . ! ,

☆ साप्ताहिक स्तम्भ – विजय साहित्य ☆

☆ हरवलाय  मित्र माझा.  . ! ☆  

 

हरवलाय  मित्र माझा.  . !

त्याचा, …तिचा, . . .

ह्याचा,  … तुमचा …

जसा आहे ना  . . .

अगदी तसाच आहे . . .

जीवाभावाचा

मित्र माझा. पण .. .

सध्या. . . .  हरवलाय. . .

कुणी म्हणतं सोशल झालाय

कुणी म्हणतं लोकल झालाय.

वाॅटस्अप ,फेसबुक, वेबसाईट

दमलोय आता ,शोध घेऊन

कोण जाणे? कुठे बसलाय जाऊन ?

नाही म्हणायला. . . .  संवाद घडतोय

पण.. .

मेसेज मधुनच बोलतोय

ईमेल मधून भेटतो

सारख बदलतो स्टेटस

स्वतः  कधी , समोर येतच नाही

वाद नाही, . . विवाद  नाही

भांडण, तंटा . . काहीच नाही.

नुसता आपला .. . छापील संवाद

हाय,हॅलो, . . कसा आहेस?

गुडमाॅर्नींग .. . गुडनाईट. ..!

मिसिंग की . . मिस् प्लेस

काय झालंय ,? कळत नाही

पण….

हरवलाय मित्र माझा.

जिवंत, हाडामासाचा,संवेदनशील

विचारी, विवेकी संयमी

तर कधी

भांडखोर, चिडखोर. . .

हळवा , प्रेमळ,

अन  भावविभोर. .

समोर दिसताच धावणारा

गळाभेट घेणारा

मन मोकळे करणारा

हरवलाय मित्र माझा.

अरे,  तुमचा मोबाइल

नवीन दिसतोय

त्याच्यात आहे का हो

साॅफ्टवेअर एखादं

फेसबुक वरच अपडेट,

मिडियाच अपलोड

हार्ट वर्क मधे

डाऊनलोड करणारं

त्याची छबी ,छापील संवाद

चेहर्‍यावरचे हावभाव

काळजामधे उतरवणार

मनामनात रूजणारं

आहे का साॅफ्टवेअर एखाद?

या संगणकीय युगात

मशीन नको . . माणूस हवाय

कुठलीही कळ दाबताच

नव्या विश्वात नेणारा.

फक्त चेहरा बघताच

सारं मन वाचून घेणारा.

मनकवडा मित्र माझा

बघताय ना. ? प्लीज. . .

शोधताय ना.. . खरंच. . .

खरच. . .

हरवलाय मित्र माझा. . . !

(श्री विजय यशवंत सातपुते जी के फेसबुक से साभार)

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 48 –एकांताची करतो सोबत. . . . ! ☆ सुजित शिवाजी कदम

सुजित शिवाजी कदम

(सुजित शिवाजी कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी एक भावप्रवण गझल  “एकांताची करतो सोबत . . . . !”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। ) 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #48 ☆ 

☆ गझल – एकांताची करतो सोबत ☆ 

 

एकटाच रे नदीकाठी या वावरतो मी

प्रवाहात त्या माझे मी पण घालवतो मी

 

सोबत नाही तू तरीही जगतो जीवनी

तुझी कमी त्या नदी किनारी आठवतो मी

 

हात घेऊनी हातात तुझा येईन म्हणतो

रित्याच हाती पुन्हा जीवना जागवतो मी

 

घेऊन येते नदी कोठूनी निर्मळ पाणी

गाळ मनीचा साफ करोनी लकाकतो मी.

 

एकांताची करतो सोबत पुन्हा नव्याने

कसे जगावे शांत प्रवाही सावरतो मी .

 

© सुजित शिवाजी कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

दिनांक  16/2/2019

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 52 – गझल – ना इथे ना राहते आहे तिथे ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  एक  अत्यंत भावप्रवण  गझल  “ना इथे ना राहते आहे तिथे।  सर्वव्याप्त अदृश्य ईश्वर का साथ और पृथ्वी  पर उसकी अपेक्षाओं  पर आधारित एक अप्रतिम रचना । सुश्री प्रभा जी द्वारा रचित संवेदनशील रचना के लिए उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 52 ☆

☆ गझल – ना इथे ना राहते आहे तिथे ☆ 

 

सोसला  दुष्काळ हा, आता तरी,

पावसाच्या बरसु दे झरझर सरी

 

जातिधर्माचे कशाला दाखले

वाढते आहे विषमतेची दरी

 

तू किती नाकारल्या काळ्या मुली

भांडते रात्रंदिनी गोरी परी

 

कष्ट करणे टाळले वरचेवरी

देत आहे कोण भाजी भाकरी ?

 

ना इथे ना राहते आहे तिथे

भेटला मज विश्वव्यापी तो हरी

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ उत्सव कवितेचा # 6 – संदेश ☆ श्रीमति उज्ज्वला केळकर

श्रीमति उज्ज्वला केळकर

(सुप्रसिद्ध वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उज्ज्वला केळकर जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आपके कई साहित्य का हिन्दी अनुवाद भी हुआ है। इसके अतिरिक्त आपने कुछ हिंदी साहित्य का मराठी अनुवाद भी किया है। आप कई पुरस्कारों/अलंकारणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी अब तक दस पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं एवं 6 उपन्यास, 6 लघुकथा संग्रह 14 कथा संग्रह एवं 6 तत्वज्ञान पर प्रकाशित हो चुकी हैं।  हम श्रीमति उज्ज्वला केळकर जी के हृदय से आभारी हैं कि उन्होने साप्ताहिक स्तम्भ – उत्सव कवितेचा के माध्यम से अपनी रचनाएँ साझा करने की सहमति प्रदान की है। आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता  ‘संदेश’ ।आप प्रत्येक मंगलवार को श्रीमति उज्ज्वला केळकर जी की रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – उत्सव कवितेचा – # 6 ☆ 

☆ संदेश 

आपल्या

आकांती हिमवर्शावाने

अवघं जीवन

उध्वस्त करण्याच्या

उन्मादात

शिशिराने

थैमान मांडला होता.

त्याच वेळी,

झाडांचा संदेश घेऊन

निघालेली पाने

मातीच्या कानी लागत

म्हणाली-

माते, आता तरी वाहू दे

तुझ्या काळजातील अमृतधारा

मिळू दे थेंब…थेंब ….

झाडांच्या शिखा-शेंड्यांना

उमटू देत पुन्हा

शाश्वताच्या खाणा-खुणा

त्यांच्या कटी-खांद्यावर

 

© श्रीमति उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 51 ☆ ईश्वरी प्रकाश ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत मार्मिक, ह्रदयस्पर्शी एवं भावप्रवण कविता  “ईश्वरी प्रकाश।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 51 ☆

☆ ईश्वरी प्रकाश☆

हातात काहीच नसताना

कवितेच्या अंगणात

शब्दांची रांगोळी काढण्याची कला

ईश्वराने मला बहाल केली…

एवढेच नव्हे तर

त्या रांगोळीची छबी

कायम स्मरणात राहावी म्हणून

मेंदूच्या कॕमेऱ्यात ती टिपण्याची

क्षमताही दिली…

काल सहस्तचंद्र दर्शन सोहळ्यात

काढलेली रांगोळी

पुसून टाकलेली पाहिली

आणि मला

मी शब्दांच्या काढलेल्या रांगोळ्याची

आठवण झाली…

त्या रांगोळ्यांचे रंगही

आता पुसट होत चालले आहेत

डोळ्यांवरचा पडदा सरकतो आहे

डोळ्यांच्या बाहुल्या झाकण्यासाठी

आणि मी पापण्या ताणून पहातोय

अंधाराच्या पलिकडचा तो

ईश्वरी प्रकाश…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 2 ☆ व्यथा साहित्यिकांच्या… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी) का ई- अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। आप मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है उनकी भावप्रवण कविता “व्यथा साहित्यिकांच्या…”)

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 2 ☆ 

☆ व्यथा साहित्यिकांच्या…… ☆

व्यथा साहित्यिकांच्या

सांगाव्या तरी कशा

त्या व्यथा कथा बनल्या.. ०१

 

नेहमीच आशावादी असता

निराशा येई पदराला

त्या व्यथा कथा बनल्या..०२

 

शब्द-कल्पना घेऊन ओझे

सुरुवात होई लेखनाला

त्या व्यथा कथा बनल्या..०३

 

शब्द सुमनांजली केली

परी ती पुस्तकात लोपली

त्या व्यथा कथा बनल्या..०४

 

थोर साहित्यिकांचे साहित्य

अभ्यासात फक्त उरले

त्या व्यथा कथा बनल्या.. ०५

 

असे कसे हो हे घडले

उत्तर कुणाला न सापडले

त्या व्यथा कथा बनल्या..०६

 

काव्यपुष्प चोरल्या जाते

पाकळ्या तव चुरगाळल्या

त्या व्यथा कथा बनल्या..०७

 

संमेलन होतात भव्य कुठे

साहित्यिकांची कुबडी घेऊन

त्या व्यथा कथा बनल्या

 

शेवटी एक व्यथा उरली

कवी शापित गंधर्व ठरला

त्या व्यथा कथा बनल्या..०८

सांगणे इतुकेच माझे आता गडे

अंध ह्या चालीरीतीला पाडा तडे

राज कवीचे शब्द आता तोकडे.. ४

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन,

वर्धा रोड नागपूर,(440005)

मोबाईल ~9405403117, ~8390345500

Please share your Post !

Shares
image_print