श्री अशोक श्रीपाद भांबुरे
((वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक कविता “करू दिवाळी साजरी”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 22 ☆
☆ करू दिवाळी साजरी ☆
उठू पहाटेच्यापारी
करू दिवाळी साजरी
स्नान उरकले आता
जाऊ दर्शना राऊळी
आनंदाची ही दिवाळी
गाली आणते हो खळी
साऱ्या संसारा सोबत
नटे फुलांची डहाळी
आज अभ्यंगस्नानाला
न्हाऊ घालते ती मला
ओवाळणीत मागते
नवी साडी आणि चोळी
माहेराहून येईन
माझी लाडकी बहीण
आणि भरून नेईल
प्रेम नात्यांची ही झोळी
रंगीबेरंगी फटाका
मारी आकाशी धडका
आनंदाने ही लेकर
बघा वाजवती टाळी
दारामधे ही रांगोळी
हाती फराळाची थाळी
पाडव्याच्या मुहुर्ताला
नवी सोन्याची साखळी
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८