मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #28 – सदरा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक  सामयिक कविता  “सदरा”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 28 ☆

☆ सदरा ☆

 

चुलीत नाही आग म्हणूनी जळतो आहे

आयुष्याचा मला निखारा छळतो आहे

 

जुनाट गळक्या छपरावरती धुके उतरले

पत्र्याच्या डोळ्यांतुन अश्रू गळतो आहे

 

तारुण्याला सावरणारा पदर फाटका

पिसाटलेला चहाड वारा चळतो आहे

 

तुझे पावसा रूप असे की वैरी कोणी

संसाराची करून माती पळतो आहे

 

डोंब भुकेचा ज्याला त्याला छळतो आहे

संसाराचा अर्थ कुणाला कळतो आहे

 

सफेद सदरा चारित्र्याचा किती जपावा

चिखल फेकिने सदरा माझा मळतो आहे

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ मराठी कविता ☆ लढाई ☆ सौ .योगिता किरण पाखले

सौ .योगिता किरण पाखले

(आदरणीया सौ .योगिता किरण पाखले जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की  सशक्त हस्ताक्षर हैं। आप कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी रचनाएँ स्तरीय पत्र पत्रिकाओं / चैनलों में प्रकाशित/प्रसारित हुई हैं। आज प्रस्तुत है आपकी  एक सामयिक एवं समाजकंटकों के प्रति युद्ध के उद्घोष  तथा नारी सशक्तिकरण  पर मानसिक द्वंद्व से उपजी  कविता “लढाई”। हम भविष्य में आपकी और चुनिन्दा रचनाओं को प्रकाशित करने की अपेक्षा करते हैं।)   

 ☆ लढाई ☆

 

हृदय हेलावणारी

दिशादिशात घुमणारी

ती आर्त किंकाळी

अनंतात विलीन झाली

नराधमांची भूक भागता

सारे काही स्तब्ध….

एक निरव भयाण शांतता

नव्यानं येणार वादळ शांत करण्यासाठी….

बस ……..

आता बस…..

उठ निर्भया ,उठ..

यदा यदा हि धर्मस्य

नकोच आठवू

नाही येणार तो कृष्ण

घट्ट कर ती साडी  निर्भयतेची ……

अन हो सारथी तू तुझ्याच रथाची…

धृतराष्ट्र बसलेत सारे

दु:शासनाचा पराक्रम पाहण्यासाठी….

सांग एकदा त्यांना,

तुझ्या जीवाची किंमत फक्त नाही फाशीचा दोर

अजूनही लपलेत येथे काही सावज अन चोर

नवीन निर्भया चिरडण्यासाठी…..

आता तरी पेटू दे गं

तुझ्यातील अंगार

जातांना देऊन गेलीय निर्भया

एक चिंगार…..

भडकू दे वणवा, भस्मसात कर सारे दु:शासन

कशाला हवे न्यायव्यवस्थेचे शासन….

एका निकालाने वासनांधांची भूक नाही शमनार इतक्यात

म्हणूनच …….उठ

लढाई अजून संपलेली नाही

कारण तू अजून जिंकलेली नाही

तू अजून जिकलेली नाही….

 

© सौ. योगिता किरण पाखले, पुणे

मोबा 9225794658

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 27 – ईश स्तवन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है  ईश्वर की स्तुति  स्वरुप  भजन/कविता   “ईश स्तवन” । )

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 27 ☆ 

 ☆ ईश स्तवन

 

नित्य मागतो मी दाता, शुध्द राहो तन मन।

द्वैत बुद्धी त्यागुनिया स्थिर व्हावे अंतःकरण ।।धृ।।

 

मना मनांच्या तारांचे, यावे प्रेमळ झंकार।

खुंट्या भेदाच्या आवळी, ऐक्य गीत आविष्कार ।

स्वार्थ त्यागुनिया लाभो सम बुद्धी अधिष्ठान न।।१।।

 

नको लालसा नि धन शमवावी चित्तवृत्ती।

श्रमाप्रती राहो प्रीती, हीच ऐश्वर्य संपत्ती।

साद ऐकुनिया धावे, ऐसे देई प्रिय जन।।२।।

 

देव, देश, धर्मा प्रती, मनी वाढवावी गोडी।

साधुसंत संतीला,  आणि सज्जनांची जोडी।

वैऱ्याचेही  व्हावे मनी, मज अभिष्ट चिंतन।। ३।।

 

जीव जीवा लावणाऱ्या, सोबत्यांचा संगे मेळा।

बळ देतील लढण्या, सुख दुःखाच्याही वेळा।

होती आनंद सोहळा, असे स्वर्गीय जीवन।।४।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 25 – जगायला शिकू… ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर कविता जगायला शिकू… )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #25☆ 

 

☆  जगायला शिकू… ☆ 

 

श्वास घेऊनीच आलो

श्वास होऊनीच जाऊ

आयुष्यात सुख दुःख

थोडं देऊ थोडं घेऊ. . . . !

 

कुणी असा कुणी तसा

प्रश्न रोजचाच आहे

माझ्या त्यांच्या मनामध्ये

राग लपलेला आहे…!

 

सूत्र जीवनाचे साधे

नाही कळले कोणाला

जन्म गेला माणसात

माणसाला शोधण्याला . . . . !

 

मातीमध्ये उगवलो

आस आभाळाची ठेऊ

ऊन, पाऊसा सारखे

जरा जगायला शिकू…!

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 27 – मी ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनकी एक कविता  “मी.  सुश्री प्रभा जी  ने  ‘मी ‘ अर्थात ‘ मैं ‘  शीर्षक से  अपने बारे में जो बेबाक विचार लिखे, हैं वे अकल्पनीय है। वास्तव में स्वयं के बारे में  लिखना अथवा आत्मावलोकन कर लिपिबद्ध करना अत्यंत कठिन है। किन्तु, उन्होंने इतने कठिन तथ्य को अत्यंत सहज तरीके से कलमबद्ध कर दिया है कि कोई भी बिना उनसे मिले या बिना उनके बारे में जाने भी उनके व्यक्तित्व को  जान सकता है।  स्वाभिमान एवं सम्मानपूर्वक मौलिक व्यक्तित्व एवं मौलिक रचनाओं की सृष्टा, एक सामान्य इंसान की तरह, बिना किसी बंधन में बंधी  एकदम सरल मुक्तछंद कविता की तरह। मैं यह लिखना नहीं भूलता कि  सुश्री प्रभा जी की कवितायें इतनी हृदयस्पर्शी होती हैं कि- कलम उनकी सम्माननीय रचनाओं पर या तो लिखे बिना बढ़ नहीं पाती अथवा निःशब्द हो जाती हैं। सुश्री प्रभा जी की कलम को पुनः नमन।

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 27 ☆

☆ मी ☆ 

 

मी नाही देवी अथवा

समई देवघरातली!

मला म्हणू ही नका

कुणी तसले काही बाही !

 

कुणा प्रख्यात कवयित्री सारखी

असेलही माझी केशरचना,

किंवा धारण केले असेल मी

एखाद्या ख्यातनाम कवयित्री चे नाव

पण हे केवळ योगायोगानेच !

मला नाही बनायचे

कुणाची प्रतिमा किंवा प्रतिकृती,

मी माझीच, माझ्याच सारखी!

 

एखाद्या हिंदी गाण्यात

असेलही माझी झलक,

किंवा इंग्रजी कवितेतली

असेन मी “लेझी मेरी” !

 

माझ्या पसारेदार घरात

राहातही असेन मी

बेशिस्तपणे,

किंवा माझ्या मर्जीप्रमाणे

मी करतही असेन,

झाडू पोछा, धुणीभांडी,

किंवा पडू ही देत असेन

अस्ताव्यस्त  !

कधी करतही असेन,

नेटकेपणाने पूजाअर्चा,

रेखितही असेन

दारात रांगोळी!

 

माझ्या संपूर्ण जगण्यावर

असते मोहर

माझ्याच नावाची !

मी नाही करत कधी कुणाची नक्कल

किंवा देत ही नाही

कधी कुणाच्या चुकांचे दाखले,

कारण

‘चुकणे हे मानवी आहे’

हे अंतिम सत्य मला मान्य!

म्हणूनच कुणी केली कुटाळी,

दिल्या शिव्या चार,

मी करतही नाही

त्याचा फार विचार!

 

कुणी म्हणावे मला

बेजबाबदार, बेशिस्त,

माझी नाही कुणावर भिस्त!

मी माणूसपण  जपणारी बाई

मी मानवजातीची,

मनुष्य वंशाची!

मला म्हणू नका देवी अथवा

समई देवघरातली!

मी नाही कुणाची यशोमय गाथा

मी एक मनस्वी,

मुक्तछंदातली कविता!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #27 – वासनांचे कोपरे ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक  सामयिक कविता  “वासनांचे कोपरे”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 27 ☆

 

☆ वासनांचे कोपरे ☆

 

केवढे हे कौर्य घडते रोज येथे बाप रे

मी मुलीचा बाप आहे येत नाही झोप रे

 

पावसाळा गाळ सारा घेउनी गेला जरी

स्वच्छ नाही होत यांच्या वासनांचे कोपरे

 

जाळण्या कचऱ्यास बंदी जाळती नारीस हे

वृत्तपत्रे छापतांना अक्षरांना कापरे

 

फलक हे निर्जीव त्यांच्या चेहऱ्यावर वेदना

झुंडशाहीला कुठे या कायद्याचा चाप रे

 

घोषणा अन् मागण्यांचे हे निखारे चालले

राजभवनाच्या पुढे हे घेत नाही झेप रे

 

येउद्या शिवराज्य येथे वा शरीयत कायदा

शीर वा हे हात तोडा थांबवा हे पाप रे

 

या सुया देतात जखमा आणि फिरती मोकळ्या

जन्मभर नाही मिळाला या कळ्यांना लेप रे

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 26 – जर….. ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनकी एक कविता  जर…...    सुश्री प्रभा जी  ने सत्तर वर्ष की  वय में  जिस  परीकथा को लिखने की कल्पना की थी, उन्हें पता भी नहीं चला और उन्होंने इस कविता के माध्यम से लिख ही दिया। इसका आभास उन्हें तब होगा जब वे इस कविता को पुनः पढेंगी। वास्तव में कवि अपनी परिकल्पना में इतना खो जाता है  कि उसे पता ही नहीं चलता है कि वह एक कालजयी रचना कर रहा है। अतिसुन्दर परी कथा की  रचना एक मधुर स्मृति  की तरह संजो कर रखने लायक।  मैं यह लिखना नहीं भूलता कि  सुश्री प्रभा जी की कवितायें इतनी हृदयस्पर्शी होती हैं कि- कलम उनकी सम्माननीय रचनाओं पर या तो लिखे बिना बढ़ नहीं पाती अथवा निःशब्द हो जाती हैं। सुश्री प्रभा जी की कलम को पुनः नमन।

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 26 ☆

जर….. ☆ 

 

जर मी जगलेच सत्तर वर्षे….

तर लिहिन एका म्हाता-या परीची कथा…

कुणाला आवडो न आवडो…

त्यात असेल एक गाव….

परीकथेतला….

आजोबा म्हणायचे,

“तुम्ही काहीही सांगाल, आम्हाला खरं वाटलं पाहिजे ना? ”

 

परी सांगेल तिची खरीखुरी कहाणी,

परीकथेत असतील इतरही प-या,

यक्ष, जादू च्या छड्या, चेटकिणी,

घडेल काही आक्रित,

नियती वाचवेल प्रत्येकवेळी परीला…..

परीला पडतील स्वप्न….अगदी साधीसुधी….

ती खेळेल भातुकलीचा खेळ

बाहुला बाहुलीचे लग्न ही लावेल….

 

ती हरवेल कधी जंगलात, कधी गर्दीत….

तिला सापडणार नाहीत हवे ते रस्ते…

ती रस्ता चुकेल, रडेल,

दुखेल, खुपेल तिलाही…

ती सहन करेल तोंड दाबून बुक्क्यांचा मार…

 

आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध च घडणार आहे,

हे माहित असूनही,

ती लावेल पत्त्यांचे

नवे नवे डाव आणि हरत राहिल वारंवार!

 

परी सांगेल तिची खरीखुरी कहाणी, गाईल गाणी,

खेळेल  ऐलोमा पैलोमा….

 

ती करेल स्वयंपाक, थापिल भाकरी, कधी सुगरण असेल ती तर कधी करपेल तिचा भात,पोळी कच्ची राहिल,

आडाचं पाणी काढायला जाताना…तिचे पडतील ही दोन दात…

केस पांढरे होतील, सुरकुत्या पडतील चेह-यावर…..

परी म्हातारी होईल, तरीही तिला काढावसं वाटेल आडाचं पाणी….

कुणी म्हणेल ही सहजपणे….

“धप्पकन पडली त्यात”

ती पडेल आडात,पाण्यात की खडकावर माहित नाही…..

तिने हातात गच्च धरून ठेवलेला शिंपला पडेल त्याच आडात…

 

आणि आजूबाजूच्या फेर धरणा-या तरूण प-या म्हणतील….

आडात पडला शिंपला…..तिचा खेळ संपला!

 

जर मी जगलेच सत्तर वर्षे तर लिहिन एका म्हाता-या परीची कथा…..

जी आली होती जन्माला बाईच्या जातीत…..आणि मेली ही बाई म्हणूनच!

 

आणि ही कथा तुम्हाला नक्कीच खरी वाटेल

परीकथा असूनही..

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #26 – मेघ भक्तीचा ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक  भावप्रवण कविता  “मेघ भक्तीचा”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 26 ☆

☆ मेघ भक्तीचा ☆

 

कृष्ण डोह हा सावळा

राधा उतरली आत

ठाव घेताना डोहाचा

सारी सरली ही रात

 

वीणा चिपळ्या सोबती

मेघ भक्तीचा बरसे

गाभाऱ्यात तेवणारी

मीरा तेजोमय  वात

 

राधा सत्ययुगातली

कलियुगातली मीरा

तरी सवतीचा खेळ

चाले अजून दोघीत

 

नागवेलीचं हे पान

वाटे नागिणीचा फणा

फास झाडाच्या भोवती

तिनं टाकलेली कात

 

वन सारं बासरीचं

तिच्या सोबती नाचतं

धून राधेच्या प्राणाची

नित्य वाजे बासरीत

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ रंजना जी यांचे साहित्य #- 25 – मासिक पाळी ☆ – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है  शिक्षिका के कलम से  तरुण युवतियों के लिए एक शिक्षाप्रद भावप्रवण कविता  – “मासिक पाळी। )

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 25 ☆ 

 

 ☆ मासिक पाळी

 

तारूण्याच्या उंबऱ्यावर

स्त्रीत्वाची ही निशाणी।

म्हणे कोणी ओटी आली

लेक झाली हो शहाणी।

 

जुने नवे घाल मेळ

भावनांचा नको खेळ।

योग्यतेच ठेवी ध्यानी ,

होई व्यर्थ जाता वेळ।

 

नको जाऊ गोंधळून

सुचिर्भुत रहा दक्ष

जरी धोक्याचे हे वय

ध्येयावरी ठेवी लक्ष।

 

लागू नये नजर दुष्ट

तुला जपते जीवापाड।

जरी जाचक भासली

माझी बंधने ही  द्वाड।

 

हवे मर्यादांचे भान

घेता उंच तू भरारी।

श्रेष्ठ संस्कृती सभ्यता

सदा जपावी अंतरी।

 

जप तारूण्याचा ठेवा

जाण जीवनाचे मोल।

प्रकृतीने दिले तुज

असे स्त्रीत्व अनमोल।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 24 – बरं आहे मना तुझं… ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर कविता बरं आहे मना तुझं… )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #24☆ 

 

☆  बरं आहे मना तुझं… ☆ 

 

बरं  आहे मना तुझं

सदा राही रूबाबात

ताबा घेऊनीया माझा

राही तिच्या घरट्यात. . . . !

 

बरं आहे मना तुझं

जमे हासू आणि आसू

कधी  इथे, कधी तिथे

आठवांचे रंग फासू . . . !

 

बरं आहे मना तुझं

खर्च नाही तुला काही

अन्न पाण्या वाचूनीया

तुझे अडते ना काही .. . !

 

बरं आहे मना तुझं

माझी खातोस भाकरी

माझ्या घरात राहून

तिची करशी चाकरी. . . !

 

बरं आहे मना तुझं

असं तिच्यात गुंतण

ठेच लागताच मला

तिच्या डोळ्यात झरणं.. . !

 

© सुजित कदम, पुणे

7276282626

Please share your Post !

Shares
image_print