सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनके पुरानी डायरी से एक कविता पर एक कविता “ऐलोमा पैलोमा ”. बचपन में खेले गए खेलों के साथ उपजी कविता जैसे करेले की बेल के साथ अंकुरित होती है और बेल के साथ ही बढती है. करेले के कोमल पत्ते, फूल और फल. करेले की सब्जी के स्वाद सी कविता . बचपन के खेल में गए गीत में सासु माँ का कथन कि “बहु करेले की सब्जी खा फिर मायके जा” बहुत कुछ कह जाती है. किन्तु, करेले सा यह कटु सत्य है कि हम अपनी कविता की सही विवेचना हम ही कर सकते हैं . कुछ बातें गीतों और कविताओं में ही अच्छी लगती हैं. ऐसे कुछ खेल अकेले ही खेले जा सकते हैं. सुश्री प्रभा जी की कवितायें इतनी हृदयस्पर्शी होती हैं कि- कलम उनकी सम्माननीय रचनाओं पर या तो लिखे बिना बढ़ नहीं पाती अथवा निःशब्द हो जाती हैं। सुश्री प्रभा जी की कलम को पुनः नमन।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 19 ☆
☆ ऐलोमा पैलोमा ☆
या इथेच तर सुरू झाला खेळ,
कवितेत रंगण्याचा!
मी ही मग गायली पावसाची गाणी,
हदग्याच्या दिवसात ऐलोमा पैलोमाचा फेर ही धरला!
कारल्याचा वेल लावला खरा,
पण….
“कारल्याची भाजी खा गं सुने,
मग जा आपल्या माहेरा ”
म्हणणा-या सासू सारखीच वाटली,
ही व्यासपिठीय कविता!
मनात गच्च भरून राहिलेला पाऊस
एका स्नेहमयी सांजेला
हळूवार रिमझिमला
आणि वाटलं,
गवसलं कवितेचं रान,
मनमुक्त बरसायला!
अनुभवाच्या कारल्याचा वेल
हळूहळू वाढू लागला!
कारल्याला फूल येऊ दे गं….
म्हणत कवितेची दाद भुलवतच राहिली!
कारल्याला कारलीही आली हिरवीगार!
चिंचगुळ घालून भाजीही केली,
चटकदार, चविष्ट!
दारातला वेल हिरवा आहे आणि
जिभेवर कार्ल्याची चव आहे
तोवरच माहेरी जाईन म्हणते,
भोंडला खेळणा-या सोबतीणी तरी कुठं टिकतात इतका काळ?
आताशा हस्त बरसतच नाही आणि सोसवत नाही—
“नवरा मारितो ऽऽ ..बरे करितो”
असे खेळातल्या खेळातही म्हणणे!
कविते, आपले निर्णय आपणच घ्यायचे असतात,
बरेचसे खेळ एकटीनेच खेळायचे असतात!
© प्रभा सोनवणे,
(३०-५-१९९९)
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]