मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुण्य पदराला… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ पुण्य पदराला… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला

आभाळाच्या भाळी अबीर ल्याला ॥

*

गडगटाचा मृदु्ंग, थेंबांची तुळशीमाळ

टपटप आवाजाचे वाजतात टाळं

ढग अश्व धावे कधी, सज्ज रिंगणाला

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला ॥

*

भक्त मेळाव्यात हा असा सामावला

विसरूनी देहभान अभंग गाईला

रिमझीम चिपळ्यांनी ठेका तो धरला

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला ॥

*

पंढरपुरी येता विठूमय झाला

आनंदाचा पूर चंद्रभागेला आला

पापक्षालन झाले पुण्य पदराला

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 229 ☆ अर्णवाची लाट…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 229 – विजय साहित्य ?

☆ अर्णवाची लाट…! ☆

झालो अर्णवाची लाट

चालू पंढरीची वाट || धृ ||

*

ज्ञानदेव तुकाराम

अखंडीत जपनाम

झालो पालखीचे भोई

वैष्णवांचा थाट माट ||१ ||

*

पालखीच्या पुढेमागे

जोडी संचिताचे धागे

कैवल्याची चंद्रभागा

उचंबळे काठो काठ ||२ ||

गावोगावी जाई वारी

सांगे संकट निवारी

बुक्का अबीर गुलाल

रंगे रंगांत ललाट ||३ ||

*

भक्ती भावनांचा रंग

तन मन झाले दंग

पांडुरंगी शिंपल्यात

कृपा प्रसादाचे ताट ||४ ||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ भोळा भक्ती भाव… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ भोळा भक्ती भाव… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

जीव माझा वेडावला

दर्शनासी आतुरला

कुठे शोधू विठुराया

ओढ लागली मनाला ll१ll

*

पहाटेच्या आरतीत

फुललेल्या रे फुलात

बाळ लीला बघण्यात

शेतातल्या रे पिकात ll २ll

*

प्रपंचाचा हा डोलारा

सांभाळता सांभाळता

कष्ट सारे निवळती

तुझ्या नामात रमता ll ३ll

*

ओढ तुला भेटण्याची

डोळे भरू पाहण्याची

चालू लागती पाऊले

वाट मग पंढरीची  ll ४ll

*

ऐका आता पांडुरंगा

हाक माझ्या अंतरीची

तुज वीण व्यर्थ जन्म

फक्त आस रे भेटीची ll ५ll

*

ध्यास लागतो तुझाच

नको खेळू लपंडाव

कुठे शोधू विठुराया

भोळा माझा भक्तिभाव ll ६ll

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधाकृष्ण… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? कवितेचा उत्सव ?

☆ ✍️ राधाकृष्ण… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

(राधा ही कृष्णाची आत्मशक्ती…)

✍️सुखाचा जो उगम असे तो आत खोल हृदयात

मनास जागृत करून मग तो

राही आनंदात…

वरवर भासे सुख ते मिथ्या निश्चित हे जाण

ॐ कारातच स्वस्थ जीव मग भगवंताची आण…

*

रज्जू भासे सर्प तो‌ खरा केवळ माया आहे

बुद्धी मात्र निरंतर हा भार वाहते आहे……

*

कुंडलिनी  निद्रिस्त असे की जग वाटे सत्य

रज्जू दिसला सर्प पळाला खरे महद्भाग्य…..

  – अपर्णा परांजपे

*

मोहन तल्लीन होतो कारण हृदयी आहे राधा

कुंडलिनी ही कृष्णाची असे नियम साधा…..

*

असाच घडतो एकांती मग घाट मीलनाचा

राधा मोहन दृष्य जरी संयोग आत्म्यांचा…..

*

अतर्क्य बुद्धी करून समर्पण आतच परमात्म्याला

राधा कृष्ण, कृष्ण राधा भेट आकाराला……

*

कणात रस हा भरून उरतो प्रसाद पावित्र्याचा

कृतार्थ होता थेंब मिळे हा अमर अमृताचा…..

*

राधा नाही कुणीही मूर्ती ती केवळ शक्ती

भगवंताची जडली खरोखर स्वतः वरच प्रीती…..

*

देह नसती दोन हे असे एकच   असती दोघे

वसुंधरेवर मीलन घडते कृष्ण पुढे  राधा मागे….

*

शक्ति ही केवळ माझी अन्य नसे कोणी

अद्भुत प्रेम फुलते  राधा मोहन रक्मिणी….

*

नको रुसू गं माय रुक्मिणी तू तर शक्ती माझी

जगात तू अन् आत वसते लपून राधा माझी…..

*

डोळे उघडून सत्य असे मग सहज सुलभ समोर

मीच माझी नित्य असे मग  हीच खरी मोहर….

*

ही प्रेमाची खूण!!

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

🌹🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काव्यपंढरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ काव्यपंढरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जमे शब्दांचा मेळावा

वाजे कल्पना मृदुंग

टाळ विचार वाजती

अोठी येतसे अभंग ॥

*

आत्मा संताच्या प्रस्थाना

पालखी ही सजविली

अलंकार उपमांची

फुगड्या रिंगणे झाली ॥

*

कागदाच्या हो पताका

विणारूपी ही लेखणी

अक्षर तुळस उभी

शाईच्या त्या वृंदावनी ॥

*

मन झाले पांडूरंग

मी विठूचे अंतरंग

बरसतो कृपाघन

इंद्रायणी देई संग ॥

*

आशय विठ्ठल माझा

प्रसन्नला पहा हरी

टाळ चिपळ्या गजरी

नाहली काव्य पंढरी ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बातमी… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बातमीश्री प्रमोद वामन वर्तक ☆

दृष्ट लागली माहेरघराला 

पडला विळखा पबवाल्यांचा 

दिवसा ढवळ्या निघू लागला 

धूर असली अमली पदार्थांचा

वाया चालली तरुण पिढी   

करू लागली विखारी नशा   

वारे वाढले गुंडगिरीचे अन्

भरकटली तरुणाई दाही दिशा

घेतली वाटे जणू समाधी 

गल्ली बोळातील देवांनी 

ऱ्हास विद्येच्या माहेर घराचा 

न पहावे म्हणती डोळ्यांनी

वाताहत ही पुण्यनगरीची 

बघवत नाही ठाणेकराला 

सद्बुद्धी द्यावी ‘त्या तरुणाईला’

विनवितो इथून दगडूशेठला

         विनवितो इथून दगडूशेठला …… 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 238 ☆ निषेध… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 238 ?

निषेध… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आपण माणसंच असतो,

मुळीच नसतो साधुसंत,

पण आपल्या जगण्याची

निश्चितच असते एक पद्धत!

  बरेच दिवस चालत राहतो,

मेंढरांप्रमाणे किंवा,

जगत असतो–

प्रवाहपतित होऊन!

 पण स्वतःला सजग नागरिक

म्हणवून घेताना ,

तुम्ही काय काय खपवून घेता ?

 शाळेत सुपरव्हिजन करताना,

तुम्ही करू देता विद्यार्थ्यांना कॉपी?

जाऊ दे बिचारा पास तरी होईल,

या उदात्त हेतूने ?

की एखाद्या बालिकेवर,

बलात्कार करणाऱ्या विषयी,

येऊ शकते तुमच्या मनात कणव ?

आपण नसतोच “सत्यकाम” सिनेमाचे नायक !

किंवा हरिश्चंद्राचे अवतारही ,

पण कोणते कसदार आणि,

कोणते हिणकस,

हे निश्चितच कळते आपल्याला !

आपण बदलू शकत नाही

कुठलीही यंत्रणा किंवा

व्यवस्थाही !

आपण हतबलच असतो,

बऱ्याचदा!

पण आपण निश्चितच नोंदवू

शकतो निषेध,

कुठल्याही दुष्कृत्याचा !

आपला कुठलाही ,

फायदा नसला तरी  !

☆  

© प्रभा सोनवणे

२५ जानेवारी २००७

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आषाढ… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? कवितेचा उत्सव ?

☆ “आषाढ…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆

ओथंब ओथंब

मन जणू कदंब

देहरुपी राधेला

खुलवितो श्रीरंग…

 

ओसंड ओसंड

भावनांचा बांध

नयनांच्या कोंदणी

वसतो श्रीरंग..

 

गंधार गंधार

श्वासांचे फुलार

अंतरंगी पेरतो

मल्हार श्रीरंग…

 

बहर बहर

उमलते पोर

पाऊस धारेत

आषाढ श्रीरंग…

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “’लक्ष्मीची’ सावली……” – कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “’लक्ष्मीची’ सावली……” – कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

विठोबाही रुक्मिणीला 

       खूप कामे सांगतो ,

अन्  तिच्यावर थोडा

    रूबाब गाजवतो .

*

सकाळीच म्हणाला विठुराया

     रुक्मिणी,’ जरा आज

नीट कर सडा -सारवण

आपल्याकडे येणार भक्त सर्वजण

*

विठोबा म्हणतो रुक्मिणीला ,

‘ भक्तांची विचारपूस

    जरा अगत्याने कर ,

अगं हे तर त्यांच माहेरघर ‘.

*

विठोबा म्हणतो , ‘ जनीची

    कर  ना तू वेणी -फणी ‘

अगं एकटी आहे अगदी

 तिला या जगी नाही कुणी .

*

रुक्मिणी, उद्या तर घाल तू

     पुरणा -वरणाचा घाट

उदया आहे बार्शीच्या

 भगवंताच्या स्वागताचा थाट

*

एका मागोमाग सूचना ऐकून

    रुक्मिणी आता रुसली

आणि रागा- रागाने जाऊन

    गाभाऱ्या बाहेर बसली .

*

सारखंच याचं आपलं

       भक्त अन् भक्त

मी काय आहे

          कामालाच फक्त ?

  *

भोवती तर याच्या सारखा

      भक्त आणी संत मेळा

काय तर म्हणे _ 

     विठू लेकुरवाळा .

*

भक्तांनाही काही

       माझी गरजच नाही

कारण तोच त्यांचा बाप

    अन् तोच त्यांची आई .

*

कधीतरी माझी ही 

      कर जरा चौकशी

भक्तांच्या सरबराईत

     दमलीस ना जराशी .

*

मी आता मुळी

     जातेच कशी इथून

बाहेर जाऊन याची

      गंमत बघते तिथून

*

आता तरी याला

       माझी किंमत कळेल

अन् मग हळूच

     नजर इकडे वळेल

*

विठू जरी आहे

      साऱ्यांची माऊली

भगवंतांच्याही मागे असते

     ‘ लक्ष्मीची ‘ सावली…

कवी : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #245 ☆ विठूचा जागर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 245 ?

☆ विठूचा जागर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सौख्यसागरात भक्तिचा वावर

मनोभावे चालू विठूचा जागर

*

ज्ञाना तुका दोघे पंढरी निघाले

जनसमुदाय सोबत चालले

डोळ्यांनी टिपला भक्तिचा सागर

*

एकतारी संगे जोडलेली नाळ

बोलू लागलेत मृदंग नि टाळ

प्रसाद वाटते कोरडी भाकर

*

गरीब श्रीमंत नाही उपहास

विठूच्या भेटीची प्रत्येकाला आस

सारेच माऊली केवळ आदर

*

मन हे प्रसन्न वाटे येथे धन्य

मुखी विठू नाम नाही काही अन्य

देह कंटाळता पसरे चादर

*

तुला भेटण्याची लागलेली ओढ

कष्टाचा प्रवास तरी वाटे गोड

आलोय सोडून शेतात नांगर

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares