मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओली कविता… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ओली कविता... ☆ श्रीशैल चौगुले ☆

तुटलेले तारे  डोळ्यातून ढळतात

डोळ्यात आभाळ पागोळ्याच गळतात.

*

फिरलेत वारे   धुंदरात्री छळतात

का कोण जाणे ते  मनावर जळतात.

*

हि नाती वेगळी  पावसात जुळतात

अनोळखी स्मृती भिजवीत पळतात

*

अजून धरतीच्या गालावर ओघळ

भावनेच्या पानावर घरंगळतात.

*

कातरवेळी निरवतेत टपटपत्या

ओल्या कवितेस शब्द अलगद मिळतात.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हरवत चाललं आहे बालपण… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – हरवत चाललं आहे बालपण  – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

हरवत चाललं आहे बालपण,

मोबाईलच्या व्यसनात |

अभ्यास, मैदानी खेळ, वाचन 

गुंडाळून ठेवलंय बासनात |

*

भूलभुलैय्या या आभासी दुनियेत,

सगळेच झालेत रममाण |

कोवळ्या वयात डोळे मेंदूवर,

पडू लागलाय असह्य ताण |

*

दोन जीबी डेटाचा रोजचा,

मोबाईलला लागतो खुराक |

अनलिमिटेड वायफाय असेल 

तर सर्वच वेळ बेचिराख |

*

लुडो, पब्जी , ऑनलाइन रमी,

क्रिकेट सारेच ऑनलाईन गेम |

भावी पिढीचे व्हावे नुकसान,

हाच आहे एकमेव नेम |

*

असामाजिक तत्व मोबाईल आडून,

मुलांच्या आयुष्यात घुसत आहेत |

तुमचं आमचं साऱ्याच राष्ट्राचं,

उज्वल भविष्य नासवत आहेत |

*

प्रिय सुजाण पालकांनो,

नका पुरवत जाऊ असे बालहट्ट |

वेळ देत रहा पाल्याला,

नात्यातील वीण होऊ द्या घट्ट |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खरे वाटते… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ खरे वाटते… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

ज्याचे त्याला

बरे  वाटते

सुरेल जगणे

खरे वाटते

जीवन कायम

धावत असते

नाही  थांबत

गती पकडते

आकांक्षांना

वेड लागते

मी पण तेव्हा

जागे होते

वास्तव तेचे

सत्य संपते

अहं पणाचे

फिरवत जाते

दैव नेमकी

कमाल करते

पदरा मध्ये

सत्य टाकते

लाचारीने

संधी मिळते

नशिब त्यांचे

तिथे ऊधळते

सत्व नेमके

मागे उरते

वा-या संगे

फोल धावते

स्थितप्रज्ञाला

हे ही कळते

हिणकस सारे

जळून जाते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 181 ☆ पहिला पाऊस… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 181 ? 

☆ पहिला पाऊस… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

पहिला पावसाळा, सुचते कविता कुणाला

पहिला पावसाळा, चिंता पडते कुणाला.!!

*

पहिला पावसाळा, गळणारे छत आठवते

पहिला पावसाळा, राहते घर प्रश्न विचारते.!!

*

पहिला पावसाळा, शेतकरी लागतो कामाला

पहिला पावसाळा, चातकाचा आवाज घुमला.!!

*

पहिला पावसाळा, नदी नाले सज्ज वाहण्या

पहिला पावसाळा, झरे आसूसले कूप भरण्या.!!

*

पाहिला पावसाळा, थंड होय धरा संपूर्ण

पहिला पावसाळा, इच्छा होवोत सर्व पूर्ण.!!

*

पहिला पावसाळा, शालू हिरवा प्राची पांघरेल

पहिला पावसाळा, चहू बाजू निसर्ग बहरेल.!!

*

पहिला पावसाळा, छत्री भिजेल अमर्याद भोळी

पहिला पावसाळा, पिकेल शिवार तरच पोळी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साठीच्या पुढचा म्हातारा… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ साठीच्या पुढचा म्हातारा… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

थंड हवेच्या ठिकाणी जसा

नेहमीच गारवा असतो

तसाच — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो !

 

उजेडाचा त्रास होतो म्हणून

गॅागल वापरत असतो

काळ्याभोर काचेमागून

निसर्गसौंदर्य न्याहाळीत असतो!

शेजारीण घरी आली की

आनंदाने हसत असतो

बायकोला चहा करायला लावून

स्वत: गप्पा मारीत बसतो

 

कारण — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

पाय सतत दुखतात म्हणत

घरच्या घरी थांबत असतो

बाकी सगळ्या दिवशी मात्र

मित्रांबरोबर भटकत असतो!

चार घास कमीच खातो

असं घरात सांगत राहतो

भजी समोसे मिसळपाव

बाहेर खुशाल चापत असतो

 

कारण — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

औषधाचा डोस गिळताना

घशामध्ये अडकत असतो

पार्टीत चकणा खाता-खाता

चार चार पेग रिचवत असतो

अध्यात्माच्या गप्पा मोठ्या

चारचौघात झोडत असतो

मैत्रिणींच्या घोळक्यात मात्र

रंगेल काव्य ऐकवत असतो

 

कारण— 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

साठीच्या पुढचा म्हातारा

आता निवृत्तीत गेलेला असतो

विरंगुळ्याला जुन्या-जुन्या

आठवणीत रमत असतो

काम नसतं हातामध्ये

किंमत नसते घरामध्ये!

म्हटलं तर ज्येष्ठ असतो

तरी बराच तरूण असतो

संपून गेलेलं तारुण्य

पुन्हा आणू पहात असतो

 

कारण —

थंड हवेच्या ठिकाणी जसा

नेहमीच गारवा असतो

तसाच — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोंगटी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘सोंगटी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(गालगागा गालगागा गालगागा गा)

सोंगटी मी या पटावर खेळते आहे

खेळताना नेहमी मी हासते आहे

*

हार किंवा जीत या खेळात ठरलेली

रात्र सरुनी सूर्य येईल थांबते आहे

*

का करू मी काळजी सार्‍या जनाची या

कोण कसले भोवताली जाणते आहे

*

ज्या प्रमाणे कर्म ज्याचे फळ तसे मिळते

पात्र मीही ज्या फळाला चाखते आहे

*

चूक झाली एकदा जी ना पुन्हा व्हावी

याचसाठी मी सदा सांभाळते आहे

*

खेळताना वाटला प्रारंभ सुंदरसा

वाकडी मज वाट मधली वाटते आहे

*

हात तू माझा कधी धरशील का देवा

भिस्त सारी मी तुझ्यावर सोडते आहे

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढाळ मन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ ओढाळ मन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

मन आभाळ आभाळ,

कधी सान, कधी विशाल!

कधी पाण्याचा डोह,

कधी सागर  नितळ!

*

कधी असे ते पाखरू,

तेजापाशी झेपावलेले

कधी असे ते निश्चल,

कूर्मापरी स्थिरावलेले!

*

कधी अतीच चपळ,

निमिषातच दूर धावे!

कधी असते निश्चल,

वज्रासारखे एक जागे!

*

मना तुझा ठाव,

घेता येईना जीवाला!

फिरते मीही तुझ्या संगे,

गिरकी सोसेना ती मला!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जायचेच जर न येण्यासाठी … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ जायचेच जर न येण्यासाठी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

पुन्हा परत ना इथे यायचे

ठरवूनच ती निघून गेली

ती येण्याची वाट परंतू

इथे वाट पहात थांबली

*

 त्या वाटेवर तिच्याचसाठी

 मऊ रेशमी हिरवाई आली

 अन् वाटेच्या अगदी मध्ये

 झाड उभे विश्रांतीसाठी

*

 येणार जर नव्हती तु तर

 वाट कशाला आखीव मागे

 पाहणारा गुंततो  आपसूक

 आठवणींचे उलगडून धागे

*

  जायचेच जर न येण्यासाठी

  काहीही  ठेवावे  ना  पाठी

  खाणाखुणा नष्ट कराव्या

  हवे ते जपती काळीजकाठी

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रकाश वाट… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रकाश वाट… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

चालत होतो मी एकाकी आयुष्याची वाट

पसरत होता अवतीभवती अंधकार घनदाट

पूर्वाचल कधी निघेल उजळून नव्हते ठाऊक मजला

ठेचाळत धडपडत चाललो रेटीत काळोखाला ||१ ||

*

कर्म भोग हा असा न जाई भोगून झाल्याविना

गिळेल मज अंधार परंतु राहतील पाऊल खुणा

जे होईल ते खुशाल होवो मधे थांबणे नाही

असेल संचित त्याचप्रमाणे न्यायनिवाडा होई ||२ ||

*

निश्चय ऐसा होता उठली नवीन एक उभारी

शीळ सुगंधित वाऱ्याची मज देई सोबत न्यारी

बेट बांबूचे वन केतकीचे पल्याड मिणमिणता दीप

दूर दूर तो प्रकाश तरीही मज भासला समीप हे||३ ||

*

हे देवाने जीवन आम्हा दिधले जगण्यासाठी

उषःकाल तो नक्कीच आहे अंधाराच्या पाठी

मनात आली उसळून तेव्हा उत्साहाची लाट

त्या मिणमिणल्या दीपाने मज दाविली प्रकाश वाट ||४||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कारण…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “कारण…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

निद्रस्थ स्तब्ध राहण्या अनेक कारणे

पेटून उठण्या एकच कारण पुरते ….

न करण्याची अनेक कारणे

करण्यासाठी फक्त एकच कारण असते..

 

दुःखाची अनेक कारणे

भर उन्हात एक झुळूक पुरते

अनेक संकटे मोठी असताना

सुखासाठी एकतरी कारण नक्की असते….

 

दोष देण्या अनेक कारणे

नाते सहज तोडू पाहते

जोडून राहण्या एकच कारण

प्रेमाने जग जिंकता येते….

 

अश्रूंसाठी अनेक कारणे

एकच कारण ओठावर हसू फुलवते

हार मानण्या अनेक कारणे

जिंकण्यासाठी एकच कारण असते….

 

जग हे मोठे,जगणे छोटे

पुरून येथे उरता येते

एक कारण जगण्याचे

मरणालाही परतून लावते…..

 

जीवन मरण इथे आपण शरण

तरीही जगण्याची एक आशा पुरते

दोन श्वासातील अंतर जीवन

त्या श्वासाची सोबतही अमूल्य इथे ठरते….

 

स्वप्न आणि ध्येयासाठी पळताना

सुख, शांती आणि समाधानच जिंकते

शोध त्या एक कारणाचा लागता

आयुष्य सहज सुंदर सोपे होते….

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares