मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊसरेघ… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

पाऊसरेघ… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

वृक्षाच्या छायेखाली ,

उतरेल माज उन्हाचा.

शोधता सावलीला ,

लागला माग वार्‍याचा .

जमतील कदाचित येथे,

नभी अचानक मेघ.

क्षितिजावर आशेच्या कधीही,

उमटेल पाऊसरेघ.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रवास  – – ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रवास  – – ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना

 हरलो का जिंकलो, काही उमजेना

*

जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो

आलेल्या प्रसंगाशी लढत राहिलो

*

खाच खळगे, काट्या झुडपातून मार्गस्थ झालो

धडपडत, चाचपडत, पडून, उभा राहिलो

तरतरीत, टवटवीत होऊन ताजातवाना झालो

पुढे मखमली गालिच्या वरून चालत राहिलो

पण

गालिच्या खालची टोकेरी दगड टोचत राहिली

जमिनीवरच्या मातीची आठवण देत राहिली

*

काही प्रसंगी हरून जिंकलो

तर

काही प्रसंगी जिंकून हरलो

*

काही लढाया डोक्याने लढलो

तर

काही लढाया मनाने जिंकलो

*

डोक्याच्या लढायांना सर्व साथीला होते

मनाच्या लढायांना फक्त हृदयच

साक्षीला होते

*

काय कमवले, काय गमवले हिशोब जुळत नाही

काय जमवले, काय हरवले काहीच कळत नाही

*

सुख दुःखाच्या खेळामध्ये कठपुतळी झालो

नशिबाच्या लाटेवर तरंगत वहात राहिलो

*

सुख काय, दुःख काय, सारे सारखे वाटत गेले

त्याच्या पलीकडे जाऊन

माणूस होऊन, दुसऱ्यांसाठी, जगावेसे वाटत राहिले

*

होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना

हरलो का जिंकलो, काही उमजेना

पण महत्वाचे

जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो

सुखदुःखाच्या पलीकडे बघत राहिलो

आणि फक्त नी फक्त

आनंदाची देवाण घेवाण करत राहिलो

आंनदाची देवाण घेवाण करत राहिलो

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भान… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – भान – ? ☆ सुश्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे ☆

सोना आणि मुन्ना बागेमध्ये आले, 

माती पाहून खेळायला लागले!

सोना म्हणाली’ आपण झाड लावू,’

मुन्ना म्हणाला,’ मी काय करू?’

*

सोनाने आणली पाण्याची झारी, 

मुन्नाला दिली मातीसाठी फावडी!

सोनाने आणले रोप हिरवेगार,

 जमिनीत लावूया वाढेल शानदार!

*

सोना सांगे मुन्नाला झाडांचे महत्त्व,

पर्यावरण जतन करू, हेच आपले तत्व!

“पर्यावरण टिकवू या, 

जीवन चांगले जगू या”

*

संदेश दिला मुलांनी छान,

 निसर्गाचे सर्वांनी राखूया भान !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 235 ☆ वाट… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 235 ?

☆ वाट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

ही वाट कुठे जाते  ,

माहित नव्हतं,

तुम्ही भेटलात,

रस्ता रमणीय झाला खरा,

खरं तर आपणच ,

शोधत असतो आपली वाट !

जवळचे वाटणारे ,

नेहमीच असतात……

फक्त सहप्रवासी….

जेव्हा लागतो स्वतःला

स्वतःचा शोध तेव्हा ….

एकांतच वाटतो हवासा—

एकमेकांची गरजही

संपलेली असते ….

भूतकाळ कडू, गोड, तिखट !

म्हणूनच,

या सुनसान एकाकी रस्त्यावर,

आता एकटंच

जावसं वाटतं…

स्वतः इतकी अखेर पर्यंत,

नसतेच कुणाची सोबत….

म्हणतातच ना—-

“अंधारात सावलीही साथ देत नाही”

ही वाटच असते सोबतीण,

दिवसा- उजेडी,

आणि अंधारातही !!

 

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुग्धा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ मुग्धा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

ही कोण शोडषा उभी नदीच्या तटी

न्याहळी समोरी कलती करुनी कटी

*

फडफडे पापणी टपोर डोळ्यावरी

गुंजतो भ्रमर जणू कमल परागावरी

*

ओठातच फुटले हास्य अडकले शब्द

धुंदला किनारा जणू जाहला स्तब्ध

*

भिरभिरे नजर अन् धडधडतो हा ऊर

पदराशी करीते चाळा वाटण्या धीर

*

आतूर नेत्र-एकाग्री लावली नजर

मुरलीने जाहली धुंद जणू ही नार

*

चमकुनी पाहते मागे पुढती कशी

वेलीवर डुलते कोमल कलीका जशी

*

पाहते लाजूनी सभोवती ना कुणी

पाकळ्या जाईच्या झडती ओठातूनी

*

घट रिता ठेऊनी पुढे खिन्न बैसली

इतक्यात मागुनी शीळ तिने ऐकली

*

ऐकताच खुणेची शीळ उठे शिरशिरी

भ्यालेली हरिणी दिसे जणू बावरी

*

हुरहूर गोड लागली शब्द ना स्फुरे

पाहूनी सख्याला जवळी भरे कापरे

*

ह्रदयात गुपीत गुंतले येईना ओठी

धुंदीत गोड स्वप्नीच्या मारीली मिठी

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #242 ☆ अमर्ष… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 242 ?

☆ अमर्ष ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

अधी तुझ्यातलाच तू अमर्ष आज नष्ट कर

तुला कसे जगायचे रिवाज आज स्पष्ट कर

*

अजन्म कष्ट पाठिशी शरीर धष्टपुष्ट कर

प्रसन्नता फुलावया स्वतःस तूच तुष्ट कर

*

प्रसंग पाहुनी कधी स्वतः स्वतःस दुष्ट कर

समोर सिंह पाहता नको दया वितुष्ट कर

*

मनात मोद जागता अमूर्तता वरिष्ठ कर

वनाप्रती अखंड तू सुजान भाव निष्ठ कर

*

मिठातल्या खड्यातुनी पदार्थ तू चविष्ट कर

असेल कारले घरी तरी तयास मिष्ट कर

*

विभागलीत माणसे स्वतःस तू विशिष्ठ कर

दुही नकोस वाढवू स्वतःस एकनिष्ठ कर

*

विचार दूरचा नको मितीस याच कष्ट कर

कुटुंब, दुःख, वेदना स्वतःस तूच द्रष्ट कर

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांजप्रांत… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ सांजप्रांत... ☆ श्रीशैल चौगुले ☆

उन्हे पांघरुनी मन

सावल्यासंगे रमते

त्याच स्मृती झुलवा

झुलणे कसे जमते.

*

हसता वारा बिलगे

पाने सळसळ राग

ग्रीष्मात सलगी चाले

गुलमोहर पराग.

*

भाव अंतरीत धरा

अजुनी हिरवा चुडा

शुभ्र आभाळ निवांत

झळात पर्वत-कडा.

*

क्षितीजाच्या ओठी शब्द

उतरता दिन शांत

कविता फुलते नवी

सांजेचा विश्राम प्रांत.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ज्ञानमंदिर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – ज्ञानमंदिर – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

चित्रकाव्य : “ ज्ञानमंदिर “ 

*

शैक्षणिक वर्ष | आज सुरुवात |

मुले आनंदात | शाळेमध्ये ||१||

*

शिक्षकांच्या मनी | ओसंडला हर्ष |

स्वागत सहर्ष | विद्यार्थ्यांचे ||२||

*

दोन महिन्यांची | संपलीय सुट्टी |

जमणार गट्टी | वर्षंभर ||३||

*

शाळेतली घंटा | रोज वाजणार |

प्रार्थना होणार | शारदेची ||४||

*

सरस्वती पूजा | विद्येचा संकल्प |

नवीन प्रकल्प | अभ्यासात ||५||

*

नवीन पुस्तकं | वही व लेखणी |

रोज उजळणी | अभ्यासाची ||६||

*

किलबिल गुंजे | ज्ञान मंदिरात |

शुभ सुरवात | मांगल्याची ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोर झाला… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

मोर झाला☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

चांगला तो साव होता आज आहे चोर झाला

वाचताना बातमीही फार मोठा शोर झाला

*

संगतीला संत आले वागण्याला शिस्त आली

साधकांचा स्पर्शहोता कावळ्याच्या मोर झाला

*

फार मोठी चूक झाली वागताना तोल गेला

उधळला संसार तेव्हा बायकोचा घोर झाला

*

स्वार्थ साधायास त्याने सोडला अभिमान सरा

लाजमोडा त्या घडीला राबणारा ढोर झाला

*

जाहली साकार स्वप्ने गर्व तेव्हा फार केला

संकटानी घेरलेल्या वादळाचा जोर झाला

*

काय होतो काय झालो हे कळेना आज त्याला

चाचपाया दैव तेंव्हा तो बिचारा पोर झाला

*

वेगळा आवेग होता कल्पना घेऊन आला

एकता बांधावयाला संस्कृतीचा दोर झाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 178 ☆ नको कुणाची चाकरी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 178 ? 

☆ नको कुणाची चाकरी ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(काव्य प्रकार:- अंत्यओळ अष्टाक्षरी.)

(विषय:- मृग बरसून जावा.)

मृग बरसून जावा

धरा तृप्त शांत व्हावी

धूळ निघूनिया जावी

छटा धरेची खुलावी.!!

*

छटा धरेची खुलावी

मुक्त धरणी हसावी

छटा दिसाव्या बोलक्या

ऐसी करणी होवावी.!!

*

ऐसी करणी होवावी

बळीराजा तो हसावा

हाती घेऊनिया हल

कष्ट करण्या निघावा.!!

*

कष्ट करण्या निघावा

त्याला नं चिंता असावी

बीज रोपताना भूमी

भूमी निर्भेळ बोलावी.!!

*

भूमी निर्भेळ बोलावी

बीज ग्रहण करावे

यावे अंकुर जोमाने

सोने कष्टाचे होवावे.!!

*

सोने कष्टाचे होवावे

मिळो सर्वांना भाकरी

दिस बदलो सर्वांचे

नको कुणाची चाकरी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares