मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हवा पावसाळी… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

हवा पावसाळी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

हवा पावसाळी

अशा सांजवेळी

बेधुंद वा-यापरी होऊनिया

नव्या पावसाचे नवे गीत गावे

 

नव्या पावलांनी

नवे मेघ आले

जुन्या आठवांनी

मना चुंबिले

 

मनाच्या घनाचे

फुटावेत बांध

तुटावे मनाचे

आता सर्व  बंध

 

हवा पावसाळी

अशा सांजवेळी…….

हवा पावसाळी

अशा सांजवेळी… 

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोण चितारी… ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆

 ☆ कवितेचा उत्सव ☆

☆ कोण चितारी ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆ 

नील नभी बघ पूर्व दिशेला

अरुणाचा रथ सज्ज जाहला

फुटे तांबडं पहाट  झाली

लाल केशरी रंग उधळला

*

प्राचीवरती आले नारायण

सुवर्ण किरणे पहा पसरली

चराचराला उजळून टाकी

हिरव्यावरती छटा पिवळी

*

ऊन कोवळे जरी हळदुले

रंगछटा ती गडद दाखवितो

कलिका उमलून फुले रंगीत

ऊन‌ सावली खेळ रंगवितो

*

धरेवर येत सावल्या

अस्मानी तर रंगपंचमी

काळोखाच्या पार्श्वभूमीवर

क्षितिजावर नक्षी हो नामी.

*

कोण फिरवितो रंग कुंचला

चित्र चितारी सांज सकाळी

विश्व विधाता नमन तयाला

रंगांची दिसे सुंदर जाळी.

© सौ. सुरेखा कुलकर्णी

सातारा 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पावसाची फुलं… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ पावसाची फुलं… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

भूईवर टपटपणारी 

पावसाची फुलं

तुझ्यासाठी साठवेन म्हंटलं

पण तू पावसात चिंब भिजलेलीस

माझ्यासाठी.

पावसाच्या थेंबातून फुगे फुटत होते .

आणि तू म्हणालीस –

जोर आहे रे पावसात आजच्या.

मी मात्र; 

थुईथुईणाऱ्या 

पावसाच्या फुलांत मग्न

फक्त तुझ्यासाठी.

आणि 

आजचा पाऊस 

मनसोक्त कोसळत राहिला

तुझ्या माझ्यासाठी

अशी पावसाची फुलं होऊन..!

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 236 ☆ कामिनी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 236 ?

कामिनी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(कामिनी ची फुलं !)

आज खूप दिवसानंतर…

टेरेसवरच्या झाडांना भेटले,

मदनबाण बहरलाय…दरवळ सर्वदूर!

चाफा, कण्हेर, सदाफुली, झेंडू, बोगनवेलही…

स्वतःचं अस्तित्व टिकवून!

गवतीचहा, कढीपत्ता, लिंबुही हिरवीगार!

अंब्याची कलमंही तग धरून!

कोरफड, तुळशीचं स्वतंत्र अस्तित्व!

दोन वड कुंडीत आपोआपच बोन्साय झालेले !

जुई इवल्या इवल्या कळ्या सावरत !

रातराणी आणि कामिनी,

मोठ्या हौसेने लावलेले….दिसेनात कुठेच!

जीव लावल्याशिवाय काही

झाडं जगत नाहीत,

रातराणी सुकून गेली असावी,

तिच्या मुक्या कळ्या उमलल्याच

नाहीत कधी!

पण कामिनी दिसली ,

आणि हायसं वाटलं,

कामिनीला दुर्लक्षून कसं चालेल ?

सुंदरीच ती ,

या झाडाझुडपातली,

काहीशी दुर्मिळ,

म्हणून अप्रुपही तिचं !

कामिनीचा धुंद गंध

अनुभवायला तरी….

जगायला हवं तिचा मोसम

येईपर्यंत!

© प्रभा सोनवणे

२३ जून २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हळुवार पाऊस… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

हळुवार पाऊस… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

हळुवार आला पाऊस

थोडं हातंच राखून

चौखुर उधळी खोंड

वास मातीचा पिऊन

*

शहारली झाड वेली

हेलावत गेलं पान

गरजत शिरे वारा

झाडांची मोडली मान

*

दूर डोंगरानी  कसे

होते आभाळ धरून

आली पाऊस धारा

गेली दुधाळ होऊन

*

झाली माती ओलीशार

येती कोंब फाकून

सखे चल जाऊ रानी

घेऊ थोडंसं भिजून…

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पावसाचं वय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पावसाचं वय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

काल मी पावसाला विचारलं

तुझं वय काय?

पावसानं मला सुंदर उत्तर दिलं,

जर तू पावसात सैरावैरा

आनंदात धावतअसशील

तर माझं वय १०

 

जर तू पावसात

कविता लिहित असशील

तर माझं वय १६

 

जर तुला पावसात

विरह जाणवत असेल

तर माझं वय १८

 

जर तुला पावसात

ट्रेकिंगला जावंसं वाटत

असेल,

तर माझं वय २४

 

जर तुला पावसात

गजरा घ्यावासा वाटत असेल

तर माझं वय ३०

 

जर तुला मित्रांसोबत

पावसात भिजत भजी

खावी, असं वाटत असेल

तर माझं वय ४०

 

जर तुला पावसात

छत्री घ्यावी लागली,

तर माझं वय ५०

 

मग मी पावसाला म्हणालो

“अरे, एक काय ते वय सांग,

 शब्दात गुंतवू नकोस!”

 

स्मितहास्य देऊन म्हणाला पाऊस,

 तू जसे अनुभवशील

तेच माझे वय!

 

पावसाळ्याच्या  ओल्याचिंब शुभेच्छा!

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #243 ☆ बरसात प्रीतीची… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 243 ?

☆ बरसात प्रीतीची ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

तिच्या नाजूक ओठांवर तिळाने स्वार का व्हावे ?

दिसाया कृष्णवर्णी तो तरी हे भाग्य लाभावे

*

मलाही वाटतो आता नकोसा जन्म हा माझा

मनी या एवढी इच्छा तिच्या ओठीच जन्मावे

*

सखा होण्यातही आता कुठे स्वारस्य हे मजला

उभा हा जन्मही माझा करावा मी तिच्या नावे

*

कळेना सूर मी कुठला तिच्या गाण्यातला आहे

मला तर एवढे कळते तिचे मी शब्द झेलावे

*

तिच्या कोशात मी इतका असा बंदिस्त का झालो ?

मुलायम रेशमी धागे कसे हे पाश तोडावे

*

तिच्या नजरेतली भाषा कळे नजरेस या माझ्या

तिच्या एकेक शब्दांचे किती मी अर्थ लावावे

*

किती बरसात प्रीतीची नदीला पूर आलेला

मिळालेली मने दोन्ही कशाला पूल बांधावे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गा-हाणे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

गा-हाणे... ☆ श्रीशैल चौगुले ☆

चार दिवस पाउस कोसळला

बाकीचे आठ कोरडेच

उदास पुन्हा धरती रानमाळ

माती सांगे रोज गा-हाणे

आभाळाशी नाते बेभरोशी पंख

पाखरे शोधती ढगांस

धनधान्याविन घास दु:ख पाणी

 रिमझीम तरी ओल दे

आकाढ-श्रावणा निसर्ग थेंबांनी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शरिरी वसे रामायण – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ शरीरी वसे रामायण – लेखक : कवी ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

जाणतो ना काही आपण

शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||

*

आत्मा म्हणजे रामच केवळ,

मन म्हणजे हो सीता निर्मळ !

जागरुकता हा तर लक्ष्मण,

शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||

*

श्वास, प्राण हा मारुतराया,

फिरतो जगवित आपुली काया |

या आत्म्याचे करीतो रक्षण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||२||

*

नील जाम्बुवंत रक्त नसा या,

फिरती शोधत जनक तनया

गर्वच म्हणजे असतो रावण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||३||

*

रक्तपेशी त्या सुग्रीव, वानर,

भाव भावना त्यातील वावर

मोहांधता करी आरोग्य भक्षण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||४||

*

नखे केस त्वचा शरीरावरती,

शरीर नगरीचे रक्षण करती

बंधु खरे हे करती राखण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||५||

*

क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,

शांत असता घोरत पडतो

डिवचताच त्या करी रणक्रंदन

शरीरी आपुल्या वसे रामायण ||६||

*

गर्वे हरले सौख्य मनाचे

कासावीस हो जीवन आमुचे

संकटी येई शरीर एकवटून

शरीरी आपुल्या वसे रामायण ||७||

*

मनन करता भगवंताचे,

रक्षण होईल आरोग्याचे

रामजपाचे अखंड चिंतन

शरीरी आपुल्या वसे रामायण ||८||

कवी :अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मृगाचा पाऊस… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – मृगाचा पाऊस – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

 मृग नक्षत्राच्या | कोसळती धारा |

पोट पाणी चारा | प्राणीमात्रा ||१||

*

बळीराजा पाहे | पावसाची वाट |

अन्नधान्य ताट | जगासाठी ||२||

*

पेरून बियाणं | आपल्या शेतात |

आशा ती मनात | समृद्धीची ||३||

*

जगाचा पोशिंदा | मागे एक दान |

पीक पाणी छान | हंगामात ||४||

*

उघडे आभाळ | सर्वस्व त्या खाली |

निसर्ग हवाली | शेतीभाती ||५||

*

चार मास नाही | घेणार विश्रांती |

साठवणी अंती | समाधान ||६||

*

बिब्बा म्हणे मृगा | तुझे आगमन |

सुखावते मन | सर्वार्थाने ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares