मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ शुक्राची चांदणी… ☆ मेहबूब जमादार ☆
☆
मी पाहतोय तेथे अजुनीआहे शुक्राची चांदणी
आपले अढळ स्थान ठेऊन आहे शुक्राची चांदणी
*
कित्येक शतकांच्या आठवणी काळ सांगून गेला
त्या काळांचा इतिहास सांगते शुक्राची चांदणी
*
सूर्य उगवतो मावळतो आणि अंधार पडतो
अंधार पडता पुन्हा उजळते शुक्राची चांदणी
*
गतकालांचे दाखले विझले पडद्याआड गेले
आपले आकाश भेदून आहे शुक्राची चांदणी
*
आले गेले बरेच अन काळाच्या स्मृतीत गेले
आपले नांव राखून आहे शुक्राची चांदणी
☆
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈