मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “घरटे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “घरटे…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

घरटे झाले वेळीच बांधून  

इवल्याशा काड्यांनी सांघून

बाहेरून आता नीट पहाते 

चुकून  काही गेले का राहून —- 

आत मऊशी गादी झाली

जागाही सुरक्षित मिळाली

अन पंख फुटेपर्यंत मनीची 

पिल्लांची काळजीही मिटली —-

वाट पहाता काही दिसांनी

घरटे बोलेल चिवचिवाटांनी

त्याच क्षणाची वाट पहाते 

पंखाखाली घेईन त्या क्षणी —- 

जन्मोत्सव  माझ्या पिल्लांचा 

याच महाली करावयाचा

होईल सुरू मग नवाच दिनक्रम 

चिमण्या चोचींना भरवायाचा —- 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सृष्टी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ सृष्टी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(षडाक्षरी)

  ढगाळ आभाळ ,

  अवचित वेळी !

  थंडीला वेढून ,

 हवा पावसाळी!…..१

 

        चाहूल थंडीची

        सरे पावसाळा ,

        अचानक वाजे,

        पावसाचा वाळा……२

 

  पाऊस न् थंडी,

   निसर्ग सजला,

  गारव्यात याच्या,

   माणूस भिजला …..३

 

        ऋतू चक्रामध्ये,

        मनस्विनी सृष्टी!

        दिसते सर्वांना,

        तिची चमत्कृती!….४

 

  नकळत सारी,

   सृष्टी ही गोठली!

  थंडी च्या ऋतूत,

    ‘स्ट्यॅच्यू’ हीच झाली!…५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ लाभो सानिध्य थोरांचे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ लाभो सानिध्य थोरांचे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

लाभो सानिध्य थोरांचे

सार्थक हो जीवनाचे

पूज्य भाव त्यांच्या प्रति

विचारांच्या आदर्शांचे

 

अनुभवी असे बोल

ज्ञान बुध्दी त्यांच्याकडे

उपदेश अनमोल

नेती कसे उंचीकडे

 

धन्य धन्य हे जीवन

आशीर्वाद मिळे जर

वाटचाल होते सोपी

खडतर मार्गावर

 

दिशा मिळे आपोआप

सल्ला थोरांचा मानावा

ध्येयाकडे जाण्यासाठी

त्यांचा आधार शोधावा

 

छत्रछाया कृपा त्यांची

नित्य सहज लाभावी

जीवनाची इतिश्रीही

सानिध्यात त्यांच्या व्हावी

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवीन वर्षात ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☘️ नवीन वर्षात ❔❔ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

स्वतःला नव्याने

  शोधता येईल ?

शोधले तरी

   जगता येईल ?

निवडूंगाचे 

  गुलाब होईल ?

शब्दांशिवाय

   बोलणे कळेल ?

डोळ्यातल्या भावना

    वाचल्या जातील ?

भावनेचा मनापासून

    आदर होईल ? 

स्वयंपाक घर

    विरुन जाईल ?

नास्ता जेवण

    सहज मिळेल ?

 न आवडणाऱ्या गोष्टी

     टाळता येतील ? 

हवे तेवढे

    वाचता येईल ?

हवी त्याला हाक

    देता येईल ?

विनाअट कुणी

    नाते ठेवेल ?

आई सासखं कुणी

   अलिंगन देईल ?

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 204 ☆ नदी काठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 204 – विजय साहित्य ?

☆ नदी काठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

नदी काठी विसावल्या

दोन संसारिक पिढ्या

उगवती मावळती

भाव भावनांच्या उड्या…! १

नातवंडे खेळताना

येई नदीला बाळसे

गुजगोष्ठी मनातल्या

हसे वार्धक्य छानसे…! २

देई बोलका दिलासा

आधाराची काठी हाती

टाळी वाजता पाण्यात

उजळली पहा नाती…!३

उगवती मावळती

नदी काठी संगमात

बाल,तारूण्य वार्धक्य

आठवांच्या आरश्यात…!४

उगवती दावी जोर

बालपण झाले जागे

सांजावली दोन मने

अनुभव राही मागे…!५

नदी धावते धावते

पोटी घेऊन जीवन

काठावरी फुलारले

सानथोर तनमन…!६

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ४१ ते ४३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ४१ ते ४३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । 

पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ ४१ ॥ 

गात्रांना वश करुनीया  ठेवी त्यांच्यावर अंकुश 

विनाशी ज्ञानविज्ञानाच्या भारता बळे करी तू नाश ॥४१॥

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । 

मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥ 

इंद्रिये असती परा त्याहुनी आहे मन सूक्ष्म

मनाहुनीही बुद्धी परा आत्मा त्याहुनी सूक्ष्म  ॥४२॥

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । 

जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ४३ ॥ 

जाणुनी घेई महावीरा सूक्ष्मतम अशा आत्म्याला 

मनास घेई वश करुनीया  तल्लख बुद्धीने अपुल्या

अंकित करुनी अशा साधने दुर्जय अरिला कामाला

अंत करूनी कामरिपूचा प्राप्त करुनी घे मोक्षाला ॥४३॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥ 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी कर्मयोग नामे निशिकान्त भावानुवादित तृतीय अध्याय संपूर्ण ॥३॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गावठी !!!! –” लेखिका : सुश्री संध्या साठे जोशी ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “गावठी !!!! —” लेखिका : सुश्री संध्या साठे जोशी ☆ श्री सुनील देशपांडे ☆

आम्ही मातीच्या भिंती 

आणि शेणाने सारवलेल्या 

जमिनीच्या घरात रहायचो…

 

‘ते’ सिमेंटच्या भिंती आणि 

चकचकीत टाईल्स लावलेल्या 

घरात रहायचे… 

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही कोंड्याच्या रांगोळीत मीठ कापूर मिसळून 

त्या पावडरने दात घासायचो…

‘ते’ चकाचक वेष्टणात मिळणाऱ्या 

पांढऱ्या टूथपेस्टने दात घासायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही जात्यावर धान्य दळायचो 

आणि पाट्यावरवंट्यावर 

चटण्या वाटायचो…

‘ते’ आयतं किंवा गिरणीवरुन 

पीठ दळून आणायचे,

मिक्सरात चटण्या वाटायचे…

आणि

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही तांब्यापितळेच्या 

कल्हई लावलेल्या भांड्यातून 

चुलीवर शिजवलेलं जरा धुरकट वासाचं अन्न खायचो…

 

‘ते’ गॅसवर स्टीलच्या 

चकचकीत भांड्यात शिजवलेलं अन्न खायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही हातसडीच्या तांदळाचा भात 

आणि नाचणीची भाकरी …. लसणीच्या चटणीबरोबर हाणायचो…

‘ते’ शुभ्र पांढऱ्या तांदुळाचा भात अन् गव्हाची पोळी 

तुपसाखरेबरोबर खायचे ……

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही घाण्यावरुन काढून आणलेलं 

तेल वापरायचो…

‘ते’ डबल रिफाइंड तेल वापरायचे ……

आणि

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही साधे सुती कपडे वापरायचो…

‘ते’ टेरिलीन टेरिकाॅट वापरायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आमच्या घरी न्हावी यायचा,

मागीलदारच्या पडवीत पाटावर बसून 

थोरापोरांचे केस कापायचा…

‘ते’ मागेपुढे आरसेवाल्या सलुनात 

खुर्चीत बसून केस कापून घ्यायचे…

आणि

*आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

काळ बदलला…

 

‘ते’ करायचे त्या सगळ्या गोष्टी 

सोसासोसाने आम्ही पण करु लागलो…

 

आता ‘ते’ दामदुप्पट रकमा मोजून 

मन्थेंडांना आणि वीकेन्डांना 

मुद्दाम मातीच्या घरात 

रहाण्याची चैन करतात…

 

चुलीवर शिजवलेलं 

धुरकट वासाचं .. (साॅरी स्मोकी फ्लेवरचं)

अन्न आवडीने खातात…

घरी रिफाइंड तेलाऐवजी 

‘कोल्ड प्रेस’वर काढलेलं 

महागडं तेल वापरतात…

 

हौसेने नाचणीची बिस्कीटं खातात…

नमकवाल्या टूथपेस्टा वापरतात…

महागड्या ब्रॅन्डांचे 

सुती कपडे वापरतात…

आणि 

आणि आम्हाला गावठी म्हणतात…!!!

 

लेखिका :  संध्या साठे-जोशी, चिपळूण. 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जिथे… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

जिथे… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

प्रेमाचा बोल नाही,

ममतेला मोल नाही,

कपाळाला आठि तिथे

जावे कशाला ?

 

ममतेला थारा नाही,

आदराचा वारा नाही,

आस्थाहीन घरांत त्या,

रहा कशाला ?

 

संवादाला जागा नाही,

कलहाला अंत नाही,

दुस्वासाचा ढोल तेथे,

ऐका कशाला ?

 

अंतरीची ओढ नाही,

मायेची ओल नाही,

नात्याचे नाटक तिथे,

करा कशाला ?

 

देव्हार्‍यात देव नाही,

भक्तीचा भाव नाही,

मुक्या मूर्तिला फूल,

वाहू कशाला ?

😟😟 

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – जिद्द जगण्याची…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – जिद्द जगण्याची– ? ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

जिद्द जगण्याची..

बीज अंकुरण्याची..

उपेक्षित तरीही..

उमेद बहरण्याची..

आनंद उधळण्याची..

 

खडतर तरीही..

प्रवास हा सुखाचा..

उपेक्षित राहून ही..

मनसोक्त बहरण्याचा..

 

आपले आयुष्य आपणच घडवावे..

येवोत अडथळे कितीही 

आनंदाने सुख उधळीत जावे..

हाच संदेश जणू देते ही 

नाजूक सुंदर वेली…

 

फुलण्या बहरण्याला ..

रोखू शकते ना कोणी..

जिद्द असावी फुलण्याची..

खडकाळ वाटेवर ही बहरण्याची…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 212 ☆ लहान अभंग ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 212 ?

लहान अभंग ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

पंढरीच्या विठूराया

आले तुलाच भेटाया ।

देवा थकला हा देह

नाही आता माया मोह ॥१॥

आयुष्याचा खेळ मोठा

खाच खळग्याच्या वाटा ।

तुझ्या कृपेने सरले

दिन थोडेच उरले ॥२॥

माझा विठ्ठल साजिरा

माझ्या हृदयीचा हिरा।

जीव भक्तीत रंगला

पंढरीत विसावला ॥३॥

तुझ्यावीण देवराया

कोण मार्ग दाखवाया ।

मोहमयी ही दुनिया

लाभो तुझी कृपा छाया॥४॥

चंद्रभागा माझी आई

दूजी असे रूखुमाई ।

बाप विठ्ठल सावळा

माझा भाव साधाभोळा ॥५॥

मी न जना, कान्होपात्रा

परी तूच माझा त्राता ।

जीव कुडीतून जावा

तुझ्या चरणी पडावा॥६॥

“प्रभा” म्हणे विठ्ठला रे

असे घडेल का बरे ।

नाही पुण्यवान फार

तरी जीव हा स्वीकार ॥७॥

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares