मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– ऐक मुकुंदा… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – ऐक मुकुंदा… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

हाती पावा घेऊ नको रे

अधरावरती धरू नको रे

सचेत होऊन सूर उमटता

विसरतेच मग जग हे सारे !

खट्याळ तू रे किती मुरारी 

विनविते तरी घेशी बासरी

हात तुझा मी किती अडवावा

सांगू मुकुदा कोणत्या परी !

सासुरवाशीण मी रे कान्हा

किती सांगू तुज मी पुन:पुन्हा 

अवघड होते मन आवरणे

सूर पावरीचे पडता काना !

 हात जोडूनी तुला विनवते

 सूर अवेळी अळवू नको ते

 नंतर भेटू कदंबातळी 

 स्वतः बासरी हाती देते !!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अवलिया… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अवलिया… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

ओलांडुनिया पाचही पर्वत

एक अवलिया आला कोणी

भणंग भटका लक्तरलेला

तुटकी झोळी हाती घेउनी

 

तळव्यावरच्या भेगांमधुनी

रक्त ठिबकले, रक्त गोठले

अंगावरच्या रेषा दाविती

किती सोसले, किती भोगले

 

दिठीत दुख-या रुतून बसली

युगायुगांची अटळ व्यथा

रुख्या-सुख्या अधरांवरती

ओघळती मग करूण कथा

 

रुद्ध जाहले अवखळ निर्झर

मोती-दाणे झोळीत ओतूनी

मूक जाहले मर्मर मधुस्वर

स्वरवलयाचे  देणे देवूनी

 

रंगरुपाचे वैभव अर्पून

पुष्पपाकळ्या विकल जाहल्या.

पाने पाने झोळीत टाकून

तरुतरुंच्या छाया सुकल्या.

 

भरली झोळी,

फकीर गेला

धुळी-मातीची विभूती लावूनी .

मलीन धुक्याचे लक्तर लेवून

सृष्टी बसली भणंग होऊनी .

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 175 – जगण्याचे बळ ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 175 – जगण्याचे बळ  ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

जगण्याचे बळ

माऊलीची माया।

तप्त जीवनात

पिता छत्र छाया।

 

साजनाची साथ

सहजीवनात।

जगण्याचे बळ

विश्वासाचा हात।

 

पाडस धरीते

विश्वासाने बोट।

त्याच्या स्वप्नापुढे

सारं जग छोटं।

 

लाखो संकटांचा

दाटता अंधार।

आशेचा किरण

मनाला आधार।

 

जीवनी संघर्ष 

लागे नित्य झळ।

प्रेम,आशा, स्फूर्ती

जगण्याचे बळ।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवीचे नवरंग… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ देवीचे नवरंग… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पहिली माळ सजे, केशरी रंगाने,

सजवी देवीला ,झेंडूच्या हाराने! ..१

 

पांढऱ्या रंगाची ,माळ दुसरी,

पावित्र्य घेऊन ,आली साजरी!…२

 

तिसरी माळ रंग, लाल घेऊन आली,

जास्वंदीची लाली येई, देवीच्या गाली!..३

 

चवथ्या माळेला, निळे स्वच्छ आभाळ,

कुमकुमार्चनाने फुलले, देवीचे भाळ!…४

 

शेवंतीची फुले वाहू, पाचव्या माळेला,

पिवळ्या रंगाचा शालू, शोभे देवीला!..५

 

सहाव्या माळेला, हिरव्याची किमया,

देवीला भरु या, बांगड्या हिरव्या!..६

 

सातव्या माळेला, रंग येईल करडा,

देवीला देऊया, मानाचा विडा.!..७

 

आठवी माळ करी,  गुलाबी उधळण,

देवीच्या खेळा मिळे, मंदिर अंगण!..८

 

नववी माळ सजे, जांभळ्या रंगाने,

देवी सौख्य देई ,जांभळ्या साजाने!..९

 

नवरंगाची पखरण, होई नऊ दिवस,

दसऱ्यास सज्ज, देवी सिम्मोलंघनास!.१०

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #195 ☆ आरती – जय जय जय अंबे माता ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 195 – विजय साहित्य ?

☆ आरती – जय जय जय अंबे माता ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

(आरती – स्वरचित)

आरती सप्रेम जय जय जय अंबे माता

कृपा रहावी आम्हां वरती, दे आशिष आता .||धृ||

सदा पाठिशी रहा उभी मुकांबिका होऊनी

शिवशक्तीचे प्रतिक तू सिंहारूढ स्वामींनी

कोल्लर गावी महिमा गाई भक्त वर्ग मोठा .

कृपा रहावी आम्हां वरती, दे आशिष आता .||1||

ब्राम्ही रूप हे तुझेच माते चतुर्मुखी ज्ञानी

सप्तमातृका प्रातः गायत्री हंसारूढ मानी

सृजनदेवता ब्रम्हारूपी रक्तवर्णी कांता

कृपा रहावी आम्हां वरती, दे आशिष आता .||2||

माहेश्वरी रूप शिवाचे , व्याघ्रचर्म धारीणी

जटामुकूट शिरी शोभतो तू सायं गायत्री

त्रिशूल डमरू त्रिनेत्र धारी तू वृषारूढा.

कृपा रहावी आम्हां वरती, दे आशिष आता .||3||

स्कंदशक्ती तू कौमारी तू नागराज धारीणी

मोर कोंबडा हाती भाला तू जगदोद्धारीणी.

अंधकासूरा शासन करण्या आली मातृका

कृपा रहावी आम्हां वरती, दे आशिष आता .||4||

विष्णू स्वरूपी वैष्णवी तू ,शंख, चक्र, धारीणी

माध्यान्ह गायत्री माता तू शोभे गरूडासनी.

मनमोहिनी पद्मधारीणी तू समृद्धी दाता.

कृपा रहावी आम्हां वरती, दे आशिष आता .||5||

नारसिंही भद्रकाली तू,पानपात्र धारीणी

गंडभेरूडा , शरभेश्वर शिवशक्ती राज्ञी

लिंबमाळेचा साज लेवूनी शोभे अग्नीशिखा.

कृपा रहावी आम्हां वरती, दे आशिष आता .||6||

आदिमाया,आदिशक्ती,विराट रूप धारीणी

रण चंडिका शैलजा महिषासूर मर्दिनी

महारात्री त्या दिव्य मोहिनी ,शोभे जगदंबा .

कृपा रहावी आम्हां वरती, दे आशिष आता .||7||

सप्तमातृका रूपात नटली देवी कल्याणी

भगवती तू, माय रेणुका शोभे नारायणी

स्तुती सुमनांनी आरती कविराजे सांगता

कृपा रहावी आम्हां वरती, दे आशिष आता .||8||

© कविराज विजय यशवंत सातपुते

स्वरचित आरती. निर्मिती विजया दशमी

18/10/2018.

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहिला – ( श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग पहिला – ( श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।

स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ৷৷४१৷৷

संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।

पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः৷৷४२৷৷

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः ।

उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः৷৷४३৷৷

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।

नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ৷৷४४৷৷

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।

यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ৷৷४५৷৷

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।

धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ৷৷४६৷৷

संजय उवाच

एवमुक्त्वार्जुनः सङ्‍ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌ ।

विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ৷৷४७৷৷

मराठी भावानुवाद ::::  

कुलावरी वर्चस्व  अधर्म प्रदूषित कुलस्त्रिया 

वर्णसंकरा प्रसूत करती वाममार्गी त्या स्त्रिया ॥४१॥

वर्णसंकरे पिंडदान तर्पणादी खंड होत 

पितरादींची अधोगती नाश कुलाचा होत ॥४२॥

कुलघातक हा वर्णसंकर अतिघोर दोष

जातिधर्म कुलधर्मही जात पूर्ण लयास ॥४३॥

लुप्त जाहले कुलधर्म  नाही त्यासी  काही थारा

जनार्दना रे ऐकुन आहे नरकवास त्या खरा ॥४४॥

राज्यसुखाच्या मोहाने युद्धसिद्ध जाहलो

हाय घोर या पापाच्या मार्गाला  भुललो ॥४५॥

शस्त्र न धरी मी हाती काही करीन ना प्रतिकार 

मृत्यूला स्वीकारिन मी झेलुनिया कौरव वार ॥४६॥

कथित संजय 

छिन्नमने कथुनी ऐसे त्यजुनी तीरकमान

शकटावरती शोकमग्न तो  बसला अर्जुन ॥४७॥

– क्रमशः भाग पहिला 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जोगवा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ जोगवा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पदर पसरुनी मागते आई

जोगवा तू मजसी देई

भवानी कल्याणी रेणूका माई

जोगवा तू मजसी देई ।।

 

जीवन अवघे दु:खे भरले

माया मोह त्यास जडले

प्रयत्नानी जरी त्यागले

काम क्रोध मग जागे झाले

जाळ रीपू अन् कर पुण्याई

जोगवा तू मजसी देई

शिवानी जननी अंबाबाई

जोगवा तू मजसी देई ॥

 

क्षणोक्षणी या चिंता ग्रासती

तम व्यथेचे जग भासती

साहसाने सारे साहती

विपदा येती मागे पुढती

चिंता विपदा लयास नेई

जोगवा तू मजसी देई

स्वामिनी तारिणी वणीमाई

जोगवा तू मजसी देई ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #177 ☆ संत रामदास… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 177 ☆ संत रामदास…☆ श्री सुजित कदम ☆

नारायण ठोसर हे

समर्थांचे मुळ नाव

राम आणि हनुमान

अंतरीचा घेती ठाव…! १

 

बालपणी ध्यानमग्न

अष्टमित्र सहवास

ज्ञान संपादन कार्य

विश्व कल्याणाचा ध्यास..! २

 

गाव टाकळी नासिक

जपतप अंगीकार

तपश्चर्या रामनाम

दासभक्ती आविष्कार…! ३

 

केली दीर्घ तपश्चर्या

पंचवटी तीर्थ क्षेत्री

रामदास नावं नवे

प्रबोधक तीर्थ यात्री….! ४

 

एकाग्रता वाढवीत

केली मंत्र उपासना

तेरा अक्षरांचा मंत्र

राम नामाची साधना…! ५

 

रघुवीर जयघोष

रामदासी दरबार

दासबोध आत्माराम

मनोबोध ग्रंथकार…! ६

 

दैनंदिन तपश्चर्या

नाम जप तेरा कोटी

रामदासी कार्य वसा

ध्यान धारणा ती मोठी…! ७

 

श्लोक मनाचे लिहिले

आंतरीक प्रेरणेने

दिले सौख्य समाधान

गणेशाच्या आरतीने…! ८

 

श्लोक अभंग भुपाळ्या

केला संगीत अभ्यास

रागदारी ताल लय

सुरमयी शब्द श्वास….! ९

 

रामदासी रामायण

ओव्या समासांची गाथा

ग्रंथ कर्तृत्व अफाट

रामनामी लीन माथा…! १०

 

प्रासंगिक निराशा नी

उद्वेगाचे प्रतिबिंब

वेदशास्त्र वेदांताचे

रामदास रविटिंब….! ११

 

दिली करुणाष्टकाने

आर्त भक्ती आराधना

सामाजिक सलोख्याची

रामभक्ती संकल्पना…! १२

 

शिवराय समर्थांची

वैचारिक देवघेव

साधुसंत उपदेश

आशीर्वादी दिव्य ठेव…! १३

 

पुन्हा बांधली मंदिरे

यवनांनी फोडलेली

देवी देवता स्थापना

सांप्रदायी जोडलेली…! १४

 

वैराग्याचा उपासक

दासबोध नाही भक्ती

दिली अखिल विश्वाला

व्यवहार्य ग्रंथ शक्ती….! १५

 

आत्य साक्षात्कारी‌ संत

केले भारत भ्रमण

रामदास पादुकांचे

गावोगावी संक्रमण…! १६

 

दासबोध ग्रंथामध्ये

गुरू शिष्यांचा संवाद

हिमालयी एकांतात

राम रूप घाली साद…! १७

 

राम मंदिर स्थापना

गावोगावी भारतात

भक्ती शक्ती संघटन

मठ स्थापना जनात….! १८

 

दिले चैतन्य विश्वाला

हनुमान मंदिराने

सिद्ध अकरा मारुती

युवा शक्ती सामर्थ्याने…! १९

 

नाना ग्रंथ संकीर्तन

केले आरत्या लेखन

देवी देवतांचे स्तोत्र

पुजार्चना संकलन…! २०

 

स्फुट अभंग लेखन

श्लोक मनाचे प्रसिद्ध

वृत्त भुंजंग प्रयात

प्रबोधन कटिबद्ध….! २१

 

केले विपुल लेखन

ओवी छंद अभंगांत

कीर्तनाचा अधिकार

दिला महिला  वर्गात….! २२

 

धर्म संस्थापन कार्य

कृष्णातीरी चाफळात

पद्मासनी ब्रम्हालीन

समाधिस्थ रामदास…! २३

 

गड सज्जन गातसे

रामदासी जयघोष

जय जय रघुवीर

दुर पळे राग रोष…! २४

 

माघ कृष्ण नवमीला

दास नवमी  उत्सव

रामदास पुण्यतिथी

भक्ती शक्ती महोत्सव…! २५

 © श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सडकं, नासकं, कुजकं… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

सडकं, नासकं, कुजकं… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

ती – तिच्या संसारात सुखी नव्हती. लग्नाला आठ दहा वर्षे उलटून गेली होती. दोन गोजिरवाणी मुलं होती. तिच्यावर प्रेम करणारा, निर्व्यसनी नवरा होता, त्याला ठीकठाक नोकरी होती. 

 …..पण तरीही ही संसारात सुखी नव्हती. सासरच्या प्रत्येक गोष्टीत हिला काही ना काहीतरी खोट दिसायची. 

सासू सासरे गावाहून आले की त्यांच्या वागण्यात तिला गावठीपणा दिसायचा. सासरे बशीत चहा ओतून फुरके मारत चहा पिऊ लागले की हिच्या कपाळावर आठ्यांचे जाळे उमटायचे. सासू जरा कामवालीला ख्यालीखुशाली विचारू लागली की हिचा जीव तीळ तीळ तुटायचा.

आणि नवरोबा काय ! तो तर चुका काढण्यासाठीचा हक्काचा माणूस. पलंगावर ओला टॉवेलच टाकतो, लेंग्याची नाडी लोंबत असते, रात्री झोपेत घोरतो, घरात काय हवंय नकोय ते त्याला कसं बिलकूल ठाऊक नसतं, तिनं म्हणून संसार केला – निभावून नेलं, दुसरी कोणी असती, तर केव्हाच निघून गेली असती, वगैरे वगैरे….. तक्रारींचा पाढा मोठा आणि न संपणारा होता.

शेजाऱ्यापाजाऱ्यांपासून, दूधवाला, भाजीवाला, पेपरवाला सगळ्यांकडे ही कॅसेट वाजायचीच वाजायची. 

आजची सकाळही अपवाद नव्हती. कालच सासू सासरे गावाहून आले होते, त्यामुळे असंही तिचा मूड खराबच होता. काहीतरी कारण घेऊन ती तणतणतच होती, तेवढ्यात नेहमीच्या भाजीवाल्याने हाळी दिली. 

तिला ताज्या दमाचा श्रोता सापडला होता, ती अशी संधी थोडीच सोडणार होती ! 

गळ्यांच्या मनसोक्त कागाळ्या सांगून झाल्यावर ती म्हणाली, “बरं, बरं. ते राहू दे सगळं. कामं पडली आहेत घरी. सगळी मलाच करावी लागतात. कोणी येत नाही हो मदतीला… टोमॅटो दे किलो दोन किलो.”

“नाही, नाही ताई. तुम्ही टोमॅटो घेऊ नका. ते खराब आहेत. तुम्ही असं करता का, बटाटे घ्या. ते चांगले आहेत.” भाजीवाला सांगू लागला. 

“बटाटे नको आहेत मला. आणि टोमॅटोच हवे आहेत. तू एक काम कर, मला एक रिकामी टोपली दे. मी खराब टोमॅटो त्यात काढून ठेवते आणि चांगले निवडते.”

बघता बघता तिने दोन किलो चांगले टोमॅटो घेतले. 

“बरं, आता भेंडी दे बरं.” ती.

“नाही, मॅडम. भेंडीपण किडलेली आहे. तुम्ही बटाटे का घेत नाहीत ? एक नंबर माल आहे.”

पुन्हा त्याच संवादांची उजळणी झाली आणि पुन्हा तिनं निवडून निवडून एक किलो भेंडी घेतलीच. 

आणि मग तिनं त्या भाजीवाल्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. “का रे ? एवढी सगळी चांगली भाजी आहे आणि तू काय सारखं ही कुजली आहे, ती किडली आहे असा धोशा लावला आहेस ? बघितलंस ना – केवढीतरी चांगली भाजी होती की इथं. आणि तू असा आहेस की सडक्या कुजक्यातच अडकून बसला आहेस.”

ती बोलून गेली आणि क्षणभर तिला वाटलं की हा भाजीवाला भडकणार. पण झालं उलटंच. 

तो प्रसन्न हसला.

“आता कसं छान बोललात ताई ! भाजी असो की आयुष्य, आपण चांगलं तेवढं घ्यावं. सडकं, कुजकं नजरअंदाज करावं. आयुष्य किती सुंदर होऊन जाईल !”

तो तिला उद्देशून बोलला का सहज, कोण जाणे. पण ही गोळी तिला पक्की लागू पडली. 

ती आजारी पडल्यावर उपासतापास करणारे सासरे तिला आठवले. तिच्या पहिल्या बाळंतपणाच्यावेळी तिची आई हॉस्पिटलमध्ये admit होती. सासूबाईंनी तळहातावरच्या फोडासारखं जपलं होतं तिला, ते आठवलं. बायकोमुलांपासून दूर राहावे लागू नये म्हणून प्रमोशन नाकारणारा नवरा आठवला. वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे सोडूनसुद्धा त्याचं कधीतरी सहज गजरा आणणं आठवलं.

आणि भाजीवाल्याचं वाक्य मनात पिंगा घालू लागलं. 

…. आज संध्याकाळी घरी जेवण तर छान झालंच, आणि नंतरचं जीवनही.

……  ती आता चांगलं स्वीकारायला शिकली होती. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नव रंग… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ नव रंग… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

झोपडीच्या दारासमोर आज

हजारो दुर्गा उदास बसल्यात

बंगल्यातल्या दुर्गा नवरात्रीला

नऊ रंगाच्या साड्या नेसल्यात …. 

 

नऊ दिवसाला नऊ रंगाच्या

साड्या नेसणे गुन्हा नाही

हजारो साड्या कपाटाची

शोभा बनणं बरं नाही …. 

 

अंगाची अब्रू झाकण्या,

हजारो दुर्गा आहेत बेजार

कपाट तुमचं रिकाम करून

बना त्यांचा तुम्ही आधार …. 

 

देवळातील देवीला वाहता

हजारोचे भरजरी पातळ

कधीतरी डोळे उघडून बघा

गरीब महिलांच्या साडीचे ठिगळ …. 

 

श्रद्धेला तुमच्या विरोध नाही

तुम्ही तुमच्या जीवावर करता

मी  बिचारा आपला

तुम्हाला सांगण्यापुरता …. 

 

झोपडीत एकदा डोकावून पहा

तुमची साडी तिला नेसवा

नक्कीच सांगतो मिळणारा

आनंद नसेल फसवा …. 

 

गरिबांच्या झोपडीत उधळा

नवरात्रीचे नऊ रंग

कधीच होणार नाही

तुमच्या भक्तीचा बेरंग …… 

 

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares