मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नव रंग… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ नव रंग… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

झोपडीच्या दारासमोर आज

हजारो दुर्गा उदास बसल्यात

बंगल्यातल्या दुर्गा नवरात्रीला

नऊ रंगाच्या साड्या नेसल्यात …. 

 

नऊ दिवसाला नऊ रंगाच्या

साड्या नेसणे गुन्हा नाही

हजारो साड्या कपाटाची

शोभा बनणं बरं नाही …. 

 

अंगाची अब्रू झाकण्या,

हजारो दुर्गा आहेत बेजार

कपाट तुमचं रिकाम करून

बना त्यांचा तुम्ही आधार …. 

 

देवळातील देवीला वाहता

हजारोचे भरजरी पातळ

कधीतरी डोळे उघडून बघा

गरीब महिलांच्या साडीचे ठिगळ …. 

 

श्रद्धेला तुमच्या विरोध नाही

तुम्ही तुमच्या जीवावर करता

मी  बिचारा आपला

तुम्हाला सांगण्यापुरता …. 

 

झोपडीत एकदा डोकावून पहा

तुमची साडी तिला नेसवा

नक्कीच सांगतो मिळणारा

आनंद नसेल फसवा …. 

 

गरिबांच्या झोपडीत उधळा

नवरात्रीचे नऊ रंग

कधीच होणार नाही

तुमच्या भक्तीचा बेरंग …… 

 

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – कळाहीन… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – कळाहीन… ?सौ. उज्ज्वला केळकर 

कधी काळी 

मला एकट्यालाच टाकून 

तू गेली होतीस निघून 

शिशिराच्या गोठवणा-या थंडीत.

त्यावेळी 

तुझ्या त्या पाठमो-या आकृतीवर,

तुझ्या पाऊलखुणांवर,

गतस्मृतींवर,

नजर खिळवित उभा होतो मी 

त्यांना आपले वैभव अर्पित,

अश्रू ढाळीत आसमंतात.

मग आज अशी अवचित 

दशदिशांना दिपवीत 

कणाकणाला उजळीत 

कशाला आलीस पुन्हा,

अमृतकण शिंपीत?

माझ्या पतझड़ल्या 

थकलेल्या, शिणलेल्या 

गात्रांना जीवन द्यायला 

संजीवनी होऊन ?

नको घालूस त्यावर 

तुझी चैतन्याची फ़ुंकर 

नको ग पालवूस 

नव्या पालवीची पाखर

नको नको भारूस 

तुझ्या वासंतिक पैंजणांनी 

नको नको ग फुलवूस 

मधु मधुर गंधांनी…

कारण माहीत आहे मला,

अशीच फ़सवून, फुलवून 

पुष्पपाशात बद्ध करून 

तू जाणार आहेस निघून 

पुन्हा मला कळाहीन करून.

© सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 204 ☆ कविता ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 204 ?

कविता ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

बरेच दिवस सुचलीच नव्हती कविता,

घरातले पुस्तकांचे पसारे

आवरता आवरेनात,

खेळ तर मांडलेला असतो,

पण पटावरच्या सोंगट्या

दगा देतात?

की खेळताच येत नाही खेळी?

 

किती निरागस,

त्या शाळेतल्या सख्या…

कुबेर नगरीत रहात असूनदेखील,

निगर्वी, व्यक्तिमत्त्वात विलोभनीय

सहजपणा!

माझ्यावर कौतुक वर्षाव करणा-या..

थोर प्रशंसक!

 

आयुष्य किती रंगीबेरंगी—-

काहीच नको असतं ,

एकमेकांकडून…

फक्त अडीच अक्षरे प्रेमाची!

 

 तू ही बोलतोस,

खूप भरभरून…

आयुष्याच्या सांजवेळी..

भरून जाते ओंजळ तुझ्या शब्दांनी,

आणि घमघमतेच एक कविता,

मोग-याच्या दरवळा सारखी !!

 

आणि सा-या फापटपसा-यातून,

अलगद स्वतःला सोडवून घेत,

मी ही होते…

अशरीरी… मुक्तछंद!

© प्रभा सोनवणे

(१७ ऑक्टोबर २०२३)

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय भवानी… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

सौ. प्रतिभा संतोष पोरे 

? कवितेचा उत्सव ?

☆ माय भवानी… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

✒️

आदिशक्ती प्रणवरूपिणी

संबळ वाजतो दारी गं

अर्पण करते पंचप्राण हे

देई ठाव मज चरणी गं । १।

✒️

सजली माझी माय भवानी

श्वेत वस्रे सुंदर सजली गं

त्रिशूळ, डमरू घेऊन हाती

शुभ्र नंदीवरी बसली गं ।२।

✒️

भाळी मळवट चंदनाचा

वरी कुंकूम लाली चढली गं

कवड्याची माळ  घालूनी

कंठी ठुशी,तन्मणी शोभली गं ।३।

✒️

अथांग सागर करूणेचा

वाहे सदा तव लोचनी गं

भावभक्तीने नमन करते

त्रैलोक्याची तू जननी गं ।४।

✒️

लिंग स्थापूनी तप करूनी

होसी शिवाची स्वामिनी गं

प्रसन्न होऊन वर दे शक्तीचा

शरण मी तुझिये चरणी गं ।५।

✒️

© सौ. प्रतिभा पोरे

पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 102 – नयन हँसे तो दिल हँसे… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना  “नयन हँसे तो दिल हँसे। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 102 – नयन हँसे तो दिल हँसे… ☆

नयन हंँसें तो दिल हँसे, हँसें चाँदनी – धूप।

नयन जलें क्रोधाग्नि से, देख डरें सब भूप।।

नयन विनोदी जब रहें, करें हास परिहास।

व्यंग्य धार की मार से, कर जाते उपहास।।

नयन रो पड़ें जब कभी,आ जाता तूफान।

पत्थर दिल पिघलें सभी, बन आँसू वरदान।।

नयनों की अठखेलियाँ, जब-जब होतीं तेज।

नेह प्रीत के सुमन से, सजती तब-तब सेज।।

इनके मन जो भा गया, खुलें दिलों के द्वार।

नैनों की मत पूछिये, दिल के पहरेदार ।।

नयनों की भाषा अजब, इसके अद्भुत ग्रंथ।

बिन बोले सब बोलते, अलग धर्म हैं पंथ।।

बंकिम नैना हो गये, बरछी और कटार।

पागल दिल है चाहता, नयन करें नित वार।।

प्रकृति मनोहर देखकर, नैना हुए निहाल।

सुंदरता की हर छटा, मन में रखे सँभाल।।

नैंना चुगली भी करें, नैना करें बचाव।

नैना से नैना लड़ें, नैंना करें चुनाव।।

नैना बिन जग सून है, अँधियारा संसार।

सुंदरता सब व्यर्थ है, जीवन लगता भार।।

सम्मोहित नैना करें, चहरों की है जान ।

मुखड़े में जब दमकतीं, बढ़ जाती है शान।।

प्रभु की यह कारीगिरी, नयन हुए वरदान।

रूप सजे साहित्य में, उपमाओं की खान।।

 ©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विचार लेखणी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ विचार लेखणी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

अविचारी माणसे सध्या मी टाळतो आहे

तत्वांचीया अभ्यास ग्रंथे मी चाळतो आहे.

प्रत्यक्षात डोळ्यादिक्कतंचे अपराध

चिंतनात भविष्ये नित्य माळतो आहे.

हिंसाचक्र,नराधम पापात नाचती

मनालाच लेखणीत सांभाळतो आहे.

वृत्ती माझी  हळव्यात  डरपोक जरी

मानवी हक्कासाठी धैर्यास भाळतो आहे.

शस्त्रावीन पार संयमाचे अस्त्र टोकाचे

तेच सत्य शब्दज्वाळा कुरवाळतो आहे.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #210 ☆ हरला नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 210 ?

☆ हरला नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

भात्यामधला बाणच त्याच्या सुटला नाही

जखमी झाले कशी जरी तो भिडला नाही

मला न कळले कधी निशाणा धरला त्याने

नेम बरोबर बर्मी बसला चुकला नाही

माहिर होता अशा सोंगट्या टाकायाचा

डाव कुणाला कधीच त्याचा कळला नाही

बऱ्याच वेळा चुका जाहल्या होत्या माझ्या

तरी कधीही माझ्यावरती  चिडला नाही

गुन्हास नसते माफी आहे सत्य अबाधित

कधीच थारा अपराधाला दिधला नाही

जुनाट वाटा किती चकाचक झाल्या आता

कधी चुकीच्या वाटेवरती वळला नाही

गुलाम होता राजा झाला तो कष्टाने 

काळासोबत युद्ध छेडले हरला नाही

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ काकस्पर्श… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– काकस्पर्श…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

पितृपक्ष चालू आहे,

सगळीकडे धावाधाव |

खाऊन खाऊन आता

पोट भरलंय राव |

वर्षभर सगळे हुसकवती ,

कुणीच देत नाही भाव |

दाही दिशा ओरडत,

फिरतो कावकाव |

केवळ श्राद्ध करण्यापुरतंच

आठवतं आमचं नाव |

आम्ही मृतांसाठी पिंडाला शिवतो,

इतकंच माणसांना ठावं |

काकस्पर्श नाही झाला,

अर्थ गतात्मा इच्छा अपूर्ण |

दर्भाचा कावळा लावून म्हणती ,

अपूर्ण इच्छा करू पूर्ण |

काँक्रीटच्या जंगलात,

हरवला नैसर्गिक अधिवास |

रोडावली हो संख्या,

पितृपक्षापुरतीच आमची आस |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लोकशाही… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ लोकशाही☆ प्रा तुकाराम दादा पाटील

देवध्यानी सोनचाफा बहरला दारात आहे

 आत्मप्रौढीच्या खरा तो गुंतला प्रेमात आहे

शक्तिशाली राबणारे  हात दोन्ही भक्त झाले

 आदराने देव त्यानी पेरला रानात आहे

न्यायनिष्ठा पाळणारा कायदा लाचार झाला

 लोकनेत्यांनीच त्याला डांबला नोटात आहे

देवतांची आरती ही थांबली होती कशाने

जातिभेदाच्या कृपेने रोखली वादात आहे

लाजमोडे लोकसारे लाजही कोळून प्याले

घातपाती द्वेष त्यानी लपवला पोटात आहे

दैत्य झाले आज सारे राजसत्ता मागणारे

दहशतीची आग आता पसरली जोमात आहे

धावणारा देश आहे चालला कोठे कळेना

दीनवाणी लोकशाही कोणत्या शोधात आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 147 ☆ सत्यपरिस्थिती ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 147 ? 

☆ सत्यपरिस्थिती… 

अध्याय माझा संपेल

मी रुद्र भूमीत असेल 

घरी पेटतील चुली

सडा सारवण होईल 

 

 जेवायला बसतील सर्व

अश्रू डोळ्यांचे थांबतील 

माझ्याच घरातील सर्व

भोजनाचा स्वाद घेतील… 

 

 स्वाद घेत घेत भोजनाचा

आग्रह एकमेकांना होईल 

रुदन संपेल त्या क्षणाला

कामाला हात लागतील…

 

 हे जीवन क्षणभंगुर

इथे कुणाचे स्थिर ते काय 

आला त्याला जावे लागणार

यात आश्चर्य नाय…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares