मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हे चैत्र यामिनी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

?️?  चित्रकाव्य  ?️?

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

?– हे चैत्र यामिनी… – ? ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

(१२ ऑक्टोबर … ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री श्रीमती शांता शेळके यांचा जन्मदिन– … त्यांना भावपूर्ण आदरांजली🙏) 

शांत निरागस प्रसन्न मुद्रा 

विद्वत्तेचे तेज मनोहर

अस्सल मराठमोळी महिला

नीट नेटका पदर डोईवर ||१||

 

प्रशांत मानस सरोवरामधि

सुविचारांची फुलली कमळे

नादमधुर कविता गाण्यांनी

कुशीत तुमच्या जन्म घेतले ||२||

 

महाराष्ट्राच्या शेतमळ्यांतून

पिकविलेत शब्दांचे मोती

तुम्हा कारणे गंधित झाली

वनराईची काळी माती ||३||

 

साधी भोळी हळवी यामिनी

परंतु तेजस्विनी होती

शांता नावामध्ये कणखर

अभिमानाची ठिणगी होती ||४||

 

दरी खोऱ्यातून आमराईतून

घुमती तव कवितापंक्ती

घरांघरांतून नित्य तेवतील

शब्दांच्या मंगल ज्योती ||५||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक झोपडे कवितेचे… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

एक झोपडे कवितेचे☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

  रूजून अक्षरं अक्षरे

 शब्द हिरवे व्हावे

 गीत शब्दांचे होऊन

 हिरव्या कुशीत रूळावे

 

 ओल्या मातीच्या स्पृर्शानी

 शब्द गंधाळून जावे

 हिरवा आनंद घेऊन

 थवे पाखरांचे व्हावे

 

 सरींनी धुंद होऊन

 मातीला बिलगावे

 चला करूया पेरण

 रूजवू शब्दाचे बियाणे

 

 काळ्या मायला देऊ

 हे दान शब्दपुष्पांचे

 हिरव्या रानात बांधू

 एक झोपडे कवितेचे

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #176 ☆ संत कबीर… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 176 ☆ संत कबीर☆ श्री सुजित कदम ☆

सत्य कर्म सिद्धांताचे

संत कबीर द्योतक

पुरोगामी संत कवी

दोहा अभंग जनक…! १

 

ज्येष्ठ पौर्णिमेचा दिन

कबिरांचा जन्म दिन

देव आहे बंधु सखा

जपू नाते रात्रंदिन….! २

 

कर्म सिद्धांताचे बीज

संत कबीरांची वाणी

धर्म भाषा प्रांतापार

निर्मियली बोलगाणी….! ३

 

सांगे कबिराचे दोहे

सोडा साथ अज्ञानाची

भाषा संस्कृती अभ्यास

शिकवण विज्ञानाची…! ४

 

बोली भाषा शिकोनीया

साधलासे सुसंवाद

अनुभवी विचारांना

व्यक्त केले निर्विवाद…! ५

 

एकमत एकजूट

दूर केला भेदभाव

सामाजिक भेदभाव

शोषणाचे नाही नाव…! ६

 

समाजाचे अवगुण

परखड सांगितले

जसा प्रांत तशी भाषा

तत्त्वज्ञान वर्णियले…! ७

 

राजस्थानी नी पंजाबी

खडी बोली ब्रजभाषा

कधी अवधी परबी

प्रेममयी ज्ञान दिशा…! ८

 

ग्रंथ बीजक प्रसिद्ध

कबीरांची शब्दावली

जीवनाचे तत्त्वज्ञान

प्रेममय ग्रंथावली…! ९

 

नाथ संप्रदाय आणि

सुफी गीत परंपरा

सत्य अहिंसा पुजा

प्रेम देई नयवरा…! १०

 

संत कबीर प्रवास

चारीधाम भारतात

काशीमधे कार्यरत

दोहा समाज मनात…! ११

 

आहे प्रयत्नात मश

मनोमनी रूजविले

कर्ममेळ रामभक्ती

जगा निर्भय ठेविले…! १२

 

हिंदू मुस्लिम ऐक्याचा

केला नित्य पुरस्कार

साखी सबद रमैनी

सधुक्कडी आविष्कार…! १३

 

बाबा साहेबांनी केले

संत कबीरांना गुरू

कबीरांचे उपदेश

वाट कल्याणाची सुरू…! १४

 

काशीतले विणकर

वस्त्र विणले रेशमी

संत कबीर महात्मा

ज्ञान संचय बेगमी…! १५

 

सुख दुःख केला शेला

हाती चरखा घेऊन

जरतारी रामनाम

दिलें काळीज विणून…! १६

 

संत्यमार्ग चालण्याची

दिली जनास प्रेरणा

प्रेम वाटा जनलोकी

दिली नवी संकल्पना…! १७

 

मगहर तीर्थक्षेत्री

झाला जीवनाचा अंत

साधा भोळा विणकर

अलौकिक कवी संत…! १८

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गंध गाभार्‍यातळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– गंध गाभार्‍यातळी… – ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

बंद केले नयनद्वार

जणू मन गाभार्‍याचे कवाड

सगळी पानगळ झडते बहर

जपले मुळाशी खोल —

पण त्याची चिवचिव दिसलीच

जेव्हा एक थेंब थरथरतो द्वाड

म्हणूनच तर दिसते साजरी

 ही अर्धोन्मीलित कळी —- 

चेहरा सांगे  असूनही बंद

जपले आहेत गंध••• गाभार्‍यातळी

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 203 ☆ पाऊस प्रतिक्षा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 203 ?

 📱 पाऊस प्रतिक्षा 📱 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

ठरवलं होतं मनाशी,

यंदाच्या पावसात,

भिजायचं तुझ्या समवेत,

करायची पुन्हा एकदा उजळणी

त्या पावसाळी क्षणांची!

तारूण्यातली सारी हिरवाई

आणि पावसाची रिमझिम

दाटून राहिली मनभर…

आणि कितीतरी—

पावसाळी एस.एम.एस. पाठवले तुला!

तुझं प्रत्युत्तर–

“भेटू या ना , यंदाच्या पावसात!”

 

तेव्हापासून मी प्रतिक्षेत,

तुझ्या आणि पावसाच्याही!

तू ही पाठवलेस एस.एम. एस. …..

पहिल्या प्रेमाचे,पहिल्या पावसाचे,

पण पाऊस आलाच नाही !

यंदा पावसाने खूपच उशीर केला !

आता जाणवू लागली आहे,

त्याची रिमझिम…..

मी साधू पहातेय संवाद,

तुझ्याशी….पावसाशी….

आणि ऐकते आहे,

मोबाईल मधून येणारे….

नाॅट रिचेबल…नाॅट रिचेबल…

हे उत्तर….वारंवार!!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फासे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ फासे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

डोई निरभ्र आकाश

पायी चालाविशी वाट

वाटसरुची सोबत

संथ वारियाची लाट

 

ऊन पावसाचा खेळ

सत्य स्वप्नांचीही भेट

दु:खासवे सुखाची ही

असावीच वहिवाट

 

जरी वाटते कितीही

असो असे..नको तसे

उरे हातात आपुल्या

फक्त टाकायचे फासे…

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री शिवाय माणूस अपूर्णच !!!… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ स्त्री शिवाय माणूस अपूर्णच !!!… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

स्त्री शिवाय माणूस अपूर्णच !.. बघा ना…

शिक्षण घेत असताना ‘ विद्या ‘

नोकरी उद्योग करताना ‘ लक्ष्मी ‘

अंतसमयी ‘ शांती ‘! 

सकाळ सुरु होते तेव्हा ‘ उषा ‘

दिवस संपताना ‘ संध्या ‘!

झोपी जाताना ‘ निशा ‘

झोप लागली तर ‘सपना’!

मंत्रोच्चार करताना ‘ गायत्री ‘

ग्रंथ वाचन करताना  ‘ गीता ‘ ! 

आपुलकीच्या काळी ‘ नम्रता ‘ 

उद्विग्न पणात ‘ शितल ‘

मंदिरात ‘ दर्शना ‘ ‘ वंदना ‘ ‘ पूजा ‘ ‘आरती ‘अर्चना

…. शिवाय ‘ श्रद्धा ‘ तर हवीच !

वृद्धपणी  ‘ करुणा ‘ .. पण ‘ ममता ‘ सह बरं

आणि राग आलाच तर  ‘ क्षमा ‘ !

जीवन उजळविण्यासाठी ‘उज्ज्वला’ 

कठोर परीश्रम म्हणजे कांचन व साधना ! 

आणि सर्वात महत्वाचं …. 

प्रश्न सोडवायचा असेल तर सुचली पाहिजे ती “कल्पना” 

आनंद मिळविण्यासाठी  ‘कविता’ आणि कविता करण्यासाठी ‘प्रतिभा’ ! 

आणि .. अशा “कविता” रचण्यासाठी असावी लागते जवळ ती “प्रज्ञा”

लेखक : अज्ञात

संग्रहिका : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रसन्न देव… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रसन्न देव… ☆ श्रीशैल चौगुले ☆

ओळखीचा कोण

देव रहातो इथे

निमीत्ते कारण

विश्व पहातो इथे.

 

फुलवूनी भुमी

पशु पक्षाशी नाते

सृष्टीत अदृश्य

बासरी कशी गाते.

 

मेघ सूर्य चंद्र

ऋतूत तो असतो

कायेचे जीवन

पाहुनीया हसतो.

 

म्हणे, राधा सखी

माझी अजाण प्रीत

संसार सागर

जाण रुक्मीणी नीत.

 

गोकुळ मथुरा

वृंदावन भक्तीचे

संस्कृती जागृत

ज्ञान प्यावे मुक्तीचे.

 

राधा-कृष्ण मन

स्वप्नांचे हे सदन

लिला अनंतादी

कर्ता मधुसूदन.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #209 ☆ भुरळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 209 ?

☆ भुरळ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

प्रेम तुझे दे नितळ मला

त्यात स्थान दे अढळ मला

पहात नाही ढुंकून तू

तरी तुझी का भुरळ मला ?

तुझ्याचसाठी अमृत मी

समजतेस का गरळ मला ?

पाण्यावरती वावरते

दे ओठांचे कमळ मला

होय प्रीतिचा याचक मी

कधीतरी घे जवळ मला

पान मसाला झालो मी

हवे तेवढे चघळ मला

अशोक आहे दास तुझ्या

चंदन समजुन उगळ मला

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दोन ऑक्टोबर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?दोन ऑक्टोबर– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

दोन ऑक्टोबर | नेत्यांहाती  झाडू |

स्वच्छता आवडू | लागे  त्यांना ||१||

स्वच्छता संदेश | देण्या चढाओढ  |

दामटती घोडं | दिखाव्याने ||२|||

वर्षभर चाले | कचरा  साम्राज्य |

भाग अविभाज्य |  व्यवस्थेचा ||३||

‘ड्राय डे’ म्हणून | आडवी बाटली |

गर्दीच लोटली | काल तिथे ||४||

तळीराम करी | आधीच  बेगमी |

पडू नये कमी |  एक प्याला ||५||

सूटबूट वाले | चालवी चरखा  |

चढवी बुरखा |  स्वदेशीचा  ||६||

एक दिवसाचा | केवळ दिखावा |

बापूनांही ठावा  |  बिब्बा म्हणे ||७||

… १ ऑक्टोबर… महाकवी ग. दि. माडगूळकर यांचा  जन्मदिवस… साहित्यातल्या या तेजोमय भास्कराला विनम्र प्रणाम… 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares