महंत कवी राज शास्त्री
साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 57
☆ प्रेम… ☆
प्रेम आंधळं असतं
म्हणायला सोप्प जातं
झाल्यावर मात्र
गोड सुद्धा कडू लागतं…०१
प्रेम आंधळं असतं
ते कुठे ही होतं
काळी गोरी बोबडी
प्रेम मानत नसतं…०२
प्रेम आंधळं असतं
हे कसं पटवायचं
घरच्यांसमोर सांगा
सामोरं कसं जायचं…०३
प्रेम आंधळं असतं
पुरावे आहेत बारा
तरी सुद्धा पहा हो
नाही होत कमी तोरा…०४
प्रेम आंधळं असतं
नाही कधी करायचं
पण प्रेम होऊनच जातं
अलिप्त कसं रहायचं…०५
प्रेम आंधळं असतं
गणित खूप कठीण प्रेमाचं
भले भले इथे शूर थकले
न उलगडे कोडं प्रेमाचं…०६
माझे चित्त तुला अर्पण
मीरा वदली कान्हाला
विष पिऊन दिला दाखला
प्रेमाचा असा बोलबाला…
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈