कवितेचा उत्सव
?♂️ स्वातंत्र्याचे मानकरी?♂️
☆ सौ. विद्या पराडकर ☆
क्रांती ज्योत पेटविली तू क्रांतीच्या आद्य प्रणेत्या
नाव अमर केले इतिहासात वासुदेव बळवंता
भारत मातेच्या अत्याचारा मदनलाला दिलेस तू उत्तर
इंग्रज अधिकाऱ्याचा करुनी खून
तारुण्याचा जोमातच ते स्वातंत्र्य लक्ष्मीचे भक्त बनले
पारतंत्राच्या शृंखला तोडण्या राजगुरू भगतसिंग फावसावर लटकले
केसरीतून सिंह गर्जना करून स्वराज्य मंत्राचा उद्घोष केला
स्वातंत्र्याच्या प्राणवायु तू लोकमान्य लोकप्रिय झाला
स्वातंत्र लक्ष्मीचे घालुनी कंकण देशसेवेचे बांधूनी तोरण
सागरातून उडी घेऊन संकटि घातले पंचप्राण
सावरकरा नरकासम तू शिक्षा भोगून
कलीकाळाला जिंकून घेऊन घेतले सतीचे वाण
गाजविला तू 9 ऑगस्टचा क्रांती दिन चले जाओ जीऊ करूनी घोषणा
धन्य धन्य महात्माजी इंग्रजांविरुद्ध लढा देण्याची केलीस खरी योजना
सुभाषचंद्र उगवला हिंद भू्मीच्या आकाशी
“मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” घोषणेने अमर झाला जनमानसी
“लोहपुरूष तू वल्लभ भाई पटेल मातृभूमीच्या”
“मानबिंदू तू हैदराबाद चा”
उषा उगवली स्वातंत्रविरांच्या बलिदानाने
प्रभा फाकली स्वातंत्र्याची चहू दिशेला
भारतभूच्या लाख वीरांनी पावन केली भारत भूमी
गेली निशा आली उषा पवित्र झाली मातृभूमी
© सौ. विद्या पराडकर
पुणे (महाराष्ट्र)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈