मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समजुतीचा घोटाळा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 समजुतीचा घोटाळा !🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

⭐

       ( ३ ) “  “ 

                कवी : प्रमोद वर्तक 

 समजुतीचा घोटाळा ! 

उभा होतो बाल्कनीत 

नजारा भोवतीचा पहात, 

दिसे समोरच्या घरातून 

हलणारा ललनेचा हात !

*

जरी दुसरीकडे पाहिले तरी 

तिचा हात नाही थांबला, 

मम हृदयात काळजाचा 

या वागण्याने ठोका चुकला !

*
द्यावा प्रतिसाद तिला,

का दुर्लक्षावे मज सुचेना, 

केला कानाडोळा तरी 

तीचा हात हलणे थांबेना !

*
पण सौ.चा बसता धपाटा 

मी मग भानावर आलो, 

अन् मी त्या गावचाच नाही 

असे तिला भासवू लागलो !

*
“मांडे आपले मनांतले 

भाजा आपल्याच मनांत,

पुरी न होई इच्छा जन्मात

लाज बाळगा थोडी जनांत !

*
साफ करी ललना काच

न की दावी तुम्हां हलवून हात,

चला आता मुकाट्यानं घरात

दावते तुम्हां माझी करामत !”

⭐

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तेवत राहणे महत्त्वाचे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “तेवत राहणे महत्त्वाचे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

पणती असो वा स्वप्नं…

तेवत राहणे महत्त्वाचे…

*

आकाशकंदील असो वा जीवन..

प्रकाश देत राहणे महत्त्वाचे…

*
रांगोळी असो वा आयुष्य…

रंग भरत राहणे महत्त्वाचे…

*

मिठाई फराळ असो वा प्रेम…

सगळ्यांना वाटत राहणे महत्त्वाचे..

*

तोरण असो वा निर्धार..

बांधत राहणे महत्त्वाचे…

*

दिव्यांची आरास असो वा समृद्धी..

लक्ष्मीच्या पावलाने येत राहणे महत्त्वाचे..

*
अभ्यंगस्नान असो वा विचार…

नाने शुचिर्भूत होणे महत्त्वाचे…

*      

भाऊबीज असो वा मनाचा गोडवा…

नात्यांची लयलूट होणे महत्वाचे..

*

दिवाळीच्या सर्वांना सदिच्छा असो वा शुभेच्छा…

भरभरून देत राहणे महत्वाचे…

  ☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तगमग… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ तगमग… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

नभ अंधारून येता

काळजात धडधड

 पिकलेल सारं सोनं 

 आहे शेतात उघड

*

 शेतामघे राबताना

 सुखस्वप्नांना पेरलं 

 डोळ्यापुढे तेच स्वप्न

 प्रत्यक्षात साकारलं 

*

 आता करूनी मळणी

 नेणे घरामघे रास

 याच्यापुढे ओठामधे

 येई सुखाचाच घास

*

  अचानक अंधारून

  येता अवकाळी ढग

  नको नको कोसळाया

  जीवांमाजी तगमग

*

  डोळ्यापुढे गुरं ढोरं

  आईबाप आणि पोर

   काळजीचे ढग सारे

  भवताली  धरी फेर

*

   राबतसे पोटासाठी

   धान्य जगा पुरवितो

   स्वार्थ परमार्थ साधत

   तोच जगणे जगतो

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – गंधित समीर चैतन्याचा…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – गंधित समीर चैतन्याचा…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

प्रकाश मांगल्य ! दिवाळीचा सण !

राहो आठवण ! वर्षभर  !!१!!

*

सवत्स धेनूचे ! मंगल पूजन !

करती सज्जन ! भक्तीमय!!२!!

*

धन्वंतरी वंदय ! वैद्यकीय सेवा!

आरोग्याचा ठेवा ! आयुर्वेद !!३!!

*

अभ्यंग स्नानाने ! देह मन शुद्ध !

अष्टलक्ष्मी बद्ध! कृपा दृष्टी !!४!!

*

बली प्रतिपदा! मंगल पाडवा !

नात्यात गोडवा! वृद्धिंगत !!५!!

*

बहीण भावाचा! दिन भाऊबीज!

नाती सुख चीज! ओवाळणी !!६!!

*

बिब्बा दीपावली ! सारती तिमिर !

गंधित समीर ! चैतन्याचा !!७!!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपावली… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपावली…🪔 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

आयुष्य सुख दुःखाचे

 पावसातील उन्हाचे

 दिपावली शिंपीत जाई

 चांदणे ऋतुबंधाचे —

*

विश्वदीप उजळे

 घेऊनी स्निग्ध वात

सहा ऋतूंचे सोहळे

 जीवन गीत गात —

*

 सौभाग्य नंदादीप

 अखंड पुण्य मंदिरी

 गर्भगृह  तेजाळले

 भक्त औक्षण करी —

*

 अनादी अनंत परंपरा

 आयु सजवुनी जाती

 कित्येक सण बहरती

 मंगल पवित्र ज्योती —–

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनोखा फराळ ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 अनोखा फराळ !🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

⭐

लाडवाचा गोडवा

ठेवा जिभेवर,

पण काटा चकलीचा

नसावा त्यावर !

*

चिवड्याचा खमंगपणा

स्वभावात असावा

पण शेवेचा तिखटपणा

त्यात नसावा !

*

चिरोट्यांचे पापुद्रे

असावेत मनाला,

जाळीदार अनारसे

त्याच्या सोबतीला !

*

करंजीचे सारण

खरपूस असावे,

कुरकुरीत कडबोळे

तोंडात विरघळावे !

*

खारे अथवा गोड

शंकरपाळ्यांना नाही तोड,

दिवाळी सर्वांची

होऊ दे गोड गोड !

दिवाळी सर्वांची होऊ दे गोड गोड !

⭐

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय निवडायचं ? – – फटाके…  की पुस्तके… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ काय निवडायचं ? – – फटाके  💥 की पुस्तके 📚 …कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

फटाके मोठा आवाज ⚡करतात.

पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात.

*

फटाके हवेचं प्रदूषण करतात.

पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात.

*

फटाके अक्षरशः पैसे जाळतात.

पुस्तके मात्र पैसे उभे करतात.

*

फटाके लहानग्यांना इजा करतात 

पुस्तके बाळांना 👶छान रमवतात 

*

फटाके पक्षीप्राण्यांना घाबरवतात 

पुस्तके सर्व माहिती पोहोचवतात 

*

फटाके कान किर्रर करुन सोडतात.

पुस्तके मानसिक समाधान 🧠देतात.

*

फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात.

पुस्तके माणसाला जमिनीवर ठेवतात.

*

फटाके विध्वंसक मूल्य 🔥रुजवतात.

पुस्तके रचनेचा आग्रह धरतात.

*

फटाके क्षणभर प्रकाशातून अंधाराकडे नेतात.

पुस्तके तिमिरातूनी तेजाकडे वळवतात.

*

फटाके म्हणजे बालमजूरीला प्रोत्साहन.

पुस्तके म्हणजे बालबुद्धीला आवाहन.

*

फटाके ही तर खरीखुरी विकृती.

पुस्तके च उभी करती मानवी संस्कृती.

*

भूषण नित्य वाजवी विवेकाची घंटा 

फटाक्यास फाटा देवूनि पुस्तकेच वाटा 

*

आता काय निवडायचं तुम्हीच ठरवा !

विवेकाचा आवाज बुलंद करु या….

(🙏पालकांना हात जोडून विनंती की या दिवाळीला मुलांना फटाक्याऐवजी काही पुस्तके घेऊन द्या )

कवी :अज्ञात

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कण तेजाचे वेचूया चला… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

कण तेजाचे वेचूया चला ☆ श्री मुबारक उमराणी ☆

कण तेजाचे वेचूया चला

दीप आनंदी लावू या चला !!धृ !!

*

तेज:कण चमचम

चमकती दानत्वात

लक्ष दीप उजळत

लक्षचांदण होऊ चला! !१!

*

दु:खी जन मन जगी

आसू पुसत पुसत

लाडवाचा घास भरवीत

दु::ख त्यांचे घेऊ चला !!२!!

*

तेलात उकळून कानुले

गोडवा देत म्हणते

संकटातूनच सुखाची

नवी वाट माळू चला!!३!!

*

खुसखुशीत चकली फिरे

मोतीचूर लाडवासंगे

शंकरपाळीसम सारे

गोड गोड बोलू चला!!४!!

*

अनारसे, बालूशाही, पोहे

धरून हात खाजाचा

नाजुक रवा, बेसन लाडू

म्हणे सुखाचे गाणे गाऊ चला! !५!!

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आली दिवाळी दीप घेऊनी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

आली दिवाळी दीप घेऊनी… 🪔 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

*

आली दिवाळी दीप घेऊनी

 गंधित चांदणे उटणे लेवूनी

*

 शरद ऋतुचा मादक वास

 गुलाबदाणी अत्तर सुवास

 पहाट सुगंधी वारा खास

 दवबिंदूंचा सडा शिंपुनी

*

 गारव्या मध्ये मखमली रात

 पणती मध्ये घालून वात

 प्रेमळ स्पर्ष उजळे ज्योत

 चांदणे पहाटे दवात दाटुनी

*

 चंद्र चांदणे अनेक पणत्या

 तमा मध्ये उजळीत होत्या

 अनादी परंपरा गात होत्या

 अनंत प्रवासी पथ दर्शवूनी

*

आली दिवाळी दीप घेऊनी

गंधित सुवास अत्तर पेरूनी

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वच्छता – – – ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

स्वच्छता – – – ☆ श्री अनिल वामोरकर ☆

होणार होणार हो

घराची स्वच्छता होणार

मनाची कधी?

होणार हो होणार?

*

ढीगभर कचरा

षडरिपूंचा हो

कुविचारांचा हो

कधी काढणार हो. . .

*

रंगवू या हे

पंचभूतांचे देहघर

धवल सुविचारांनी

आणि विवेकानी हो. . .

*

दीपमाळ ती

परोपकाराची

पणत्या त्या प्रेमाच्या

साधनेचे धृत

अंतरी प्रकाश उजळेल हो. . .

सर्वांना दिवाळीच्या अनंत शुभेच्छा… 🪔🏮💐

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares