श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – विडंबन कविता – दिवस सेलचे सुरु जाहले – बायांचे मन प्रसन्न झाले ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆
मूळ कविता – दिवस सुगीचे सुरु जाहले – शेतकरी मन प्रसन्न झाले–
खळखळ ,छमछम,डुमडुम,पटडुम लेझीम चाले जोरात।
कवी- ग.ह. पाटील.
——- दिवस सेलचे सुरु जाहले
——- जिकडे तिकडे बोर्ड झळकले
——- बायांचे मन प्रसन्न झाले
—— पटकन, झटकन, भर्कन, सर्कन
—— विक्री होतसे जोरात ।।
—— नऊ वाजता शटर उघडुनी,
—— गाद्या, गिरद्या साफ करोनी
—— सुंदर साड्या बाहेर टांगुनी
—— सेल्सगर्ल्स बसल्या थाटात।।
—— नाश्ता, सैपाक धुंदीत उरकुन
—— ‘त्या’च्या कडुनी रक्कम उकळुनी
—— मैत्रीणीना कॉल करूनी
—— भरभर, तरतर, लवकर, गरगर
—— फिरति सख्या बाजारात ।।
—— इथे हकोबा, तिथे बांधणी,
—— गर्भरेशमी किंवा चिकणी,
—— वस्त्रांची राणि ही पैठणी
—— सुळुसुळु, झुळुझुळु, हळुहळु, भुळुभुळु
—— ढीग संपतो तासात ।।
—— विटकि,फाटकी, कुठेकुठे-
—— घरि आल्यानंतर कळते
—— कपाट जरि भरभरुन वाहते
—— भुलवी, झुलवी, खुळावणारा
—— सेल अखेरी महागात ।।
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈