मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ☆ बाप्पा येती घरा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बाप्पा येती घरा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

घेऊनी आता डोस लसीचे

चला आणूया गणरायाला

वाजत गाजत ढोल नि ताशे

सिद्ध होऊया स्वागताला

 

सडा शिंपुनी रेखू रांगोळी

तोरण बांधू दारात

माला सोडू सुमनांच्या

बाप्पा बसतील मखरात

 

जबाकुसुम शमी पत्री

लाडू मोदकाची गोडी

मनोभावे प्रार्थू गणेशा

वाहुनी ही दुर्वांची जुडी

 

आप्त स्वकीय सारे जमले

गाऊ आरती तालात

नाचू डोलू आनंदाने

झांजांच्या या गजरात

 

धूप दीप नैवेद्य अर्पूया

मिष्ठांन्नाने तबक भरूया

प्रसाद सेवना पंगत बसली

मुखी बाप्पा मोरया म्हणूया

 

आगमन झाले सुखकर्त्याचे

नकोच आता चिंता

कशास भ्यावे कोरोनास त्या

घरात असता विघ्नहर्ता?

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 102 ☆ वाळवी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 102 ☆

☆ वाळवी ☆

प्रेमपत्रे कागदाची, मोठ्या कष्टाने जपली

गोड स्वप्नांना ह्या माझ्या, कशी वाळवी लागली

 

अक्षरे ही मौन होती, नाही काहीच बोलली

कोणा घाबरून त्यांनी, मान खाली ही घातली

 

कागदांची ह्या चाळण, अक्षरांचा झाला भुगा

राख स्वप्नांची सांडली, दिला नशिबाने दगा

 

साठलेले डोळ्यांमध्ये, होते सारे आठवले

एकएका अक्षराला, आज कोंब फुटलेले

 

देह कागदाचा होता, संपविण्या साधा सोपा

नष्ट करून दाखवा, माझ्या मनातला खोपा

 

प्रेमपत्रांचा हा गंध, साठलेला ह्या मनात

मन रेंगाळते आहे, भूतकाळाच्या वनात

 

गेली पत्रे जाऊदेत, जपू श्रद्धा काळजात

तुझी आठवण येता, अश्रु जमती डोळ्यात

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ करी स्वागत गणरायाचे..! ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  कवितेचा उत्सव ? 

☆ करी स्वागत गणरायाचे..! ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गजवदना गणराया

स्वागत तुझे मजदारी

बांधीले तोरण सजले मखर

रांगोळी रेखली   रंगभरी

 

नयनातल्या पंचारती

ह्रदयातले लेझीम घणघण

लेउन स्वागता तुझ्या

आनंदाने ऊसळतो कणकण..

 

सारीतो विवंचना सार्‍या

नको भयाची छाया

मिटून मुक्त चिंता  आवरी

विश्वासूनी विनायका तुझीच माया…

 

तबकात मांडली रक्तपुष्पे

हळद कुंकवाचे करंडे

सहस्त्र दुर्वांची जुळली जुडी

मोदकासवे केले पुरणांचे मांडे

 

चौसष्ट कलांचा अधिपती

प्रथमेशा बुद्धीदाता

हेरंबा शिवपुत्रा

तुजविण आम्हा कोण त्राता…..

 

दशदिनीचा पाहुणा तू

तुजसाठी बाप्पा  मोरया

भावे रचीला पाहुणचार

सत्वर उतरा मानवा रक्षाया….

 

करु रक्षण सृष्टीचे

सत्यासाठी झिजवू कुडी

नको आम्हा माडी गाडी

अधर्माची करुन कुरवंडी

वाहीन ही दुर्वांची जुडी…

 

सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीमहालक्ष्मी ☆ सौ. विद्या वसंत पराडकर पुणे

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ? श्रीमहालक्ष्मी ?☆ सौ. विद्या वसंत पराडकर पुणे

ये ये लक्ष्मी माहेराला

धावून ये ग

भक्तांच्या हाकेला

साद तू घाल ग

 

भाद्रपद मासी अनुराधा नक्षत्री

स्वागत तुझे आम्ही करू ग

ये ये लक्ष्मी माहेराला

धावून ये ग

 

चंदेरी साडी

तुज नेसवू ग

सोनेरी चोळी

तुज लेववू ग

 

सोने मोती अलंकार

तुज चढवू ग

बिंदी कंबर पट्टा, राणीहार

तुज सजवू ग

 

भाद्रपद मासी जेष्ठा नक्षत्री

षोडशोपचारी पूजन तुझे करू ग

ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी

आनंदात भजू ग

 

मळवट शोभे ललाट भारी

पूजू सोळा दूर्वा सोळा पत्री

शोभे फुले गोड गोजिरी

हार तुरयांनी सजवू ग

 

षोडश पदार्थांचा नैवेद्य दाखवू ग

करंजी अनारशाचा फुलोरा करु ग

भाव भक्तीने निरांजन ओवाळू ग

खणा-नारळाने ओटी भरू ग

 

पुढील वर्षीचे निमंत्रण देऊन

लक्ष्मीला निरोप देवू ग

तीन दिवस ब्रम्हानंद पावलो ग

दिवाळी दसरा फिका पडला ग

 

© सौ. विद्या वसंत पराडकर पुणे

१२/९/२०२१।

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 47 ☆ परस्पर प्रेम… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 47 ? 

☆ परस्पर प्रेम… ☆

(अंत्य-ओळ काव्य.)

मनाची औदार्यता असावी

मनाची औदार्यता जपावी

मन उदार करून सहज

स्नेहाची उधळण करावी…!!

स्नेहाची उधळण करावी

सहिष्णूता, ती जपावी

वाट्यातील वाटा देतांना

अहंकाराची झालर नसावी…!!

अहंकाराची झालर नसावी

सहजतेने मुक्त व्हावे

क्षणभंगूर जीवनात आपुल्या

काहीतरी निर्मळ कार्य करावे…!!

काहीतरी निर्मळ कार्य करावे

कीर्ती गंध पसरवून द्यावा

शेवटी काय राहते भूव-री

याचा विचार स्वतः करावा…!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 12 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 12 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

१.   भांड्यातल्या पाण्याचा

        स्वच्छ चमकता तळ

        समुद्राचं पात्र किती

        गहन…. गूढ…. अथांग …

        छोट्या स्त्यांना जसे-

        स्पष्ट, सोपे, शब्द

        श्रेष्ठ सत्यांना वेढलेली

        नि:शब्द खोल शांतता

 

२.   स्तुती ओशाळं करते मला

      कारण

      अगदी चोरटेपणानं

     मीच तिची भीक मागतो…

 

३..    वादळाला उत्तर देणारा आवाज 

      असतोच आमच्याजवळ

      पानं म्हणतात आम्हाला…

      सतत सळसळतो आम्ही,

      पण तू रे कोण इतका गप्प?

      मी?

      मी फक्त फूल आहे.

 

४.   त्या कडयाच्या

     पार टोकावर बसवतोस

     आपल्या प्रीतीला?

     फार उंच आहे रे ते….

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लेणी ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ लेणी ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

 मनातील अर्जित भावनांची लेणी,

काळीज कोरतं स्वतःवर..

 

ही लेणी

सौन्दर्याने ओसंडून वाहणारी,

कधी गूढ वाटणारी…

तर कधी सहज सुंदर निरागस…

 

गच्च आशयांनी तृप्त,

लावण्यानी युक्त लेणी पाहून,

कुणी हसत फिदीफिदी,

कुणी मत्सराने पेटतो,

कुणाचा प्रयत्न मोडतोडीचा,

तर काहींचा त्या नष्ट करण्याचा…

 

असतात हातावर मोजणारेच,

त्याची किंमत समजणारे…

त्या मृदू काळजासारखे!

 

तरीही,  सादर करत काळीज,

जीवंत कोरीव लेण्यांना…सर्वांपुढे!

पण.. नाही उतरवत कधीही स्पर्धेत,

कारण, ही जीवंत लेणी,

नसतातच स्पर्धेसाठी…

असतात ती अतीव सुंदर…

आपापल्यापरीने!

मग का तोलायचं-मोलायच त्यांना?

इतर लेण्याबरोबर?

रोजच कोरली जातात,

कमनीय लेणी!

प्रत्येक लेण्यांची सुंदरता

फक्त अनुभवायची!

दिवसेंदिवस…

 

काळजाने-

काळजाच्या गुहेत कोरलेली,

घडवलेली,

ती सुबक लेणी,

नक्कीच ऐतिहासिक होतील,

हा एकच विश्वास! काळजाचा…

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अद्वैत ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ अद्वैत ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

सूर छेडिले मधुर

जशा सरीवर सरी

गोकुळाला वेड लावी

कान्हाची धुंद बासरी ||

 

वसे मोहन अधरी

हेवा वाटे गोपिकांना

भाग्य तुझे असे मोठे

याचे कारण सांगना ||

 

बासरीची ती साधना

कधी कुणा ना कळते

सर्वसंग परित्यागे

नतमस्तक ती होते ||

 

अहंकार त्यजुनीया

झाली पोकळ आतूनी

षडरिपू दूर होती

सहा छिद्रांच्या मधूनी ||

 

‘मी’पण नसे तियेला

शांत सदैव रहाते

फुंकर घालीता कान्हा

शीळ मधुर वाजते ||

 

परिपूर्ण या गुणांनी

चीज अनोखी बासरी

मुरलीधराला प्रिय

धरी सदैव अधरी ||

 

कान्हाच्या स्वरसंगमी

सारे विश्व वेडे होते

कृष्ण बासरीचे ऐसे

अद्वैत घडून येते ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणपती बाप्पा मोरया ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ गणपती बाप्पा मोरया ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆ 

(सुवर्ण सुधाकरी अभंग रचना)

भादव मासात | चतुर्थी दिनात ||

बाप्पा भुलोकात | आनंदात ||१||

 

प्रसन्न अवनी | चैतन्य गगनी ||

भालचंद्र जनी | तन मनी || २||

 

आरंभी नमन | रंगले भजन ||

मानस पूजन | गजानना ||३||

 

भरजरी शेला | पितांबर नीला ||

शेंदूर लाविला | हेरंबला ||४||

 

हिरे मुकुटात | हार तो गळ्यात||

नुपूर पायात | एकदंता ||५||

 

हातात परशू | धरिले अंकुश ||

निर्गुण तो ईश | गणाधीश.||६||

 

चंदनाची उटी | नागबंध कटी ||

गदा धरी मुष्टी | तो विकट ||७||

 

कला अधिकारी | दिनांचा कैवारी||

संकटे निवारी | विघ्नेश्वर ||८||

 

तूच बुधिदाता | विश्वाचा नियंता ||

वेद शास्त्र महंता | शिवसुता ||९||

 

आतुर दर्शना | मुषकवाहना ||

तू चित्तरंजना | त्रिनयना ||१०||

 

भक्तांचा तो मेळा | सुखद सोहळा ||

धुंद परिमळ | सदाकाळा ||११||

 

मी गें अल्पमती | करावया स्तुती ||

तूच देई स्फूर्ती | गणपती ||१२||

 

तूच माझी माता | तूच माझा पिता ||

क्षमा करी आता | कृपावंता || १३||

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 71 – हरवलेले माणूसपण ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 71 – हरवलेले माणूसपण ☆

 समृध्दीने नटलेल घर पाहून हरवले देहभान ।

शोधून सापडेना कुठेही हरवलेले माणूसपण ।।धृ।।

 

कुत्र्या पासून सावध राहा भलीमोठी पाटी।

भारतीय स्वागताची आस  ठरली खोटी।

शहानिशा करून सारी आत घेई वॉचमन ।।१।।

 

झगमगाट पाहून सारा पडले मोठे कोडे ।

सोडायचे कुठे राव हे तुटलेले जोडे ।

ओशाळल्या मनाने कोपऱ्यात  ठेऊन ।।२।।

 

सोफा टीव्ही एसी सारा चकचकीतच मामला।

पाण्यासाठी जीव मात्र वाट पाहून दमला ।

नोकराने आणले पाणी भागली शेवटी तहान ।।३।।

 

भव्य प्रासादातील तीन जीव पाहून ।

श्रीमंतीच्या कोंदणाने गेलो पुरता हेलावून ।

चहावरच निघालो अखेर रामराम ठोकून।।४।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares