मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागतिक महिला दिना निमित्त – रणचंडिकेचा हात.. ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ जागतिक महिला दिना निमित्त – रणचंडिकेचा हात.. ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

पानोपानी, देठोदेठी शकूनी बसले,

करण्या कुरुवंशाचा नाश.

सांग द्रौपदी,काय फायदा निव्वळ देवोनिया शाप…..

 

कृष्ण सख्यालाही न्याय मिळविण्या,

इथे लागू लागली धाप.

सांग द्रौपदी……..

 

अंध नसूनही धुतराष्ट्र इथले

बैसले घेऊन गांधारीचा थाट

सांग द्रौपदी………

 

सद् रक्षणाची प्रज्ञा ज्यांची

ते भीष्म ही बसले कोनाड्यात

सांग द्रौपदी…..

 

हतबल झाले विदुर इथले

अन् बहुमताच्या करते

न्यायाचा संहार.

सांग द्रौपदी…….

 

मूकबधीर होऊन स्तंभ ही चवथा

दिसतो कर्णाच्या भूमिकांत.

सांग द्रौपदी……..

 

निस्तेज जाहले पांडव सगळे,

गांडिव, गदा,

गहाण पडली,सत्तेच्या दारात

सांग द्रौपदी,,,,,,,,,

 

सत्व युधिष्ठिराचे झाकोळले

पुरते मलिद्यांच्या अस्वादात

सांग द्रौपदी,,,,,,,

 

काय फायदा अरण्य रुदनाचा

शंढांच्या या बनात.

सांग द्रौपदी……….

 

सोड भूमिका हतबल द्रौपदीची.

अन् हो रण चंडिकेचा हात

सांग द्रौपदी…………

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 88 ☆ वांझोटी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 88 ☆

☆ वांझोटी ☆

जन्म नाही दिला तिनं

तरी तीच माझी आई

अनाथाला ही पोसते

आहे थोर माझी माई

 

काही म्हणतात तिला

आहे वांझोटी ही बाई

त्यांना बाई म्हणायला

जीभ धजावत नाही

 

बाळ श्रावण होण्याचं

स्वप्न पाहतोय मीही

त्यांना डोईवर घ्यावं

फिराव्यात दिशा दाही

 

मुक्ती मिळूदे मजला

त्यांच्या ऋणातून थोडी

त्यांच्या पायात असावी

माझ्या कारड्याची जोडी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तेजस्विनी की…. ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ तेजस्विनी की…. ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

रुपवंत, शीलवंत

स्त्री ही अशी बुद्धिमंत

स्वतःसवे घरादारा

बनविते नीतीमंत

ती शिकते

शिकवतेही तीच

बछड्यांच्या संगोपना

ती तर नित असे दक्ष.

ती कधी घडी बसवी

मार्गी लावी द्रष्टी होत.

अशी ही स्त्री स्वतः जळत

दीपदान करी सतत

घोर तमा दूर नेत

तेजस्विनी ठरे लखलखत.

स्त्री अशीही

शिक्षणापासून वंचित

डोक्यावर छत्र नसलेली

अब्रू लक्तरात झाकलेली

समाजातील कावळ्यांच्या

नजरापासून लपणारी

क्षणोक्षणी ठेच खात

कसंबसं सावरणारी

झाशीची राणी तीच

आजही अबलेचं जिणं

जगणारी तीच.

स्त्री अशी -स्त्री कशी ?

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महिला दिन विशेष – शापित अहिल्या ☆ सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ महिला दिन विशेष – शापित अहिल्या ☆ सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆ 

पदस्पर्श रामाचा

त्याने शिळा धन्य झाली

शापातून सती अहिल्या

त्या स्पर्शाने मुक्त झाली

 

दिव्य होती  ती साध्वी

दिव्य तो पावन स्पर्श

युगायुगांची कथा

गातो रामायण सहर्ष

 

आज…. संपली ती राम कथा

सत्यातून ‘राम’ गेला

स्वार्थापायी ‘राम -राम’

झाले सारे मलाच मला

 

स्पर्श झाला भयानक

.  नको नको ती बला

बलात्कार,अन्याय, बळजबरी

अत्याचार  सोसतेय अबला

 

आहे शापित अजुनी अहिल्या

शीळेहूनही घोर दशा

कधी काळी अवतरेल ‘राम’

.  पद स्पर्शाची आर्त आशा.

 

© सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काटे कुटे पचवत…. ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

कवितेचा उत्सव ☆ काटे कुटे पचवत…. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

बाई असे ग कसे पायी चाळ बांधायचे

आणि साऱ्यांच्याच तालावर नाचायचे

आई बा च्या घरी ही धाकातच डोळ्यांच्या

आहे पोरीची ही जात नजरा साऱ्यांच्या…

 

भाऊ खेळी विटीदांडू आम्ही भातुकली

चूल बांधली गळ्यात पहा तेव्हा चिमुकली

खोटाखोटा भातपोळ्या खऱ्याच होतात

आणि तव्यावरती पहा चटके देतात….

 

विहिणी विहिणी भातुकलीत पहा भांडत

मानपान रूसवे फुगवे तेव्हा रूजतात

संस्कारांची घडीच काही अशी बसवली

मानेवरती दिले “जू” नि पहा हाकलली…

 

ओढ ओढ बैला  तू गाडा संसाराचा

मिळो नाही मिळो तुला शब्द प्रेमाचा

बंड केले तर नाही, कुठे ही रस्ता

इथे कर किंवा मर काढना मग खस्ता…

 

जगी सारेच पुरुष पहा आहेत सारखे

बायको वाचून त्यांचे पहा थोडे ना धके

तरी चिरडली तिला पायातली वहाण

नशिबचं बायकांचे पहा आहे हो भयाण….

 

नाही मिळणार न्याय, इथे कधी ही

काटे कुटे पचवत….

वाहिल ही…. नदी…..

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि: ०९/०९/२०२०

वेळ:  दुपारी ४:२५

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वचनपूर्ती… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ वचनपूर्ती… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

नित्यनेमे करितो रे

तुझ्या जन्माचा सोहळा

आनंदाने रंगूनिया

फुले भक्तीचाच मळा  ||

 

आम्ही सारे फक्त तुझ्या

पालखीचे होतो भोई

मस्त नाचता नाचता

रंगू भजनाचे ठाई ||

 

तूच फक्त नाही देवा

बाकी सारी तीच कथा

नित्य कानावर येई

द्रौपदीची नवी व्यथा ||

 

वाट बघतोस का रे

शंभर अपराधांची

नाही कुणालाच भीती

वाढ होते माजोऱ्यांची ||

 

धर्म संस्थापनेसाठी

अधर्माला निर्दालून

विश्‍वाच्या कल्याणास्तव

दिले येण्याचे वचन ||

 

द्रौपदीचा पाठीराखा

धर्माचा रक्षणकर्ता

धाव घेई आम्हास्तव

होऊनी सहाय्यकर्ता ||

 

पुरे झाली तुझी लीला

आता प्रत्यक्ष प्रकट

सांग पुन्हा नवी गीता

हाक आमुचा शकट ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत सांज ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ वसंत सांज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

झुकते आभाळ जिथे

घरटे असती माझे

मावळ दिशा मैफल

मनात स्मृतींची मौजे.

 

हळु सप्तक वसंत

हृदया देई ऊसंत

झुळूक गारवा स्पर्श

वायू भावगीत वाजे.

 

समुद्र किनारी गाज

अगंतुक झाके लाज

पसरुन पंख नभ

कुसूम ललाटी साजे.

 

क्षणिक सुखावा नेत्री

ओलावा दवाचे थेंब

पापण्या वेलींचे पर्ण

सजून सांज विराजे.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 61 – मी एक ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 61 – मी एक ☆

मी एक

असे  आईची आस

बाबांचा श्वास

अंतरीचा

 

मी एक

ताई म्हणे परी

दादाच्या अंतरी

बाहुलीच

 

मी एक

करी प्रयत्न खास

प्रगतीचा ध्यास

अविरत

 

मी एक

राणी आहे सजनाची

माझ्या मनमोहनाची

अखंडीत

 

मी एक

बनली कान्हाची मैय्या

जीवन नैय्या

सानुल्याची

 

मी एक

जरी हातात छडी

मनात गोडी

विद्यार्थ्यांची

 

मी एक

सदा भासते रागीट

प्रेमही अवीट

सर्वांसाठी

 

मी एक

कशी सांगू बाई

सर्वांची माई

योगायोग

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहाट ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ पहाट ☆ श्री प्रकाश लावंड ☆

     कितीकदा खरडावी

जिण्यावरली  काजळी

किती  टाकू  तराजूत

माझ्या कष्टाच्या ओंजळी

 

सारं आयुष्य टांगलं

असं पासंगाच्या पारी

तरी  पारडं  राहिलं

कायमच  अधांतरी

 

किती भरावा रांजण

त्याची थांबंना गळती

येता येता सुखं सारी

वाऱ्यावरती  पळती

 

जादा मागत नाहीच

मोल कष्टाचं रं व्हावं

शेतामध्ये  राबताना

गाणं सर्जनाचं गावं

 

उत्साहात उगवावी

माझी प्रत्येक पहाट

समाधानानं लागावी

राती धरणीला पाठ

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावळी… ☆ श्री कमलाकर नाईक

श्री कमलाकर नाईक

संक्षिप्त परिचय 

शिक्षण – बी.काॅम., डी.बी.एम्.

सम्प्रत्ति – गॅमन इंडिया लि. मधून निवृत्त.

 ☆ कवितेचा उत्सव ☆ सावळी… ☆ श्री कमलाकर नाईक ☆ 

गो-या आई पोटी जन्मा आले

ना कोणा आनंद ना सुख झाले

 

नाही आले घरी वाजत गाजत

नाही केले कुणी माझे स्वागत

 

नावालाच माझे बारसे केले

सावळीचे नाव शामली झाले

 

नव्हता कोणाचा स्पर्श मायेचा

नव्हता कोणाचा शब्द प्रेमाचा

 

नव्हते जगात कोणी माझ्यासाठी

रानफूल झाले माझी मीच मोठी

 

उरी स्वप्न सैनिक होणे देशासाठी

झाले पूर्ण देवा, उभा माझ्या पाठी

 

मिडियाने चढवले  डोईवर मला

गणगोतानी  केले जवळ मजला

 

आता  चिमुकली सावळी शामली

जनसागराच्या प्रेमात बुडून गेली.

 

© श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print