मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिशीर-शिणगार ☆ श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ शिशीर-शिणगार ☆ श्रीशैल चौगुले ☆

शिशीर-शिशीर  मनात रानात

दव पांघरुन   काळीज पानात.

धुके पहाटेचे  डोळेच आभाळ

थंड शरीरास   किरणे वनात.

तेज पूर्वदिशी  झाकून अलोक

मंद पावलात  गारवा कानात.

हळू चिवचिव  पाखरे अंगणी

ऊडे भुर्रकन   थवाच तृणात.

मोती साठलेले  कळी फुलांवर

थोडी खसबस  कावळा मौनात.

तरी शिडकावा  सजवी निसर्ग

भूमी सातरंगी   सौंदर्य  तैनात.

ऋतू शिशीराचा  हिमाचा मज्जाव

नभी  आर्यरथ   स्वर्ग सदनात.

स्मृती  शिणगार  शिशीर शिवार

माया  हिरवाई   सकाळ अधनात.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 31 ☆ कांदा पोहे… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 31 ☆ 

☆ कांदा पोहे… ☆

 

प्रथम मान मिळतो ज्यांना

कांदा पोहे म्हणतात त्यांना…

 

पाहुणे आले कांदे पोहे

भूक लागली कांदा पोहे…

 

सोयरीक जुळते नवीन जेव्हा

कांदा पोहे तेव्हा तेव्हा…

 

कांदा चिरावा मस्त

त्यात हिरवे वाटाणे रास्त…

 

हिरवी मिरची सवे कोथिंबीर

जिरेपूड आणि तेल धार…

 

मीठ आणि हळद मिळते

खाणाऱ्यांची झोप पळते…

 

असा होतो बेत मस्त

जसा मिळावा, दोस्तास दोस्त…

 

महाराष्ट्राचे हे स्वादिष्ट व्यंजन

मानून घ्या तुम्ही गोड करुनि मन…

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 36 ☆ छंद सप्तक ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताeह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी  द्वारा रचित  ‘छंद सप्तक। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 36 ☆ 

☆ छंद सप्तक ☆ 

*

शुभगति

कुछ तो कहो

चुप मत रहो

करवट बदल-

दुःख मत सहो

*

छवि

बन मनु महान

कर नित्य दान

तू हो न हीन-

निज यश बखान

*

गंग

मत भूल जाना

वादा निभाना

सीकर बहाना

गंगा नहाना

 

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरणारे वर्ष मी ☆ स्व. मंगेश केशव पाडगांवकर

स्व. मंगेश केशव पाडगांवकर

Padgaonkar2.jpg

जन्म – 10 मार्च 1929

मृत्यु – 30 डिसेंबर 2015

सलाम’ या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता…

☆ कवितेचा उत्सव ☆ सरणारे वर्ष मी ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

मी उद्या असणार नाही

असेल कोणी दुसरे

मित्रहो सदैव राहोत

चेहरे तुमचे हासरे

झाले असेल चांगले

किंवा वाईटही काही

मी माझे काम केले

नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानू

तुमची माझी नाळ आहे

चांगले होवो अथवा वाईट

मी फक्त ” काळ ” आहे

उपकारही नका मानू

आणि दोषही देऊ नका

निरोप माझा घेताना

गेट पर्यन्त ही येऊ नका

उगवत्याला ” नमस्कार “

हीच रीत येथली

विसरु नका ‘ एक वर्ष ‘

साथ होती आपली

धुंद असेल जग उद्या

नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला

शिव्या ,शाप,लोभ,माया

यातले नको काही

मी माझे काम केले

बाकी दुसरे काही नाही

निघताना ” पुन्हा भेटू “

असे मी म्हणणार नाही

” वचन ” हे कसे देऊ

जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो

” शुभ आशीष ” देऊ द्या

” सरणारे वर्ष ” मी

आता मला जाऊ द्या।

चित्र सौजन्य – मंगेश पाडगांवकर – विकिपीडिया (wikipedia.org)

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन पांखरू पांखरू …. ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

☆ कवितेचा उत्सव ☆ मन पाखरू पाखरू….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

मन पांखरू पांखरू डहाळीवर झुलते

वारा आला कानापाशी आणि त्याच्याशी बोलते

 

मन पांखरू पांखरू आभाळातच उडाले

गरूडाच्या पंखावर कडेकपारीत गेले..

 

मन पांखरू पांखरू झाले हिरवे हिरवे

आणि फांद्या फांद्यावर दिमाखात ते मिरवे…

 

मन पांखरू पांखरू फुल पांखरूच झाले

गुलू गुलू हासतचं फुलांवरती डोलले …

 

मन पांखरू पांखरू झाले जास्वंदीचे पान

फुलताच पारिजात गंधाळले सारे रान…

 

मन पांखरू पांखरू झाले काटे कोरांटीच

आणि रातराणीचा हो झोका गेला पहा उंच…

 

मन पांखरू पांखरू आभाळात ..धरेवर

नाही येत चिमटीत फिरविते गरगर …

 

मन पांखरू पांखरू कधी खुपसते चोच

मग समजावे त्याला पहा लागली हो ठेच..

 

मन पांखरू पांखरू होत नाहीच शहाणे

रोज रोज गाई पहा गाणे नवेच … उखाणे..

 

मन पांखरू पांखरू रोज त्याच्या नाना कळा

असो कसे ही ..पण ..ते …

त्याचा लागतोच लळा…

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि: १८/०९/२०२०,  वेळ : ११:२५ रात्री

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आपणच व्हावे कालनिर्णय ☆ श्री शुभम अनंत पत्की

श्री शुभम अनंत पत्की

☆ कवितेचा उत्सव ☆ आपणच व्हावे कालनिर्णय ☆ श्री शुभम अनंत पत्की 

गरज वाटेना आता काहीच

विचार विद्रोही ठेवण्याची,

उद्विग्न होणे मान्य नाहीच,

वाट पाहतो वर्ष संपण्याची

 

नवीन आशा असेल मनी,

नाही नुसती दिनदर्शिका

थोडी भीती राहिल जनी,

वर्तुळच भेदू नये स्पर्शिका

 

नको जरी उसनं अवसान,

थोडं तरी धाडस हवं

होईल आपलंच नुकसान,

जेव्हा संकट दिसेल नवं

 

पुन्हा उद्दिष्ट स्मरावे आपण,

घ्यावे सर्व महत्वाचे निर्णय

पुन्हा ध्येय करावे स्थापन,

आपणच व्हावे कालनिर्णय…

 

© श्री शुभम अनंत पत्की

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दांची गुंफण ☆ सौ. मनीषा रायजादे-पाटील

☆ कवितेचा उत्सव ☆ शब्दांची गुंफण ☆ सौ. मनीषा रायजादे-पाटील ☆

 

शब्दांची गुंफण मी

काळजातून करते

भाव सारे मनातले

शब्दांसोबत मांडते

 

शब्द वारा वाहताना

जीवन कळी उमलते

नक्षत्रांचा साज ऋतू

गंध शब्दांसवे उधळते

 

दुःखाला सारून दूर

शब्द अमृतधार बरसते

प्रेमाचा तेवता दीप

हृदय कुपीत लावते

 

जीवनाच्या  वाटेवर

शब्दांसोबत चालते

शब्दांच्याच कुशीत

वात्सल्य  ओंथबते

 

नाद तरंगे विश्वब्रह्म

शब्दांतुन झंकारते

हृदयाच्या  मृदुंगावर

शब्द अभंग आळवते

 

© सौ. मनीषा रायजादे-पाटील

सांगली

9503334279

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊले त्याची पुढे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊले त्याची पुढे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

काय मोठे जाहले हो वर्ष आता संपले

वर्ष आणि एक पुढचे भिंतीवरी हे टांगले

 

पाऊले बारा अशी जो नित्यनेमे टाकतो

काळ त्याचे नाव आहे,ना कधी तो थांबतो

 

दुःख आणि सुख अथवा यश असो वा संकट

ना कधी तो भाववेडा,वा कधी ना उत्कट

 

जाहली वर्षे किती अन् राहिली पुढती किती

ना कधी तो रंगतो या आकड्यांच्या  संगती

 

वार आणि तारखांचा खेळ आम्ही मांडतो

पुण्यतिथी वा जयंती ना कधी तो मानतो

 

वर्ष जाते,वर्ष येते,आयुष्य अपुले संपते

कालचक्राच्या गतीने क्षणक्षणाने खंगते

 

सोडूया संकल्प आणि देऊया वचने नवी

जाणतो आम्ही जरी ही सर्व ठरती अल्पजीवी

 

घालूनी हातात त्याच्या हात,आता चालणे

पाऊले त्याची पुढे अन् मागूनी हे धावणे.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – मला तुझ्यात शोध तू. . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य ☆ मला तुझ्यात शोध तू. . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

वृत्त कलिंदनंदिनी.

चुकेन मी, तरी पुन्हा, वसेन माणसात मी

मला तुझ्यात शोध तू, दिसेन काळजात मी. . . . !

 

मनास सागणे नको, जपावयास गोडवा

हसून गोड बोल तू, फसेन आरशात मी. . . . !

 

उगाच फूल लाजले , तुला उन्हात पाहता

पहा जरा स्वतःकडे, असेन त्या फुलात मी . . . !

 

मनामनात होतसे , क्षणाक्षणात कालवा

हवेत थांब मोकळ्या , घुसेन कुंतलात मी. . . !

 

निघून दूर चालली, प्रवास दूरचा जरी

अबोल प्रीत छेड तू, शिरेन अंतरात मी

खुशाल वाट चाल तू, चुकू नको नव्या पथा

नसेन सोबतीस मी, बसेन आठवात मी. . . !

 

विशाल त्या पथावरी, जपून टाक पावले

नसेन मी तुझा जरी, उरेन आसवात मी. . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सेतू ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ कवितेचा उत्सव ☆ सेतू ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

? ?

? ?

गत वर्षाच्या

सरत्या क्षणांबरोबर

विरून जाऊ दे

उदास मलीन धुके

कटू स्मृतींचे

येऊ दे सांगाती

सौरभ

सुमधुर स्मृतींचा

जो सेतू होऊन राहील

भूत – भविष्याचा                 

 

? ? ? ?

? ? ? ?

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print