सौ. अमृता देशपांडे
☆ कवितेचा उत्सव ☆ कथा आणि कविता ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
कथा आणि कविता
दोघी माझ्या खूप लाडक्या
कथा अघळपघळ बोलणारी
कविता नीट नेटकं…
जेव्हढ्यास तेव्हढं!
कथा स्पष्ट, रोकठोक, दिलखुलास…
कविता लाजरी….पेक्षा बुजरीच जास्त….
कथा एक प्रसंग सांगायला शंभर शब्दांना वेठीस धरते
कविता दोनच ओळीत
शंभर शब्द बोलून जाते.
कथा आवडते, कारण
मनानं अगदी मोकळी.
लपवाछपवी हा तिचा
स्वभावच नाही..
सगळं शब्दभांडार लेवून
नखशिखांत सजलेली….
कविता ही आवडते, कारण कधी फुलांमागून खुद्कन हसते तर कधी पापण्या मिटून टिपं अडवते. अव्यक्त भावनांना ह्रदयापर्यंत पोचवते……….
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈