मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भावसंभ्रम ☆ श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ भावसंभ्रम ☆ श्रीशैल चौगुले ☆

पाण्यात छटा कुणाच्या

लयींचे कि रेत खुणांचे  ?

डोळ्यात रंग कुणाचे

तैलचित्र कि माझ्या मनाचे !

हृदयात भाव भक्तिचे

कृष्ण कि जन्म आसक्तीचे ?

ओठांवर नाव सखयाचे

राधीका कि मिरा प्रीतीचे !

गाण्यात स्वर शब्दांचे

कोकिळ कि धून बासरीचे ?

आसवात मधूर मूग्धाली

दुःख कि विरह आनंदाचे.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 26 ☆ गर्व नसावा… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 26 ☆ 

☆ गर्व नसावा… ☆

गर्व नसावा, मानहानी होईल

गर्व नसावा, विनाकारण कलह होईल

 

गर्व नसावा, आपलेच घराचे वासे मोजतील

गर्व नसावा, स्व:कीय ते परके होतील

 

गर्व नसावा, अधोगती होईल

गर्व नसावा, जवळचे सर्व जाईल

 

गर्व नसावा, जगणे मुश्कील होईल

गर्व नसावा, पाणी पाजण्या कोणीच नसेल

 

गर्व नसावा, गर्वाचे घर खाली पडेल

गर्व नसावा, मृत्यू एक दिवस हमखास येईल

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गझल – हौसच आहे ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ कवितेचा उत्सव ☆ गझल – हौसच आहे ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

अज्ञाताची अशी असोशी हौसच आहे

सुखासीनता ठोकरण्याची हौसच आहे

 

नाकापुढती चालत जगणे सोपे तरीही

अवघड आव्हाने घेण्याची हौसच आहे

 

मृदुमुलायम पायघड्यांची वाट  सोडुनी

धोंड्यांमधुनी धडपडण्याची हौसच आहे

 

ऐषारामी नोकरीवरी लाथ मारुनी

रित्या खिशाचा कवी होण्याची हौसच आहे

 

नोकरीतली दगदग सरली निवांत जगणे

लष्करच्या रोट्या करण्याची हौसच आहे

 

शंभूधनुष्या बाण लावणे छंद असे हा

सूर्याचा गोळा गिळण्याची हौसच आहे

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन-क्षेत्र ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ कवितेचा उत्सव ☆ मन-क्षेत्र ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

मनाच्या भूमीची,

भाजावण केली!

जलाच्या विरहात,

कोळपून गेली!

 

मनाची ही भूमी,

विचारांची पेरणी!

भावनेचे पाणी,

बीज अंकुरे झणी!

 

मन निर्मळ क्षेत्र,

बी असे निमित्तमात्र!

उगवेल मन चित्र,

वेल अंबरी जाईल!

 

मना नाही आधार,

राही अस्थिर, बेजार!

मनोवेलीला माझ्या,

फळे येती नाजूक फार!

 

मनाशी एकरूप,

देह आणि आत्मा!

त्यांच्या ठायी राही,

अक्षय परमात्मा!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रवास ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ स्मृती यात्रा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

प्रवास  असाही न संपणारा

अज्ञान दूर सारणारा,

तिमिराला भेदणारा,

ज्ञानदीपाने तेजाळणारा.

 

विद्या,व्यासंग जपणारा,

चौसष्ट कला जोपासणारा,

कलापू्र्तीसाठी झटणारा.

 

मरगळ दूर लोटणारा,

मन प्रसन्न करणारा.,

लक्ष ज्योती प्रकाणारा.

 

मानवतेसाठी झगडणारा,

सहप्रवाशास जपणारा,

अक्षय आनंद लुटणारा.

 

 © सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ सखी माझी तुळस ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

??️  सखी माझी तुळस  ?️?

सखी माझी तुळशीमाई

तुला लाविते अंगणी!

रोज सकाळी नेमाने

घालिते गं तुला पाणी!!१!!

 

तिन्ही सांजेच्या वेळेला

दिवा तुला मी लाविते!

हळदीकुंकू वाहुनिया

औक्ष सर्वांना मागते !!२!!

 

दगडविटा आणुनिया

बांधिले मी वृंदावन!

अंगणात करिते रोज

रंगावली संमार्जन !!३!!

 

वृंदावनाच्या भोवती

बांधविला ओटा सुबक!

बसुनिया त्याच्यावरी

करिते मी हितगुज !!४!!

 

तुझ्या डोईवरल्या निळ्या

मोहकशा त्या मंजिऱ्या !

लेकीसुना नातीपणती

माझ्या साजिऱ्या गोजिऱ्या  !!५!!

 

माझ्या सोनियाच्या घरा

तुझ्यामुळे आली शोभा!

बाळकृष्ण तुझा सखा

हाती मुरली पुढे उभा !!६!!

 

भरजरी मुकुटावरी

शोभे त्याच्या मोरपीस!

नाही आला मुरलीरव

होई जीव कासावीस !!७!!

 

दिनांक:-२७-११-२०.

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चारोळ्या ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

☆ कवितेचा उत्सव ☆ चारोळ्या ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

[1]

पहाटेचा मंगलमय प्रहर

झाला गजर खोचला पदर

गृहकृत्याला करायला हसत

आपलेपणाने स्वतः हजर

[2]

झटकून घालत चादरीच्या घड्या

आळसाला दूर पळवते

अंगण झाडून काढतानाच

अमंगल सारे कचऱ्यात टाकते

[3]

कोरड्या पिठाला ओलावा देत

करते मळून नरम गोळा

लाटून गरम तव्यावर जाता

टम्म् फुगतात सोसत झळा

[4]

खसाखसा भाज्या चिरून

खमंग फोडणीत ठेवते शिजत

अतरंग एकत्र मिसळत

खुमासदार सारं असतं घडत

[5]

बागेमघे ठेवते पाणी अन शित्

चिमणपाखरू चिवचिवत येतं

अंगण सार बोलक होतं

घरातल्या बाळाला बाळसं येतं

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांधेजोड ☆ सौ.नीलम माणगावे

सौ.नीलम माणगावे

☆ कवितेचा उत्सव ☆ सांधेजोड ☆ सौ.नीलम माणगावे ☆ 

त्याच्या पांढऱ्या राजाला

मी असं कोंडीत पकडलं,

की एक पाऊल उचलणं त्याला कठीण होऊन बसलं

शरणागती पत्करून मागे जावं,

तर माझा घोडा

अडीच पावलं टाकून त्याला मारायला तयार होता

कसाही वार करण्याच्या पवित्र्यात

उजवीकडे प्रधानाने रस्ता आडवला होता

डावीकडे लांबवर तिरक्या चालीचा उंट

टपूनच बसलेला

बाकी सभोवती त्याच्याच सैन्याने त्याचा रस्ता रोखलेला

आता हरण्याशिवाय पर्याय नव्हता

बचावाच्या भूमिकेतून त्याने पुन्हा , चेक देऊन

खिंड लढवणार्या माझ्या सशक्त हत्तीला मारून

आपला रस्ता मोकळा केला

आणि त्याचक्षणी

माझ्या छोटुल्या प्याद्याने

त्याच्या राजाला उडवून टाकला

‘हरलास, तुझा राजा मेला..’मी म्हणताच

पडलं तरी नाक वर च्या अविर्भावात तो म्हणाला,

‘चल, आपण राजा नसताना खेळून पाहूया’

त्याच्या लक्षातही आलं नाही,

की जीवनात फक्त खेळच महत्त्वाचा नसतो

की नसते फक्त जीत

हरण्यातही गंमत असते

जोडीदाराच्या चेहऱ्यावरचा जेतेपदाचा आनंदही

बेड्या तोडण्याची नशा देते

खऱ्या अर्थाने.. ती सांधेजोड असते

मोकळ्या जागा भरून काढते

 

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – तुळशी विवाह ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य – तुळशी विवाह ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कार्तिकाची एकादशी

त्रिपुरारी पौर्णिमेचा

कालखंड सौभाग्याचा

तुळशीच्या विवाहाचा.. !

वृंदा नामे पतिव्रता

तुळशीचे निजरूप

विष्णू कृपा लाभण्याला

विवाहाचे वाजे सूप. . . . !

हिंदू धर्म संस्कृतीने

तुळशीला दिला मान

शेषशायी विष्णू शोभे

वर तिचे पंचप्राण. . . . !

चिंचा, बोरे आवळ्याने

तुळशीची भरू ओटी.

ऊसमामा आणि वधू

फराळाची ठेव मोठी.

आरोग्याची वृंदावन

अंगणात सजवावे

सृजनाच्या सौभाग्यात

आनंदाने मिरवावे . . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ तसदी (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ तसदी (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

सृजनाचा क्षण कधी कुठे उगवेल हे खरंच सांगता येणार नाही. दुसऱ्या दिवशी अँजीओप्लास्टी करायची ठरल्याने मी आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. स्पेशल रूम मिळाली नाही म्हणून मला जनरल वार्ड मध्ये दाखल केले गेले. गच्च भरलेला तो मोठा हॉल….. जवळ जवळ मांडलेले बेडस, पेशंटसोबत असणाऱ्याला बसायला एक स्टूल एवढीच सोय. इतक्या लोकांसाठी फक्त २-३ नर्सेस आणि २ वॉर्ड बॉय. साहजिकच नर्सेसची धावपळ आणि जोडीला चिडचिड .. वॉर्डबॉयचा हाकांकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न…. स्वतःला नेमकं काय झालंय आणि काय करणार आहेत हे न कळल्याने घाबरलेले पेशंट, आणि डॉक्टरांशी नेमकं काय बोलायचं हे कळत नसल्याने बावरलेले, उपचारांसाठी पैसे कसे कुठून उभे करायचे ही मोठीच चिंता चेहेऱ्यावर सतत बाळगणारे नातेवाईक… भीती, चिंता, हतबलता, नैराश्य अशा-सारख्या भावनांनी तिथलं सगळं वातावरण व्यापून टाकलं होतं…….. संध्याकाळी रूम मिळाल्याने मला तिथे शिफ्ट केलं आणि ते हॉस्पिटल म्हणजे फिरता रंगमंच आहे असं वाटलं …..७-८ खोल्यांसाठी ४-५ नर्सेस, ३ वॉर्डबॉय, वरचेवर खोलीची साफसफाई, परीट -घडीच्या चादरी, सोबत आलेल्याला वेगळा बेड …… लागूनच असलेल्या सुपर स्पेशल खोल्यांची ऐट तर आणखी कितीतरी जास्त …… परिस्थितीची ही दोन टोकं पहाताना मनात दाटलेली ही कविता……उठून बसायला परवानगी नसल्याने, गुडधा उभा करून, त्यावर कागद ठेवून अक्षरशः कशीतरी खरडलेली…

☆ तसदी ☆

भेदभाव मुळी नसतो म्हणती

कधीही त्या भगवंत कृपेला

दीन नि धनवंतांना त्याचा

न्याय एकची ठरलेला ………

 

खरे न वाटे मला कधी हे

अवतीभवती जग हे बघता

कुठे पूर पैशाचा नि कुठे

गरिबीला ती नाही तृप्तता……..

 

कुठे शिंकला श्रीमंत तरी

दहाजण पहा जाती धावत

आणि कोठे रस्त्याकाठी

कोणी मृत्यूशी त्या झुंजत ……

 

कितिकांना फसवूनही येथे

गणले जाती किती मान्यवर

घाम स्वतःचा गाळूनही पण

कितीकांना ना मिळते भाकर….

 

रंक आणखी रावामधली

खोल खोल ही दरी वाढती

तशी झुंड नि पुंडशाहीची

जरब वाढती संस्कृतीवरती……

 

मरणामध्ये जगता क्वचितच

कधी कुणाला आम्ही पहावे

जगता जगता सततच आणि

कितिकांनी ते रोज मरावे……..

 

आता वाटते एकदाच त्या

रामाने अल्लासह यावे

डोळे आपले आणखी उघडूनी

राज्य स्वतःचे पाहून जावे …….

 

अंदाधुंदी येथ माजता

राहू कसे ते शकती शांत

किती भक्त ते रंकच त्यांचे

दोन वेळची ज्यांना भ्रांत ………

 

मरणानंतर देऊ म्हणती

स्वर्ग तयांना नक्की अगदी

नंतर काय करू स्वर्गाचे

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी…….

 

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी..

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print