☆ कवितेचा उत्सव ☆ दोन कविता ☆ सुश्री सुषमा गोखले ☆
[ 1 ]
अळवावरचे पाणी
गाई शाश्वताची गाणी
दंवबिंदूंचे मोती
स्थिरावले अस्थिरावरी
चिरंतन मैत्र जिवाचे
तारून नेई भवताप सारे !
– सुषम
[ 2 ]
सुवर्णशर विंधितसे प्राण
मृग विस्मयभारित
तेजोमय भास्कर लखलखीत
केशर अबोली सुवर्णी किंचित
रंगपखरण चराचरावर
विशाल तरू भेदूनी येई
तेजोनिधी सहस्त्ररश्मी
प्रकाशाचे दान दैवी
धरेवर प्रभातरंगी
अलौकिक या तेजमहाली
ब्रम्हक्षणांची अनुभूती !
–सुषम
© सुश्री सुषमा गोखले
शिवाजी पार्क – दादर
मो. 9619459896
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈