☆ कवितेचा उत्सव ☆ चक्रव्यूह ☆ श्री अनंत गाडगीळ ☆
(- अनंता.)
मला वाटले होते
जन्म घेतलाय मी
माणसांच्यात ….
पण हीच माझी
मोठी गैरसमजूत
झाली होती.
जागा झालोय मी
आता केव्हाचाच
पण करू काय?
बाहेर नाही शकत
पडू मी इथून.. ..
पुनर्जन्मच हवाय!
तुमची परिस्थिती
पण अशीच आहे?
या माझ्याबरोबर.
पण लक्षात ठेवा..
जाण्यापूर्वी आपण
माणुसकीही पेरू!
एकतर आपण सर्व..
माणसांच्यात येऊ किंवा
सर्वजण पुनर्जन्मात जाऊ!
© श्री अनंत नारायण गाडगीळ
सांगली.
मो. 92712 96109.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈