मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भय संपावे इथले ☆ श्री शरद कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ भय संपावे इथले ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

 

युद्ध म्हणावे का

हा शुद्ध गनिमी कावा.

थैमान भयावह होता,

संहार कसा थांबावा?

अद्भुत कसा हा वैरी,

अदृश्य नी मायावी.

आगळीच शस्त्रे ज्याची ,

लक्षवेधी आणि प्रभावी.

फाटता आकाश अवघे,

ठिगळ कसे लावावे.

काळीज विदीर्ण होता,

कसे किती सावरावे.

एवढीच प्रार्थना माझी,

अवघा भोग सरावा.

भय संपावे इथले आणिक,

थोडा संयमही वाढावा.

 

©  श्री शरद कुलकर्णी

२० .४ .२०२०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वंचना ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ कवितेचा उत्सव ☆ वंचना ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

 

राही एकनिष्ठ तू नको करू प्रतारणा |

नको करूस वंचना ||धृ||

 

निसर्ग हा सभोवती देतो तुज भरभरूनी |

तूच घेसी दुष्टासम त्यास ओरबाडुनी |

मीच श्रेष्ठ निसर्गाहुन नको करूस वल्गना ||

करू नकोस वंचना ||१||

 

कोण तू कोण मी एक बिंदू या जगी |

अफाट या ब्रह्मांडी श्रेष्ठता ही वाऊगी |

मातीतील कण मी एक ठेव मनी भावना ||

करू नकोस वंचना ||२||

 

जलसंयोजन हा उभा प्रश्न मानवापुढे |

गांभीर्या समजुनिया लक्ष देई त्याकडे |

आगामी पिढ्यांपुढे ठेव स्पष्ट योजना ||

करू नकोस वंचना ||३||

 

कोपला जर निसर्ग टेकशील हात तू |

रक्षिण्या ही संपदा दे इतरा साथ तू |

दृढ करूनी संकल्पा पूर्ण करी साधना ||

करू नकोस वंचना ||४||

 

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 55 – आड पडदा… ☆ सुजित शिवाजी कदम

सुजित शिवाजी कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #55 ☆ 

☆ आड पडदा… ☆ 

 

त्या दिवशी तुला पावसात

भिजताना पाहीलं.. अन्

वाटलं…

माझ जसं

पावसाशी नातं आहे

तसंच तुझ आणि पावसाच

आहे की काय….

पण आज तुला

पावसात छत्री घेऊन

येताना पाहीलं

तेव्हा खात्री झाली…

माझ्यासारख तुझ पावसाशी

काहीच नातं नाही

कारण….

त्याच्यात आणि माझ्यात

कधी

कोणता आड पडदाच

येत नाही…!

 

© सुजित शिवाजी कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कबर ☆ सुश्री निलांबरी शिर्के

☆ कवितेचा उत्सव ☆ कबर ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆ 

 

अंधारातच जगणे आता

नसेच येथे कसले वारे

कर्तृत्वाला खोल गाढुनी

अडसर लावुन बंद कवाडे

 

दाहिदिशातुन खुशाल वाहो

चैतंन्याचे कितीही वारे

संसाराच्या सारिपटावर

फासे पडले विपरीत सारेँ

 

नव्या दमाचे वाहो आता

प्रकाशात त्या कितीही वारे

अंधाराच्या गर्भामधूनी

विध्वंसाचे सदाच वारे

 

खोदत गेले मी जगताना

कबर खोलवर माझ्यासाठी

सारे हे करण्याकरता

मनास माझ्या धरले वेठी

 

© सुश्री निलांबरी शिर्के

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य – देणार प्राण नाही ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण कविता  “देणार प्राण नाही )

☆ विजय साहित्य – देणार प्राण नाही ☆

 

(वृत्त आनंद)

गागालगा लगागा

सरणात जाळ नाही

मरण्यात शान नाही.

आरोग्य स्वच्छता ही

करणार घाण नाही.

वैश्विक हा करोना

ठरणार काळ नाही.

संसर्ग शाप झाला

अंगात त्राण नाही .

साधाच हा विषाणू

नाशास बाण नाही .

सोपे नसेल जगणे

हरण्यात मान नाही .

बकरा नव्हे बळीचा

देणार प्राण नाही .

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 7 – हा तुझा एकटीचा प्रवास  ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 7 ☆

☆ हा तुझा एकटीचा प्रवास  ☆

हा तुझा एकटीचा प्रवास

एकटीचा नाहीये बाळा

साताठशे मैलांचा जो

तू पित्यासह केलेला-

हा आहे एक चिरंतन प्रवास

जो जीवनाकडून जीवनासाठी जीवनाकडे झालेला—

शेकडो मैलांच्या या प्रवासात भेटली तुला ती होती सर्व

मेलेली माणसे-जी

मेलेल्या नजरेनेच तुला  न्याहाळत होती षंढपणे …

अशी सणसणीत चपराक तुझी

त्यांच्या ही कानाखाली

ज्यांची लाचार पत्रकारिता

नाचली फुटपाथच्या भवताली

अशी असावी जिद्द-

असावा असा कणखरपणा

आमच्याकडे का नसावा

एवढा मजबूत कणा?

इतकी प्रखर जीवनआस

कुठून बरं येते?

जन्मदात्यालाही जन्म द्यायची

ताकद कुठून येते?

दूर देशीच्या ‘राज’ कन्येनं

या ‘देश’ कन्येचं कौतुक करावं

आणि इथल्या बेशरम प्रजेला

हे अगदी उशिरा कळावं?

गर्भातल्या उमलत्या कळ्यांना

गर्भातच खुडणाऱ्यांना

आतातरी यावं आत्मभान

‘दिवट्या’ पेक्षा ‘ज्योती’ बरी

यातच सुचावं शहाणपण

अशी सणसणीत चपराक

ज्याची वाट बघावी

की आठवणीने आपली आपण रोज मारून घ्यावी?

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

25/5/20

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू आणि मी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

जन्म – ४ जुलै १९५४.

शिक्षण – एम् ए.

प्रामुख्याने रत्नागिरी आणि सांगली येथे वास्तव्य झाले. आता पुण्यात स्थायिक! गृहिणी पदाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना च शिशुवर्गापासून ते किशोर वर्गापर्यंत च्या मुलांना अध्यापन.

लेखनाची आवड जोपासली. विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकात लेखन.’  जसं सुचलं तसं’  या लेख व कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे १६ जून २०१९ रोजी  झाले.

☆ कवितेचा उत्सव ☆ तू आणि मी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

 

तुझ्या माझ्या आठवणींची

साठीही उलटून गेली!

पाठच्या बहिणीसम सखे,

तुझी माझी जोडी राहिली!

 

बालपणीची आपुली सोबत,

एकमेकीच्या घरी असे!

साजशृंगार तुझा माझा,

सारखाच मनी वसे !

 

एकीने घातली चार वेणी,

दुसरी लाही तशी हवी

तर कधी लांब वेणी वरी

रिबिनीची ही झूल हवी !

 

बालपणाने प्रवेश केला,

अलगद पणे तारुण्यात !

गोड गुपितांची लयलूट,

एकमेकींच्या कानात !

 

शैशवाचे दिवस सरले,

गेलो मांडवाच्या दारी !

ओढ आपली तरी न संपली,

होती अन् ती खरी खुरी!

 

मिळे अकल्पित वेळ कधी,

असे एकमेकीसाठी शकून!

सोडला ना एकही आपण,

भेटीचा तो असे सुकून !

 

आता उरलो एकमेकीचा,

विरंगुळा तोही मनोमनी !

आयुष्याच्या उरल्या क्षणांची,

साथ मिळेल ही क्षणोक्षणी !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊले चालती चालती ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊले चालती चालती ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

 

पाऊले चालती चालती अध्यात्माची वाट

साधकाच्या मानसात चैतन्याची झाली पहाट || ध्रु ||

पूज्य गुरूंनी लावला सत्संगाचा लळा

इथे येतो दिव्यत्वाचा प्रत्ययही वेगळा || १ ||

फुलती इथे हरीभक्तिचे हिरवागार मळे

 गुरुच्या सहवासाने जीवा-शिवाची भेट कळे || २ ||

प्रभूचरणाशी समर्पणाने अहंकार लोपला

कैवल्याचे दर्शन होता आत्मा पावन झाला || ३ ||

अध्यात्माच्या वाटेवरचा गिरविला ओनामा

ब्रम्हपदी पोहचू आम्ही कां मोक्ष धामा || ४ ||

पाऊले चालती चालती अध्यात्माची वाट

साधकाच्या मानसात चैतन्याची झाली पहाट || ध्रु ||

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 65 – कोरोना ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  एक समसामयिक विषय पर आधारित विचारणीय कविता  कोरोना। सुश्री प्रभा जी ने इस कविता के माध्यम से  वैश्विक महामारी पर गंभीर विमर्श किया है। आज इस वाइरस के कारण मानवजाति के अस्तित्व पर प्रश्नचिन्ह लग गया है। मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे। आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 65 ☆

☆ कोरोना ☆

प्रथम पाहिली बातमी,

चीनमध्ये पसरलेल्या,

या भयानक विषाणू संसर्गाची,

वटवाघूळाच्या भक्षणाने,

झालेल्या आजाराची!

 

अनेक अफवा, तर्कवितर्क,

हा विषाणू पक्षाप्राण्यातून आलाय

की प्रयोगशाळेत तयार केलाय,

मानवाने मानुष्यजातीच्या

विनाशासाठी…….??

 

जगभर पसरलेली ही लागण,

सगळेच व्यवहार ठप्प!

जग थांबले आहे जणू

स्टॅच्यूच्या खेळासारखे!!

 

मी घरात बंद गेले सहा महिने,

विश्वशांती,विश्वाचे आरोग्य,

सांभाळणारा विधाताही

बंद देवळात…..

आणि आम्ही करतोय प्रार्थना…

ए मालिक तेरे बंदे हम…..

 

आम्ही करतोय कविता,

घेतोय वाफ नाकातोंडात

व्हाटस् एप्प वर वाचतोय

सुरक्षित रहाण्याचे उपाय….

 

मोबाईल वर वाजतेय धून

बाहेर न पडण्याविषयी…..

 

आणि मैत्रीण करतेय आग्रह…

गाठीभेटीचा….

पण गावात …शहरात…गल्लीत…

पसरलेला हा कोरोना–कोविड–

नाही मुभा देत कुणाच्याच घरी

जाण्याची अथवा कुणाला

घरी बोलवण्याचीही….

 

या उमाळ्याच्या गाठीभेटींपेक्षा

आवश्यकता आहे अस्तित्व

टिकविण्याची, स्वतःचं आणि इतरांचंही…..

घरात राहूनच जिंकायचे आहे युद्ध

ज्याचं त्यालाच….

सांगून टाकते निर्वाणीचं….

व्हाटस् एप्प च्याच भाषेत…

“घरी हूँ मैं बरी हूँ मै”

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाल कामगार! ☆ श्री मुबारक बाबू उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

शिक्षा – एम.ए.बी एड्.बी.लिब .

लेखन – कविता लेखन, कथाव इतर.-दिवाळी अंक, प्रातिनिधिक संग्रह.

पुरस्कार/अलंकरण – (1) निसर्ग मित्र शिक्षक पुरस्कार-०१० (2) रविकिरण सेवाश्री पुरस्कार–२०११ (3) युवाशक्ति सामाजिक संस्था नाशिक. आदर्श शिक्षक पुरस्कार-२०११ (4) सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल, आदर्श शिक्षक पुरस्कार-२०११ (5) महाराष्ट हरितसेना सदस्य-२०१७ (6) समीक्षक. म्हणून. म.रा मा.उच्च.मा. शिक्षण  मंडळ,पुणे,५. इ.१०वी साठी (7) ग्रीन ओलम्पियाड परीक्षा उत्तम नियोजक म्हणून सन्मानित (नवी दिल्ली)-२०१७ (8) स्वाध्याय पुस्तक लेखन इ.१०वी.पुणे बोर्ड (9) राज्यस्तरिय ,जिल्हास्तरिय तज्ज्ञ मार्गदर्शक मराठी विषय (10) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली,वेस्ट कल्चरल झोन आयोजित सांगली निर्मितीक्षम नाट्य प्रशिक्षण (11) नेपथ्य आणि प्रकाश योजना, कार्यशाळा उपस्थित, अखिल भारतीय नाट्यशास्त्र विद्यामंदिर समिती, सांगली-२००६ (12) समाजरत्न साहित्य पुरस्कार-२०१८ सम्राट फौडेशन, सांगली (13) उत्कृष्ट काव्य लेखन,रंगीत काव्यधारा साहित्य मंच, वासिम-२०१८ (14) साहित्यसेवा साहित्य समुहातर्फे लीनाक्षरी पुरस्कार व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, माहूरगड, नांदेड-२०१९ (15) कविभूषण पुरस्कार, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव २०१९, नांदेड (16) अनेक काव्य स्पर्धेत परीक्षक (17) अर्धांगी कविता संग्रहासाठी प्रस्तावना लेखन (18)काव्यस्पंदन संस्थेचा महाराष्ट्र भूषण,नवरत्न पुरस्कार पुणे

☆ कवितेचा उत्सव ☆ बाल कामगार! ☆ श्री मुबारक बाबू उमराणी ☆ 

भूक अंगार होऊन रोज पेटे

उभं आयु काजळी धुराडी वाटे

 

कळ सोसेना भुकेची आग घरा

बाप व्यसनी पडला पहा धरा

 

आई धुणे भांडी दिसभर करी

ओढे संसार गाडा ती आसूभरी

 

जन्मे यातुनच बालकामगार

हातभारासाठी काय करणार ?

 

दुर्दैवच जगी  भयान अंधार

दूर दूर जाई शिक्षण भांडार

 

कमी पगारात राबवी मालक

मोडू प्रथा चला जागवू पालक

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print