सुजित शिवाजी कदम
(सुजित शिवाजी कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी एक भावप्रवण कविता “लाॅकडाउन….!”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। )
☆ सुजित साहित्य – लाॅकडाउन….! ☆
तू तिथे.. .
मी इथे.. .
सारं काही लाॅकडाउन लाॅकडाउन..
फेसबुक आणि व्हाॅट्सअप वरती
भेटतो आपण येऊन जाऊन..
हातामध्ये तुझा हात
बाईकवरचा आपला थाट
रोजची आपली तीच वाट….
आता सारं काही
लाॅकडाउन लाॅकडाउन…!
नाक्यावरची ती काँफी
काँफीवरची ती वाफ
आणि वाफेवरती रंगत जाणारे
गप्पाचे ते…..तासन तास..
आता सारं काही
लाॅकडाउन लाॅकडाउन…!
दिवसभर तुझी साथ
माझे शब्द तुझी दाद..
कवितेची मग रंगते मैफल
समारोपाला रोजचा ऊशीर
आता सारं काही..
लाॅकडाउन लाॅकडाउन…!
मधाळलेली सायकांळ
अंधाराला घाई फार
मनामध्ये दोघांच्याही
निरोपाचा एकच ताल..
आता सारं काही..
लाॅकडाउन लाॅकडाउन…!
रोजचा उशिर आणि
रोजची गडबड
घरातल्यांची ती नुसती बडबड
ठरलेले रोज तेच उत्तर
आता सांर काही..
लाॅकडाउन लाॅकडाउन…!
तू तिथे.. .
मी इथे.. .
सारं काही लाॅकडाउन लाॅकडाउन…!
फेसबुक आणि व्हाॅट्सअप वरती
भेटतो आपण येऊन जाऊन. !
भेटतो आपण येऊन जाऊन. !
© सुजित शिवाजी कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६