सुश्री मीनाक्षी सरदेसाई
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६, नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)
आज प्रस्तुत है सोशल मीडिया में आई कविताओं की बाढ़ पर आधारित आपकी एकआनंददायक कविता —– कोडे —– .
आपके ही शब्दों में – “गंमत म्हणून कविता. स्वतः सह सर्व कवींची क्षमा मागून.”
☆ —– कोडे —– ☆
कविता, कविता चोहिकडे
जिकडेतिकडे, चहूकडे ।।
वाट्स अँपवर ‘ह्या ‘ची कविता
फेसबुकवर ‘ त्या ‘ ची कविता
सगळे झाले कवी फाकडे
जिकडे तिकडे ——-
“छान, सुंदर “कमेंट” ह्याची
“क्या बात है।” ही दुसऱ्याची
सगळ्यांना सगळेच आवडे
जिकडेतिकडे ———
“माझ्या कवितेचे हे शीर्षक”
ओळी वाचती होऊन भावुक
गंभीरपणे कोणी न ऐकत
कशास जो तो तरी धडपडे
कवितेलाही पडले कोडे
जिकडेतिकडे ——–
कविवर म्हणुनी नांव व्हावे
‘मी’ कोणितरी खास असावे
आपण सुध्दा एक त्यातले
काव्याचा पुर म्हणूनच वाढे
कविता कविता चोहिकडे ।।
© मीनाक्षी सरदेसाई
मोबाईल नंबर 9561582372, 8806955070