श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी की पड़ोस में रहने वाली हमारी वरिष्ठतम पीढ़ी की सदस्य के 102 वे जन्मदिवस पर शुभकामनाएं देती एक कविता “शतकोत्तर वाढदिवसाच्या शुभेच्छा”। अंकों में 102 वर्ष हमारी पीढ़ी की कल्पना के परे है। उनके ही शब्दों में “आमच्या शेजारी रहाणाऱ्या ‘आठल्यांच्या मम्मी ‘ यांच्या शतकोत्तर म्हणजे १०२ व्या वाढदिवसाची भेंट स्वरूप कविता।” उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ केल्याने होतं आहे रे # 32 ☆
☆ शतकोत्तर वाढदिवसाच्या शुभेच्छा ☆
गोरा गोरा रंग,
ठेंगणा ठुसका बांधा !
तरतरीत नाक, सुंदर नाजूक देखण्या !
आमच्या आठल्यांच्या मम्मी !!
पेठेत आमच्या आहेत सर्वांनाच त्या परिचित !
घरी येवो कुणी,
अथवा भेटो रस्त्यात !
मधाळ हसून स्वागत
त्या करणार !
आवर्जून घरी बोलावणार !
न चुकता गोडाची वाटी हातात देणार !
घरच्या साऱ्यांची विचारपूस करणार !
वाटीतला खाऊ संपल्याबिगर,
त्या कुणालाही जिना नाही उतरु देणार !!
मृदू बोलायचे षट्कार अन्
मधुर हास्याचे चौकार मारत
त्यांनी शतक अन् दोन केली पूर्ण !
अगदी गोड बोलायचे आणि नेहमी शांत रहायचे
त्यांच्याकडे आहे एक नामी चूर्ण !!
आम्हा सर्वांना ते खायची आहे मनापासून इच्छा !
अन् शतकोत्तर वाढदिवसाच्या
मम्मींना खूप सुंदर शुभेच्छा !!
खूप सुंदर शुभेच्छा !!!
©️®️ उर्मिला इंगळे
सातारा
दिनांक : २५-४-२०
भ्रमण:9028815585
!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!