मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात #6 – रिमझिम के तराने ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात”  में  उनकी  वर्षा ऋतु से संबन्धित कवितायें और उनसे जुड़ी हुई यादें। निःसन्देह यादें विस्मरणीय होती हैं किन्तु,  मैं विस्मित हूँ!  सुश्री प्रभा जी के पास तो वर्षा ऋतु से संबन्धित कविताओं के संस्मरणों का एक इतिहास है १९७८ से लेकर सतत प्रकाशित रचनाएँ, मानधन, अग्रज साहित्यकारों का स्नेह और पाठकों का सम्मानधन । प्रत्येक रचना के साथ कुछ न कुछ तो जुड़ा ही है। उन्होने इस सुदीर्घ साहित्यिक अविस्मरणीय इतिहास को सँजो कर रखा और हमारे पाठकों के साथ साझा किया इसके लिये उनका आभार और लेखनी को नमन।

उनके अविस्मरणीय स्वर्णिम संस्मरणों के प्रति उनके विचारउनके ही शब्दों में –

“ पाऊस खुप आवडता ऋतू, आयुष्यातल्या अनेक पावसाळ्यांच्या अनेक आठवणी …..मागच्या पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या  त्या आजच्या  # *कवितेच्या प्रदेशात*  मध्ये सादर करते….” – प्रभा सोनवणे

अब आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं । )

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 6 ☆

 

 ☆ रिमझिम के तराने ☆

 

पावसाळ्यात  पावसाच्या कवितांना  उधाण येतं! अनेक संस्थां वर काम करत असताना, जुलै  ऑगस्ट मधे  पावसाच्या कवितांचे  आयोजन केले आहे.

परवा स्वतःच्या पावसाच्या  कविता  एकत्र वाचल्या आणि किती तरी पावसाळे आठवले.

माझ्या *अनिकेत* या संग्रहातील कवितांमधून पावसाच्या कविता निवडायला सुरुवात केली. हा माझा १९७८ पासून चा पाऊस आहे.

ही कविता १९८० साली  *स्वराज्य* साप्ताहिकात सचित्र प्रकाशित झाली होती आणि या कवितेचे दहा रूपये मानधन ही मिळाले होते. ती ही कविता–

 

*सखी मेघ बरसती रिमझिम रिमझिम*

*जणू छेडते कुणीतरी सुरेल सरगम*

          (*अनिकेत*-   बालमैत्रिणीस)

 

त्याच काळात लिहिलेली ही पुढची रचना-

 

*रिमझिम बरसली धारा*

*अंगाला झोंबे वारा*

(*अनिकेत* –गीत )

 

*पाऊस असा पाऊस तसा*

*पाऊस आहे कसा कसा* ?

 

ही आणि पुढच्या ब-याच रचना  अनिकेत मधल्या च आहेत. पाऊस शिर्षकाची ही कविता पहिल्यांदा टिळक स्मारक मंदिरात सादर केली तेव्हा कविसंमेलनाचे अध्यक्ष-न.म.जोशी  यांनी या कवितेचं कौतुक केलं होतं.

दुसरी  एक गोष्ट या कवितेच्या बाबतीतली अशी की,या कवितेची चोरी झाली होती.

माझी *सखी* ही कविता मला टीव्ही वर चा सिनेमा पहाताना झालेली… टीव्ही वर *तुमसा नहीं देखा* हा लागला होता..मी शाळेत असताना पाहिला होता….शाळेचे दिवस आठवले आणि ही कविता  जन्माला आली

 

*आयुष्यातचं पुस्तक  उघडलं की*

*पहिल्यांदा तू सामोरी येतेस*

*तुझा नितळ सावळा रंग*

*दाटलेल्या मेघाला सारखा*..

*बरसत रहातो पुस्तकभर*  !

 

यानंतर ची अष्टाक्षरी रचना ही याच मैत्रिणी वर केलेली..अकाली हे जग सोडून गेलेली ती….

 

*मेघ बरसला  आज*

*आल्या श्रावणाच्या सरी*

*तुझी आठवण येता*

*झाले कावरी बावरी*

 

ही कविता मी १९९२ साली लिहिली. आणि मैत्रिणी ला वाचून दाखवत असताना तिथे तिच्या बिल्डींग मधे रहाणारी अमराठी-पंजाबी शीख मुलगी आली होती. त्यानंतर ती पंजाबी मुलगी मला पंधरा सोळा वर्षांनी रस्त्यात भेटली..तेव्हा ती म्हणाली, “मुझे  आपकी कविता आज तक याद है जिसमे  आपने लिखा था, मेरी पाजेब कुछ बोल नही रही है”!

इतकी सुंदर दाद ऐकून मी अवाकच झाले….ते शब्द  असे आहेत….

 

*मेघ बरसला आज*

*सखे रिकामे अंगण*

*मुके झाले आहे आज*

*माझ्या पायीचे पैंजण*

आषाढात ब्रह्मकमळं उमलतात… माझी *ब्रह्मकमळ* ही एका आषाढातली ख-याखु-या घटनेची कविता. या कवितेला मला साहित्य प्रेमी भगिनी मंडळाचा कवी कालिदास पुरस्कार मिळाला होता आणि *आपले छंद* या अतिशय सुंदर दिवाळी अंकात ती प्रकाशित झाली होती आणि त्या काळात – वीस वर्षा पूर्वी या कवितेला मला दोनशे रुपये मानधन मला मिळाल॔ होतं  …

*रिमझिमत्या शीतल सांजेला*

*त्या राजस कळ्या*

*उघडू लागल्या चोची*

*जणू  आषाढ मेघांच्या*

*अमृत सरीच प्राशण्यासाठी* !

( *मृगचांदणी*- ब्रह्मकमळ )

 

एका पावसाळी संध्याकाळी बालगंधर्व च्या कट्ट्यावर मैत्रिणी बरोबर गप्पा मारत बसलो होतो. नंतर रविराज मध्ये जेवायला जायचं होतं! घरी जाताना रिक्षा डेक्कन काॅज वे वरून गेली. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या…. आणि रात्री कागदावर शब्द बरसले….

 

*सखे,निमित्त फक्त*

*आपल्या गाठी भेटीचे*

*पण आपल्या मनातला*

*पाऊस मात्र* ,

*किती वेगळा* ….

*तुझा तुझ्या पुरता*..

*माझा माझ्या पुरता*..

 

माझी “पाऊस प्रतिक्षा” ही कविता प्रेयसी चं हळवं दुःख सांगणारी..मला स्वतःला माझी ही कविता खुप आवडते…

 

*मी साधू पाहतेय संवाद* –

*पावसाशी*…  *तुझ्या शी*….

*आणि ऐकते  आहे*

*मोबाईल मधून येणारे*…

*नाॅट रिचेबल*….

*नाॅट रिचेबल*..

*हे उत्तर*….     *वारंवार*!

 

पावसाच्या काही गजल ही मी लिहिल्या आहेत. मृगाक्षी वृत्तातील या गजल च्या दोन  शेरांनी समारोप करते…

 

*किती दुष्काळ सोसावा धरेने*

*अता बरसायचे  आहे जरासे*

*मला या वेढती लाटा सुनामी*

*मरण टाळायचे  आहे जरासे*

( *मृगचांदणी*-जरासे )

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #6 – अपहरणाचा बळी ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है ।  साप्ताहिक स्तम्भ  अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण  कविता  “ अपहरणाचा बळी ”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 6 ☆

? अपहरणाचा बळी ?

 

डोळ्यांचा या ओला पडदा वाळत नाही

माझा जिवलग सूर्य मजवरी भाळत नाही

 

गळून पडली दोऱ्या मधली फुले सुगंधी

कुणीच दोरा गजरा म्हणुनी माळत नाही

 

वाऱ्याने या सुगंध सारा पसार केला

वाऱ्यावरती कुणी ठेवली पाळत नाही

 

प्रेमग्रंथ हा जीर्ण जाहला तरी चाळते

तुझ्या वेदना आता मजला जाळत नाही

 

स्नान कराया पाप पोचले गंगेकाठी

गंगा करते पवित्र त्याला टाळत नाही

 

अपहरणाचा बळी आजही होते सीता

तरी कुणीही लंका आता जाळत नाही

 

गोठुन गेल्या का लोकांच्या सर्व भावना ?

कुणी आसवे आता येथे ढाळत नाही

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती # 3 ☆ साहित्य संसार ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर

सुश्री स्वप्ना अमृतकर

(सुप्रसिद्ध युवा कवियित्रि सुश्री स्वप्ना अमृतकर जी का अपना काव्य संसार है । आपकी कई कवितायें विभिन्न मंचों पर पुरस्कृत हो चुकी हैं।  आप कविता की विभिन्न विधाओं में  दक्ष हैं और साथ ही हायकू शैली की सशक्त हस्ताक्षर हैं। हम आपका  “साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना की कवितायें ” शीर्षक से प्रारम्भ कर रहे हैं।  इस शृंखला की यह तीसरी कड़ी है। संभवतः ‘साहित्य संसार’ शीर्षक से  काव्यप्रकार : सुधाकरी अभंग (६,६,६,४) में रचित यह कविता उनके साहित्य संसार में से उत्कृष्ट रचनाओं में से एक होनी चाहिए। आज प्रस्तुत है सुश्री स्वप्ना जी की कविता “साहित्य संसार”। )

 

साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती # -3 ☆ 

☆ साहित्य संसार  ☆ 

काव्यप्रकार : सुधाकरी अभंग (६,६,६,४)

 

गीता सहवास

  ज्ञानेश्वरी ध्यास

     साहित्य प्रवास

                दादपुर्ण     ॥ १ ॥

 

परंपरा जुनी

शब्दांची च झोळी

          ओळींची लव्हाळी

                       परीपुर्ण     ॥ २॥

 

साहित्य संसार

महिमा अपार

विश्वाचा प्रचार

                        अर्थपुर्ण      ॥ ३ ॥

 

 

काव्या च्या रुपांत

   होई काव्य खेळ

 दिसे शब्द भेळ

                        कार्यपुर्ण      ॥ ४॥

 

भासते रचना

कधी हास्यमय

कधी तत्वमय

स्नेहपुर्ण      ॥ ५ ॥

 

साहित्य प्रगती

वंश चाले पुढे

साहित्तिक घडे

हो संपुर्ण     ॥ ६ ॥

 

© स्वप्ना अमृतकर , पुणे

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 5 – आभाळ दाटून आलं की..! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। अब आप श्री सुजित जी की रचनाएँ  “साप्ताहिक स्तम्भ – सुजित साहित्य” के अंतर्गत  प्रत्येक गुरुवार को  पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनकी कविता आभाळ दाटून आलं की..!)

 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #5 ☆ 

 

☆ आभाळ दाटून आलं की..!☆ 

 

आभाळ दाटून आलं की भिती वाटते

येणा-या पावसाची आणि

येणा-या आठवणींची सुध्दा

डोळ्यासमोर सहज तरळून जातं

गावाकडचं घर..,गावाकडचं आंगण

मनामधल्या सा-याच जखमा

पावसाच्या प्रत्येक थेंबाबरोबर

ओल धरू लागतात सलू लागतात…

पण मी मात्र संयमानं त्या

जखमांवर फुंकर मारत राहतो

अगदी..पाऊस थांबेपर्यंत

पाऊस पडत असताना

घरात जायची भितीच वाटते

कारण ह्या पावसाने

गावच्या घरासारखं हे ही घर

माझ्या अंगावर कोसळेल की काय

ह्याची भिती वाटते

आणि माझ्या मायेसारखाच

मीही ह्या घराच्या ढीगा-यात एकाएकी

दिसेनासा होईल की काय ह्याचीही

कारण..घर जरी बदललं असलं तरी

अजून आभाळ तेच आहे

आणि कदाचित..पाऊस ही..,

आभाळ दाटून आलं की

भिती वाटते येणा-या पावसाची

आणि येणा-या आठवणींची सुध्दा..

 

……©सुजित कदम

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात #5 – मला वाटते …. ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात”  में  उनकी  एक ऐसी  कविता जो वर्तमान पीढ़ी की प्रत्येक सास अपनी  बहू के लिए मन ही मन लिखती होंगी ।  किन्तु , प्रत्यक्ष में कोई प्रदर्शित कर पाती हैं और कोई नहीं कर पाती । कभी अहंकार (Ego) आड़े आ जाता है तो कभी कुछ। आपकी कविता में बहू ही नहीं बेटी का स्वरूप भी दिखाई देता है। सुश्री प्रभा जी को निश्चित रूप से ऐसे उत्कृष्ट साहित्य के लिए साधुवाद और उनकी लेखनी को नमन।  

सास और बहू के रिश्तों पर उनकी भावना उनके ही शब्दों में –

“ सासू सुनेचं नातं युगानुयुगे वादग्रस्तच ठरलेलं आहे……माझ्या सूनेबद्दल च्या भावना व्यक्त करणारी कविता….

आजच्या #कवितेच्या प्रदेशात  मध्ये! ” – प्रभा सोनवणे

अब आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं । )

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 5 ☆

 

 ☆ मला वाटते …..☆

 

ती खरोखर सुंदर आहे

आणि आवडतेही मला मनापासून !

ती दिसते अधिक आकर्षक आणि गोड

चुडीदार ,पंजाबीड्रेस मध्येच !

पैठणीत ही दिसते खुलून …….

पण मला वाटते ,

तिने क्वचितच नेसावी साडी ,

मात्र जीन्स वापरावी सर्रास ,

जावे ट्रेकिंगला ,

करावी मुलुखगिरी !

आयुष्यातले सारे सारे आनंद

लुटावेत  मनसोक्त !

स्वयंपाक ही करावा चटपटीत -चटकदार ,

हवा तसा हवा तेंव्हा !!

मला आवडते तिचे सफाईदार ड्राईव्हिंग ,

आणि फर्डा इंग्रजी संभाषणही .

मिळालेल्या स्वातंत्र्यातून आणि संधीतून

बनावे तिने स्वयंसिद्ध ,स्वयंपूर्ण !

 

तिच्यात दिसते मला नेहमीच

एक हरणाचे पाडस ,

जंगलात हरविलेले ……….

पण क्वचितच कधीतरी ………

तिच्यात एक मांजरही संचारते ,

फिस्कारते अधून मधून ,

न बोचकारता ,

रक्तबंबाळही  करते ………

पण ….पण …..तिच्यातले ते निरागस ,

टपो-या डोळ्याचे ,चकचकीत कांतीचे .

हरिणाचे पाडसच

बागडत असते आस पास !!

 

………तिच्या तिच्या  अभयारण्यात

असावे ते सुखरुप …..आनंदी !

 

ती खरोखर सुंदर आहे ,

आणि आवडतेही मला ,

मनापासून …………..

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ♥ प्रेमवेडा पाऊस ♥  – सौ .योगिता किरण पाखले

सौ .योगिता किरण पाखले

(आदरणीया सौ .योगिता किरण पाखले जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। सौ.योगिता जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की  सशक्त हस्ताक्षर हैं। आप कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी रचनाएँ स्तरीय पत्र पत्रिकाओं / चैनलों में प्रकाशित/प्रसारित हुई हैं। आज प्रस्तुत है आपकी वर्षा ऋतु पर आधारित शृंगारिक कविता “प्रेमवेड़ा पाऊस”। हम भविष्य में आपकी और चुनिन्दा रचनाओं को प्रकाशित करने की अपेक्षा करते हैं।)   

 

प्रेमवेडा पाऊस

 

आठवतो मला आजही तो पाऊस

आपल्या प्रेमाची पूरवायचा हौस …… धृ

 

सरीवर सरी किती धुंद करायच्या

भावनांच्या ओलाव्यात चिंब चिंब भिजवायच्या

डोळ्यांनीच सांगून जायचा,नको ना गं जाऊस

आठवतो मला….. १

 

ओथंबलेले घन अन भिजले मन थांबवायचे कसे

काही शब्दातच सारे गाणे बसवायचे कसे

माहित होत त्याला म्हणूनच सांगायचा, नको ना गं गाऊस

आठवतो मला….. २

 

कधी खोडकर कधी हळवा होऊन बरसायचा

डोळ्यातील अश्रूंना उगाचच पावसात भिजवायचा

मी बोलायच्या आतच म्हणायचा, नको ना गं पाहूस

आठवतो मला……. ३

 

भर पावसात मुद्दामच छत्री विसरायचा

एका छत्रीत( छताखाली) येण्याचा बहाणा शोधायचा

मी बोलण्या आधीच कटू सत्य म्हणायचा, नको ना गं दृष्ट लावूस

आठवतो मला….. ४

 

© सौ. योगिता किरण पाखले, पुणे

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #5 – उडताही नाही आले ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है ।  साप्ताहिक स्तम्भ  अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक कवि  हृदय की कल्पना और कल्पना की सीमाओं में बंधी कविता “उडताही नाही आले”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 5  ☆

? उडताही नाही आले ?

 

बाहेर मला घरट्याच्या पडताही नाही आले

पंखाना धाक असा की उडताही नाही आले

 

हे बांध घातले त्यांनी हुंदके अडवले होते डोळ्यात झरे असतांना रडताही नाही आले

या काळ्या बुरख्या मागे मी किती दडवले अश्रू पुरुषांची मक्तेदारी नडताही नाही आले

 

धर्माचे छप्पर होते जातींच्या विशाल भिंती

मज सागरात प्रीतीच्या बुडताही नाही आले

 

या गोर्‍या वर्णाचीही मज भिती वाटते आता त्या अंधाराच्या मागे दडताही नाही आले

वरदान मला सृजनाचे नाकार कितीही वेड्या खुडण्याचे धाडस केले खुडताही नाही आले

 

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? रंजना जी यांचे साहित्य #-5 – आयुष्य साधकाचे ? – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना इस एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।   सुश्री रंजना  जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश  देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। अब आप उनकी अतिसुन्दर रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे।  आज प्रस्तुत है  उनकी एक भावप्रवण रचना “आयुष्य साधकाचे”।)

 

? साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #-5 ? 

 

☆ आयुष्य साधकाचे ☆

 

वृत्त आनंदकंद

लगावली-  गागाल गालगागा गागाल गालगागा

 

आयुष्य साधकाचे भोगी जगून गेले।

साधुत्व मात्र त्यांचे पुरते मरून गेले।

 

लावून सापळ्याला कोणी हलाल केले।

हा खेळ मुखवट्यांचा खोटे तरून गेले।

 

लावून गोपिचंदन माळा गळ्यात शोभे।

फसवून ते जगाला साधू बनून गेले।

 

डोळे मिटून असती बगळे अखंड ध्यानी।

मत्स्यास का कळेना अलगद फसून गेले।

 

सोडून लाज सारी तत्वास मोडले पण।

शिरपेच  लाटताना डोके झुकून गेला।

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती # 2 ☆ शिडकावा ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर

सुश्री स्वप्ना अमृतकर

(सुप्रसिद्ध युवा कवियित्रि सुश्री स्वप्ना अमृतकर जी का अपना काव्य संसार है । आपकी कई कवितायें विभिन्न मंचों पर पुरस्कृत हो चुकी हैं।  आप कविता की विभिन्न विधाओं में  दक्ष हैं और साथ ही हायकू शैली की सशक्त हस्ताक्षर हैं। आपने कविता के साप्ताहिक स्तम्भ के लिए हमारे आग्रह को स्वीकार किया, इसके लिए हम हृदय से आपके आभारी हैं। हम आपका  “साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना की कवितायें “ शीर्षक से प्रारम्भ कर रहे हैं। वर्षा ऋतु ने हमारे द्वार पर दस्तक दी है।  सुश्री स्वप्ना जी के ही शब्दों में  “पावसाळ्याची सुरुवात आहे.. आता सगळ्या कवींचे, लेखकांचे मन जागे होते लिखाणासाठी .. म्हणून ह्या वेळेसचे साहित्य “ ।  इस शृंखला में  प्रथम पाँच कवितायें वर्षा ऋतु पर आधारित हैं जो आप प्रत्येक शनिवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है सुश्री स्वप्ना जी की कविता “शिडकावा”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती # -2 ☆ 

 

☆ शिडकावा  ☆ 

(१२ओळी)

 

नभातल्या ढगांची

जणु मैत्री तुटते

कडकडाट वीजेचा

ती कोणा वरती रुसते? ..

 

विसर पडावा

धरेला त्या उष्माचा

सुगंधी भूल टोचावी

स्पर्ष व्हावा जलाचा .

 

पावसाच्या ओढीने

धरा व्याकूळ होते

मृदु थेंबाचा शिडकावा

तिला मोहरुन टाकते .

 

© स्वप्ना अमृतकर , पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ पावसाच्या कविता ☆ – सुश्री विजया देव

सुश्री विजया देव

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री विजया देव जी  की  वर्षा ऋतु के आगमन पर एक भावप्रवण मराठी कविता।)

 

☆ पावसाच्या कविता ☆

 

या धरेच्या रांजणात बरसतो

पाऊस हा

जीवनाचा अर्थ काही सांगतो

पाऊस हा

मित्र हा  क्रुषिवलांचा करी क्रुपा त्यांचेवरी

शेत हिरवीगार कराेनी सुखवितो

पाऊस हा

काेरड्या झाल्या मनाच्या भावना

संवेदना

प्रेमवर्षावात तेव्हा भिजवतो

पाऊस हा

वाट हिरवी चालताना मातीला

येई सुवास

काय अत्तराचे सुगंध शिंपतो

पाऊस हा

विरह आणि मिलनाचे  हा धडे देतो कशाला

प्रेमिकाना जागवितो जागतो

पाऊस हा

जाण याला संगिताची हा असे कां

गायक

रिमझीमणारी गझल गातो

रिझवतो पाऊस हा

 

©  विजया देव, पुणे 

 

Please share your Post !

Shares
image_print