मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुठे कुठे जाऊ ? ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ कुठे कुठे जाऊ? ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

विदीर्ण काळीज,

कोसळे आकाश.

उमेद प्रकाश,

मंदावला.

मुखी तुझे नाव,

वेगळे दर्शन.

वंचनेचा भाव,

पदोपदी .

वाहे चंद्रभागा,

उपेक्षा उदरी.

संतांची पंढरी,

दूरावली.

आता काय वर्णू,

कसे गुण गाऊ?

कुठेकुठे जाऊ,

पांडुरंगा.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 223 ☆ महाबली हनुमान! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चहाची महती… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

चहाची महती…☕ ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

मिळाले स्वातंत्र्य अन् चहाचे लागले व्यसन

लागली चटक आणि जिंकले चहाने सर्वांचे मन

*

जो तो उठसूठ चहा पिऊ लागला

पाहुणचार चहाचा बिनदिक्कत करू लागला.

*

चहा शिवाय मुलगी बघणे अपमान वाटू लागला

साधा चहा पण दिला नाही हा शब्दप्रयोग रूढ झाला

*

मुलीला चहा पण साधा येत नाही हे वर्णन करायला लागले

चला चहा घेऊ हे वाक्य टेबला खालून राजरोस सुरू झाले

*

टपरीवरील चहा, हाॅटेल चहाला मारक ठरला

क्रिकेटच्या मॅचेस टपरीवरील टी.व्ही.वर झडू लागल्या.

*

काॅलेज कॅंटीनचा परिसर चहाच्या वासाने दरवळायला लागला

लंच ब्रेक मध्येही चहाच्या फेर्या वाढायला लागल्या

*

 मुलांची पावले आपसूकच तिकडे वळायला  लागली

तरुणाईची झिंग कॅंटीनच्या आवारात चढायला लागली.

*

इलेक्शनला चहाच्या किटल्या भरभरून रिकाम्या झाल्या

गर्दीच्या चहाच्या कपाच्या वार्या झडू लागल्या

*

कर्तृत्ववान माणसं चहाच्या एका कपाचा मी मिंधा नाही असं म्हणून मिरवू लागली

वृद्ध माणसं चहाची वेळ झाली म्हणून ऊन्ह कलल्यावर स्वैपाकघरात डोकावू लागली.

*

चहाने एक काम  मात्र चांगले केले

अभ्यासासाठी जागण्यास प्रोत्साहन दिले

*

चहा बाज,चहा चा चहाता,चहा प्रेमी या विशेषणांची भर पडली

अन् पेयांचा राजा म्हणून चहाची चलती झाली.

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।

ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥१॥

*

वृत्ती तुजठायी ना पार्था दोष शोधण्याची

जाणुनिया पात्रता गुह्य ज्ञान जाणण्याची

विज्ञानासह तुला सांगतो गुह्याची युक्ती

या ज्ञानाने मिळेल तुजला कर्मबंधमुक्ती ॥१॥

*

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्‌ ।

प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्‌ ॥२॥

*

विद्याराज गुह्यश्रेष्ठ परम पवित्र धर्माचे हे ज्ञान

परमात्म्याची देई अनुभूती सुखकर्तव्य कर्माचरण ॥२॥

*

अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप । 

अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥३॥

*

धर्मप्रती ना श्रद्धा ज्याची तया न मी प्राप्त

जन्ममृत्युच्या फेऱ्यातुनिया ना हो तो मुक्त ॥३॥ 

*

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।

मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषवस्थितः ॥४॥

*

व्यापिले सकल विश्वाला राहुनी अव्यक्त मी

स्थित सर्वभूते माझ्या ठायी त्यांच्या ठायी नाही मी ॥४॥ 

*

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्‌ ।

भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥५॥

*

योगसामर्थ्यासी या मम तू जाणुन घेई रे अर्जुन 

सकल जीवांचा मी निर्माता करितो त्या धारण

जीवांच्या त्या ठायी तरीही नच माझे  वास्तव्य 

माझ्यामध्ये जीवांचे कोणत्याही  नसते वास्तव्य ॥५॥

*

यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्‌ ।

तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥६॥

*

सर्वत्र लहरतो वायु जैसा अवकाशात स्थित

सकल जीवही माझ्या ठायी सदैव असती स्थित ॥६॥

*

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ ।

कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌ ॥७॥

*

समस्त जीव माझ्या ठायी विलीन कल्पान्ते

प्रारंभी नव कल्पाच्या पुनर्निर्मितो मी त्याते ॥७॥

*

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।

भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्‌ ॥८॥

*

परावलंबी विलीन होती समस्त जीव मम प्रकृती 

पुनःपुन्हा मी तया निर्मितो यदृच्छेने मम प्रकृती ॥८॥ 

*

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।

उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥९॥

*

अलिप्त कर्मांपासुनी मी या सदैव धनंजया

बंधन नाही कर्मांचे त्या अनासक्तासी मया ॥९॥

*

मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरं ।

हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥१०॥

*

मम इच्छेने समस्त चराचर सृष्टीला मी प्रसवितो

निर्मुनिया अन् नाश करूनी संसारा मी परिवर्तितो ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवितेला…. ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? कवितेचा उत्सव ?

कवितेला…. 🖋️✍️अ ते ज्ञ🎼 डॉ. माधुरी जोशी 

कुठे मनात शब्द साठतात

सहज सुंदर सजत राहतात

हातात हात घालून ओळ करतात

आणि पेनातून झर झर झरतात

कधीतरी काहीतरी वाचलेलं

कधीतरी काहीतरी अनुभवलेलं

अचानक उसळी मारत वर येतं

आणि मनात रिंगण धरतं

कसे शब्द ओळीनं चपखल बसतात

आपली आपली जागा ठरवतात

त्यांना आपसूक कळतात वृत्त,छंद

माझ्या नकळत सुंदर व्यक्त होतात

मी काहीच ठरवलेलं नसतं

मी खूप काही अभ्यासलेलंही नसतं

तरी शब्द कुठूनअचानक सामोरे येतात

सुंदर कवितेची वस्त्र पांघरतात

वाचणारे म्हणतात

तुम्ही छान कविता करता

देवाला हात आपोआप जोडले जातात

 

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “साक्षात्कार… —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “साक्षात्कार…—” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

मनी झरे का अवचित झरझर

अवखळ श्रावणसर

अलगद कानी गुणगुणती अन्

बासरीचे सूर मधुर ….

 

निळे सावळे भासे का नभ

प्रसन्न जरी दिनकर

निरभ्र असुनी भवती सारे

मनी दाटे हुरहूर ….

 

जग सारे हे तसेच येथे

मनाची परि भिरभिर

शोधू लागले कोठून आली

नकळत श्रावणसर ….

       

मग क्षणात चमके इंद्रधनू अन्

सूर्य हसे हळुवार

लख्ख दिसे मज मनी दडलेला

कृष्णसखा सुकुमार ….

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ काबीज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ काबीज ☆ श्रीशैल चौगुले ☆

निळ्या शुभ्र उन्हाझळात

पांघरुन माया ही छाया

किती सुख कळपाशी

हि ऋतू निसर्ग किमया.

तळव्याची चटके खरी

धरा अस्वस्थ मनाची

हळू सूर्य खाली येताना

पशू प्राणी ग्रीष्म गोची.

किती हिरवे प्रेमळ

पान बहर काळीज

याच मुळांचे शाखांनी

सृष्टीस केले काबीज.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 231 ☆ दुनियादारी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 231 ?

☆ दुनियादारी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आजकाल शोफर ड्रिव्हन कार असणं,

हे खूप मोठं स्टेटस मानलं जातं,

विचारलं परवा,

एका नातेवाईकानं,

यायचंय का मुंबईला?

म्हटलं “कसे आले आहात?”

तर ते म्हणाले,

माझ्याकडे शोफर ड्रिव्हन कार असते !

मी म्हणाले… “ओह्ह ग्रेट!”

 

आता प्रवासभर असंच काही

ऐकावं लागणार,

याची कल्पना आलीच!

 

तरीही गाण्याचा चाॅईस

चांगला होता…..

चलो न गोरी मचल मचलके….

खूप वर्षानी ऐकलं !

सी. एच. आत्माचा आवाज

मनाला वेढून राहिला

असतानाच,

 

काल “तू डायरेक्ट इकडेच ये रिक्षाने”

असं म्हणून फोन

कट करणारणीचा फोन,

 

म्हटलं, “मी प्रवासात आहे” !

“उद्या येतीयेस ना संध्याकाळी”

म्हटलं, “नाही” अगं….

परत कालच्या सारखाच,

फोन कट !

 

मी हसले स्वतःशीच!

आपल्याला दुनियादारी

समजली नाही….

की,

ही रीतच आहे दुनियेची,

“मुझसे बडा न कोय”!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन पाखरा रे… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘मन पाखरा रे…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(देवप्रिया~ गालगागा गालगागा गालगागा गालगा)

मानसीच्या पाखरा रे पिंजरा हा तोड तू

कोंडलेल्या भावनांना या अशा रे सोड तू

*

खूप झाली बंधने अन खूप झाले सोसणे

संपली सारीच शक्ती बांध आता फोड तू

*

अंतरीच्या वेदनांना सांग का लपवू कसे?

सागराची लाट उठली जा अशी ती मोड तू

*

मोरपंखी स्पर्श सखया रोमरोमी साठला

सोबतीला राहुनी बघ जीव आता जोड तू

*

भ्यायचे नाही जराही बोलुदे काही कुणी

का तमा पण बाळगावी मान नाते गोड तू

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

२२/०४/२०२४

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #238 ☆ भूक प्रीतिची… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 238 ?

☆ मातृदिनानिमित्त – भूक प्रीतिची ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

जीव गुंतला केवळ माझा

फुगली छाती तुटला काजा

*

मन हे माझे येते बहरुन

रोज भेटणे होते चोरुन

नकोच त्याचा गाजावाजा

जीव गुंतला केवळ माझा

*

प्रीत जडाया बहू कारणे

प्रीत सोडुनी ‌नसे मागणे

भूक प्रीतिची माझा राजा

जीव गुंतला केवळ माझा

*

समजुन घे ना माझा हेतू

बंद पापण्या मिटून घे तू

नकोच उघडा तो दरवाजा

जीव गुंतला केवळ माझा

*

सरपण होते चूल पेटली

तवा भाकरी अशी भेटली

पाणी लावा खमंग भाजा

जीव गुंतला केवळ माझा

*

लाल गुलाबी गर्द पाकळी

तुझ्याचसाठी आहे मोकळी

नको मुखी तो आता बाजा

जीव गुंतला केवळ माझा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares