(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक कविता – “सरप्लस… ” ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 320 ☆
कविता – सरप्लस… श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆
बड़ी सी चमचमाती शोफर वाली
कार तो है
पर बैठने वाला शख्स एक ही है
हाल नुमा ड्राइंग रूम भी है
पर आने वाले नदारद हैं
लॉन है, झूला है, फूल भी खिलते हैं, पर नहीं है फुरसत, खुली हवा में गहरी सांस लेनें की
छत है बड़ी सी, पर सीढ़ियां चढ़ने की ताकत नहीं बची।
बालकनी भी है
किन्तु समय ही नहीं है
वहां धूप तापने की
टी वी खरीद रखा है
सबसे बड़ा,
पर क्रेज ही नहीं बचा देखने का
तरह तरह के कपड़ों से भरी हैं अलमारियां
गहने हैं खूब से, पर बंद हैं लॉकर में
सुबह नाश्ते में प्लेट तो सजती है
कई, लेकिन चंद टुकड़े पपीते के और दलिया ही लेते हैं वे तथा
(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख # 112 ☆ देश-परदेश – मुंह धो कर आना ☆ श्री राकेश कुमार ☆
सामान्य भाषा में मित्रों और परिचितों को हमने ये कहते हुए अनेक बार सुना है, “जाओ मुंह धो कर आओ” जब कभी हमें ऐसा प्रतीत होता है, कि सामने वाला व्यक्ति किसी कार्य कर सकने के काबिल नहीं है, या उसमें इतनी क्षमता नहीं है, कि वो ये कार्य सम्पन्न कर सकें, उसको मज़ाक में कह दिया जाता है, जाओ पहले मुंह धो कर आओ।
हमारे चाचा जब कभी घर में कुछ खानें के लिए बात करते थे, तो पिताजी कहते थे। पहले हाथ मुंह धो लो, फिर भोजन ग्रहण करो। चाचा हाजिर जवाबी और अधिक भूख के कारण कह देते थे, “शेर कहां मुंह धोते हैं” ऐसा कहकर वो भोजन पर टूट पड़ते थे।
उपरोक्त फोटो में तो पुलिस वाले ही हाइवे पर ट्रक ड्राइवरों के मुंह धो रहे हैं, ताकि उनकी नींद खुल जाए, और सड़क दुर्घटनाओं में कमी की जा सके, नींद भगाने का पुराना फॉर्मूला है। वैसे, रात के समय भीषण ठंड के दिनों में, ये घोर जुल्म हो रहा है।
दसवीं की बोर्ड परीक्षा के समय माता जी ठंड के दिनों में प्रातः चार बजे जगा दिया करती थी। हम भी चटाई/ कुर्सी पर कंबल में बैठे बैठे सो जाते थे। पिता जी की दृष्टि जब भी हम पर पड़ती, वो शब्दों के बाण छोड़ दिया करते थे। हम भी जिद्दी और ढीठ प्रवृति के थे, पिताजी के शब्द बाण को अनसुना कर निद्रा में खो जाते थे।
बाप तो बाप ही होता है, कड़कती ठंड में खुले हौद से लौटा भर कर पानी के छींटे हमारे मुंह पर डाल कर नींद भगाने का फार्मूला, पिता जी ने भी अपने बाप से ही सीखा था। हमारी पीढ़ी ने इस प्रथा को लुप्त प्रायः सा कर दिया है।
बंडू आणि बेबीची वहिनी म्हणून गल्लीतले सारेच त्यांना वहिनीच म्हणायचे. आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात अनेक स्त्रिया माझ्या जीवनात आल्या. नात्यातल्या, शेजारपाजारच्या, काही सहज ओळखीच्या झालेल्या, काही शिक्षिका, काही मैत्रिणी, लग्ना आधीच्या, लग्नानंतरच्या, एका संस्थेच्या माध्यमातून काम करण्याच्या निमित्ताने भेटलेल्या तळागाळातल्या स्त्रिया, घरातल्या मदतनीस, ठिकठिकाणच्या प्रवासात ओळख झालेल्या, निराळ्या धर्माच्या,संस्कृतीच्या, सहज भेटलेल्या अशा कितीतरी सबल, दुर्बल, नीटनेटक्या, गबाळ्या, हुशार, स्वावलंबी, अगतिक, असहाय्य, परावलंबी, जिद्दी, महत्त्वाकांक्षी तर कुठलंच ध्येय नसलेल्या वारा वाहेल तशा वाहत जाणाऱ्या स्त्रिया मला ठिकठिकाणी भेटल्या पण लहानपणीच्या वहिनींना मात्र माझ्या मनात आजही एक वेगळाच कोपरा मी सांभाळून ठेवलेला आहे. त्यावेळी वहिनींच्या व्यक्तिमत्त्वातलं जे जाणवलं नाही त्याचा विचार आता आयुष्य भरपूर अनुभवलेल्या माझ्या मनाला जाणवतं आणि नकळत त्या व्यक्तिमत्त्वासमोर माझे हात जुळतात.
विस्तृत कुटुंबाचा भार वहिनींनी पेलला होता. त्यांचं माहेर सातार्याचं. तसा माहेरचाही बहीण भावंडांचा गोतावळा काही कमी नव्हता पण सातारचे बापूसाहेब ही एक नावलौकिक कमावलेली असामी होती. साहित्यप्रेमी, नाट्यप्रेमी म्हणून सातारकरांना त्यांची ओळख होती आणि त्यांची ही लाडकी कन्या म्हणजे आम्ही हाक मारत असू त्या वहिनी. वहिनींनाही बापूसाहेबांचा फार अभिमान होता. पित्यावर त्यांचं निस्सीम प्रेम होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाबाळांना घेऊन त्या माहेरपणाला सातारी जात आणि परत येत तेव्हा त्यांच्यासोबत धान्य, कपडे, फळे, भाज्या, मिठाया विशेषत: कंदी पेढे यांची बरीचशी गाठोडी असत. वहिनींचा चेहरा फुललेला असे आणि त्यांच्या मुलांकडून म्हणजेच आमच्या सवंगड्यांकडून आम्हाला साताऱ्याच्या खास गमतीजमती ऐकायलाही मजा यायची.
अशी ही लाडकी बापूसाहेब सातारकर यांची कन्या सासरी मात्र गणगोताच्या गराड्यात पार जुंपलेली असायची.
आमचं कुटुंब स्वतंत्र होतं. आई-वडील, आजी आणि आम्ही बहिणी. मुळातच वडील एकटेच असल्यामुळे आम्हाला फारशी नातीच नव्हती, विस्तारित नात्यांच्या एकत्र कुटुंबात राहण्याचा आम्हाला अनुभवच नव्हता. त्या पार्श्वभूमीवर या मुल्हेरकरांचे कुटुंब नक्कीच मोठं होतं. बाबासाहेब आणि वहिनी या कुटुंबाचे बळकट खांब होते. आर्थिक बाजू सांभाळण्याचं कर्तव्य बाबांचं आणि घर सांभाळण्याची जबाबदारी वहिनींची. घरात सासरे, नवऱ्याची म्हातारी आजारी आत्या, दीर, नणंद आणि त्यांची पाच मुलं. धोबी गल्लीतलं त्यांचं घर वडिलोपार्जित असावं. बाबासाहेबांनी त्यावर वरचा मजला बांधून घेतला होता. वहिनींच्या आयुष्यात स्वत:चं घर हा एकच हातचा मौलिक असावा.
त्यावेळी दोनशे रुपये महिन्याची कमाई म्हणजे खूप होती का? बाबासाहेब आरटीओत होते. त्यांचाही स्वभाव हसरा, खेळकर, विनोदी आणि परिस्थितीला टक्कर देणारा होता. बाबासाहेब आणि वहिनींच्यात त्याकाळी घरगुती कारणांमुळे धुसफुस होतही असेल पण तसं त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्याच सामर्थ्यावर वहिनी अनंत छिद्रे असलेला संसार नेटाने शिवत राहिल्या. काहीच नव्हतं त्यांच्या घरात. झोपायला गाद्या नव्हत्या, कपड्याचं कपाट नव्हतं, एका जुनाट पत्र्याच्या पेटीत सगळ्यांचे कपडे ठेवलेले असत. म्हातारी आजारी आत्या— जिला “बाई” म्हणायचे.. त्या दिवसभर खोकायच्या. सासरे नानाही तसे विचित्रच वागायचे पण बंडू बेबी आणि बाबासाहेबा या भावंडांचं मात्र एकमेकांवर खूप प्रेम होतं. बेबीला तर कितीतरी लहान वयात जबाबदारीची जाणीव झाली असावी. ती शाळा, अभ्यास सांभाळून वहिनींना घर कामात अगदी तळमळीने मदत करायची. खरं म्हणजे तिच्या आणि माझ्या वयात फारसं अंतरही नव्हतं पण मला ज्या गोष्टी त्यावेळी येत नव्हत्या त्या ती अतिशय सफाईदारपणे तेव्हा करायची. त्यामुळे बेबी सुद्धा माझ्यासाठी एक कौतुकाची व्यक्ती होती. शिवाय त्यांच्या घरी सतत पाहुणेही असायचे. त्यांच्या नात्यातलीच माणसं असत. काहींची मुलं तर शिक्षणासाठी अथवा परीक्षेचं केंद्र आहे म्हणून त्यांच्या घरी मुक्कामी सुद्धा असायची. प्रत्येक सण त्यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने, साग्रसंगीत साजरा व्हायचा. दिवाळी आणि गणपती उत्सवाचंच तर फारच सुरेख साजरीकरण असायचं. खरं सांगू ? लहानपणी बाह्य गोष्टींचा पगडा मनावर नसतोच. भले चार बोडक्या भिंतीच असतील पण त्या भिंतीच्या मधलं जे वातावरण असायचं ना त्याचं आम्हाला खूप आकर्षण होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी वहिनी होत्या.
किती सुंदर होत्या वहिनी! लहानसाच पण मोहक चेहरा, नाकीडोळी नीटस, डोळ्यात सदैव हसरे आणि प्रेमळ भाव, लांब सडक केस, ठेंगणा पण लवचिक बांधा, बोलणं तर इतकं मधुर असायचं …! संसाराची दिवस रात्रीची टोकं सांभाळताना दमछाक झाली होती त्या सौंदर्याची.
अचानक कुणी पाहुणा दारी आला की पटकन त्या लांब सडक केसांची कशीतरी गाठ बांधायच्या, घरातलंच गुंडाळलेलं लुगडं, सैल झंपर सावरत अनवाणीच लगबगीने वाण्याकडे जायच्या. उधार उसनवारी करून वाणसामान आणायच्या आणि आलेल्या पाहुण्यांना पोटभर जेवायला घालून त्याने दिलेल्या तृप्तीच्या ढेकरानेच त्या समाधानी व्हायच्या. वहिनी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. साधं “लिंबाचं सरबत सुद्धा” अमृतासारखं असायचं. त्यांच्या हातच्या फोडणीच्या भाताची चव तर मी आजही विसरलेली नाही. अनेक खाद्यपदार्थांच्या चवीत त्यांच्या हाताची चव मिसळलेली असायची. मला आजही आठवतं सकाळचे उरलेले जेवण लहान लहान भांड्यातून एका मोठ्या परातीत पाणी घालून त्यात ठेवलेलं असायचं, त्यावर झाकण म्हणून एखादा फडका असायचा. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर मी कित्येकदा चित्रा, बेबी बरोबर त्या परातीतलं सकाळचं जेवण जेवलेली आहे. साधंच तर असायचं. पोळी, कधी आंबट वरण, उसळ, नाहीतर वालाचं बिरडं, किंवा माशाचं कालवण पण त्या स्वादिष्ट जेवणाने खरोखरच आत्म्याची तृप्ती व्हायची. त्या आठवणीने आजही माझ्या तोंडाला पाणी सुटतं! लहानपणी कुठे कळत होतं कुणाची आर्थिक चणचण, संसारातली ओढाताण, काळज्या, चिंता. एका चपातीचीही वाटणी करणे किती मुश्कील असतं हा विचार बालमनाला कधीच शिवला नाही. घरात जशी आई असते ना तशीच या समोरच्या घरातली ही वहिनी होती. आम्हाला कधीच जाणवलं नाही की वहिनींच्या गोऱ्यापान, सुरेख, घाटदार मनगटावर गोठ पाटल्या नव्हत्या. होत्या त्या दोन काचेच्या बांगड्या. त्यांच्या गळ्यात काळ्या मण्याची सुतात ओवलेली पोतही आम्हाला सुंदर वाटायची. त्यांच्या पायात वाहणा होत्या की नव्हत्या हे आम्ही कधीच पाहिले नाही. आम्हाला आठवते ते सणासुदीच्या दिवशी खोलीभर पसरून ठेवलेला सुगंधित, खमंगपणा दरवळणारा केवढा तरी चुलीवर शिजवलेला स्वयंपाक आणि पाहुण्यांनी भरगच्च भरलेलं ते घर आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद लुटणाऱ्या त्या पंगती आणि हसतमुखाने आग्रह कर करून वाढणाऱ्या वहिनी. हे सगळं त्यांना कसं जमत होतं हा विचार आता मनात येतो.
मला टायफॉईड झाला होता.तोंडाची चव पार गेली होती. वहिनी रोजच माझ्याजवळ येऊन बसायच्या. एकदिवस मी त्यांना म्हटलं, “शेवळाची कणी नाही का केली?” दुसर्या दिवशी त्या माझ्यासाठी वाटीभर “शेवळाची कणी” घेउन आल्या. अत्यंत किचकट पण स्वादीष्ट पदार्थ.पण वहिनी झटपट बनवायच्या.
काळ थांबत नाही. काळा बरोबर जीवन सरकतं नाना—बाई स्वर्गस्थ झाले. बाबासाहेबांनी यथाशक्ती बहीण भावाला त्यांना पायावर उभे राहण्यापुरतं शिक्षण दिलं. बेबी च्या लग्नात आईच्या मायेने वहिनींनी तिची पाठवणी केली. आयुष्याच्या वाटेवर नणंद भावजयीत वाद झाले असतील पण काळाच्या ओघात ते वाहून गेलं. एक अलौकिक मायलेकीचं घट्ट नातं त्यांच्यात टिकून राहिलं. माहेरचा उंबरठा ओलांडताना दोघींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. विलक्षण वात्सल्याचं ते दृश्य होतं. बेबी आजही म्हणते!” मी माझी आई पाहिली नाही. मला माझी आई आठवत नाही पण वहिनीच माझी आई होती.”
धन, संपत्ती, श्रीमंती म्हणजे काय असतं हो? शब्द, भावनांमधून जे आत्म्याला बिलगतं त्याहून मौल्यवान काहीच नसतं.
बाबा वहिनींची मुलंही मार्गी लागली, चतुर्भुज झाली. जुनं मागे टाकून वहिनींचा संसार असा नव्याने पुन्हा फुलून गेला. पण वहिनी त्याच होत्या. तेव्हाही आणि आताही.
बाबासाहेब निवृत्त झाले तेव्हा काही फंडांचे पैसे त्यांना मिळाले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा ते म्हणाले,” सहजीवनात मी तृप्त आहे. मला अशी सहचारिणी मिळाली की जिने माझ्या डगमगत्या जीवन नौकेतून हसतमुखाने सोबत केली. माझ्या नौकेची वल्ही तीच होती. मी तिच्यासाठी काहीच केलं नाही. तिचं डोंगराएवढं ॠण मी काही फेडू शकणार नाही पण आज मी तिच्या भुंड्या मनगटावर स्वतःच्या हाताने हे सोन्याचे बिलवर घालणार आहे. “ .. त्यावेळचे वहिनींच्या चेहऱ्यावरचे भाव मी कोणत्या शब्दात टिपू? पण त्या क्षणी त्यांच्या परसदारीचा सोनचाफ्याचा वृक्ष अंगोपांगी फुलला होता आणि त्या कांचन वृक्षाचा दरवळ असमंतात पसरला होता. तो सुवर्ण वृक्ष म्हणजे वहिनींच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता आणि तोही जणू काही अंतर्यामी आनंदला होता.
अशोक (त्यांचा लेक) एअर इंडियात असताना त्याने वहिनी आणि बाबासाहेबांसाठी लंडनची सहल आयोजित केली. विमानाची तिकिटे तर विना शुल्क होती. बाकीचा खर्च त्यांनी केला असावा. वहिनींना मुळीच जायचं नव्हतं पण सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अखेर जाण्याचे मान्य केले. वहिनींच्या आयुष्यात असा क्षण येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते पण त्याचवेळी त्यांच्या प्रियजनांचा आनंदही खूप मोठा होता. त्या जेव्हा लंडनून परत आल्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते. धोबी गल्ली ते लंडन— वहिनींच्या आयुष्यातला अकल्पित टप्पा होता तो! मी त्यांना विचारलं,” कसा वाटला राणीचा देश ?”
तेव्हा त्या हात झटकून म्हणाल्या,” काय की बाई, एक मिनिटंही मी बाबासाहेबांचा हात सोडला नाही. कधी घरी जाते असं झालं होतं मला! “
.. .. .. त्यावेळी मात्र वहिनींकडे पाहताना “इथेच माझे पंढरपुर” म्हणणारी ती वारकरीणच मला आठवली.
“ ते जाऊदे ग! हे बघ सकाळी थोडी तळलेली कलेजी केली होती. खातेस का?”
.. .. त्या क्षणी मला आठवलं ते मोठ्या परातीत पाणी घालून झाकून ठेवलेलं सकाळचं उरलेलं चविष्ट जेवण!
या क्षणी माझ्याजवळ होती ती तीच अन्नपूर्णा वहिनी. प्रेमाने खाऊ घालणारी माऊली…
आज वहिनी नाहीत पण जेव्हा जेव्हा मी काटेरी फांदीवर उमललेलं टवटवीत गुलाबाचे फुल पाहते तेव्हा मला वहिनींचीच आठवण येते..
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका भावप्रवण कविता – कथा क्रम (स्वगत)…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 218 – कथा क्रम (स्वगत)…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “समझ गई जो जीवन को...”)
☆ साप्ताहिक स्तम्भ # 218 ☆।। अभिनव गीत ।। ☆
☆ “समझ गई जो जीवन को...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆
वरिष्ठ पत्रकार, लेखक श्री प्रतुल श्रीवास्तव, भाषा विज्ञान एवं बुन्देली लोक साहित्य के मूर्धन्य विद्वान, शिक्षाविद् स्व.डॉ.पूरनचंद श्रीवास्तव के यशस्वी पुत्र हैं। हिंदी साहित्य एवं पत्रकारिता के क्षेत्र में प्रतुल श्रीवास्तव का नाम जाना पहचाना है। इन्होंने दैनिक हितवाद, ज्ञानयुग प्रभात, नवभारत, देशबंधु, स्वतंत्रमत, हरिभूमि एवं पीपुल्स समाचार पत्रों के संपादकीय विभाग में महत्वपूर्ण दायित्वों का निर्वहन किया। साहित्यिक पत्रिका “अनुमेहा” के प्रधान संपादक के रूप में इन्होंने उसे हिंदी साहित्य जगत में विशिष्ट पहचान दी। आपके सैकड़ों लेख एवं व्यंग्य देश की विभिन्न पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित हो चुके हैं। आपके द्वारा रचित अनेक देवी स्तुतियाँ एवं प्रेम गीत भी चर्चित हैं। नागपुर, भोपाल एवं जबलपुर आकाशवाणी ने विभिन्न विषयों पर आपकी दर्जनों वार्ताओं का प्रसारण किया। प्रतुल जी ने भगवान रजनीश ‘ओशो’ एवं महर्षि महेश योगी सहित अनेक विभूतियों एवं समस्याओं पर डाक्यूमेंट्री फिल्मों का निर्माण भी किया। आपकी सहज-सरल चुटीली शैली पाठकों को उनकी रचनाएं एक ही बैठक में पढ़ने के लिए बाध्य करती हैं।
प्रकाशित पुस्तकें –ο यादों का मायाजाल ο अलसेट (हास्य-व्यंग्य) ο आखिरी कोना (हास्य-व्यंग्य) ο तिरछी नज़र (हास्य-व्यंग्य) ο मौन
(ई-अभिव्यक्ति में प्रत्येक सोमवार प्रस्तुत है नया साप्ताहिक स्तम्भ कहाँ गए वे लोग के अंतर्गत इतिहास में गुम हो गई विशिष्ट विभूतियों के बारे में अविस्मरणीय एवं ऐतिहासिक जानकारियाँ । इस कड़ी में आज प्रस्तुत है एक बहुआयामी व्यक्तित्व “सहृदय भावुक कवि स्व. अंशलाल पंद्रे” के संदर्भ में अविस्मरणीय ऐतिहासिक जानकारियाँ।)
आप गत अंकों में प्रकाशित विभूतियों की जानकारियों के बारे में निम्न लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं –
☆ “ सहृदय भावुक कवि स्व. अंशलाल पंद्रे” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆
अत्यंत सहज, सामान्य से दिखने वाले अंशलाल पंद्रे को उनके ज्ञान, कर्तव्य निष्ठा, ईमानदारी, सहृदयता, मिलनसारिता, देशभक्ति और सशक्त लेखनी ने उनके जीवन काल में ही विशिष्ट बना दिया था। एक समय ऐसा था जब न सिर्फ जबलपुर वरन आसपास के अनेक नगरों की साहित्यिक – सांस्कृतिक, आध्यात्मिक संस्थाओं के कार्यक्रमों के सूत्रधार और शक्तिपुंज पंद्रे जी ही हुआ करते थे। पंद्रे जी ने धर्म – आध्यात्म, प्रकृति, महापुरुषों और देशभक्ति पर अविस्मरणीय मधुर, प्रेरणादायी, सहज – सरल भावभरे गीत लिखे।
एकता और समानता पर उनकी पंक्तियां –
राम, कृष्ण, ईसा, मोहम्मद,
नानक का सम्मान यहां।
जाति धर्म का भेद नहीं है,
हम सब एक सामान यहां।।
,,,,और प्रकृति प्रेम –
रिमझिम गाए सावनी घटा।
बहलाए मन फगुनी छटा।।
जो दिखे लगे निखरा – निखरा।
है नमन तुझे हे ! वसुंधरा।।
,,,,श्रम का पूजन –
हाथों में लेकर कुदाल खेतों को हम जाते।
सूरज की पहली किरन से रोज ही नहाते।
श्रम की पूजा करने में विश्वास हमारा है।
सबसे अच्छी फुलवारी – हिन्दुस्तान हमारा है।।
12 सितम्बर 1954 में ग्राम विजयपानी खुर्द में जन्में अंशलाल पंद्रे की प्रारंभिक शिक्षा एवं कर्म भूमि का केंद्र छपारा जिला – सिवनी रहा। आपने अर्थशास्त्र में एम. ए. तथा गायन में संगीत प्रभाकर किया। सफलता के लिए निरंतर प्रयत्न एवं कर्म पर विश्वास रखने वाले अंशलाल पंद्रे जी मध्यप्रदेश के लोकप्रिय क्षेत्रीय परिवहन अधिकारी रहे। शासकीय सेवा में अति व्यस्तता के बाद भी उन्होंने साहित्य सृजन जारी रखा। उनकी रचनाएं देश की प्रतिष्ठित पत्र – पत्रिकाओं में प्रकाशित तथा आकाशवाणी व दूरदर्शन से प्रसारित होती रहीं। पंद्रे जी आकाशवाणी से अनुबंधित गीतकार, सुगम संगीत व ड्रामा आर्टिस्ट भी रहे हैं। आप जबलपुर की संस्था “वर्तिका” के अध्यक्ष सहित अनेक संस्थाओं व पत्रिकाओं के संरक्षक भी रहे। दुष्यंत कुमार स्मारक पांडुलिपि संग्रहालय, भोपाल के परिषद सदस्य पंद्रे जी का देश की अनेक संस्थाओं द्वारा सम्मान किया गया। यों तो आपके गीत अनेक संग्रहों में शमिल हैं तथापि आपके द्वारा रचित कृतियों में प्रमुख हैं – सच्चिदानंद साईं हरि, गीत गुंजन, गीत मेरे मीत, प्यारा मध्यप्रदेश, सुर हरसिंगार (संगीत साधकों के लिए), जय मां हे भारती, किलकारी – फुलवारी, अंश भजनामृत एवं जननी भारत माता। देश के प्रसिद्ध शायर साज़ जबलपुरी के अनुसार कविता में अनेक विषयों पर अपनी सशक्त अभिव्यक्ति करने वाले अंशलाल पंद्रे में रसिकता, आध्यात्मिकता, राष्ट्रचिंतन तथा सरसता का अदभुत योग है।
साहित्य साधिका संध्या जैन “श्रुति” कहती हैं –
पंद्रे जी के गीतों का सरस सुवासित काम।
सद्भावी वाणी सरल अंशलाल है नाम।।
डॉ. हरी सिंह गौर विश्वविद्यालय, सागर के तत्कालीन प्रोफेसर एवं अध्यक्ष हिंदी विभाग डॉ.आनंद प्रकाश त्रिपाठी ने लिखा था कि “व्यक्तिगत जीवन में भी पंद्रे जी की सरलता, सहजता और भावप्रवणता को देखकर हर कोई मुग्ध हो उठता है। व्यक्तित्व की यही छाप पंद्रे जी के गीतों में देखी जा सकती है।”
पंद्रे जी की देशभक्ति पूर्ण भावभरी रचनाएं सदा आने वाली पीढ़ी का मार्गदर्शन करती रहेंगी।
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “सर्दी का मौसम…”।)
☆ “स्वामी विवेकानंद समग्र चरित्र – ३ खंड” – लेखक : प्रा. एस. एन धर – अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
(स्वामी विवेकानंद यांचे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या प्रकाशनाने प्रकाशित केलेलं समग्र चरित्र !)
पुस्तक : स्वामी विवेकानंद समग्र चरित्र (खंड एक, दोन आणि तीन)
(कॉम्प्रेशन बायोग्राफी ऑफ स्वामी विवेकानंद या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.)
लेखक : प्रा. एस. एन धर
अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली
(तिन्ही ग्रंथाची एकत्रित) पृष्ठे : २११२
मूल्य : २५००₹
स्वामी विवेकानंद यांच्या नावाची भुरळ आजही भारतीयांच्या मनावर आहे. आणि ती तसूभरही कमी झालेली नाही. त्यांचे विचार, त्यांचा संदेश पौर्वात्य जगतातच नव्हे, तर पश्चिमात्य विश्वातही सगळ्यांना आकर्षून घेत आहे.
स्वामी विवेकानंद एक महायोगी होते. हिमनगाचा पाण्याखालील अदृश्य भाग असतो, तसे त्यांचे जीवन आपल्या मानवी जाणिवांच्या पलीकडचे होते. स्वामीजींचे जीवन आणि कार्य सर्व जगतकल्याणासाठीच होते. इतर सत्पुरुषांसारखे त्यांचे जीवन नव्हते. शिकागोमध्ये १८९३ साली भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेपासून, जगाच्या पटलावर त्यांना एक थोर ऐतिहासिक विभूती अशी ओळख मिळाली होती. आधुनिक भारताचे ते कित्येकांच्या मते एक सर्वश्रेष्ठ निर्माते होते, ज्यांचे ध्येय जागतिक होते. जगाला भौतिक प्रगती प्रदान करण्याबरोबरच, नवीन जीवनमूल्ये किंवा जुन्या जीवनमूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी ते अखंड झिजले. दुसरे म्हणजे, त्यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी उदंड साहित्य जमा होत गेले आणि भारताबरोबरच जगातही त्यावर खूप संशोधन सुरू आहे.
हे पुस्तक लिहिण्यामागे स्वामी विवेकानंदाच्या जीवन आणि कार्याचा एक सरळ आणि तटस्थ आढावा घेणे हा लेखकाचा हेतू आहे. उपलब्ध असलेले सर्व प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्याचा संदर्भ घेऊन केलेले हे लेखन कुठल्याही सिद्धांताचा/ तत्त्वाचा अथवा विचारपद्धतीच्या प्रसारासाठी अथवा छापील गोष्टीचा अपभ्रंश करण्यासाठी केलेले नाही. या चरित्रातील व्यक्ती आणि प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे पारखून आणि निरखून घेतलेले आहेत. ज्यायोगे वाचकांना एक समग्र चरित्र उपलब्ध होईल. या अभ्यासात पार्श्वभूमीवरचे आणि अग्रस्थानी असलेले अनेक प्रसंग, आणि त्याकाळची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच स्वामी विवेकानंदांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे श्रीरामकृष्ण यास अभ्यासात अध्याहृत आहेत.
या खंडात्रयीचा पहिला भाग १८६३ ते १८९३ हा स्वामीजींच्या आयुष्यातील पहिल्या तीस वर्षाच्या कालावधीवर आधारलेला आहे. हा टप्पा आहे त्यांचा जन्म ते भारत परिक्रमा आणि त्यानंतर अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेला त्यांनी केलेले संबोधन, या घटनाक्रमावर आधारलेला. स्वाभाविकपणेच त्यात स्वामीजींचे बालपण, शाळा – कॉलेजातील दिवस, श्रीरामकृष्णांशी झालेली भेट, गुरु म्हणून त्यांचा केलेला स्वीकार, त्यांच्याकडून घेतलेली संन्यासदीक्षा, श्रीरामकृष्णांनी घेतलेली महासमाधी, वराहनगर मठाची स्थापना आणि ध्येयमार्गाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यापूर्वी गुरू आज्ञेनुसार केलेले भारत भ्रमण, इतक्या घटनांचे विस्तृत तपशील आले आहेत. स्वामीजी जागतिक धर्म परिषदेला गेले, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना आलेल्या अडचणी, यावर त्यांनी केलेली मात, स्वामीजींच्या अचाट व्यासंगाची अनुभूती घेतल्यानंतर या परिषदेत स्वामीजींना प्रवेश मिळावा यासाठी काही अमेरिकन नागरिकांनीच केलेले प्रयत्न आणि अखेरीस त्या महापरिषदेसमोर स्वामीजींनी केलेले उदबोधन हा सगळाच रोमांचित करणारा कालखंड पहिल्या खंडात प्रा. धार यांनी उलगडला आहे. हे लेखन रोचक आहेच, परंतु अंत:करणाला भिडणारे आहे, नितांत सुंदर वाचनानंद देणारे आहे. श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतरही स्वामीजींना जे दैवी संकेत मिळत गेले, जे दृष्टांत घडले त्यांचे वर्णन वाचणे हा एक अनमोल आनंदाचा ठेवा ठरावा.
या खंड त्रयीचा दुसरा भाग आधारला आहे तो ११ सप्टेंबर १८९३ ते १६ डिसेंबर १८९६ या तशा तीनच वर्षांच्या कालावधीतील घटनांवर. या घटना बहुतांशी अमेरिका आणि इंग्लंडमधील आहेत. स्वामीजींनी या देशांच्या दौऱ्यात भारतीय संस्कृतीचा केवळ पायाच रचला नाही, तर त्याचे मजबुतीकरणही केले. या सर्वच घटना स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाला आंतरराष्ट्रीय महती प्राप्त करून देणाऱ्या असल्याने, त्याचे तपशील वाचकांना प्रेरणादायक असेच वाटतील यात शंका नाही. अमेरिका आणि इंग्लंडचा हा दौरा सुरू असताना आणि तिथल्या शिष्यांना स्वामीजी अधिक काळ रहावेत असे वाटत असताना, स्वामीजींना मात्र भारतात परतण्याची विलक्षण होऊ लागली होती.
स्वामीजी ३० डिसेंबर १८९६ ला परतीच्या प्रवासाला निघाले. कोलंबोपासून कोलकात्यापर्यंत ठीकठिकाणी स्वामीजींचे उत्स्फूर्त स्वागत झाले, त्याचे वर्णन मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
खंडत्रयीचा तिसरा भाग फेब्रुवारी १८९७ ते जुलै १९०२ असा सुमारे साडेपाच वर्षाचा आहे. हा कालखंड स्वामीजींच्या जीवनातील अनेक विविध प्रसंगांनी आणि घटनांनी भरलेला आहे. त्याचे शब्दांकन अंगावर रोमांच उभे करणारे ठरले आहे. २० जून १८९९ ते ९ डिसेंबर १९०१ या कालखंडातील स्वामीजींनी पुन्हा एकदा पश्चिमेचा दौरा केला; परंतु या दौऱ्याचा हेतूच प्रकृतीस उतार पडावा हा होता. काही प्रमाणात स्वामीजींची प्रकृती सुधारलीही, त्यामुळेच बेलूर मठासाठी निधीसंकलन करून पाश्चात्त्य जगात सुरु झालेल्या कार्याचं मजबुतीकरण करण्यासाठीही त्यांना वेळ काढता आला. तिथल्या कामाचा व्यवस्थापन मार्गी लावता आलं, हेही महत्त्वाचं.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामीजींची अत्यंत दुर्मिळ आणि पूर्वी कधीही प्रसिद्ध न झालेली छायाचित्रे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈