.. “. आता समोरून त्या बाईक वर बसून गेलेली आमच्या मंदी सारखी वाटली!.. ती बाईक चालवणाऱ्याने जरा जास्तच स्पीड मधे माझ्या समोरून नेली ना!.. तिनं मला बघून तिकडं तोंडच फिरवलं!… थोडसा ओझरता चेहरा दिसला दोघांचा… कोण असावा बरं तो? दोघांनी डोक्याला हेल्मेट घातलं असल्याने नीट ओळखता आलं नाही… ती माझी मंदी होती का ? का आणि कुणी दुसरीच होती?… छे! छे! माझी मंदी असं छचोर वागणार नाहीच मुळी!… हं आता आठवलं त्या कर्णिकची शर्मिलाच असणार!… मला बऱ्याच वेळेला दिसलीय ना ती कुणा मित्रांच्या बरोबर हिंडताना… तिचं लक्ष नसायचं इतका मी तिच्या जवळून कितीतरी वेळा गेलोय… पण आपल्याला काय करायचं त्याबाबत… त्या कर्णिक जवळ काही बोलायची सोय नाहीच म्हणा… त्यांना तिचं हे असलं वागणं ठाऊकही असेल, कदाचित त्यांची संमती असेल तिला असं उंडगेपणा करायला… बाकी सोसायटीत उलटसुलट चर्चा काय कमी चालतात?… लोकांची कुठे तोंड बंद करता येतात का?… का म्हणून या पोरटीने आपला सुखाचा जीव धोक्यात टाकावा… चांगल्या कुटूंबातील मुलाशी लग्न करून कसा सुखाचा संसार करायचा सोडून… हेल मेट ची का अवदसा आठवतेय कुणास ठाऊक?… नशीब माझं मंदीवर चांगले संस्कार केले असल्याने आमच्या डोक्याला असला ताप नाही… आता घरी जाऊन आमच्या हिला हे सांगायला हवं.. या आर. टी. ओ. च्या आपली सुरक्षा आपल्या हाती या अभियानाचा हेल्मेट वापराचा सक्तीचा कायदा लागू केला त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांची ओळखच पटत नाही… आता हेच बघाना त्या मुलीने पण आमच्या मंदी सारखाच ड्रेस घातलाय कि.. मग मंदी तर नसेल… छे छे डोक्याचा पार भुगाच होऊन राहिलाय… “
“अगं मंदे काय तुझा बाप गं!… त्याच्या समोरून निघून पुढे आलो तर डोक्यात शंकेचं वारूळातला भुगा ऊकरत बसलाय… बघितलसं आपण दोघांनी हेल्मेट घातल्यामुळे तो कनफ्युज कसा झालाय… आज जर आपण हेल्मेट घातलं नसतं, तर आपल्या दोघांची चेकमेटच त्यांने केली असती.. लग्न गाठी स्वर्गात ठरतात ना त्याच्या ऐवजी. मग आपली हेल मेट नक्कीच ठरली असती.. “
☆ व्रतोपासना – ७. कोणत्याही ऋतूची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
जसे आपण काही व्रत कथा वाचल्या की, त्यात प्रथम लिहिलेले असते ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. ‘ त्याच प्रमाणे कोणती व्रते करावीत हे आपण बघत आहोत. ही व्रते जुनीच आहेत फक्त काळानुसार आपण त्यात थोडा बदल करुन अंमलात आणावे.
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर अशा सहा ऋतूंनी आपले संवत्सर पूर्ण होते. आणि हे ऋतूचक्र अव्याहत चालू असते. त्या मुळेच संपूर्ण जीवसृष्टीला, माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळतात. कधी कधी काही ऋतूंचा त्रास होऊ शकतो. पण तो काही जणांनाच होतो. काहींना ऋतू बदलाचा पण त्रास होतो. या बदलाच्या काळात काहींना आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. पण त्यात ऋतूंचा दोष नसतो. आपली प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. त्या नुसार आपल्याला त्रास होतात. पण आपण आहार, विहार, विश्रांती, यात ऋतू प्रमाणे बदल करुन कधी आवश्यक ती औषध योजना करुन हे त्रास, आजार नियंत्रित करु शकतो. परंतू या कोणत्याही ऋतूंची निंदा करणे योग्य नाही.
आपण निसर्गा कडे बघितले की निसर्ग प्रत्येक ऋतुशी कसे जमवून घेतो, पशुपक्षी कसे जमवून घेऊन राहतात हे समजते. आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे रहायचे हे शिकवतात. एक माणूसच असा आहे की आनंद शोधण्या पेक्षा दु:ख शोधत रहातो. आपल्याला जर कोणी आठवणी विचारल्या किंवा लिहायला सांगितल्या तर आनंदी प्रसंग फार कमी समोर येतात. आणि अवघड, दुःखाचे प्रसंग जास्त आठवतात. ही सवय जर आपण बदलू शकलो तर आपण कायम आनंदात राहू शकतो. हेच ऋतूंच्या विषयी करायचे. प्रत्येक ऋतुतील आनंद शोधायचा. आयुर्वेदिक औषधे देणाऱ्यांना या ऋतूंचे खूप महत्व असते. आपली संस्कृती, आपले सण समारंभ बघितले तर त्यात निसर्गाचेच पूजन दिसते. आपल्या पूर्वजांनी सगळे सण व त्यातील आहार, पूजा, व्रते त्या त्या ऋतू नुसार ठरवलेली होती. ऋतू बदलतात म्हणून तर आपल्याला विविध फळे, फुले यांचा आस्वाद घेता येतो. आणि अनेक प्रकारची धान्ये, भाज्या मिळतात. हा सर्व विचार करून विविधता देणाऱ्या ऋतूंचा सन्मान करु या. आणि या ऋतूंची निंदा बंद करु या.
(साधना त्यांना डायनिंग हॉल मध्ये घेऊन गेली. तो अतिशय सुंदर भव्य आणि उच्च अभिरुचीने सजवलेला एरिया बघून डोळे विस्फारले या तिघींचे.) – इथून पुढे
साधना म्हणाली, हवे ते मागवा ग. लाजू नका” मेन्यूकार्ड बघत बघत भली मोठी ऑर्डर दिली तिघीनी. रेणुका हे मजेत बघत होती. ऑर्डरने टेबल भरून गेलं. करा ग सुरुवात. ” साधना म्हणाली.
तिघी त्या डिशेसवर तुटून पडल्या.
“बास ग बाई आता. अगदी पोट फुटेपर्यंत खाल्लं. अंजू, आज मुलांना आणायला हवं होतं ना? त्यांनाही मिळालं असतं फाईव्ह स्टार मधलं जेवण. पण त्यांचे वेगळेच असतात प्रोग्रॅम. ती कुठली आपल्याबरोबर यायला? आता आईस्क्रीम खाऊया ना?”
साधनाने आईस्क्रीम मागवलं.
कला म्हणाली, ” साधना, अग सोळा हजार बिल? काय ग. किती हा खर्च. ”
माधुरी म्हणाली, ” हो मग. होणारच एवढा. फाईव्ह स्टार हॉटेल आहे हे. साधनाला काय कमी आहे? मस्त परदेशात जॉब करतेय. नवराही असेल भरपूर कमावत.
साधनाने काही न बोलता सही केली आणि बिल आपल्या अकाउंटवर टाकायला सांगितलं.
“साधना, थँक्स ग. आता पुढच्या वेळी आलीस की घरीच ये आमच्या. म्हणजे खूप गप्पा होतील.
येताना परदेशातून काही आणलं नाही का?”
साधना म्हणाली, ” छे ग. मला काय माहिती तुम्ही भेटाल? आणि मी इथे कॉन्फरन्ससाठी आलेय ना. ” शांतपणे साधना म्हणाली.
“ रेणुका, कारने आली आहेस ना? मग सोड की आम्हाला. तेवढीच टॅक्सी नको करायला. ”
रेणुका म्हणाली, “ नाही ग. मला विरुद्ध दिशेला जायचंय ना. नाहीतर नक्की सोडलं असतं. बाय बाय. ”
त्या तिघी निघून गेल्यावर रेणुका साधनाच्या जवळ बसली ”. गेल्या ना त्या? आता चल बस माझ्या गाडीत. ” साधनाला बोलू न देता रेणुकाने तिला आपल्या कारमध्ये बसवले. कार जुहूच्या रस्त्याला लागली.
सफाईने कार पार्क करत रेणुकाने साधनाला आपल्या दहाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये नेले. किती सुंदर आणि मोठा होता रेणुकाचा फ्लॅट. खूप सुंदर सजवलेला, उत्तम फर्निचर आणि अभिरुचीपूर्ण नीटनेटका ठेवलेला.
रेणुका म्हणाली “आरामात बस साधना. आता सगळं सांगते तुला. आपल्या चाळीतल्या खोल्या लागून लागूनच होत्या नाही? अम्मा अप्पा सुद्धा गरीबच ग. माझा भाऊ रवी खूप शिकला आणि परदेशी निघून गेला. मी मात्र झटून अभ्यास केला. एम ए केलं आणि नंतर आय ए एस सुद्धा झाले. मंत्रालयात मिनिस्टरची सेक्रेटरी आहे मी. माझे मिस्टर नागराजन एका मल्टिनॅशनल कंपनीत डायरेक्टर आहेत. एकुलता एक मुलगा आय आय टी रुरकी ला आहे. साधना, खूप झगडले मी इथपर्यंत यायला. सोपी नव्हती ग ही वाट. या एक्झाम्स देताना घाम फुटला मला. आणि नोकरी करून या यू पी एससी क्रॅक करणं सोपं का होतं? मी तिसऱ्या अटेम्प्टला चांगल्या मार्कानी यशस्वी झाले आणि ही ब्रँच निवडली. मग माझं लग्न झालं. अगदी साध्या गरीब कुटुंबातला होता नागराजन. पण त्याची जिद्द हुशारी वाखाणण्याजोगीच होती. दोन खोल्यातून इथपर्यंतचा हा प्रवास दोघानाही सोपा नाही गेला. आता अम्मा अप्पा नाहीत, पण लेकीचं सगळं वैभव बघूनच सुखाने डोळे मिटले त्यांनी. ” रेणुकाच्या डोळ्यात पाणी आलं.
“ आता तुझ्याबद्दल सांग ना मला साधना. ”
साधना म्हणाली, “ तुझ्याइतकं नाही झगडावं लागलं मला रेणुका, पण माझीही वाट सोपी नव्हतीच. एकटीने जर्मनीसारख्या देशात रहाणं सोपं नव्हतंच. पण ही वाट मी माझ्या हट्टाने स्वखुशीने निवडली होती ना? मग तक्रार कशी करू मी? माझी सगळ्याला तयारी होती. मध्ये नोकरी गेली तेव्हा मी हॉटेलात सुद्धा काम केलंय. सोपं नसतंच तिकडे बेकार राहणं ग… पण मग तिकडची पीएचडी मिळाल्यावर मला चांगला जॉब मिळाला. इथली पीएचडी असूनही मला तिकडचीही करावी लागलीच. तेव्हा फार हाल झाले माझे पण नंतर सगळं सुरळीत झालं. अभयसारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. आणि मुलंही गुणी आणि हुशार आहेत माझी. मुलगी डॉक्टर होतेय आणि मुलगा अजून कॉलेज करतोय… एका गोष्टीचं मला फार आश्चर्य वाटलं रेणुका. जेव्हा या कला माधुरी अंजू बघितल्या ना तेव्हा. ! मी मध्यमवर्ग समजू शकते. सगळे लोक कुठून ग डॉक्टर इंजिनीअर आणि तुझ्यासारखे ऑफिसर होणार? पण याही बऱ्या परिस्थितीत आहेतच की. पण काय ग ही वृत्ती. किती हा अधाशीपणा. मला गंमत वाटली, त्यांनी माझी एका शब्दानेही चौकशी केली नाही बघ.. की साधना तू तिकडे काय करतेस? मुलं किती आहेत? मिस्टर काय करतात?
मीच उत्साहाने म्हटलं की आपण तुमच्या कोणाच्या तरी घरी जमूया. तर माधुरीने ते चक्क टाळलेच.
फाईव्ह स्टार हॉटेलात मी उतरलेय म्हटल्यावर त्यांना तिथेच जेवण हवे होते. त्यांना त्यांच्या घरी मला बोलवायचे नव्हते. मी नावे का ठेवणार होते त्यांच्या घरांना ? मी जुन्या मैत्रीसाठी आसुसलेली होते ग ”. साधनाच्या डोळ्यात पाणी आलं.
रेणुका म्हणाली, “ हे असंच असतं ग साधना. मीही हे अनुभव घेतले आहेत यांचे. माझ्या घरी अनेकवेळा येऊन जेऊनखाऊन गेल्यात या तिघी. पण मी अजूनही यातील एकीचेही घर बघितलं नाहीये. सोड ग. आपण केलेले कष्ट दिसत नाहीत त्यांना. मी म्हणूनच लांबच असते यांच्यापासून. मला काय वाटतं साधना, हे लोक असेच रहाणार. डबक्यातले बेडूक. हेच कोतं विश्व त्यांचं… एव्हढसंच.. त्यांचं मनही मोठं नाही ग. हेवेदावेही आहेतच. आता बघ ना.. इतक्या वर्षांनी तू भेटलीस तर त्यांनी कौतुकाने घरी बोलवायला हवं होतं. किती आनंद झाला असता ना तुला. पण ते केलं नाही त्यांनी. वसुली केल्यासारखं अन्नावर तुटून पडल्या त्या. कधी बाहेरचं जग बघितलं नाही, आणि त्या डबक्यातून बाहेर पडायची इच्छाही नाही. जाऊ दे ग. माणसं अशीच असतात साधना. तू खूप दूर परदेशात रहातेस म्हणून तुला हे खटकलं. मला सवय झालीय या वृत्तीची… पण सांगू का.. मला माधुरीचा फोन आला तेव्हा मात्र खराखुरा आनंद झाला. मी तुला भेटायची संधी सोडणार नव्हते. खूप घट्ट मैत्रिणी होतो आपण. कितीतरी वेळा तुझ्या आईच्या हातचं सुग्रास जेवण जेवलेय मी. मोठ्या मनाचे ग आईभाऊ तुझे. पण बाकी काही असलं तरी माधुरीमुळे आपण इतक्या वर्षांनी भेटलो म्हणून तिचे आभारच मानले पाहिजेत.”
यावर दोघीही हसायला लागल्या. “ आता मात्र आपण कायम एकमेकींच्या संपर्कात राहूच. साधना, त्या अशा हावरटासारख्या वागल्या म्हणून मी तुझी क्षमा मागते. ”
” अगं काय हे रेणुका. क्षमा कसली मागतेस तू? वेडी आहेस का? ” साधनाने तिला जवळ ओढून घेतलं. “आता ही जुळून आलेली मैत्री कधीही सोडायची नाही. कबूल ना?”
रेणुका हसत ‘हो’ म्हणाली. आत गेली आणि एक सुंदर भरजरी कांजीवरम साडी तिच्या हातात देत म्हणाली ” ही मुकाट्याने घ्यायची. नेसायची. हे आपल्या नव्याने उजाळा मिळालेल्या मैत्रीचे प्रतिक म्हणून वापर तू. ”
… दोघीना हुंदका आवरला नाही.
“ रेणुका, तोंडदेखलं नाही पण अगदी मनापासून म्हणते, एकदा खरोखरच ये जर्मनीला. मैत्रिणीचा संसार तिचं घर बघायला. येशील ना? ”
“ अगं. नक्की येईन. आवडेल मलाही. ”
… पुन्हा रेणुकाला गच्च मिठी मारून आणि दोघींचे डोळे पुसून साधनाने रेणुकाचा हसत हसत निरोप घेतला.
☆ जे जे आपणासी ठावे… लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
|| जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे
शहाणे करून सोडावे सकल जन ||
…. समर्थ रामदासस्वामींच्या आज्ञेनुसार काही दिवसांपूर्वी, मी दिसेल त्याला, भेटेल त्याला शहाणं करून सोडायचं चंग बांधला होता.
तर एक्झॕक्टमधे झालं काय होतं, मला साधारण पंधरा दिवसांपूर्वी प्रचंड खोकल्याने झोडपलं होतं. अन् आमचा खोकला म्हणजे खानदानी, काही झालं तरी महिना भरल्याशिवाय नरडं सोडणार नाही. मी घरातली होती नव्हती तेवढी सगळी औषधं ढसाढसा ढोसली, तरी मेला जाईना. मग मी आमच्या डॉक्टरीणबाईकडं व्हिजिट दिली… एका व्हिजिटीत तो गेला नाही म्हणून आणखी दुसऱ्यांदा दिली. पण दळभद्री खोकला जळूसारखा चिकटूनच राहिला.
मी लागोपाठ तीन रात्री टक्क जागी होते. म्हणून चौथ्या रात्री मी माझ्या उशा-पायथ्याशी खोकल्याशी लढण्याची जंगी तयारी करून ठेवली. पाण्याची बाटली, एका वाटीत चाटण, दुसरीत खडीसाखर, तिसरीत दालचिनी, चौथीत लवंग आणि लागली तर चपटी (इथे औषधाच्या बाटलीस ‘चपटी’ असे उपनाम देण्यात आले आहे, वाचकांनी नसते गैरसमज करून माझे चारित्र्यहनन करण्याची व्यर्थ खटपट करू नये) इतका सगळा जामानिमा तयार ठेऊन मोबाईलवर खोकला पळवण्याचे आणखी बारा घरगुती जालीम उपायही नजरेखालून घालवत बसले होते.
उपाय वाचून दम लागला म्हणून हळूच यू टयूबवर गेले तर त्यांच्या शॉर्ट्स मधे एक बाई समोर आली, अन् तिने अॕक्युप्रेशरद्वारे खोकला बंद करायची क्लृप्ती दाखवली… तळहातावर तेल लावायचे, आणि अंगठ्याच्या खाली मसाज करायचा अन् तळहाताच्या मागचा एक पॉइंट दाबायचा. दोन्ही हातांवर याचा प्रयोग करायचा. मी ते हुबेहूब तसच्या तसं केलं, आणि आडवी झाले.
वाचकहो, मला एकदाही खsक करून सुध्दा खोकला आला नाही. तो गेला तो गेला तो गेलाच !
जन्मात पहिल्यांदा माझा खोकला चुटुकन् गेला होता.
मैं तो सारा दिन खुशी के मारे उडी मार मारके थक गयी भाईशाब !
मग नंतरच्या दिवशी आमच्या ताई खोकल्याने हैराण दिसल्या, मी त्यांना तो उपाय अगदी फुकटात सांगितला. वरून ती बाई देखील पाठवली. त्यांच्या हृदयात आशेचा काजवा लखलखला.
मग दूरच्या जवळच्या समस्त नातेवाईकांना फोनवर कळवून टाकलं. पुस्ती म्हणून त्या बाईलाही त्यांच्याकडे ढकलून दिलं.
मग आम्ही मधे नाही का वणवण भटकत होतो, त्यावेळी ज्या दुकानात साडी घेतली, तिथे मिनिटामिनिटाला खाॕsक खाॕsक करून साडी खरेदीत व्यक्त्यय आणणाऱ्या दुकानदारीण बाईला सुध्दा मी प्रात्यक्षिक दाखवलं अन् त्याबद्दल तिने साडीवर तब्बल तेवीस रुपयांची भरघोस सूट दिली.
वाटेत माझा मित्र त्याच्याच बायकोबरोबर भेटला अन् केवळ खोकल्यासाठी दवाखान्याची पायरी चढणार म्हटल्यावर तिथल्या तिथे मी त्यांची वाट अडवून त्या अॕक्युप्रेशरद्वारे स्पेशालिस्ट बाईला त्यांच्याकडे धाडून टाकलं. मी त्यांचे साधारण रुपये पाचशे खडेखडे वाचवल्याबद्दल त्यांनी पिशवीतलं एक संत्र देऊन माझे ओलेत्या डोळ्यांनी आभार मानले.
दररोज सकाळ-सकाळी मुलाच्या शाळेच्या निमित्ताने आमच्या सोसायटीची साफसफाई करणाऱ्या भैयाभाऊंना माझ्या दर्शनाचा लाभ होतो. मला बघून बरेचदा देखो ना भाभीsss असा सूर लावून ते आमच्या सोसायटीवाल्यांची कुरबुर सांगत असतात. अशाच एका शुभ्र सकाळी भैयाभाऊंना माझ्या समोर खोकल्याची ढास लागली अन् मी तिथल्या तिथे ऐसा तळहात लेनेका और तेल लेके दुसरे हातसे कैसे मळनेका वगैरे शिस्तीत समजावून सांगितलं…..
‘हा हा समज गया भाभीजी! जैसा तंबाखू मे चुना लगाता है वैसाच ना? ‘
किती पटकन त्याला क्लिक झालं अन् तोपर्यंत मी इतरांना घसा फुगेपर्यंत तासभर समजावून सांगत फिरत होते.
त्या कालावधीत मला जो भेटेल आणि खोकेल त्याला मी त्या बाईची थोरवी पटवून देत होते.
शेवटी नवरा वैतागून म्हणाला, बाssई तू नाक्यावर जाऊन उभी रहा भोsपू घेऊन!
मुलगी म्हणाली, मम्मी तू एक भाड्याची रिक्षा करून त्यात स्पीकर लावून गल्लीबोळातून मार्गदर्शन करत का फिरत नाहीस? जास्त टार्गेट अचीव्ह होईल तुझं!
पोरगा म्हणाला, गल्लीबोळात फिरायला पप्पाची बाईकच जास्त बरी पडेल!
परंतु नवऱ्याने स्पष्ट नकार दिल्याने ती योजना तिथल्यातिथे रद्द झाली.
तर समस्त जणांचा खोकला पळवून लावावा, या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मधल्या कालावधीत मी माझ्या तोंडाचा पार किस पडला.
मात्र आता माझ्याच गेलेल्या खोकल्याने परत यू टर्न मारलाय आणि चार दिवसांपासून मी त्या अदृश्य तंबाखूला चुना लावून तळहातावर चोळ चोळ चोळतीये. दोन्ही हातावर रगडून रगडून आणि त्याच्यामागचा पॉइंट दाबून दाबून त्यातून आता कळा मारायला लागल्यात तरी तो खोकला हाय तिथ्थच हाय.
शेवटी काल मीच डॉक्टरांची पायरी चढून आले वाचकहो!
त्यातून ते ‘सकल जन’ आता माझ्या नावाने बोंबटया मारत बसलेत. काहींनी तर त्या बाईला सुध्दा माझ्याकडे परत धाडून दिलं.
डिसअपॉइंटमेंटचा कहर झाला हो अगदी कहर…
लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ ‘विश्वमैत्री’ दिन अर्थात ‘मकर संक्रमण’… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
राम राम मंडळी !!
ईश्वर कृपेने आपण सर्वजण सकुशल असाल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला हा अक्षररूप तिळगुळ पाठवीत आहे.
” तिळगुळ घ्या गोड गोड बोला।”
पारंपारिक पद्धतीने मकरसंक्रांती साजरी करीत असताना आपण सर्वांना तिळगुळ देतो आणि त्यावेळी आपल्या तोंडात वरील उद्गार सहज येत असतात. हे नुसतं ऐकायलाही किती गोड वाटतं. आज सामाजिक प्रसार माध्यमांच्या काळात सुद्धा एका अर्थाने निर्जीव तिळगुळ आपण एकमेकांस पाठवतो आणि त्यात सुद्धा खरा तिळगुळ मिळाल्याचा, खाल्याचा आनंद मानतो. किती लोकविलक्षण आहे हे! हिंदू धर्म सोडला तर जगाच्या पाठीवरील आज अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या कोणत्याही धर्मात अशी परंपरा असल्याचे ऐकिवात नाही. काय कारण असेल याच्यामागे ? असे कोणाला सुचले नसेल की तशी बुद्धीच झाली नसेल ? हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. आता एखाद्याच्या मनात प्रश्न का यावेत याचे वस्तुनिष्ठ उत्तर देणे तसे अवघडच. वरील प्रश्नाचा विचार करताना असे जाणवले की केवळ आपला हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे. तो ‘भोगावर’ आधारित नाही तर ‘त्यागावर’ आधारित आहे. ज्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक वस्तू आपल्याजवळील प्रत्येक वस्तू दुसऱ्याला देण्यात समाधान मानते तसे हिंदू धर्म देखील देण्यात समाधान मानणारा, त्यागावर श्रद्धा ठेवणारा आहे. नुसता श्रद्धा ठेवणारा नाही तर तसे आचरण करणारा आहे.
“पेड हमे देते है छाया,
हवा नया जीवन देती है।
भूख मिटाने को हम सबकी,
धरती पर होती खेती है।।”
औरोंका भी हीत हो जिसमे
हम भी तो कुछ करना सिखे।”
मकरसंक्रातीचा सण साजरा करण्यास कधी सुरुवात झाली ? पहिला सण (संक्रांत ) कधी साजरी केली गेली याची नोंद इतिहासास ठाऊक नाही. अर्थात ही झाली पुस्तकी माहिती. पण आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदू धर्मात असे लिहून ठेवणे, त्याचे श्रेय (स्वामित्व) घेणे आणि ‘स्वामीत्वा’च्या जीवावर ज्ञान बंदिस्त ठेवणे अपेक्षित नसावे म्हणून तर आपल्याकडील विविध प्राचीन विश्वविद्यालयात ज्ञान निःशुल्क मिळत असे आणि ते सर्वांना सुलभ होते. इतिहासात असे वर्णन आहे की परदेशातून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात / विषयांत ज्ञान प्राप्त करण्यासाठी येत असत.
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रमण असे म्हटले जाते. सूर्य जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा कर्क संक्रमण अर्थात दक्षिणायन सुरु होते, तर मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरु होते. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. फार पूर्वी ही संक्रांत २३ डिसेंबर ला साजरी केली जायची. परंतु सूर्याच्या गतीचे गणित लक्षात घेता तर ७८ वर्षांनी ती एकेक दिवस पुढे जात ती आज १४ जानेवारी पर्यंत पुढे आली आहे. अशी हळूहळू ती पुढेच जात राहील. खगोल अभ्यासक असे म्हणतात की की ही संक्रांत काही शे वर्षांनी मार्च महिन्यात अर्थात ऐन उन्हाळ्यात येईल.
मकरसंक्राती आपल्याकडे साधारण तीन दिवस साजरी करण्यात येते. भोगी, संक्रांत आणि किक्रांत. संक्रांत ही देवी असून देवीने शंकासूर आणि किंकरासूर राक्षसांवर मिळविलेला विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. हीचे स्वरुप नेहमीप्रमाणे प्रसन्न, मंगलदायक नसून लांब ओठ, एक तोंड, दीर्घ नाक, नऊ बाहू असे आहे. थोडी अक्राळविक्राळ आहे. दरवर्षी हिचे वाहन, अस्त्र, शस्त्र, अवस्था, अलंकार वेगवेगळे असतात. आपले अलंकार आणि वस्त्र यातून ती भविष्यकाळ सुचवीत असते, असे मानले जाते. ‘संक्रांत आली’ अशी म्हण यामुळेच असावी असे म्हणता येईल.
दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो काळ थंडीचा असतो. त्यामुळे त्यावेळी तीळ आणि गूळ खाण्याची पद्धत आहे. तीळ हे थंड, स्निग्ध असतात तर गूळ उष्ण, बलवर्धक आहे. शरीर बळकट होण्यासाठी हे दोन्ही पदार्थ आवश्यक आहेत आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही पदार्थ सामान्य मनुष्यास सहज उपलब्ध आहेत. हा सण देशाच्या विविध भागात विविध नावाने साजरा केला जातो.
*आपल्याकडील कोणताही सण साजरा करण्याचे मुख्य प्रयोजन ‘सामाजिक बांधिलकी’ हेच असते. खास करुन रक्षाबंधन आणि मकरसंक्राती हे दोन सण विशेष करुन सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते. एका सणात भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसे कंकणच बांधून घेतले आहे. जर अगदी मनापासून आणि व्यापक बुद्धीने हे कंकण प्रत्येक भाऊ (पुरुष) आपल्या मनगटावर बांधेल तर प्रत्येक बहीण (स्त्री )निरंतर सुरक्षित राहील. तसेच मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ हे सूत्र समाजातील प्रत्येक घटक पाळेल तर सारा भारत एक क्षणात तंटामुक्त होईल.
आपल्याकडे सर्व आहे. ज्ञान, विज्ञान अगदी सर्व आहे. फक्त डोळसपणे त्याकडे बघण्याची गरज आहे, काळानुरूप सणांचे अर्थ लावून ते समजून घेण्याची, आचरणात आणण्याची गरज आहे. पूर्वी उद्योगांचा एकेक आदर्श नमुना आपल्याकडे होता. यास ‘स्वयंपूर्ण खेडी’ असे म्हटले जायचे. बारा बलुतेदार होते. ही बारा लोकं एकत्र येऊन एकदिलाने गावागाडा नुसती हाकत नव्हती तर कुटिरोद्योगाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत आपला सहभाग घेत होती. कोणी मोठा नव्हता आणि छोटा नव्हता. सर्व एकसमान होते. इंग्रज येईपर्यंत ही परंपरा टिकली. परंपरागत व्यवसाय असल्यामुळे कारागीर गुणवत्तावान, कुशल होते. १४ विद्या आणि ६४ कला जगाला अलंकृत करीत होत्या. परंतु हे पांढऱ्या पायाच्या इंग्रजांना रुचले नाही, त्यांनी कारागिरांचे अंगठे तोडले, हात तोडले, पाय तोडले नि देशी उद्योग नष्ट केले. बेकारी हा शाप इंग्रजांनी दिलेला आहे. त्यांनीच जातीपातींना उच्च नीच असा दर्जा दिला. इतक्या वर्षांच्या गुलामगिरीमूळे आपल्याला सुद्धा इंग्रज सांगून, लिहून गेले तेच खरे वाटते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ढाक्क्याची मलमल प्रसिद्ध होती. त्यावेळी तलम पातळाची ( साडीची) घडी काडेपेटीत राहत असे वर्णन खुद्द इंग्रजांनी केलेले आहे. आज पुन्हा याचे स्मरण करण्याची गरज आहे. जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे म्हटले जाते. त्यामुळे आपण आपला जाज्वल्य पराक्रमाचा आणि विजयाचा इतिहास न विसरता पुढील पिढीत संक्रमीत करण्याची गरज आहे. ती काळाची मागणी आहे असे मला वाटते. सर्व काही सरकार करेल ह्या भ्रमात आपण राहू नये यापेक्षा जे मी करु शकतो ते मीच करेन आणि अगदी आत्तापासून करेन असा संकल्प आपण सर्वांनी या संक्रांतीच्या निमित्ताने करुया. *
देवीने शंकासुर आणि किंकरासुरावर विजय मिळविला. आपण मनातील शंकाकुशंका, हेवेदावे, समजगैरसमज, अनिष्ट रूढी, वाईट चालीरीती, भेदाभेद यावर विजय मिळवून एकसंघ, समरस हिंदू समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करुया. आज दुष्ट शक्ति जाणीवपूर्वक हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. पण हिंदू विचार जा जोडणारा आहे. आणि दैनंदिन व्यवहारात तोडणाऱ्या पेक्षा जोडणाऱ्यालाच जास्त प्रतिष्ठा मिळते हे कोणीही विसरु नये. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे म्हणून किंवा अशी वाक्ये नुसाती तोंडपाठ करुन आता चालणार नाही तर हे सर्व कृतीत आणण्यासाठी आपण आज वचनबद्ध होऊया. माझे घर सोडून शेजारी, गावाच्या शेजारी असलेल्या माझ्या बंधूला मी तिळगूळ देईन आणि परस्परातील सुप्त रुपात असलेला स्नेह प्रगट करुन वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करेन असा निश्चय आपण सर्वांनी करुया आणि ‘विश्वमैत्री दिन’ साजरा करुया
☆ “बोलणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
“तिळगुळ घ्या गोड बोला”
असं दर संक्रांतीला आपण म्हणतो. पण या म्हणण्यामागे फक्त औपचारिकता असते. खरंच आपण गोड बोलण्याचा किती प्रयत्न करतो ? ते जमत नसेल तर त्यासाठी आपलं बोलणं सुधारावं यासाठी खरच काही प्रयत्न करतो का? त्यासाठी आपण खरंच काही एक्झरसाइज करतो का? मागच्या वर्षीच्या माझ्या बोलण्यापेक्षा या वर्षीच्या बोलण्यामध्ये अधिक गोडवा आहे असं आपल्याला जाणवतं का? त्या जाणवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करतो का? हे सगळे प्रश्न मला पडत होतेच, परंतु आज ही एक पोस्ट कुणीतरी फॉरवर्ड केली. माहित नाही कोणी लिहिली पण ती खरोखरच बोलकी आहे वाचा तर —-
– – –
‘बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे.
आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे.
तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्या बद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत!
हे इतके महत्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.
‘आहे हे असं आहे’,
‘माझा आवाजच मोठा आहे’
‘मला अशीच सवय आहे’
असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो. 🤨
बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर. ‘कौन बनेगा करोडपती’ मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ – उतार शिकायचं असेल, तर हा आवाज अभ्यासायलाच हवा, आवाजाची, बोलण्याची साधना तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन!
काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही हे हळूहळू कळत जातं.
शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो. बोलण्याचा आवाज हा आतून येतो! माणसाच्या चेतनेला स्पर्श करून! त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.
आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.
एक प्रयोग केला होता. सुंदर शब्दांची यादी दररोज वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती… अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल, तशी मोठ्याने वाचायची.
वाढवत जायचे हे शब्द.
हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते. आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे.
शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!
सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.
वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात.
नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते.
यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचे ठरते.
कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता – ऐकता आली पाहिजेत.
या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती (Time is Money) असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?
फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.
आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.
बोलणं म्हणजे,
निव्वळ शब्द थोडीच असतात?
न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं.
वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसांमाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते.
मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात,
पण
त्याआधी कसं बोलायचं,
ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.
बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.
तात्पर्य : ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस अशक्य गोष्टी शक्य होतात…. 🙏
(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं। आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना “अंतिम सम्मान: समय से परे ज्ञान की कहानी”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 36 – “अंतिम सम्मान: समय से परे ज्ञान की कहानी” ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’☆
(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)
बुढ़ापा क्या है? एक ऐसा संतत्व जो बिना पूजा, बिना माला, और बिना शांति के थमा दिया जाता है। और इसके साथ मिलता है एक गिफ्ट पैक—उम्मीदों का, तानों का और एक अजीब सा सम्मान जो तंग करता है। ऐसे ही हमारे नायक, 82 साल के जगन्नाथ शर्मा, कानपुर वाले, इस अनचाहे संतत्व के शिकार बन गए।
जगन्नाथ जी का जीवन एक पुरानी लकड़ी की कुर्सी पर बीतता था—उनका राजसिंहासन। उनका साम्राज्य? एक दो कमरे का फ्लैट, जहां तीन पीढ़ियां एक साथ रहती थीं, लेकिन किसी को उनसे मतलब नहीं था। “दादा जी तो घर का फर्नीचर हैं,” ये सबने मान लिया था।
“बुजुर्गों को सबसे अच्छा तोहफा क्या दे सकते हो? अपनी गैर-मौजूदगी,” उनका पोता, केशव, अक्सर कहा करता था। वो यह कहता हुआ अपने फोन पर ऐसे व्यस्त रहता जैसे प्रधानमंत्री कार्यालय से सीधा आदेश आ रहा हो। “बुजुर्ग तो पूजनीय होते हैं, लेकिन नेटफ्लिक्स भी तो ज़रूरी है,” केशव ने अपना तर्क पूरा किया।
जगन्नाथ जी की कहानी अनोखी नहीं थी। ये एक ऐसा राष्ट्रीय खजाना है जिसे हम सब छुपा कर रखते हैं। जहाँ वेद कहते हैं कि बुजुर्ग भगवान के समान होते हैं, वहीँ आधुनिक परिवार उनकी पूजा योग की तरह करते हैं—कभी-कभार और इंस्टाग्राम पर दिखाने के लिए। उनके बेटे प्रकाश शर्मा, जो ‘पारिवारिक मूल्यों’ पर बड़े-बड़े भाषण देते थे, ने अपने पिता को बचा हुआ खाना और बेपरवाही के साथ जीवन जीने की परंपरा दी थी। “पापा, आदर दिल से होता है, कामों से नहीं। और मेरा दिल साफ है,” प्रकाश ने कहा।
भारतीय संस्कृति संयुक्त परिवारों पर गर्व करती है। ये गर्व अक्सर शादी में भाषणों के रूप में दिखता है, जबकि दादा-दादी को बच्चों के साथ छोड़ दिया जाता है जो उन्हें चलती-फिरती मूर्ति समझते हैं। “दादा जी ताजमहल की तरह हैं,” केशव की छोटी बहन रिया ने कहा। “खूबसूरत, लेकिन दूर से देखने में ही अच्छे लगते हैं।”
एक दिन परिवार ने “वृद्ध दिवस” मनाने की योजना बनाई। योजना क्या थी? जगन्नाथ जी की सलाह को अनसुना करना, उन्हें मसालेदार खाना खिलाना जो उनके पेट के लिए ज़हर था, और सोशल मीडिया पर दिल छू लेने वाले कैप्शन डालना। “हैशटैग ग्रैटीट्यूड,” रिया ने लिखा, जगन्नाथ जी की एक फोटो के साथ जिसमें वो एक प्लेट छोले को देखते हुए उलझन में थे।
प्रकाश ने “त्याग” पर भाषण दिया, लेकिन उस त्याग का ज़िक्र नहीं किया जब उन्होंने जगन्नाथ जी की पुश्तैनी ज़मीन बेच दी थी। “परिवार ही सब कुछ है,” प्रकाश ने जोड़ा, वकील का मैसेज इग्नोर करते हुए जो उनके पिता की पेंशन के केस के बारे में था।
पड़ोसी भी आए। “बुजुर्ग अनमोल होते हैं,” गुप्ता जी ने कहा, जो खुद अपने पिता को वृद्धाश्रम भेजने की गूगल सर्च कर रहे थे। “उनकी बुद्धि तो अनमोल है,” गुप्ता आंटी ने जोड़ा, जो जगन्नाथ जी को पार्क की बेंच से हटाने की शिकायत कर चुकी थीं।
दिन के अंत में, उन्होंने एक तोहफा दिया—ब्लूटूथ हियरिंग ऐड। “तकनीक सब कुछ आसान कर देती है,” केशव ने कहा, जब उनके दादा उसे चालू करने की कोशिश में लगे हुए थे।
सब्र का बांध तब टूटा जब उन्होंने एक केक लाया—जो लाठी के आकार का था। “दादा जी, काटिए!” रिया ने खुशी-खुशी कहा। “क्या शानदार लमहा है,” गुप्ता आंटी ने कहा, केक के साथ सेल्फी लेते हुए, जिसमें उन्होंने जगन्नाथ जी को क्रॉप कर दिया।
जगन्नाथ जी उठ खड़े हुए, ये अपने आप में एक चमत्कार था। “बस बहुत हुआ!” वे चिड़चिड़े हो उठे। “आप लोग मेरा सम्मान वैसे ही करते हैं जैसे ट्रैफिक सिग्नल का—सिर्फ तब, जब पुलिस वाला देख रहा हो!”
परिवार स्तब्ध था। दादा जी ने शायद पहली बार अपने मन की बात कही थी। “आप लोग कहते हैं मैं समझदार हूं, लेकिन रिमोट तक देने में विश्वास नहीं रखते।”
जगन्नाथ जी की ये बातें पड़ोस के व्हाट्सएप ग्रुप पर वायरल हो गईं। उनका नाम पड़ गया—”विप्लवी दादा”। “सच्चे इंसान हैं,” गुप्ता जी ने लिखा, और फिर ग्रुप म्यूट कर दिया। प्रकाश ने अपनी लिंक्डइन प्रोफाइल पर जोड़ लिया, “महापुरुष का बेटा।”
जगन्नाथ जी को आखिरकार शांति अकेलेपन में मिली। “बुढ़ापा एक तोहफा है,” उन्होंने कहा। “लेकिन इस परिवार में, ये बस री-गिफ्टिंग जैसा है।”
और इस तरह, जगन्नाथ शर्मा की कहानी हमें याद दिलाती है कि आदर, चाय की तरह है—गर्म और बिना बनावट के होना चाहिए। लेकिन भारत में बुढ़ापा? वो हमेशा एक आशीर्वाद और एक मजाक के बीच झूलता रहेगा।
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “मेलजोल का प्रतीक : मकर संक्रांति पर्व……”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख # 228 ☆ मेलजोल का प्रतीक : मकर संक्रांति पर्व… ☆
सूर्य का एक राशि से दूसरी राशि में संक्रमण संक्रांति कहलाता है । 14 जनवरी को सूर्य उत्तरायण होकर मकर राशि में प्रवेश करते हैं इसलिए ये और भी खास होता है । सनातनी सभी लोग तीर्थ स्थानों में जाकर वहाँ नदियों में श्रद्धा पूर्वक डुबकी लगाते हैं । दान पुण्य करके प्रसन्नता का भाव रखते हुए तिल -गुड़ व खिचड़ी का सेवन करते हैं।
प्रयागराज महाकुंभ का मेला आस्था, भक्ति, श्रद्धा , विश्वास , साधना, शक्ति व सम्पूर्ण समर्पण का प्रतीक है । आइए प्रेम से कहें…
☆
तिल गुड़ के लड्डू खायेंगे, पर्व संक्रांति का मनायेंगे ।
झूमेंगे संग गुनगुनायेंगे, कुंभ मेले में हम तो जायेंगे ।।
*
तिल – तिल कर न जले कोई, राह ऐसी नयी बनायेंगे ।
गीत खुशियों भरे जहाँ होवें, गम के बादल को मिल ढहायेंगे ।।
*
सजा है आसमाँ पतंगों से, नेह के रंग सब उड़ायेंगे ।
पेंच पड़ते हुए गजब देखो, डोर मिल प्रीत की बढ़ायेंगे ।।
*
दृश्य क्या खूब हुआ मौसम का, संगम में डुबकियाँ लगायेंगे ।
श्रद्धा से भोग चढ़ा आयेंगे, पर्व संक्रांति का मनायेंगे ।।