सुश्री आरूशी दाते
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी मनोरंजन…. सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं. सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। मनोरंजन के कई साधन हैं जैसे सिनेमा, नाटक, संगीत, नृत्य, बागवानी, समाजसेवा, टी वी देखना, शिक्षा का प्रचार करना, व्यंजन बनाना, पठन-पाठन, साहित्य निर्माण, लेखन, वाचन, मनन, भजन, कीर्तन, योगा, गपशप, पर्वतारोहण आदि. सुश्री आरुशी जी का विमर्श अत्यंत सहज है. प्रत्येक व्यक्ति के मनोरंजन का तरीका अपना और विविध होता है. सार यह है कि मनोरंजन वही होना चाहिए जिससे मन को शान्ति मिले और हमें अपने दैनंदिन कार्यों के लिए ऊर्जा मिले. शायद छुट्टियां भी तो इसीलिए दी जाती हैं. सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं। उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #22 ☆
☆ मनोरंजन… ☆
खूप सोप्पा विषय आहे नाही?
टी वी लावला की मनोरंजन तयार आहेच की… त्यात काय आहे विशेष…?
डोक्याला ताप होणार नाही असं काहीही मनोरंजन ह्या कॅटेगरीमध्ये येईल का?
साधं मनोरंजन हवंय, मग हे प्रश्न कशाला? आयुष्यातील प्रश्नांपासून थोडा वेळ का होईना दूर जाण्यासाठी मनोरंजनाकडे वळायचं तर गहन प्रश्न कशाला आता?
खरंय,, ह्या धावपळीच्या जीवनात दोन क्षण आरामात घालवावे ही इच्छा साहजिक आहे… सर्व समस्यांचा विसर पडला पाहिजे, असं मनोरंजन हवं.. निखळ आनंद मिळावा हीच अपेक्षा असते.. ह्या आनंदातच आयुष्यातील जोश वाढला पहाणे असं माझं मत आहे.. मनोरंजनाचे मार्ग प्रत्येकाचे वेगळे असतील, सिनेमा, नाटक, संगीत, नृत्य, बागकाम, समाजसेवा, tv पाहणे, शिक्षणाचा प्रचार करणे, स्वयंपाक करणे, पोहणे, पळणे, साहित्य निर्मिती, लेखन, वाचन, मनन, भजन, कीर्तन, योगा, गप्पा, गिर्यारोहण, असे अनेक पर्याय आहेत…
आपल्याला आवडेल, रुचेल, झेपेल त्यानुसार प्रत्येकजण हा मार्ग स्वीकारतो… आणि त्यात रमतो, जगतो… त्यामुळे एक मोठ्ठा फायदा होतो असं मला वाटतं. मनोरंजरूपी बदलामुळे, मन रिलॅक्स, रिफ्रेश झालं की आपसूकच माणूस आपले काम नवीन उत्साहाने, जोशाने, जिद्दीने करू शकतो. माणूस म्हणून जगायला शिकतो, भेदभाव विसरून फक्त करमणूक करता करता प्रगल्भ होतो. हा विचार मनात पक्का असावा म्हणजे मनोरंजनातून दाम दुपटीने फायदा होईल.
© आरुशी दाते, पुणे