ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

विष्णुदास भावे

विष्णुदास अमृत भावे (9ऑगस्ट 1819 – 9 ऑगस्ट 1901)हे आद्य मराठी नाटककार होते.त्यांना मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जाते. त्यांचा उल्लेख ‘महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी’असा होतो.

त्यांचा जन्म सांगली येथे झाला.त्यांचे वडील अमृतराव भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्याकडे नोकरीला होते.

विष्णुदास अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करू शकणाऱ्या असंख्य लाकडी बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. त्या वापरून ते ‘सीतास्वयंवर’ हे नाटक करणार होते. परंतु तत्पूर्वी कर्नाटकातील भागवत मंडळींप्रमाणे कीर्तनी खेळ रचण्याची आज्ञा सांगलीचे राजे पटवर्धन यांनी त्यांना दिली व 1843 साली भावेंनी ‘सीतास्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले.

पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून भावेंनी अनेक ठिकाणी अनेक नाटकांचे प्रयोग केले.

1853मध्ये त्यांनी मुंबईला ‘इंद्रजितवध’चा पहिला नाट्यप्रयोग केला. त्यांनी ‘इंद्रजितवध’, ‘राजा गोपीचंद’, ‘सीतास्वयंवर’ वगैरे नाटकांचे अनेक प्रयोग केले. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले होते. ‘सीतास्वयंवर’ या नाटकात त्यांनी गीतलेखनही केले होते.’राजा गोपीचंद’ या नाटकाचे हिंदी प्रयोगही त्यांनी केले होते.

विष्णुदास भावेंनी बनवलेल्या लाकडी बाहुल्या पुढे रामदास पाध्येंच्या हातात आल्या. त्यांनी  पत्नी अपर्णा पाध्येंच्या सहकार्याने खूप अभ्यास करून त्याच बाहुल्या वापरून ‘सीतास्वयंवर’चा प्रयोग केला.

भावेंवरील चनुलाल दुबे यांच्या पुस्तकाचा ‘हिंदी आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे’ हा मराठी अनुवाद व्यंकटेश कोटबागे यांनी केला.

☆☆☆☆☆

वामन शिवराम आपटे

वामन शिवराम आपटे (1858 – 9 ऑगस्ट 1892) हे कोशकार होते.

आपटेंचा जन्म सावंतवाडीजवळील एका खेड्यात समृद्ध परिवारात झाला.ते लहान असतानाच त्यांचे आई-वडील स्वर्गवासी झाले.

त्यांची बुद्धिमत्ता ओळखून त्यांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना केलेल्या मदतीमुळे त्यांचे शालेय जीवन सुरळीत पार पडले.90%पेक्षाही जास्त गुण मिळवून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. केले. त्यावेळी त्यांना भाऊ दाजी संस्कृत पुरस्कार मिळाला. नंतर गणित घेऊन प्रथम श्रेणीत एम.ए. केले व भगवानदास  शिष्यवृत्ती मिळवली.

त्यानंतर उत्तम सरकारी नोकरीचा मोह टाळून ते लोकमान्य टिळक, चिपळूणकर, आगरकर

यांच्यासमवेत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापक व व्यवस्थापक म्हणून काम करू लागले.

पुढे ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.

‘द स्टुडंट्स इंग्लिश – संस्कृत डिक्शनरी’, ‘द स्टुडंट्स संस्कृत -इंग्लिश डिक्शनरी’, ‘संस्कृत – हिंदी कोश’, ‘स्टुडंट्स गाईड टू संस्कृत कॉम्पोझिशन’, ‘द स्टुडंट्स हँडबुक ऑफ प्रोग्रेसिव्ह एक्सरसाईझेस (भाग 1 व 2) इत्यादी पुस्तके जगभरात मान्यताप्राप्त आहेत.

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ ऑगस्ट – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

भीमराव गस्ती (इ.स. १९५० – ८ ऑगस्ट २०१७.)

भीमराव गस्ती यांचा जन्म यमनापूर – बेळगाव इथे झाला. देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते साहित्यिक होते, त्याचप्रमाणे जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेही होते. बेरड समाजाच्या व्यथा-वेदना आणि त्यांच्या होणार्याम छ्ळाचे चित्रण त्यांनी आपल्या ‘बेरड’ या आत्मचरित्रात केले आहे. या आत्मचरित्राने साहित्य क्षेत्रात खळबळ उडवून दिली.

भीमराव गस्ती यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण यमनापूर इथे झालं. पुढे एम. एस्सी इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी त्यांनी मिळवली. त्यानंतर रशियाची राजधानी मास्कोयेथील पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेट संपादन केली. हैद्राबादयेथील रिसर्च अॅंीड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमधे त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरी मिळाली.

एकदा एका दरोड्यासंदर्भात पोलिसांनी बेरड समाजाच्या २० निरपराध लोकांना अटक केली व त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाविरुद्ध गस्तींनी  न्यायालयात झुंज दिली. मोर्चे काढले. आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदलले. त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी निपाणी येथे देवदासींच्या  १८० मुलींसाठी  वसतिगृह सुरू केले. तिथे देवदासींच्या मुली शिकून शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झाल्या. सामाजिक प्रबोधनाची चळवळ त्यांनी सुरू केली. शेकडो देवदासींचे विवाह लावून दिले. बेरड, रामोशी समाजाच्या विकासासाठी यमनापूर येथे ‘उत्थान’ ही संस्था सुरू केली. भटके, विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्ष उपाध्यक्ष होते.    

भीमराव गस्ती यांची पुस्तके

१. *बेरड (आत्मचरित्र), 2. आक्रोश, 3. सांजवारा

*या पुस्तकाला  महाराष्ट्र राजी पुरस्कारासह आणखी ७ पुरस्कार मिळाले आहेत. 

भीमराव गस्ती यांना मिळालेले काही पुरस्कार, सन्मान

१ अरुण लिमये पुरस्कार

२ कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार

३ गोदावरी गौरव पुरस्कार

४ पंचगंगा सहकारी साखर कारखाना पुरस्कार

५ मुंबाई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी. मर्ढेकर पुरस्कार

६ रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार

९व्या समरसता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने, साहित्य सेवा आणि समाजसेवेच्या त्यांच्या कार्याला प्रणाम. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुमति क्षेत्रमाडे

सुमति क्षेत्रमाडे या विख्यात कादंबरीकार. त्यांनी अनेक कादंबर्यास व कथा लिहिल्या. त्या अतिशय लोकप्रियही झाल्या. त्यांच्या काही कादंबर्यांावर चित्रपट निघाले. महाश्वेता कादंबरीवर त्याच नावाची टी.व्ही. मालिका झाली, तर ‘युगंधरा’ कादंबरीवर ‘माझिया माहेरा’ ही मालिका झाली.    

त्यांचा जन्म ७ मार्च १९१३चा. त्यांनी वैद्यकीय शिक्षण मुंबईमधे घेतले. नंतर यातील उच्च शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. वैद्यकीय व्यवसाय त्यांनी कोल्हापूरला केला. त्यांची पहिली कादंबरी ‘आधार’ ही दवाखान्याती वातावरणावर आधारित आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच गुजराती भाषेतही विपुल लेखन केले आहे.

सुमति क्षेत्रमाडे यांची विशेष गाजलेली कादंबरी म्हणजे ‘युगंधरा’. यात स्त्रीची अनेक रूपे दाखवली आहेत. त्यांनी सुरूवातीला छंद म्हणून लिहायला सुरुवात केली पण छंद जोपासताना विपुल साहित्यनिर्मिती झाली. मानवी वर्तनाचे सूक्ष्म निरीक्षण, अचूक ज्ञान  आणि संवेदनाशील मन या गोष्टी त्यांच्या कादंबर्यासतून दिसून येतात. त्या शाळेत असल्यापासून लेखन करत होत्या. प्रेम हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. तत्कालीन राजस्त्रिया आणि आणि अन्य स्त्रिया यांना समाजात, कुटुंबात मिळणारी दुय्यम वागणूक यावर त्यांनी प्रभावीपणे लेखन केले आहे.

सुमति क्षेत्रमाडे यांच्या काही कादंबर्याा –

पांचाली, नाल-दमयंती, मखमली बटवा, चतुरा, अग्नीदिव्य, बाभळीचे काटे, पुनर्जन्म , बंदिनी सत्यप्रिय गांधारी, याज्ञसेनी इ. ४८ कादंबर्याम त्यांनी लिहिल्या.

सुमति क्षेत्रमाडे यांचे ८२ व्या वर्षी ८ ऑगस्ट १९९८ मधे निधन झाले.

 आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ७ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

संस्कृतपंडित व लेखक श्री. बाळशास्त्री हुपरीकर यांचा आज स्मृतिदिन . ( मृत्यू दि. ७/८/१९२४.) 

हे कोल्हापूर महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक होते. त्याचबरोबर, वेदान्तशास्त्राचे, तसेच, ज्ञानदेव आणि शंकराचार्य यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक आणि भाष्यकार अशीही त्यांची ओळख होती. 

त्यांनी लिहिलेले विविध ग्रंथ पुढीलप्रमाणे —– 

१) श्री अनुभवामृत पर्यबोधिनी टीका. 

२) ( हर्बर्ट स्पेन्सरसाहेबांची ) अज्ञेय मीमांसा व आर्य वेदांत.  

३) ग्रंथमाला. 

४) श्रीमद्भगवद्गीता अथवा ज्ञानयोग शास्त्र. —- हा ग्रंथ करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी गौरवलेला होता. 

५) विद्यारण्य व ज्ञानेश्वर यांच्या दृष्टीने वेदातील मतांचे तात्पर्य. 

श्री. हुपरीकर यांच्याविषयी आणखी एक महत्वाचे सांगायचे ते असे की, लो. टिळक यांनी लिहिलेल्या “ गीतारहस्य “ या गाजलेल्या ग्रंथावर त्यावेळच्या ज्या काही मान्यवरांनी जाहीरपणे टीकात्मक ( जरा कडवट ) भाष्य केले होते, त्यामध्ये श्री. हुपरीकर यांचाही समावेश होता. 

श्री. बाळशास्त्री हुपरीकर यांना विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ६ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

दत्तात्रय पांडुरंग खांबेटे

द. पां. खांबेटे यांनी मराठी साहित्यात वेगळ्या प्रकारचे म्हणजे युद्धकथा, हेरकथा, विज्ञान काल्पनिका, परमाणूशास्त्र यासह अध्यात्म आणि भविष्य या विषयांवर लेखन केले आहे. शिवाय अनेक वर्षे ते हंस, मोहिनी व नवल या मासिकांत नियमितपणे दरमहा लेखन करत होते.

सोमाजी गोमाजी कापसे, भाऊ हर्णेकर, रमाकांत वालावलकर, मुमुक्षू, ज्ञानभिक्षू, के. दत्त, प्रज्ञानंद, अवधूत आंजर्लेकर ही त्यांची लेखनातील टोपणनावे.

निवडक साहित्य:

आटप, अरे आटप लवकर-रहस्यकथा

माझं नाव रमाकांत वालावलकर.

दहा निळे पुरूष. . विज्ञान काल्पनिक

चंद्रावरचा खून. . गूढ कथा

न्यूनगंड. . . मानसशास्त्र

वयाच्या 71 व्या वर्षी 1983 मध्ये त्यांचे निधन झाले.🙏

☆☆☆☆☆

महमहोपाध्याय डाॅ. ब्रह्मानंद देशपांडे

डाॅ. ब्रह्मानंद देशपांडे हे प्रसिद्ध वक्ते, इतिहास संशोधक व महानुभाव पंथाचे अभ्यासक होते. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत,गुजराती, कन्नड, बंगाली, उर्दू, बुंदेलखंडी व छत्तीसगढी अशा दहा भाषा येत होत्या. शिवाय ब्राह्मि, फारसी आणि मोडी लिपीचे ते तज्ञ होते.

महानुभाव या मासिकाचे ते कार्यकारी संपादक होते. त्यांचे दिडशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आकाशवाणीवर अनेक रूपके, परीक्षणे सादर केली आहेत. महानुभाव व जैन साहित्याचे ते अभ्यासक होते.

त्यांचे चौतिसहून अधिक संशोधनपर ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी काही असे:

इये नाथांचिये नगरी, चक्रपाणी चिंतन, देवगिरीचे यादव, रत्नमाला स्तोत्र, शब्दवेध, सप्तपर्णी, लिळाचरित्र  एकांक इत्यादी.

प्राप्त सन्मान :

18वी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, श्रीगोंदे चे अध्यक्ष.

‘देवगिरीचे यादव’ ला महा. राज्याचे उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार

‘रत्नमाला स्तोत्र’ ला महानुभाव विश्वभारती पुरस्कार

दिवाकर रावते भूमिपूत्र पुरस्कार

संत साहित्य संशोधन पुरस्कार

उत्तर भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे त्यांना महामहोपाध्याय ही पदवी प्रदान करण्यात आली होती.

वयाच्या 73व्या वर्षी 2013 मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. 🙏

☆☆☆☆☆

कृष्णशास्त्री राजवाडे

कृष्णशास्त्री हे साहित्य व अलंकारशास्त्र ह्या विषयांचे अभ्यासक व अध्यापक होते. ब्रिटिश काळात त्यांची शिक्षण खात्याच्या भाषांतर विभागात नेमणूक झाली. (1856). अलंकारविवेक हा त्यांचा उल्लेखनिय ग्रंथ. यात संस्कृतातील अलंकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. मराठी रचनांच्या संदर्भासह व उदाहरणांसह हा ग्रंथ असल्यामुळे संस्कृत साहित्य मराठीत आणण्याचा हा पहिला प्रयत्न ठरतो.

त्यांनी मालतीमाधव, मुद्राराक्षस, शाकुंतल, महावीरचरित या नाटकांचे मराठी अनुवाद केले आहेत. ऋतुवर्णन आणि उत्सवप्रकाश ही काव्ये रचली आहेत.

पुणे येथे 1885 साली भरलेल्या दुस-या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

1820 ते 1901 हा त्यांचा कालखंड. वयाच्या 81 व्या वर्षी ते पुणे येथे निवर्तले.🙏

☆☆☆☆☆

लक्ष्मण लोंढे

मराठी साहित्यात विज्ञान कथा लेखन करण्-या लेखकांतील आघाडीचे लेखक !

वयाच्या 50 व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्विकारून पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनासाठी दिला.

‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात त्यांची दुसरा आईनस्टाईन ही कथा इंग्रजीत प्रसिद्ध झाली. या कथेला जागतिक सर्वोत्कृष्ट कथा हा पुरस्कार कन्सास विद्यापिठाकडून मिळाला. जगातील निवडक विज्ञान कथांमध्येही या कथेची निवड झाली. मराठी लेखकाला हा सन्मान प्रथमच मिळाला होता.

लक्ष्मण लोंढे यांचे प्रकाशित साहित्य:

अस घडली नाही. . . कादंबरी

आणि वसंत पुन्हा बहरला

कारकीर्द

काउंट डाऊन

गुंता

थॅक यू मि. फॅरेड

दुसरा आईनस्टाईन

धर्मयोद्धा, लक्ष्मण उवाच, लक्ष्मण झुला, वाळूचे गाणे इत्यादी

प्राप्त पुरस्कार: शांताराम कथा पुरस्कार

लक्ष्मण लोंढे यांचे 2015 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले.

मराठी साहित्यात वेगवेगळ्या प्रकारचे लेखन व संशोधन केलेल्या या चारही साहित्यिकांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या कार्यास व स्मृतीस नम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, मराठी विश्वकोश, विकीवॅन्ड.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ४ ऑगस्ट – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शरदिनी डहाणूकर (१९४५- ४ऑगस्ट २०१२)

शरदिनी डहाणूकर या भिकू पै घुंगट यांच्या कन्या. ते मुंबईला प्रख्यात डॉक्टर होते. शरदिनी यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. १९६९ मधे त्या एम.बी.बी.एस. झाल्या. अमेरिकेत राहून त्यांनी जननांग वैद्यक  आणि प्रसूतिशास्त्रात उमेदवारी केली. औषधी शास्त्रात त्यांनी एम. डी. केले .भारतीय आयुर्वेदिक शास्त्रात आणि वनस्पती शास्त्रात त्यांना खूप रस होता. भारतात आल्यावर त्यांनी वेणी माधवशास्त्री जोशी यांच्याकडे आयुर्वेदाचे ५ वर्षे शिक्षण घेतले. त्या आधारे त्यांनी आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आणि त्यांचा औषधोपचरात होणारा उपयोग यांच्याकडे आधुनिक अॅुलोपॅथिक नजरेने पहाण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग प्रस्थापित केला.

मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात त्यांच्या प्रयत्नाने आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू झाले. त्यांच्या संशोधनाने, भारतात अस्तीत्वात असलेल्या परंपरागत वैद्यकीय ज्ञानाचा, आधुनिक कसोट्यांवर पडताळा घेता आला. या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

शरदिनी डहाणूकर आणि उर्मिला थत्ते यांनी मिळून औषधी व वनस्पती शास्त्रावरची अनेक पुस्तके लिहिली.  शरदिनीताईंचे लेखन मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषातून झालेले आहे. वृक्ष, फुले आणि वंनस्पतींवरची त्यांची अनेक मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

शरदिनी डहाणूकर यांची काही मराठी पुस्तके. –

१.    औषधे आणि आपण, २.पांचालीची थाळी, ३.फुलवा, ४. मानस्मरणीचे मणी, ५. सगे सांगाती, ६. वृक्षगान, ७. हिरवाई.

आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

लेखिका , प्राध्यापिका आणि समीक्षिका म्हणून ख्यातनाम असलेल्या श्रीमती सरोजिनी वैद्य यांचा आज स्मृतीदिन . ( १६/६/१९३३ — ३/८/२००७ ) 

ललित लेखन, चरित्रलेखन, आणि समीक्षा, हे साहित्यप्रकार अधिकतर हाताळणाऱ्या सरोजिनीताई यांनी आधी स. प. कॉलेज, पुणे इथे, पुढे रुईया कॉलेज, मुंबई इथे आणि नंतर मुंबई विद्यापीठात अध्यापक, अधिव्याख्याता, आणि मराठी विभाग-प्रमुख म्हणून एकूण ३७ वर्षे मराठी अध्यापनाचे काम केले. निवृत्तीनंतर महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या संस्थापक व संचालक म्हणून या संस्थेची त्यांनी पायाभरणी केली. त्याचबरोबर शासकीय आणि खाजगी स्तरावरही अनेक संस्थांना मार्गदर्शन केले. 

त्यांनी केलेले आणखी एक महत्वाचे काम म्हणजे, अमराठी मंडळींसाठी मराठी शिक्षणक्रम बनवून,अशांना नोकरीसाठी आवश्यक असणाऱ्या पदविकेची आणि प्रमाणपत्रांची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर कोशवाङमय सूची, चरित्र माहिती, परिभाषा कोश, अशा मूलगामी योजना आखण्याचे, आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याचे कामही त्यांनी केले. मराठी भाषेच्या व एकूणच वाङमयाच्या अभिवृद्धीसाठी त्यांनी अथक परिश्रम केले. 

एकीकडे त्यांची स्वतःची साहित्य संपदाही वाढतच होती. त्यांच्या प्रकाशित साहित्यापैकी काही निवडक साहित्य असे —

पहाटगाणी — पहिलं ललित लेख संग्रह 

टी.एस. ईलीयट आणि नवीन मराठी कविता — समीक्षा 

जीवनलेखन —- नाटक 

आठवणी काळाच्या आणि माणसांच्या 

कहाणी लंडनच्या आजीबाईंची 

नानासाहेब फाटक – व्यक्ती आणि कला 

संक्रमण —- वैचारिक 

समग्र दिवाकर — नाट्यछटाकार दिवाकर यांचे अप्रकाशित लेखन 

माती आणि मूर्ती — समीक्षा 

रमाबाई रानडे – व्यक्ती आणि कार्य 

वाङमयीन महत्ता  

गोपाल हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी 

“ ज्ञानदेवी “ या ग्रंथाचे संपादन आणि लेखन– हे त्यांचे खूप मौलिक काम समजले जाते. याच्या तीन खंडांचे संपादन हा त्यांच्या विद्वततेचा, मौलिक विचारांचा आणि सहृदयतेचा परिपाक असल्याचे गौरवाने म्हटले जाते. 

त्यांच्या अनेक ग्रंथांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच इतरही पुरस्कार असे — 

भारतीय शिक्षण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, शैक्षणिक कार्यासाठी ‘ सत्यशोधक पुरस्कार ‘, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे तर्फे पुरस्कार, सु.ल.गद्रे पुरस्कार, जांभेकर पुरस्कार, नगर वाचन मंदिर पुरस्कार, दादर वनिता समाजाचा जीवनगौरव पुरस्कार . बडोदा वाङमय परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

चरित्र वाङमयाला वेगळे कसदार वळण देणाऱ्या , सतत ‘ वाङमयसेवक ‘ याच भूमिकेतून काम करत राहिलेल्या , आणि ज्यांना “ वाग्विलासिनी “ असे आदराने संबोधले जात असे , अशा सरोजिनी वैद्य यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

चेतन दातार

चेतन दातार हे अभिनेते व रंगकर्मी तर होतेच पण अत्यंत वेगळ्या विषयांवर लेखन करणारे नाटककारही होते.देवदासी प्रथा, समलैंगिकता हे त्यांच्या नाटकांचे विषय होते.श्री.विठ्ठल बंडू तुपे यांच्या कादंबरीवर आधारित त्यांनी लिहीलेले ‘झुलवा’ हे नाटक देवदासी प्रथा या विषयावर होते.ते खूप गाजले.तसेच ‘एक माधवबाग’हे नाटक समलैंगिकता या विषयाशी संबंधीत आहे.या नाटकातील समलिंगी तरूणाने, आपल्या लैगिंकतेबद्दल सांगणारे आईला लिहीलेल्या पत्राचे वाचन अनेक संबंधित संस्थांमध्ये करण्याचा उपक्रमही करण्यात आला होता.

त्यांनी इंग्रजी, हिंदी व जर्मन नाटकांवर आधारित नाट्यलेखन केले आहे.

चेतन दातार यांची नाट्यसंपदा:

एक माधवबाग, झुलवा, राधा वजा रानडे, सावल्या, आरण्य किरणं (मूळ हिंदी), काॅटन56 व पाॅलिएस्टर 84 (मूळ इंग्रजी), मै भी सुपरमॅन (मूळ जर्मन) ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेचे ते आधारस्तंभ होते.

दातार यांची नाट्यनिर्मिती:

गिरिबाला(रवींद्रनाथ टागोर-नृत्यनाट्य)

हरवलेले प्रतिबिंब(महेश एलकुंचवार)

दोन ऑगस्ट 2008 ला चेतन दातार यांचे निधन झाले.आज त्यांच्या स्मृतीदिनी या वेगळ्या वाटेवरील नाटककाराला अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

लोकमान्य टिळक

लोकमान्य बाळ (ऊर्फ केशव) गंगाधर टिळक (23 जुलै 1856 – 1ऑगस्ट 1920)हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते.

ते बी.ए., एलएल. बी. झाले होते.

विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यात टिळक शिक्षक म्हणून विनावेतन काम करीत. पुढे 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्या संस्थेतर्फे 1885मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. त्यात टिळक गणित व संस्कृत हे विषय शिकवीत.

1881मध्ये चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा (इंग्रजी)  ही वर्तमानपत्रे सुरू केली. आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते. तरी केसरीत टिळकांचे अग्रलेख प्रसिद्ध होत. पुढे आगरकर व टिळक यांच्यात मतभेद झाल्यानंतर टिळक केसरीचे संपादक झाले.1881 ते 1920 या चाळीस वर्षांत टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले. त्यापैकी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’, ‘उजाडले पण सूर्य कुठे आहे?’, ‘प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल?’, ‘टोणग्याचे आचळ’,  ‘टिळक सुटले पुढे काय?’ वगैरे अग्रलेख अजूनही प्रसिद्ध आहेत.

टिळक हे संस्कृत, गणित, खगोलशास्त्र या विषयांमधील मान्यताप्राप्त अभ्यासकही होते. अत्यंत क्लिष्ट विषय ते अभिनव व  नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळत.

त्यांची ‘ओरायन’, ‘आर्क्टिक होम ऑफ वेदाज’, भगवदगीतेतील कर्मयोगाची समीक्षा करणारे ‘गीतारहस्य’, ‘टिळक पंचांग पद्धती’ इत्यादी अनेक पुस्तके आजही लोकप्रिय आहेत.

‘टिळकांची पत्रे’, ‘सिलेक्टेड डॉक्युमेंट्स ऑफ लोकमान्य बाल गंगाधर टिलक,1880 -1920’ वगैरे पुस्तकांत टिळकांच्या लेखनाचे संपादन केले आहे.

टिळकांच्या जीवनावर ‘लोकमान्य :एक युगपुरुष’ हा चित्रपट काढला होता.

लोकमान्य टिळकांच्या आजच्या या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ जुलै – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ३१ जुलै -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्रीपाद दामोदर सातवळेकर (१९ सप्टेंबर १८६७ – ३१ जुलै १९६८ )

श्रीपाद दामोदर सातवळेकर हे संस्कृत पंडीत होते. वेदांचे अभ्यासक आणि संशोधक होते. वैदिक तत्वज्ञानाचे भासयकार आणि मराठी लेखक होते. ते उत्तम चित्रकारही होते.

सातवळेकर यांनी ‘वैदिक राष्ट्रगीत’ आणि ‘वैदिक प्रार्थनांची तेजस्वीता’ या नावाचे लेख लिहिले होते. त्यासाठी इंग्रज सरकारने त्यांना कारावासात पाठविले होते. सातवळेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील कोलगाव इथे झाला, तर मृत्यू गुजराठेतील पारडी या गावी झाला. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् इथे त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले. कीर्तिवंत चित्रकार माधव सातवळेकर त्यांचे सुपुत्र.

सातवळेकर यांचे धर्मविषयक विचार –

धर्माला  मर्यादा नाही. जेथे मानव आहे, तेथे धर्म असतोच. वेद-उपनिषदे, रामायण-महाभारत, या ग्रंथातून दिसणारी आपली सस्कृती जगावर प्रभाव टाकणारी आहे. ती जागती ठेवणं आवश्यक आहे. उपनिशादातील विचार प्रत्येक अवस्थेत मनुष्याला शांती, श्रेष्ठ आनंद व असीम धैर्य देतात.

पं. सातवळेकर यांची ४०० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही निवडक पुस्तके –

१. अथर्व वेद संहिता, २. ऋग्वेद संहिता, ३. ईश उपनिषद, ४. गृहस्थाश्रम , ५. जीवनप्रकाश, ६. दीर्घ जीवन आणि आरोग्य , ७. पौराणिक गोष्टींचा उलगडा , ८. भगवद्गीता – निबंधमाला (अनेक भाग ), ९. वेदामृत , १० सामवेद

त्यांच्यावर वेदव्यास पंडीत सटवलेकर हे पुस्तक पु. पां. गोखले यांनी लिहिले आहे.

? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

 

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३० जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्रीकृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर 

( ३१ ऑक्टोबर १९२६ —- ३० जुलै २०१३ )

श्रीकृष्ण अर्जुनवाडकर हे संस्कृतचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अध्यापक, अभ्यासक आणि संशोधक होते. त्यांनी वेदांत, योग, तत्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण इ. विषयांवर, इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषेत ग्रंथस्वरूप व स्फुटलेखन स्वरूपात विपुल लेखन केले आहे. त्यांनी आपले वडील अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने संस्कृतचे अध्ययन केले. त्यानंतर  विष्णुशास्त्री बापट यांनी सुरू केलेल्या ‘आचार्य कुला’त तीन वर्षे राहून शांकर वेदांताचा अभ्यास केला. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘वेदान्त – कोविद’ ही बी. ए. च्या समकक्ष पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नेहमीचे औपचारिक शिक्षण घेतले. १९४६ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यांना जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळाली. पुढे त्यांनी बी.ए. व एम.ए या पदव्या मिळवल्या.

त्यांनी पुण्यातील नू.म.विद्यालय , नवरोसजी वाडिया, स.प. महाविद्यालय, कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ इ. ठिकाणी संस्कृत, अर्धमागधी आणि मराठीचे अध्यापन केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रीज विद्यापीठापर्यंत  अनेक ठिकाणी संस्कृत, योग, वेदान्त, उपनिषदे, भगवद्गीता, रससिद्धांत इ. वर व्याख्याने दिली.  

श्रीकृष्ण अर्जुनवाडकर यांचे प्रकाशित साहित्य –  

१.  सुबोध भारती – अरविंद मंगरूळकर आणि  केशव जिवाजी दीक्षित यांच्या मदतीने इ. ८वी, ९वी, १०वी साठी पाठ्यपुस्तके तयार केली.

२. अर्धमागधी शालांत दीपिका

३. मराठी: घटना, रचना, परंपरा यावरील पुस्तके अरविन्द मंगरूळकर यांच्या सहयोगाने तयार केली.

४.   प्रीत गौरी गिरीशम् – ही संगीतिका कालिदासाच्या ५व्या सर्गाच्या कथानकावर आधारलेली आहे. संस्कृतमधे दुर्मीळ असा अन्त्य यमकाचा यात विपुल वापर आहे. यात गेयता आहे. या संगीतिकेचा प्रयोग १९६० मधे वाडिया कॉलेज इथे झाला.

५.  संस्कृत भाषा आणि साहित्य- महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या भारतीय सांस्कृतिक कोशाच्या ९व्या खंडात त्यांनी या विषयाचा विस्तृत निबंध लिहिला आहे. 

६. शास्त्रीय मराठी व्याकरण

७.  ग-म-भ-न या ललित मासिकात ‘पंतोजी’ या नावाने मराठी शुद्धलेखनाच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा ऊहापोह करणारी ३१ लेखांची लेखमाला लिहिली

८. मराठी व्याकरण वाद आणि प्रवाद

९. मराठी व्याकरणाचा इतिहास

१०.  विविध नियतकालिकातून वेळोवेळी त्यांचे ३००च्या वर लेख प्रकाशित झाले आहेत.

११.   संस्कृत भाषा आधुनिक जीवनाच्या अधिक जवळ नेण्याच्या दृष्टीने, त्यांनी इंग्रजीतील आधुनिक पद्धतीची अभिवादने सोप्या, समर्पक संस्कृतातून उपलब्ध करून दिली आहेत. उदा. गुडमॉर्निंग- सुप्रभातम्, गुड डे – सुदिनम् , गुड बाय – स्वस्ती , विश यू बेस्ट लक – सुभाग्यमस्तु इ.

श्री. श्रीकृष्ण अर्जुनवाडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुधाकर प्रभू  (निधन ३० जुलै २००७ )

सुधाकर प्रभू यांचा बालकुमार साहित्यिक म्हणून लौकिक आहे. त्यांचा जन्म गोव्यातील पेडणे या गावी झाला. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. पदवी मिळवल्यावर त्यांनी अध्यापनाचा व्यवसाय सुरू केला. पुण्यातील हिंद हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते.

वयाच्या १८व्या वर्षीपासून त्यांच्या कथा ‘आनंद’ आणि बालमित्र या मुलांच्या मासिकामधून प्रसिद्ध होऊ लागल्या. याखेरीज ‘सा. स्वराज्य, रविवार सकाळ, सा.हिंदू, साधना यासारख्या नियतकालिकातून देखील त्यांनी लेखन केले. त्यांची २००च्यावर पुस्तके आहेत. त्यांची राजू प्रधान ही व्यक्तिरेखा, भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे याच्याप्रमाणेच  लोकप्रिय झाली.

 सुधाकर प्रभू यांची काही निवडक पुस्तके– 

१.  मी सातववाडीचा लहान्या, २. लग्नघरात राजू प्रधान, ३. एका रात्रीची गंमत,           ४. कोणार्कचे कलाकार, ५. प्राणी स्वतंत्र झाले, ६. अशी जिंकली खिंड हाजीपीर,       ७. धिटुकली, ८. हिरवी हिरवी गार, ९. चला झाडे लावू चार, १० अमोल अमोल

बालसाहित्यातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना गोवा कला अकादमी, गोवा सरकार, भारत सरकारचे पुरस्कार लाभले आहेत. कोल्हापूरमधे १९९१ साली झालेल्या बाल कुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

श्री. सुधाकर प्रभू यांना त्यांच्या आजच्या स्मृतीदिनी विनम्र श्रद्धांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares