मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘मेंटेनन्स’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘मेन्टेनन्स’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

सकाळ पासून अनेक मेसेज WA वर येत असतात. बरेचदा आपण वाचतो आणि सोडून देतो. पण काही मेसेजेस विचार करायला लावतात. त्यातलाच हा मेसेज-

‘May  it be a Machine or Human Relationship,

Maintenance is always cheaper than repairing. ‘

अगदी खरंय. मशीनची efficiency टिकून राहावी, वाढावी म्हणून आपण नियमितपणे मशीनची देखभाल करतो. कधी थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी मशीन आपल्याला इंडिकेशन द्यायला लागते. तत्परतेने आपण मशीन मधला fault शोधून रिपेअर करतो.

नात्यांचे पण तसेच आहे.

आपल्या अवतीभवती अशी कितीतरी जणं असतात, जी सर्वांच्या नेहमी संपर्कात असतात, आवर्जून फोन करतात, विचारपूस करतात, अधूनमधून प्रत्यक्ष भेटतात सुद्धा. काहींना  वाटतं, ही माणसं रिकामी आहेत. त्यांच्याकडे खूप वेळ आहे. तर तसं अजिबात नाही. या व्यक्ती आपल्या रोजच्या व्यापातूनसुद्धा दुसऱ्यासाठी वेळ काढतात. कारण त्यांच्या लेखी नाती महत्त्वाची असतात.

कित्येकांच्या घरी रात्रीचे जेवण घरातील सर्व सदस्यांनी एकत्र घ्यायची प्रथा आहे. मूळ उद्देश हाच की सगळे जण दिवसभरातून एकदा तरी एकमेकांना भेटतात. विचारपूस होते. विचारांची देवाण घेवाण होते. काही समस्या असतील तर त्याचे निराकरण होते. हाच routine maintenance. अशाने नाती टिकून राहतात. एकमेकांबद्दल आदर, प्रेम वाढते. आपली माणसे आपल्यासोबत आहेत, हा विचारसुद्धा खूप महत्त्वाचा असतो.

माझ्या कॉलेज /शाळेच्या ग्रुपमध्ये काहीजण आवर्जून प्रत्येकाच्या वाढदिवशी त्याला फोन करतात. काही जण सोबतचे फोटो शेअर करतात. काही जण कविता किंवा लेख लिहितात.

मला आठवतंय, लहानपणी दर १५ दिवसांनी, महिन्यांनी आजीचे, काकांचे पत्र यायचे, खुशालीचे.

आपल्या पिढीनेही पाहिली असतील पत्रे आलेली. आपणसुद्धा लिहिली आहेत पत्रं. बाहेरगावी किंवा नोकरीच्या ठिकाणाहून.

किती भारी वाटायचं ना पत्र आले की!काळाच्या ओघात पत्रं बंद झाली. आणि त्यांची जागा WA ने घेतली.

कोणी म्हणेल, कशाला करायचा फोन?इथे आपल्याला आपल्या कामाचे व्याप आहेत. आणि मी नाही केला कॉल, मी नाही केली चौकशी तर काय फरक पडणार आहे?

तसे पाहिले तर फरक काहीच पडणार नसतो. पण आपल्या एका फोनने  नात्याचे बंध अधिक घट्ट होतात. समोरच्या व्यक्तीच्या आनंदासाठी आपण केलेली कृती म्हणजेच Preventive मेन्टेनन्स.

म्हणूनच Machine सारखाच नात्यांचा Maintenance हवाच.

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ही दरी कमी करूया !! ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

ही दरी कमी करूया !! ☆ श्री सुनील देशपांडे 

माणसाचं मन किती विचित्र असतं !  मृत्यू अटळ आहे हे समजायला लागल्यापासूनच माणसाला अमरत्वाची सुद्धा  स्वप्नं पडू लागली. अमरत्त्व ही अशक्य गोष्ट आहे हे माहीत असूनही मानव अमरत्वाच्या संकल्पनेकडे सरकण्याचा प्रयत्न करतोच आहे. अगदी हजारो वर्षापासून !  या प्रयत्नाचा एक महत्वाचा टप्पा मानवानं या शतकात मात्र गाठला आहे असे म्हणायला हरकत नाही. तो म्हणजे अवयव प्रत्यारोपण.

१९०५ साली तो म्हणाला ‘ मी मेलो तरी माझे नेत्र दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहतील‘

१९५४ साली तो म्हणाला ‘ मी मेलो तरी माझी मूत्रपिंडे  दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहतील ‘

असं करता करता तो आज  म्हणू शकतोय कि ‘ मी मरेन पण माझे हृदय, फुफ्फुसे, हाडं, कुर्च्या, मगज, यकृत, स्वादुपिंड, आतडी, प्लिहा हे सर्व अवयव कुणाच्या ना कुणाच्या शरीरात जिवंत राहू शकतील, मी मरेन पण अवयव रूपी उरेन !’

मानवाचा अमरत्वाच्या वाटेवरून  चाललेला हा प्रवास, वैद्यकशास्त्राच्या संशोधनातूनच या टप्प्यावर पोहोचला आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या जेवढ्या जास्तीत जास्त शस्त्रक्रिया होतील तेवढे हे संशोधन पुढे पुढे जाईल. तसेच वरील अवयवांच्या यादीत अधिकाधिक भर पडत जाईल आणि प्रत्यारोपणाच्या यशस्वितेची टक्केवारी वाढत जाईल हे नक्की.

पण हे सगळं घडण्यासाठी मुख्य गरज आहे ती हा विषय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची आणि हे शिवधनुष्य पेलण्याची.

२०१५ मध्ये जे जे हॉस्पिटल मध्ये  अवयवदान कार्यकर्त्यांची एक सभा वसईच्या देहमुक्ती मिशनचे प्रमुख श्री पुरुषोत्तम पवार यांच्या प्रयत्नाने आयोजित केली गेली होती. त्यावेळी श्री पवार यांनी असा प्रस्ताव मांडला की आपण सर्वच आपापल्या भागात उत्तम काम करत आहोत. परंतु आपण सगळे एक होऊन जर कामाला लागलो तर खूप मोठ्या प्रमाणावर हे कार्य राज्यभर उभे राहू शकेल.

आणि 

सर्वांच्या संमतीने एका मोठ्या महासंघाची स्थापना करण्याचा संकल्प झाला. त्यानुसार श्री पुरुषोत्तम पवार यांच्या बरोबर  दधिची देहदान समिती, मानव ज्योत, जीवन ज्योत, सुमती ग्रुप अशा प्रस्थापित सेवाभावी संस्थांच्या श्री सुधीर बागाईतकर, श्री विनोद हरिया, श्री. कुलीनकांत लुठीया, श्री. विनायक जोशी या कार्यकर्त्यांनी देखील या महासंघासाठी चंग बांधला.

या सर्वांच्या प्रयत्नातून २०१६ मध्ये महाराष्ट्रातील अवयवदान क्षेत्रातील अनेक सदस्यांशी संपर्क करून एक राज्यव्यापी कार्यकर्त्यांचे अधिवेशन मुंबई मुलुंड येथे, महाराष्ट्र सेवा संघ यांच्या सहकार्याने आयोजित केले. या अधिवेशनात डॉ. वत्सला त्रिवेदी, डॉ. प्रवीण शिनगारे, नागपूरचे चंद्रकांत मेहेर  इत्यादी मान्यवर मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतात ज्यांच्यावर २००३ मध्ये पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले होते, असे नाशिक येथील डॉ. भाऊसाहेब मोरे यांना पाचारण करण्यात आले होते.

या अधिवेशनाच्या यशस्वीतेमुळे महाराष्ट्रातील विविध भागातील संस्था व कार्यकर्ते महासंघाशी जोडले गेले. सतत दोन वर्षांच्या यशस्वी कार्यकालानंतर दिनांक १७ मे २०१७ रोजी महासंघाची सरकार दरबारी नोंद होऊन नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत झालेला हा महासंघ म्हणजे दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.

त्याच दरम्यान नाशिक येथून पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पालथा घालण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले आणि पहिली नाशिक ते आनंदवन अशी ११०० किलोमीटरची पदयात्रा आयोजित करणारे श्री सुनील देशपांडे यांच्याशी श्री पुरुषोत्तम पवार यांनी संपर्क साधला. श्री देशपांडे यांच्या उपक्रमाला फेडरेशनचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्या पदयात्रेच्या यशस्वीतेनंतर त्यांना फेडरेशनमध्ये सामील करून घेऊन ही पदयात्रां ची संकल्पना पुढे महासंघामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली गेली. चार पदयात्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातले जवळपास सर्व जिल्हे पादाक्रांत केले गेले.

महासंघाचे विविध कार्यकर्ते संलग्न संस्थांचे कार्यकर्ते आणि पदयात्रांच्या माध्यमातून हजारो कार्यक्रमांच्या आयोजनातून लाखो लोकांपर्यंत अवयवदानाचा विषय महासंघाने नेऊन पोहोचवला.

आज १७ मे २०२४ रोजी या संस्थेला सात वर्षे पूर्ण होत आहेत.

(अर्थात संस्थेचे कार्य नोंदणीपूर्वीच चालू झाले होते त्या दृष्टीने नऊ वर्षे म्हणता येतील. परंतु कोरोनाची दोन वर्षे सोडून देऊ. )  परंतु या सात वर्षात संस्थेने खूप मोठा पल्ला गाठला आहे.

वैद्यकीय संशोधनातून माणसाला मृत्यूच्या पाशातून सोडवण्यासाठी संशोधक झटत असले तरी त्याचा उपयोग व उपभोग माणसाला घेता यावा यासाठी समाज प्रबोधन व जनजागृतीची फार मोठ्या प्रमाणावर गरज असते. सामाजिक संस्था, रुग्णालये व प्रसिद्धी माध्यमांनाच यासाठी झटले पाहिजे.

ही गोष्ट वेळीच जाणून घेऊन दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन

ही संस्था या जनप्रबोधनाच्या कामामध्ये  कार्यरत होऊन राज्यभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आठ  वर्षे समाज प्रबोधन करत आहे.

प्रसिद्धी हे समाज प्रबोधनाचे अविभाज्य अंग आहे. यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याचीही फेडरेशन ला गरज आहे. अनेक प्रसिद्धी माध्यमांनी हे सहकार्य दिले सुद्धा आहे.

महाराष्ट्र राज्या मध्ये अवयवदानाला समर्पित  आणि  अवयवदानाच्या समाज जागृती व प्रबोधन कार्याची मुहूर्तमेढ रोवणारी राज्यस्तरीय संस्था म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई. ही संस्था आज प्रामुख्याने  ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यभर पसरलेल्या आपल्या विविध जिल्हा शाखांमार्फत ही संस्था कार्यरत आहे. अलीकडच्या काळात केंद्र व राज्य सरकारांनी सुद्धा या विषयात विशेष लक्ष घालण्याचे ठरवले असून तशा सूचना संबंधित कार्यालयांना दिल्या गेल्या आहेत. तरीही राज्यभर फेडरेशन मार्फत  या सर्व सरकारी संस्थांच्या समन्वयातून चालू असलेल्या कार्याला तोड नाही हे कबूल करावेच लागेल.

अनेक वर्षांपूर्वी तामिळनाडू सरकारमध्ये ना. सुश्री (कै) जयललिताजी मुख्यमंत्री असताना या चळवळीला तेथे सरकारी पाठबळ मिळालं आणि या  चळवळीने  तामिळनाडू राज्यात चांगलेच मूळ धरले.

भारत सरकारने सन १९९४ मध्ये अवयवदानाचा कायदा संमत केला. त्या नंतर आजपर्यंत सरकारी पातळीवर काही यंत्रणाही  निर्माण करण्यात आल्या आहेत.

अशा सर्व सरकारी यंत्रणांच्या समन्वयाने आणि त्यांना पूरक म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ही राज्यस्तरीय  संस्था आता राज्याबाहेर सुद्धा भरारी घेण्याच्या तयारीत आहेच, परंतु सध्या संपूर्ण भारत देशामध्ये विविध संस्थांच्या संपर्कात राहून फेडरेशन कार्याच्या कक्षा रुंदावत आहे.

कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यासाठी अधिकधिक  प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून फेडरेशन सध्या भारतभर प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी संपर्क साधून आहे. स्वतःच्या अनुभवांच्या फायद्याची देवाण-घेवाण  इतर संस्थांशी आणि कार्यकर्त्यांशी करण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षणाचे एक प्रारूप संस्थेने बनवले आहे. तीनस्तरीय महादान (नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान इत्यादी सर्व शारीरिक दाने)  प्रशिक्षणक्रमाचे हे प्रारूप संस्था राबवित आहे.

‌असे असले तरी जनजागृतीच्या बाबतीत आपण सगळेच अजून खूपच मागे आहोत हे पुढील आकडेवारीवरून लक्षात येईल. देशात प्रत्यारोपणासाठी दरवर्षी सर्वसाधारणपणे दोन लक्ष मूत्रपिंडांची  गरज असते त्यापैकी सध्या ६००० पेक्षा जास्त मूत्रपिंडे उपलब्ध होऊ शकत नाहीत. ३०००० पेक्षा जास्त यकृतांची गरज आहे पण फक्त १५०० च्या जवळपास यकृतेच उपलब्ध होऊ शकतात. साधारण ५०००० हृदयांची गरज आहे पण फक्त १०० च्या जवळपास हृदयेच उपलब्ध होऊ शकतात. १ लक्ष डोळ्यांच्या गरजे पैकी २५००० पेक्षा जास्त नेत्र उपलब्ध होऊ शकत नाहीत. सध्याची परिस्थिती पहाता व दिवसेंदिवस अवयवांच्या गरजेची वाढती संख्या पहाता दर वर्षी आवश्यकता व उपलब्धता या मधील दरी वाढतच आहे. ही वाढती दरी भरून काढायची असेल तर अवयवदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले पाहिजे. या सर्व परिस्थितीवर एकच उपाय म्हणजे जनजागृती !  आता ही जबाबदारी प्रामुख्याने सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व प्रसिद्धी माध्यमांवरच येऊन पडते. म्हणूनच  दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे समन्वयाने प्रबोधन करण्याचे कार्य  आज सर्वांच्या डोळ्यात भरते आहे.

फेडरेशनला आज अनेकांच्या सक्रिय सहकार्याची आणि बरोबरीने वाटचाल करण्याची गरज आहे.

जनजागृती कार्यक्रमांना प्रसिद्धी माध्यमांकडून अधिक सहकार्य मिळावे. या  संबंधीच्या मजकुराला प्रसिद्धी माध्यमांमध्ये सुद्धा महत्वाचे स्थान मिळावे असे  वाटते. पण त्याच बरोबर प्रसिद्धी माध्यमांनी आणि विविध कंपन्या आणि व्यापारी संस्था यांनी सुद्धा स्वतःहून कांही उपक्रमांचे आयोजन करणे ही आज काळाची गरज आहे.

असे काही आयोजन कोणी करणार असल्यास फेडरेशन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. फेडरेशनला सामाजिक दायित्व उपक्रम ( सी. एस. आर. ) यासाठी मंजूरी असून ज्या कंपन्यांकडे सीएसआर साठी निधी उपलब्ध असेल त्यांचे बरोबर समन्वय करून चांगले प्रकल्प राबवण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे.

फेडरेशन ला मिळणाऱ्या देणग्यांसाठी ८०जी कलमाखाली आयकराची सवलत प्राप्त आहे.

विविध खाजगी व सरकारी यंत्रणा, रुग्णालये, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व प्रसिध्दी माध्यमे यांनी एकमेकांना सहकार्य करून विविध उपक्रमांनी अवयवदानासाठी   लोक जागरणाची व्यापक मोहीम आखणे जरूर आहे. पण त्या नंतर सुद्धा सतत वरचेवर हा विषय व या विषयावरील चर्चा जागती ठेवली पाहिजे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रके (पोस्टर) स्पर्धा, पदयात्रा, सायकल रॅली, मोटारसायकल रॅली. चित्ररथ, घोषणा व फलकबाजी, पत्रके वाटप, पथनाट्ये, या विषयावरील कविता-गाणी, नाट्यछटा, एकांकिका, लेख, व्याख्याने वगैरे जे जे करता येईल त्या सर्व मार्गानी लोकांच्या पर्यंत या विषयाचे महत्व पोहोचवण्याची धडपड आज फेडरेशन करत आहे. हा विषय लोकांच्या डोक्यातून, कानातून मनात पोहोचला पाहिजे आणि मनामनात रुजला पाहिजे.

त्याही पुढे जाऊन मी म्हणतो, चांगले काम करायला औचित्य हवेच का ?   हवेच असेल तर

१७ मे हा महासंघाचा म्हणजेच फेडरेशनचा वर्धापन दिन आहे, हे औचित्य काय कमी आहे ?  

चला आपण जे कोणी सुजाण नागरिक आहोत, विचारवंत, समाज सुधारक जे कोणी आहोत त्या सर्वानी नक्की ठरवूया  की काळाचे हे आव्हान पेलण्यासाठी  आपण अवयवांची उपलब्धता व गरज या मधील दरी  कमी करण्या साठी झटून प्रयत्न करूया ! 

त्यासाठी आपण फेडरेशनशी संपर्क साधावा.

फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन

६०१, कैलाशधाम , जी. व्ही. स्कीम रोड नंबर ४ मुलुंड, मुंबई  ४०००८१

ई-मेल : [email protected] [email protected]

www. organdonation.net.in

पत्रव्यवहारासाठी पत्ता:

श्रीकांत कुलकर्णी (सचिव) 

३, श्रीनिवास गौरव अपार्टमेंट, ऑफ मयूर कॉलनी डीपी रोड, कोथरूड, पुणे ४११०३८

© श्री सुनील देशपांडे

(उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.) 

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रश्मी किरण…” ☆ श्री मिलिंद दिवाकर ☆

श्री मिलिंद दिवाकर 

परिचय 

समाजसेवक, वक्ते, लेखक, स्तंभलेखक, सातत्याने वृत्तपत्रात लेखन पालवी ह्या गाजलेल्या आत्मकहाणीचे लेखक

? मनमंजुषेतून ?

“रश्मी किरण…श्री मिलिंद दिवाकर

ए… खरं सांगू  खूप आवडतं मला तुझं ते निष्पाप कोवळं येणं

केव्हा केव्हा ना तुझे ते दाहक होणं रणरणतं, राकटपणसुद्धा मला आवडतं रे…

संध्याकाळी एक रोमान्स तू घेऊन येतोस नं  खूप रोमांचित होतो मी तुझ्या येण्याने….

निस्तब्ध एकट्या रात्रीनंतर तुझ्या येण्याच्या कोवळ्या चाहुलींनी

एक उबदार चैतन्य माझ्यात सळसळायला लागतं… असं वाटतं सोडूच नये तुझी साथ 

पण तू असा रागीट होत जातोस… दाहक व्हायला लागतोस, पण सांगू

तेही आवडतंय रे मला….

कारच्या काचेतून बघताना तुझं चालणारं तांडव पहात रहावसं वाटतं मला 

शृंगार घेऊन येतोस तू  फिरून संध्याकाळी, काय काय तुझ्या ठायी भरलंय रे….

जीवनाचा एक पटचं दाखवतोस तू आम्हांला

पण या करंट्या मनाला कळतंच नाही की 

जीवन कालचक्र तू  आम्हांला समजावून सांगतोयस !

तुझं सकाळचं निष्पापपण कुठे हरवतं कोणास ठाऊक,

दुपारी तू जुनाट व्हायला लागतोस, तेव्हा रखरखायला लागतोस आणि 

उताराकडे झुकतोस ना निरोप घ्यायला… तेव्हा शांत होतोस

सकाळच्या तुझ्या येण्याने जी मंगल सात्विकता माझ्यामध्ये भरलेली असते 

दुपारी पुन्हा ती घेऊन टाकतोस, दाह व्हायला लागतो कधीकधी 

पेटवतोस आपला अग्नी…. किती तुझे विभ्रम  

संध्याकाळ झाली की हलकेच रोमांचित करून जातोस 

ते संध्याकाळी तुझं जाणंसुद्धा विरहाकडे घेऊन जातं

मग पुन्हा वेध लागतात सकाळच्या त्या तुझ्या येण्याचे…

एक अतूट नातं झालंय तुझ्या अन् माझ्यामध्ये 

निस्तब्ध एकट्या रात्री मी आसुसलेला असतो 

सकाळच्या तुझ्या उबदार आगमनाची वाट बघत 

एक चैतन्य सळसळतं माझ्यामध्ये तुझ्या येण्यानं 

मीच काय ही सगळी वसुंधरा तुझ्यासाठी आसुसलेली असते…

कोण म्हणतं, ही धरा फक्त पावसाचीच प्रतीक्षा करते

तिच्या उदरातील बीजं ना, तुझ्या येण्याची वाट बघतात 

तुझा उष्मा त्यांना हवा असतो, अंकुरायला

तुझ्या उष्म्याने ती सवरतात… फुलतात… खुलतात…

पिकं डोलायला लागतात, त्या धरित्रीलाही तुझी गरज असते 

आणि मग आमच्यातलं चैतन्य जागवायला तू जेव्हा निरागस अवतरतोस

सकाळ मंगल करून जातोस आमचं जगणं… एक सात्त्विकतेचा उदय, चैतन्य संचारतं आमच्यात 

मग पुन्हा दुपारचं तुझं रखरखतं अस्तित्व…

सगळं बंद करून घरात शांत एकटेपणात, एकट्या जीवनाचं भान देतं

तुझ्या रुपानं जगणं शिकवतं आम्हाला, हे सगळं असंच चालत राहणारे अंतापर्यंत 

आदिम सनातन तुझ्या अस्तित्वाची ही कृपा आमच्यावर अशीच बरसत राहो 

कधीकधी तक्रार होते तुझ्याबद्दल मनात, तुझ्या त्या दाहक तांडवाची,

तुझ्या त्या रणरणत्या राकटपणाची पण असो…

हे सगळं समग्रतेच्या जीवनाचं दर्शन तुझ्या रुपानं रोज घडतंय 

आम्ही करंटे मात्र तुला नावं ठेवतं, तुझ्या अस्तित्वाची तक्रार करतं बोटं मोडत असतो 

माफ कर मित्रा! पण जगणं शिकवतोस लेका तू 

आणि हेही कळतं की तुझ्या असण्यामुळेच हे चैतन्य आहे 

मग कसा रोखू स्वतःला… तुझ्यापुढे कृतज्ञ होण्यापासून 

कसं रोखता येईल मला… मी कृतज्ञ आहे तुझा 

खूप खूप कृतज्ञ आहे.

© श्री मिलिंद दिवाकर

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गोष्ट एका आईची…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

परिचय 

शिक्षण : बीएससी बीएड.

वडील नकलाकार पत्की म्हणून सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध त्यांच्याबरोबर वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत नकलांचे कार्यक्रम  सादर केले जे लोकरंजनातून लोकशिक्षण देणारे होते अनेक नाटकात काम.. नाट्यछटा लिखाण एकांकिका आणि पथनाट्याचे लेखन कविता आणि नृत्य गीतांचे लेखन.. कवितांना पारितोषिके आणि नृत्य गीताना हमखास पहिला नंबर.

शास्त्र उपकरणे तयार करण्याची आवड– जवळपास दीडशे उपकरणे मी तयार केली असून दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला एकदा लखनऊ येथे माननीय राष्ट्रपती झैलसिंग  यांच्या हस्ते व दुसऱ्यांदा जम्मू कश्मीर येथे माननीय राष्ट्रपती श्री व्यंकट रमण यांच्या हस्ते. नापास यांची शाळा हा माझा विशेष प्रकल्प मी गेले 32 वर्षे चालवत असून सुमारे 2000 विद्यार्थी दहावीपासून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम  केले आहे स्त्रीमुक्तीचे कार्य  केले आहे. महिलांसाठी अनेक उद्योगांची उभारणी. 38 वर्ष छंद वर्गाचे नियोजन सातत्याने केले आहे सुमारे 3000 विद्यार्थी याचा लाभ घेत असत.

साक्षरता अभियान यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने एक वर्ष डेप्युटेशनवर या प्रकल्पांतर्गत कार्यरत होते व त्यातून तीस हजार महिला आणि दहा हजार पुरुषांना साक्षर केले आहे. शैक्षणिक कार्य व महिलांची उन्नती यासाठी मी सतत कार्यरत राहिले आहे आजही वयाच्या 75 व्या वर्षी मी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना लिहायला वाचायला शिकवण्यापासून त्यांची उत्तम तयारी करून घेते आणि नवोपक्रम या सर फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत मी केलेल्या तीन वर्षाच्या कामावर प्रोजेक्ट सबमिट केला आणि त्यासाठी मला राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला त्याचे वितरण जून मध्ये आहे आता अनेक विद्यार्थी शाळा संस्था यांना मदत मिळवून देण्याचे कार्य मी करीत आहे..

? मनमंजुषेतून ?

“गोष्ट एका आईची…सुश्री शीला पतकी 

साधारणपणे 2005 सालची गोष्ट होती. चौथीचे निकाल लागल्यावर आमच्याच प्राथमिक विभागाकडून ऍडमिशनसाठी पाचवीकडे दाखले पाठवले जातात.. हायस्कूल विभागाकडे. ते काम क्लार्कच्या मार्फत होत असतं. पण एका ऍडमिशनसाठी मात्र माझ्याकडे एक बाई आल्या आणि म्हणाल्या “ माझ्या मुलीचा प्रॉब्लेम आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला घरीच ठेवा असे सांगितले आहे किंवा बाईंचा सल्ला घ्या म्हणून मी तुमच्याकडे आले. ”   मी म्हणाले “ का बरं पाचवीत तिला घरी का बसवून ठेवायचं तिचे शिक्षण बंद करण्याचा आपल्याला काय अधिकार?”  त्यावर त्या म्हणाल्या, “  तिचे मेंदूच एक ऑपरेशन झाले आहे आणि त्यामध्ये एक छोटी ट्यूब आहे. तिला ट्यूमर झाला होता. तिला फारशी दगदग करायची नाही, खेळायचे नाही. तेव्हा मी आपल्याला विनंती करायला आलेय की तिच्याबरोबर मी शाळेत दिवसभर बसले तर चालेल का?”  आता पाचवीतल्या मुलीसाठी आईने दिवसभर शाळेत बसून राहायचं मला जरा गमतीदार वाटत होतं. मी म्हणाले, “ पण काय गरज काय त्याची…” … “  नाही हो तिला इतर मुली खेळायला लागल्या की खेळावे उड्या माराव्या वाटतात पळाव वाटतं… पण या सगळ्याला तिला बंदी 

आहे “ मी थोडी गप्पच झाले. “ दहा वर्षाच हसत खेळत उड्या मारणारे लेकरू त्यांनी गप्प बसून राहायचं.. खरंच अवघड होतं ते. ते तिने करता कामा नये म्हणून मला इथे थांबणे भाग आहे त्याशिवाय तिला अचानक काही त्रास झाला तर तुम्ही कुठे धावपळ करणार माझ्याकडे तिची औषधे असतात…!”

मी विचार केला आणि म्हणाले “ ठीक आहे तुम्ही वर्गाच्या बाहेर असलेल्या मैदानाच्या बाजूला बसू शकता…”  जून महिन्यात शाळा सुरू झाली  त्यानंतर त्या बाई येऊन वर्गाच्या बाहेर बसायला लागल्या आठ दहा दिवसांनी एक दोन शिक्षक आले आणि म्हणाले “ बाई त्या मुलीची आई त्या बाहेर बसतात आणि आम्हाला उगाचच डिस्टर्ब झाल्यासारखं होतं तिचा प्रॉब्लेम मोठा आहे उगाचच त्या मुलीची काळजी वाटते तिला काही झालं तर काय करायच…”  मी त्यांना म्हणाले, “  काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं जमतं का बघा.. ”  त्यांचं म्हणणं होतं की जोखीम आपण कशाला घ्यायची? मी म्हणलं “आपली मुलींची शाळा आहे मुलींच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्न करतो आणि या मुलीला का आपण वंचित ठेवायचं आणि मला असं वाटतं की आपल्यापेक्षा जास्त काळजी इतर शाळेत कोणी घेणार नाही कारण आपण सगळ्या महिला आहोत मला एक मुलंबाळं नाहीत, पण तुम्ही तर आई आहात. तुम्ही त्याना खूप छान पद्धतीने समजून घेऊ शकाल.. विचार करा आपल्या पोटी असं पोर असतं तर आपण काय केलं असतं म्हणजे आपण आपल्या मुलाच्या बाबतीत जे केलं असतं तेच आपण त्यांच्यासाठी करू.. शाळेतनं कोणालाही काढणे शक्य नाही मला आपण त्या माऊलीला थोडी मदत करू!”  

या पद्धतीने शिक्षण सुरू झालं. मधे मधे त्या मुलीला त्रास व्हायचा तिची एक दोन ऑपरेशनस झाली मुलगी खूप गोड होती. आनंदी होती तिला आपल्या गंभीर दुखण्याची जाणीव नव्हती त्यामुळे आईला अधिक काळजी घ्यावी लागत होती साधारण सात साली मी रिटायर झाले आणि मग मी माझ्या कामाला लागले मुलगी तो पावतो सातवीत गेलेली होती पुढे मी काही फारशी चौकशी केली नव्हती पण आमचे सगळे शिक्षक खूप छान होते मदत करणारे मायाळू त्यामुळे पुन्हा काही त्यांना सांगावं असं मला मुळीच वाटलं मुख्याध्यापिका ही चांगल्या होत्या बरेच वर्षानंतर म्हणजे साधारणपणे दहावीचा निकाल लागल्यावर.. मी आमच्या नापास शाळेच्या संस्थेमार्फत नापास झालेल्या नववी आणि दहावीच्या मुलांना आणि पालकांना समुपदेशन करीत असे एक मीटिंग त्यासाठी फक्त लावलेली होती पालक आले प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेतले त्याप्रमाणे त्यांना उपाय सांगितले आणि एका मुलीच्या आई नंतर थांबून राहिल्या त्या मला भेटल्या आणि त्या त्याच मुलीची आई होत्या त्या म्हणाल्या तुमच्यामुळे ती दहावीपर्यंत आली पण आता नापास झाली आहे आणि दोन विषय राहिले आहेत तुमच्याकडे काही सोय होईल का? मी म्हणलं माझ्याकडे ऑक्टोबरची व्यवस्था नाही पण माझ्या शिक्षकाकडे जर तुम्ही पाठवलं तर ते तिची तयारी करून घेतील त्या म्हणाला हरकत नाही मी पाठवते आता ती एकटी जाणे येणे करू शकते ठीक आहे त्यानंतर त्या म्हणाल्या बाई मला फार काळजी आहे या मुलीची आता सातत्याने मदत करणे तिला मला फार अवघड होत आहे या मुलीच्या दुखण्यामुळे पैसाही खूप खर्च करावा लागला त्यांनी दुसऱ्या अपत्याचा विचारही केला नाही असं बरच काही त्या मला सांगत होत्या त्या शेवटी म्हणाल्या खरं सांगू बाई मी जगातली एक वेगळी आई असेल किंवा एकमेवच अशी आई असेल की रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर आपल्या मुलीच्या मरणाची कामना देवापुढे करते मी रोज देवाला सांगते माझ्यासमोर हिला ने कारण आमच्या नंतर हिला इतकं समजून कोण घेणार आहे आता ती तरुण झालीये त्यामुळे जागोजागी मला सजग राहून तिची काळजी घ्यावी लागते तिच्या ट्यूमर मुळे काही वेळा थोडसं विस्मरण होतं अजून ते शंभर टक्के बरं झालेलं नाही मी त्याना म्हणाले असं करू नका देवाने प्रत्येकाला त्याचं त्याचे भाग्य दिले आहे तिचं जे नशीब असेल तेच होईल तुम्ही का काळजी करता त्यापेक्षा जमेल तेवढी काळजी घ्या मग मी आमच्या नापास शाळेतील दोन शिक्षकांवर तिचे जबाबदारी सोपवली मी त्या बाईंना सल्ला दिला खरा पण मी दिवसभर अस्वस्थ होते….. की एखादी आई आपल्या मुलीला परमेश्वरांन घेऊन जावे.. तिचे आयुष्य आपल्यासमोर संपावे यासाठी प्रार्थना करते आणि त्या पाठीमागेही आईचे प्रेम असावे.. यासारखे काय होतं दुसरं.. प्रेमाचा हा कोणता प्रकार ?.. हे असं सगळं फक्त आईच करू शकते  तिच्या हातातले सगळे उपाय संपतात आणि समाजातले वेगळेच प्रश्न तिला भेडसावायला लागतात तेंव्हा ती तरी यापेक्षा दुसरं काय करणार.. ? त्यानंतर ऑक्टोबर मध्ये ती पास झाली पुढे माझा संपर्क संपला नंतर 17 साली मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून  एक पाककला स्पर्धा ठेवली होती त्यामध्ये जवळपास 40 एक महिलांनी भाग घेतला होता संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा होती सर्व महिलांची नोंदणी क्लार्क करून घेत होती मी अन्य कामांमध्ये होते !सर्वांनी आपापली पाककृती सजवून मांडली.. शिक्षकांचे परीक्षण झालं.. सर्वांना दरम्यानच्या काळात अल्पोपहार आणि चहा देण्यात आला आणि हॉलमध्ये एकत्र करून मी आमच्या संस्थेबद्दल सर्वांना माहिती देत होते नापास शाळा.. महिलांसाठी करत असलेले कार्य इत्यादी माहिती मी देत होते  हे सगळं चालू असताना एक बाई उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या मी बोलू का… ?. माझ्या एकदम लक्षात आलं की ह्या त्याच मुलीची आहेत.. त्यांनी माईक हातात घेतला आणि त्या बोलू लागल्या…. माझी मुलगी बाईंमुळे दहावी झाली आणि माझ्याकडे वळून पाहत म्हणाल्या तुम्ही कामात होता त्यामुळे तुम्ही मला पाहिले नाही आणि कदाचित ओळखले नसेल पण शीला पत्की मॅडमने माझ्या मुलीसाठी खूप केले आहे या संस्थेमार्फत दोन शिक्षकानी तिची तयारी करून घेतली आणि ती दहावी झाली आणि बाई मला हे सांगायला अतिशय आनंद होतो कि आज माझी मुलगी बीए झाली आहे आणि आज ती या तुमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे मग तिने सर्वांना आपल्या मुलीची कथा सांगितली तिची मुलगी उभी राहिली आणि पुढे आली.. खूप सुंदर दिसत होती मी तिला पंधरा वर्षाची पाहिलेले आता ती छान वयात आलेली… गोरी पान देखणी युवती झालेली होती सर्वात पुढचं वाक्य त्यांचे खूप छान होतं त्या म्हणाल्या बाई माझी मुलगी पूर्णपणे बरी झाली असून डॉक्टरांनी तिचा विवाह करायलाही परवानगी दिलेली आहे आता मेंदूचा म्हणून तिला कोणताही त्रास नाही तिचा ट्यूमर पूर्ण बरा झाला संपूर्ण सभागृहा ने टाळ्या वाजवल्या टाळ्यांच्या कडकडाटा त्या बाईंचा जणू आम्ही सत्कारच केला मी तर अचानक घडलेल्या प्रसंगाने भांबावून गेले होते डोळ्यातून पाणी वाहत होते.. मी भाषणाला उभी राहिली आणि एवढेच म्हणाले हेच आमच्या संस्थेचे कार्य आहे की एखाद्याला हात देऊन उभे करणे आणि मी सर्वांना हेही सांगितले देव कनवाळू आहेच पण तो कधीकधी आईचही ऐकत नाही ते खूप छान आहे या बाई रोज आपल्या मुलीसाठी देवाला प्रार्थना करीत होत्या की देवा माझ्या मुलीला माझ्या आधी घेऊन जा पण देवाने त्या प्रार्थनेतला अर्थ जाणून त्या मुलीला सक्षम करून सोडले मी जे चित्र पाहत होते त्याच्यावर माझाच विश्वास नव्हता…. !

माझ्या संस्थेचा वर्धापन दिन इतका फलदायी सुंदर साजरा होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आजचा वर्धापन दिन काही वेगळाच होता खूप बळ देणारा आणि खूप प्रेरणा देणारा आणि माझी खात्री झाली की आईच्या प्रार्थनेत बळ असतं पण त्याहून अधिक तिच्या प्रेमात बळ असते हेच खरं…. !!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अल्फ्रेड डनहिल… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अल्फ्रेड डनहिल (Alfred Dunhill) – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

लंडनच्या एका चर्चमधे ‘अल्फ्रेड डनहिल’ (Alfred Dunhill) नावाचा एक माणूस ‘सफाई कामगार’ म्हणून काम करत होता. चर्चची जमीन रोज झाडून काढणे, टेबल्स व बेंचेस पुसणे, तसेच चर्चमधले छोटेसे स्टेज व बोलण्याचा स्टँड चकाचक साफ ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते. तसेच तो चर्चचा केअरटेकर पण होता.

चर्चमधे काम करणा-या माणसाचे कमीत कमी शालेय शिक्षण तरी पूर्ण असावे, असा या चर्चचा नियम होता. डनहिल तर अशिक्षित होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हते. त्या चर्चचा जो मुख्य पाद्री म्हणजेच फादर होता, त्याला चर्चचे काही नियम धाब्यावर बसवण्याची सवय होती. म्हणूनच डनहिलसारखा एक अशिक्षित माणूस त्या चर्चमधे काम करू शकत होता.

डनहिलने पण बरीच वर्षे, म्हणजे उतारवय होईपर्यंत तेथे काम केले. वृद्धत्वामुळे चर्चचा जुना प्रमुख निवृत्त झाला व त्याजागी एक तरूण माणूस चर्चचा प्रमुख म्हणून आला. तो चर्चच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा होता. जेव्हा त्याला कळले की डनहिलचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही, तेव्हा त्याने डनहिलला नोटीस पाठवली व सहा महिन्यांच्या आत शालेय शिक्षण पूर्ण करून तसा दाखला आणण्यास सांगितले.

डनहिलला जाणवले की त्याच्या या उतारवयात सहा महिन्यात शालेय शिक्षण पूर्ण करणे शक्य नाही. तुम्ही उतारवयातील कुत्र्याला नवीन ट्रिक्स शिकवू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आले. पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न होताच.

एके दिवशी दुपारी डनहिल विचार करत पायी फिरायला बाहेर पडला व चालत लंडनच्या प्रसिद्ध बॉन्डस्ट्रीटवर आला. त्याला सिगारेट ओढायची तल्लफ आली म्हणून त्याने सिगारेटचे दुकान शोधायला सुरूवात केली. त्याला आख्ख्या बॉन्डस्ट्रीटवर कुठेही सिगारेटचे एकही दुकान आढळले नाही.

शेवटी बाजूच्या एका छोट्या गल्लीत सिगारेटचे एक छोटेसे दुकान आढळले. ‘आपण बॉन्ड स्ट्रीटवर जर सिगारेटचे दुकान टाकले तर ?’ डनहिलच्या मनात आले. लगेच त्याच्या मनात बिझनेसचा प्लॅन पक्का झाला.

त्याने चर्चच्या नोकरीचा राजीनामा दिला व बॉन्ड स्ट्रीटवर स्वतःचे एक छोटेसे सिगारेटचे दुकान चालू केले. बघता बघता त्याचे दुकान लोकप्रिय झाले व धंदा तुफान चालू लागला.

त्याने बघितले की त्याच्या दुकानात येणा-या  ग्राहकांपैकी बरेच ग्राहक हे बॉन्ड स्ट्रीटच्या पलिकडच्या बाजूने येतात. लगेच त्याने पलीकडच्या बाजूला दुकान टाकले. बघता बघता त्याच्या दुकानांची संख्या दोनाची चार करत, तीन वर्षात सोळा झाली.

अल्फ्रेड डनहिल कंपनी इंग्लंडमधला आघाडीचा टोबॅको ब्रॅन्ड झाला.

पुढे त्याने स्वतः मशीनवर सिगारेट्स बनवायला सुरूवात केली व ‘डनहिल’ या ब्रॅन्डखाली सिगारेट्स विकायला सुरूवात केली व तो पाच वर्षात लक्षाधीश झाला.

त्याच्या सिगारेटससाठी सतत तंबाखूचा पुरवठा व्हावा, त्यासाठी अमेरिकेतील दोन तंबाखू उत्पादन करणा-या शेतक-यांबरोबर अॅग्रीमेन्ट करायला तो स्वतः अमेरिकेला गेला. या करारामुळे त्या दोन अमेरिकन शेतक-यांचे नशीब तर फळफळलेच, पण तो करार हा एक महत्वाचा सार्वजनिक समारंभच ठरला. कारण या समारंभासाठी गव्हर्नर व सिनेटर जातीने उपस्थित होते.

या करारावर इतरांनी सह्या ठोकल्या. पण डनहिलने मात्र आपला अंगठा उमटवला, कारण त्याला सही करायला येत नव्हती.

हे पाहून गव्हर्नर चांगलेच प्रभावित झाले व डनहिलला म्हणाले,

‘सर. हे खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे काहीही शिक्षण झालेले नसताना देखील तुम्ही एवढे प्रचंड यश मिळवलेत. जर तुमचे शिक्षण झाले असते तर काय झाले असते ?’ 

डनहिलने त्यांना मिस्किलपणे उत्तर दिले, ‘मला जर लिहीता वाचता आले असते तर अजूनही मी चर्चमधे झाडू मारण्याचे व फरशा पुसण्याचे काम करत राहिलो असतो’ 

आजसुद्धा ‘डनहिल’ हा जगप्रसिद्ध सिगारेट ब्रॅन्ड आहे.

अन ही अगदी खरी गोष्ट आहे.              

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काही विचार… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ काही विचार… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक 

  • परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात. बाकी सगळ गैरसमज आहे.
  • कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरलं की त्याची लायकी विसरतो.
  • जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरू नये.
  • कोणतेही कर्म करा, पण एक गोष्ट विसरु नका. परमेश्वर नेहमी ONLINE असतो.
  • SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो.
  • नातं हृदयातून असावं. रक्ताची नातं हल्ली वृद्धश्रमात सापडतात.
  • लाकडाच्या ओंडक्यांनी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते ‘झाडे लावा झाडे जगवा. ‘
  • नाती जिवंतपणीच सांभाळा. ताजमहल जगाने पाहिला, पण मुमताजने नाही.
  • चमचा ज्या भांडयात असतो, त्यालाच तो रिकामा करतो. चमच्यापासून सावध रहा.
  • उपवास नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा.
  • भावना ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे. ह्यात सगळे वाहून जातात.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिध्दीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय!)

दत्तमहाराजांवरील बाबांची श्रद्धा उत्कट होती हे खरं पण रोजची पूजाअर्चा, जपजाप्य यासाठी फारसा वेळ ते देऊच शकायचे नाहीत.हे त्यांनी जरी मनोमन स्विकारलेलं असलं तरी गुरुचरित्राचं पारायण करायचं त्यांच्या बरेच दिवस मनात असूनही ते शक्य झालं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे घरी ती पोथी नव्हती, कुणाकडून तरी मागून घेऊन ती वाचणं बाबांना रुचणं शक्य नव्हतं आणि स्वतः पोथी विकत घेण्याइतकी सवड आर्थिक ओढग्रस्तीत त्यांना मिळालेली नव्हती.या गोष्टीची रुखरुख मात्र बरेच दिवस त्यांच्या मनात होतीच.ती अधिक तीव्र झाली त्याला निमित्त ठरलं वर्तमानपत्रात आलेल्या ‘ढवळे प्रकाशन, पुणे’ या प्रसिद्ध प्रकाशनसंस्थेच्या एका जाहिरातीचं! ती जाहिरात अनेक दिवस रोज ठळकपणे प्रसिद्ध होऊ लागली. गुरुचरित्राची कापडी आणि रेशमी बांधणी अशा दोन प्रकारची नवी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याची ती जाहिरात होती.त्यासाठी प्रकाशनपूर्व सवलतही जाहीर झालेली होती. शिवाय दहा प्रतींची ऑर्डर देणाऱ्यास एक प्रत मोफत मिळणार होती.ही सवलत अर्थातच पुस्तक विक्रेत्यांसाठी असल्याचे गृहित धरुन बाबांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. एरवीही रेशमी बांधणीपेक्षा कापडी बांधणीच्या प्रतीची किंमत कमी असूनही ती प्रत विकत घेणंही बाबांच्या आटोक्यात नव्हतंच.या पार्श्वभूमीवर अचानक एक दिवस गुरुचरित्राच्या रेशमी बांधणीची एकेक प्रत विकत घेणारे अनेक इच्छुक बाबांना येऊन भेटले व त्यांनी बाबांना सहकार्य करण्याची विनंती केली. ‘आमच्या प्रत्येकी एकेक अशा प्रतींची एकत्रित नोंदणी करणे, त्या व्हीपीने येतील तेव्हा ती व्हीपी सोडवून घेणे हे व्याप दहाजणांनी आपापले करण्यापेक्षा आम्हा दहा जणांचे पैसे आधीच गोळा करून ते आम्ही तुमच्याकडे देऊ.तुम्ही एकत्रित दहा प्रतींची ऑर्डर बुक करा म्हणजे आमचे काम खूप सोपे होईल.त्या बदल्यात दहा प्रतींवर मिळणारी रेशमी बांधणीची एक मोफत प्रत तुम्ही तुमच्यासाठी ठेवून घ्या’ असा त्यांचा प्रस्ताव होता. यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. बाबांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि घरबसल्या त्या सर्वांचं काम तर झालंच आणि कांहीही पैसे खर्च न करता गुरुचरित्राची एक प्रत आणि तीही रेशमी बांधणीची बाबांना घरपोच मिळाली. त्याक्षणीचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरणार नाही.मी माझ्या त्या बालवयात अंत:प्रेरणेनेच त्या पोथीतला रोज एक अध्याय वाचायला सुरुवात केली होती.ते माझं दत्तसेवेच्या वाटेवरचं पहिलं पाऊल होतं! पुढे कालांतराने आम्ही सर्व भावंडे स्थिरस्थावर झाल्यावर नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या दिशांना विखुरले गेलो तरी पुढे अनेक वर्षे ती गुरुचरित्राची पोथी माझ्या देवघरात मी बाबांकडून मिळालेला प्रसाद या भावनेनेच जपली होती.ती पोथी हाताळताही न येण्याइतकी जीर्ण होईपर्यंतच्या प्रदीर्घकाळांत गुरुचरित्राचे नित्य वाचन, पारायण हे सगळं माझ्या आनंदाचाच एक भाग होत वर्षानुवर्षे माझ्या अंगवळणीच पडून गेलं होतं!

माझ्या हातून यथाशक्ती सुरू असणाऱ्या दत्तसेवेचं समाधान आणि आम्हा भावंडांच्या पाठी असणारी आई बाबांची पुण्याई माझ्यादृष्टीने अतिशय मोलाची होती हे खरे, पण म्हणून त्यामुळे माझ्या पुढील जीवनवाटेवर खाचखळगे आलेच

नाहीत असं नाही.किंबहुना मिळेल त्या दिशांचा परस्पर वेगळ्या वाटांवरचा आम्हा सर्वच भावंडांचा प्रवास क्षणोक्षणी आमची कसोटी पहाणाराच होता.

माझ्या आयुष्यातल्या अशा अस्थिर प्रवासाला सुरुवात झाली तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. त्या नेमक्या क्षणी स्वतः पूर्णतः परावलंबी होऊन अंथरुण धरलेल्या माझ्या बाबांनी त्यांच्या अंत:प्रेरणेने मला दिलेली अमूल्य भेट मी आजही जपून ठेवलेली आहे. तो सगळाच प्रसंग आत्ता या क्षणी पुन्हा घडत असल्यासारखा मला स्पष्ट दिसतो आहे!

अर्थात या आधी सांगितलेल्या कांही मोजक्या आठवणींच्या तुलनेत खूप वर्षांनंतरची ही गोष्ट आहे.बाबा निवृत्त होईपर्यंत माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने झालेली होती. आई, बाबा न् आम्ही दोन भाऊ किर्लोस्करवाडी सोडून माझं कॉलेजशिक्षण सोयीचं व्हावं म्हणून मिरजेत रहायला आलो होतो. लहान मोठी नोकरी करत राहिलेल्या माझ्या मोठ्या भावाला माझं काॅलेज शिक्षण संपण्याच्या दरम्यान नुकताच स्टेट बँकेत जॉब मिळून त्याचं पोस्टिंग इस्लामपूरला झालं होतं. आम्ही सर्वजण मग मिरज सोडून तिकडे शिफ्ट झालो.

तिथे गेल्यानंतर काही दिवसातच बाबांनी अंथरूण धरलं ते अखेरपर्यंत त्यातून उठलेच नाहीत. त्याच दरम्यान मला मुंबईत एक जेमतेम पगाराची खाजगी नोकरी मिळायची संधी आली, तेव्हा ती स्वीकारून चांगल्या नोकरीच्या शोधात रहायचं असं ठरलं आणि मी माझी बॅग भरू लागलो. माझं वय तेव्हा जेमतेम १८/१९ वर्षांचं. तोवर घर सोडून मी कुठे बाहेर गेलेलो नव्हतो. मुंबई तर पूर्वी कधी पाहिलीही नव्हती. त्यामुळे जायचं ठरलं त्या क्षणापासून मनावर एक विचित्र असं दडपण होतं आणि अनामिक अशी भीतीही. निघायच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना देवघरातल्या पादुकांवर मी फुलं वाहू लागलो आणि माझे डोळे भरून आले. गुरुचरित्राच्या पोथीलाही मी फुलं वाहून नमस्कार केला तेव्हा ‘माझं तिथं सगऴं व्यवस्थित मार्गी लागू दे’ हा विचार मनात नव्हताच. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या पादुकांच्या नित्यपूजेत मात्र आता प्रदीर्घ काळ खंड पडणार आणि गुरुचरित्र नित्यवाचनही जमणार नाही या कल्पनेनेच मी अस्वस्थ झालो होतो. ‘मला अंतर देऊ नका..’ अशी कळवळून मी केलेली प्रार्थना आजही मला आठवतेय.आश्चर्य म्हणजे माझ्या मनातली ती कळकळ दत्तगुरुपर्यंत पोचल्याची प्रचिती मला घर सोडण्यापूर्वीच मिळाली आणि तीही अंथरुणावर निपचित पडून असलेल्या बाबांच्यामार्फत! हे सगळं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं तर होतंच पण आजही तितकंच अनाकलनीय!

निघताना मी बाबांचा निरोप घ्यायला गेलो, तेव्हा बाबा थोडे अस्वस्थ झाल्याचं मला जाणवलं.

“जपून जा.” अंथरुणावर पडल्यापडल्याच ते म्हणाले. मी नमस्कारासाठी वाकणार तेवढ्यात आपला थरथरता हात कसाबसा वर करीत त्यांनी माझा आधार घेतला आणि ते महत्प्रयासाने उठून बसले. मी त्यांना वाकून नमस्कार केला.

” तुला काय देऊ?” त्यांनी विचारलं

खरंतर पूर्णतः निष्कांचन असणाऱ्या त्यांनी मला उचलून काही द्यावं अशी माझी अपेक्षा नव्हतीच आणि तसं कांही देण्यासारखं त्यांचं स्वतःचं असं लौकीकार्थानं त्यांच्याजवळ काही नव्हतंही. पण अलौकिक असं खूप मोलाचं कांही देण्याचा ते विचार करत असतील असं माझ्या मनातही आलं नव्हतं.उलट ‘तुला काय देऊ?’ या त्यांच्या प्रश्नात मला काय हवंय यापेक्षा आपण याला काही देऊ शकत नाहीय हीच खंत त्यांच्या मनात होती असंच मला वाटून गेलं. त्यांना बरं वाटावं म्हणून तत्परतेने मी म्हणालो,

“बाबा, खरंच कांही नको. आशीर्वाद द्या फक्त”

ते स्वतःशीच हसले. त्या स्मितहास्यात एक गूढ अशी लहर तरंगत असल्याचा मला भास झाला. त्यांनी मला स्वतःजवळ बसवून घेतलं. थोपटलं. आपला थरथरता हात अलगद माझ्या डोक्यावर ठेवून म्हणाले,

“बाळा, आशीर्वाद तर आहेतच रे. आणि ते नेहमीच रहातील. एवढ्या मोठ्या कामासाठी जातो आहेस, मग कांहीतरी द्यायला हवंच ना रे?..” बोलता बोलता त्यांनी त्यांच्या गादीचा कोपरा अलगद वर दुमडला.तिथली त्यांची डायरी उचलली.त्या डायरीत निगुतीने जपून ठेवलेला एक फोटो अलगद बाहेर काढला आणि तो माझ्यापुढे धरला..

“घे.हा फोटो हेच माझे आशीर्वाद आहेत असं समज. नीट जपून ठेव.रोज याचे नित्य दर्शन घेत जा.तीच तुझी नित्य सेवा .तोच नित्यनेम.सेवेत अंतर पडेल ही मनातली भावना काढून टाक.या फोटोच्या रुपात महाराज तुझी सोबत करतील. सगळं सुरळीत होईल.काळजी नको.”

मी भारावलेल्या अवस्थेत त्यांचा शब्द न् शब्द मनात कोरुन ठेवत होतो. ते बोलायचे थांबले तसा मी भानावर आलो.कृतज्ञतेनं बाबाकडे पाहिलं. सकाळी पूजा झाल्यानंतर मी पादुकांसमोर, पोथीसमोर डोकं टेकवलं तेव्हाची माझ्या मनातली कातरता मला आठवली आणि आताची बाबांच्या नजरेतली चमक आणि त्यांच्या शब्दात भरून राहिलेला, मला स्वस्थ करणारा गाभाऱ्यातूनच उमटल्यासारखा त्यांचा अलौकिक स्वर …मी अक्षरशः अंतर्बाह्य शहारलो. त्याच मनोवस्थेत त्यांच्या हातातला तो फोटो घेतला आणि त्यांना नमस्कार केला.

तो एक अतिशय छोट्या आकाराचा दत्ताचा फोटो होता! छोटा आकार म्हणजे किती तर आपल्या बोटाच्या दोन पेरांएवढ्या उंचीचा न् फार तर एका पेराएवढ्या रुंदीचा. पिवळ्या धमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, हसतमुख प्रसन्न मुद्रा असलेलं ते दत्तरूप होतं!

या दत्तरूपानं मला पुढं खूप कांही दिलंय. पण प्रकर्षाने कृतज्ञ रहावं असं काही दिलं असेल तर ते म्हणजे बाबांच्या वाचासिद्धीची थक्क करणारी प्रचिती! ती कशी हे सगळंच सांगायचं तर तो एक वेगळाच प्रदीर्घ लेखनाचा विषय होईल. पण माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अवेळेला, माझी कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांच्या वेळी किंवा अगदी उध्वस्त करू पहाणाऱ्या नैसर्गिक संकटांच्या वेळीही फक्त मलाच जाणवेल असा आधार, दिलासा आणि माझ्या विचारांना योग्य दिशा दिलीय ती या दत्तरूपानेच!

आज इतक्या वर्षांनंतरही तो फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलाय! आजही त्याचे नित्य दर्शन मी घेतो तेव्हा ‘तो’ माझ्याजवळ असतोच आणि त्याच दत्तरुपाशी निगडीत असणारी माझ्या बाबांची आठवणसुध्दा!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तेरी मेरी कहानी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

तेरी मेरी कहानी…☆ श्री मंगेश मधुकर 

‘एक प्यार का नग़मा है, मौजों की रवानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं, 

तेरी मेरी कहानी है’

—-  गीतकार संतोष आनंद यांनी जगण्याचा सारीपाट या गाण्यात फार सुंदर मांडलाय.

जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो, तेव्हा तेव्हा ते खोलवर भिडतं. आजपण तसंच झालं. 

 

…. रविवारी अचानक रेडियोवर हे गाणं लागलं अन मन गुंग झालं.

जगण्याचा सहज सोपा अर्थ सांगणारी रचना ऐकून  एकेक गोष्टी नजरेसमोर आल्या. 

कसं असतं ना माणसाचं जगणं, वेगवेगळं आयुष्य असलं तरी प्रत्येकाच्या जगण्याचा घटनाक्रम हा सारखाच .. 

सुरुवात जन्मापासून,– त्यावेळी होणारे लाड,कौतुक,मिळणारं प्रेम, – पूर्ण परावलंबी असलं तरी  फार मस्त असतं ते आयुष्य. त्या निरागस वयात स्वार्थाशिवाय काहीच कळत नाही. तेच बरं असतं.

अर्थात सगळ्यांच्याच नशिबी हे नसतं हे देखील तितकंच खरयं.

 

सरत्या दिवसांसोबत वय वाढत जातं. हळूहळू विचार करायला शिकतो. आजूबाजूला चाललेलं समजायला लागतं. काय बरोबर,काय चूक ठरवता येतं. आणि मग!!

— मग निरागसतेची जागा व्यवहार घेतो. एकेक करून सगळंच बदलतं. 

लहानपणीचा बहारदार काळ ओसरून सुरू होतो अपेक्षांचा खेळ .. शाळेपासून चिकटलेल्या ‘अपेक्षा’ नंतर आयुष्यभर सोबत करतात. महत्वाकांक्षा, स्वप्न यांच्यामागे धावताना नोकरी,व्यवसाय,लग्न,संसार,मुलं एकेक जबाबदाऱ्या येतात. स्वरूप बदलतं पण ‘अपेक्षा’ साथ सोडत नाहीत. 

— हे मिळवायचं,ते मिळवायचं म्हणून चाललेला जीवाचा आटापिटा. कितीही मिळालं तरी कमी होत नाही.

दमतो,थकतो तरी पळणं थांबत नाही. टेन्शन नावाचा वेताळ पाठ सोडत नाही. तो नवनवीन प्रश्न निर्माण करतो  अन आपण उत्तरं देत राहतो. हा सिलसिला थांबत नाही. जगण्याची तऱ्हा निरंतर चालू राहते

स्वप्न,इच्छा प्रत्येकाच्या असतात. काहींच्या पूर्ण होतात तर काहींच्या …. 

चांगल्या-वाईट घटना घडत राहतात. सुख-दु:ख,ऊन सावली सारखं कूस बदलतात  

.. पराकोटीचा आनंदही मिळतो अन टोकाच्या वेदनासुद्धा. 

 

प्रतिकूल परिस्थितीनं निराशा दाटते. उदास वाटतं. वैताग येतो. संयमाचा कस लागतो. तरीही —

सगळं व्यवस्थित होईल, हा विश्वास जगण्यातली उमेद जिवंत ठेवतो. कितीही संकटं आली तरी हार मानली जात नाही. जगण्यातली हीच  गंमत आहे. 

 

नेहमी वाटतं की, आयुष्य म्हणजे चटकदार भेळ… कधी आंबट तर कधी गोड, कधी तिखट,झणझणीत डोळ्यातून पाणी काढणारी – – तरी भेळ आवडीनं खाल्ली जातेच.   

शंभर टक्के कोणीच सुखी नाही अन दु:खीही नाही, कितीही चढ उतार आले तरी जगण्यावरचं ‘प्रेम’ कमी होत नाही. 

– – जगणं म्हणजे – संतोष आनंद यांच्याच शब्दात सांगायचं तर — 

“आँखों में समंदर है, आशाओंका पानी है 

ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी हैं ”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक रामरत्न आणि दोन भारतरत्न ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एक रामरत्न आणि दोन भारतरत्न ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

संस्कृतातील रम धातू म्हणजे रमणे आणि घम धातू म्हणजे ब्रम्हांडाची पोकळी….ही सर्व पोकळी व्यापून उरले ते राम…प्रभु श्री राम ! 

योगी ज्या शून्यात रमतात त्या शून्यास राम म्हणतात. तुलसीदासजी म्हणतात “स्वयं प्रभु श्रीरामांना आपल्या स्वत:च्या नावाचं वर्णन नाही करता येत”…इतकं ते अवर्णनीय आहे.  रामनामाचा केवळ एक उच्चार पुण्यप्रद आणि दोनदा उच्चार तर तब्बल १०८ वेळा नामजप केल्याचं फल देणारा! म्हणून आजवरच्या सर्वच संतांनी राम नाम जपायला सांगितलं, रामचरित्र गायचा आग्रह धरला ! 

ज्यांची प्रतिभा एखाद्या संत-महात्म्यापेक्षा कमी नव्हती असे पंडित नरेंद्र शर्मा यांनी संतांचा हाच विचार आधुनिक भाषेत मांडला. आणि या शब्दांना महान मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतात बांधले. राम रत्नाचे गुण गायला खळे काकांनी एक नव्हे तर दोन दोन रत्नं मिळवली…भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि भारतरत्न लता मंगेशकर! या दोघांशिवाय या ईश्वरी शब्दांना न्याय देणारं दुसरं होतं तरी कोण? पण ही दोन रत्नं एकत्र आणण्याचं काम मोठं अवघड. श्रीनिवासजींचा लतादीदींवर प्रेमाचा अधिकार होताच. मराठीत माऊली ज्ञानोबारायांच्या आणि जगदगुरू तुकोबारायांच्या शब्दांना लतादीदींनी खळे काकांच्याच स्वरमार्गदर्शनाखाली श्रोत्यांच्या काळजापर्यंत पोहोचवले होते. पंडित भीमसेन जोशी हे खरे तर शास्त्रीय गाणारे! परंतू त्यांना या रामनामासाठी राजी करायला वेळ लागला नाही…कारण रामाचे भजन हेचि माझे ध्यान सारख्या रचना त्यांनी आधी गायल्या होत्याच आणि त्यात त्यांना समाधान लाभल्याचा अनुभव होताच.

पंडित नरेंद्र शर्मांना दीदी ‘पप्पा’ म्हणून संबोधित असत. मास्टर विनायकांच्या घरी दीदींची आणि पंडितजींची पहिली भेट झाली होती आणि त्यातून ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या त्या पडल्याच. पंडितचे घर दीदींचे घर बनले आणि त्यांचे सर्व नातेवाईक दीदींचे नातेवाईक. एवढं असूनही पंडितजी दीदींना ‘बेटा,बेटी’ असं काहीही न म्हणता लताजी! असं म्हणत….ते आत्यंतिक प्रेमाने आणि दीदींचा अधिकार जाणून! पंडितजींचे शब्द आणि ते ही श्रीरामस्तुतीचे असं म्हणल्यावर दीदी त्वरीत तयार झाल्या पण पंडित भीमसेन जोशींसारख्या हिमालयासोबत उभं राहण्याच्या कल्पनेनं भांबावून गेल्या. ज्योतीने तेजाची आरती अशी काहीशी त्यांची मनोवस्था. कारण भीमसेनजींचा शास्त्रीय संगीतातील उच्चाधिकार इतरांप्रमाणेच दीदीही जाणून होत्या. पण खळे काकांनी दीदींना आश्वासन दिले….मी आहे सोबत! 

त्यानुसार योजना झाली आणि ‘राम शाम गुणगान’ नावाच्या हिंदी श्रीरामभजनाच्या संगीत अल्बमच्या ध्वनिमुद्रणास आरंभ झाला. इथं श्रीनिवास खळेकाकांनी मात्र एक वेगळा प्रयोग केला. भारदस्त ताना,आलाप घेणा-या पंडित भीमसेनजींना त्यांनी साधे सरळ गायला लावले. अर्थात पंडितजींचे ‘साधे-सरळ’ गाणं सुद्धा अगदी पट्टीच्या गवयांना अवाक करणारे. गाण्याचे शब्द होते…राम का गुणगान करीये! यात आरंभी भीमसेनजींनी तिस-या वेळी म्हणलेला ‘गुणगान’ शब्द ऐकावा काळजीपूर्वक! तर…खळेकाकांनी दीदींना मात्र ताना,आलाप घेण्याची जबाबदारी दिली! साहजिकच दीदींना प्रचंड मानसिक तणाव आला! बरं दीदी काही कच्च्या गुरुंच्या चेल्या नव्हत्या. पिताश्री मास्टर दीनानाथ आणि पुढे उस्ताद अमानत अली खान आणि अमानत खान आणि अन्य काही श्रेष्ठ शास्त्रीय संगीत शिक्षकांकडे दीदी शास्त्रीय शिकल्या होत्याच. जर त्या चित्रपट संगीताकडे वळल्या नसत्या तर त्या निश्चित प्रसिद्ध शास्त्रीय गायिका झाल्या असत्या! 

दोन महासागर काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि गळाभेट घेतात.परंतू एकमेकांना कमी लेखत नाहीत. समोरच्याला आपला रंग आहे तसा ठेवू देतात. पंडितजींनी असेच केले. पण त्यांच्याविषयीच्या परमादरामुळे दीदी नाही म्हटले तरी मनातून हलल्या होत्या. यावर उपाय म्हणून श्रीनिवास खळेंनी ध्वनिमुद्रण करताना या दोन गायकांच्या मध्ये चक्क एक छोटे लाकडी आडोसा (पार्टीशन) लावून घेतले होते. म्हणजे दोघे एकमेकांना पाहू शकणार नाहीत असे. पण दोघांच्याही गाण्यात कुठेही आडोसा असल्याचे जाणवत नाही. एकदा का रामनामाची धून काळजातून कंठात आली की सर्व राममय होऊन जातं. तसंच झालं….राम शाम गुणगान मधील एकेक गाणं म्हणजे एक एक महाकाव्य म्हणावे असे झाले. १९८५ मध्ये प्रसिद्ध झालेला हा संगीतठेवा आजही अत्यंत श्रवणीय आहे! ही प्रत्यक्ष त्या श्रीरामचंद्रांची कृपाच! यात राम का गुणगान हे अहिर भैरव रागातील गाणे म्हणजे दिव्य कोंदणातील अतिदिव्य हीराच! 

आजचे आघाडीचे गायक शंकर महादेवन हे त्यावेळी केवळ अकरा वर्षांचे होते. त्यांनी या गाण्यांसाठी, या अल्बममध्ये वीणावादन केले आहे, हे किती विशेष! 

‘राम शाम गुणगान’ म्हणजे एका रामरत्नाचे गुणगान दोन रत्नांनी करावे हाही एक योगच होता श्रोत्यांच्या नशीबातला. आज ही दोन्ही रत्ने आणि त्यांचे मोल जाणणारे पदमभूषण पंडित नरेंद्र शर्मा आणि पदमभूषण श्रीनिवास खळे हे या जगात नाहीत, पण त्यांची स्वरसृष्टी अमर आहे. 

राम का गुणगान करिये, राम का गुणगान करिये।

राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये॥

राम के गुण गुणचिरंतन,

राम गुण सुमिरन रतन धन।

मनुजता को कर विभूषित,

मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये॥

सगुण ब्रह्म स्वरुप सुन्दर,

सुजन रंजन रूप सुखकर।

राम आत्माराम,आत्माराम का सम्मान करिये, ध्यान धरिये॥

(अर्थातच हे सर्व मी इतरांचे वाचून रामनवमीनिमित्त तुमच्यासमोर मांडले आहे. माहितीमध्ये काही तफावत असेल तर दिलगीर आहे. पण यानिमित्ताने सर्वांच्या मुखातून राम का गुनगान व्हावे अशी इच्छा आहे. वरील ओळी आपण वाचल्या म्हणजे आपल्याकडून गुणगान झालेच की! ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ समस्या… ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ समस्या… ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

बा.भ. बोरकर म्हणतात,

 मी पण ज्यांचे

पक्व फळापरी

सहजपणे गळले हो

 जीवन त्यांना कळले हो!

जीवनाविषयी अगदी नेमकं सांगणाऱ्या या ओळी पण खरोखरच हे इतकं सोपं आहे का?  जीवन म्हणजे नक्की काय हे संपेपर्यंत कळतं का? आपण जन्माला आलो,  जगलो,  म्हणजे नेमकं काय याचा सखोल विचार मनात कधी येतो का?  जीवनाविषयी खूप भाष्ये आहेत.

 जीवन एक रंगभूमी आहे.

 जीवन म्हणजे दोन घडीचा डाव.

 जीवन म्हणजे नदी आणि समुद्राचा संगम.

 जीवन म्हणजे कुणाला माहित नसणारं प्रत्येकाचं निरनिराळं  एक गोष्टीचं पुस्तक.

 यश अपयशाचा लेखा जोखा.

 सुख दुःख यांचे चढउतार.

 जीवन म्हणजे संसार.

 जसा तवा चुल्ह्यावर

 आधी हाताला चटके।

 तेव्हा मिळते भाकर. ।।

जीवनाविषयीचा विचार करताना त्यातली दुर्बोधता जाणवते.  खरोखरच जीवन कोणाला कळले का?  हा अत्यंत मार्मिक प्रश्न डॉ.  निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या समस्या या लघुकाव्यात सुंदरपणे मांडला आहे.  या कवितेचा आपण रसास्वाद घेऊया.

☆ समस्या ☆

 जीवन ही तर एक समस्या

 कुणा न सुटली कुणा उमगली।ध्रु।

 

 कशास आलो कशास जगतो

 मोह मनाचा कुठे गुंततो

 कोण आपुला कोण दुजा हा

गुंता कधीचा कुणाल सुटतो ।।१।।

 

सदैव धडपड हीच व्यथा का

जीव कष्टतो कशा फुकाचा

स्वप्न यशाची दुर्मिळ झाली

मार्ग शोधता नजर पोळली ।२।

 – डॉ.  निशिकांत श्रोत्री

समस्या  या शीर्षकांतर्गत दोनच कडव्यांचे  हे अर्थपूर्ण चिंतनीय गीत आहे.  एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला कळली असते असे आपण म्हणतो तेव्हा ती  खरंच का आपल्याला उमगलेली असते?  जो बोध अपेक्षित असतो तो आपणास झालेला असतो का?  उलट जितके आपण त्या प्रश्नात रुततो तितकी त्यातली समस्या अधिक गंभीरपणे जाणवते.  म्हणूनच ध्रुवपदात डॉ. श्रोत्री म्हणतात,

 जीवन ही तर एक समस्या

कुणा न सुटली कुणा उमगली।ध्रु।

या दोन ओळीत जीवनाविषयीचा नकारात्मकतेने विचार केला आहे असेच वाटते पण त्यात एक वास्तव दडलेलं आहे.  सभोवताली जगणारा माणूस जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरोखरच जाणवतं की जीवन हे सोपं नाही. कुणासाठीच नाही.  ते कसं जगायचं, जीवनाकडे नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे आणि ते कसे जमवायचे हीच एक फार मोठी समस्या आहे,  कोडे आहे.  आणि आजपर्यंत हे कोडे ना समजले ना सुटले.

कवीने वापरलेला समस्या हा शब्द खूप बोलका आहे. इथे समस्या याचा अर्थ फक्त संकट,  आपत्ती,  चिंता, एक घोर प्रश्न असा नाही तर समस्या म्हणजे एक न सुटणारे कोडे.  एक विचित्र गुंतागुंत.  एकमेकांत अडकलेल्या असंख्य धाग्यांचे गाठोडे  आणि माणूस खरोखरच आयुष्यभर हा गुंता सोडवतच जगत असतो.  तो सुटतो का?  कसा सोडवायचा याचे तंत्र त्याला सापडते का हा प्रश्न आहे.

 कशास आलो कशास जगतो

 मोह मनाचा कुठे गुंततो

कोण आपला कोण दुजा हा

 गुंता कधीच कुणा न सुटतो ।१।

नेटाने आयुष्य जगत असताना निराशेचे अनेक क्षण वाट्याला येतात.  ही निराशा वेगवेगळ्या कारणांमुळे आलेली असते. अपयशामुळे, अपेक्षा भंगामुळे, अचानक उद्भवलेल्या अथवा अनपेक्षितपणे बदल झालेल्या परिस्थितीमुळे,” काय वांच्छीले अन काय मिळाले” या भावनेतून, फसगतीतून, विश्वासघातातून… वगैरे वगैरे अनेक कारणांमुळे माणसाच्या जीवनात नैराश्य येते आणि मग त्यावेळी सहजपणे वाटते  का आपण जन्माला आलो?  कशासाठी आपण जगायचं पण तरीही यातला विरोधाभास भेडसावतो. एकाच वेळी जगणं असह्य  झालेलं असतं,  मरावसंही वाटत असतं पण तरीही कुठेतरी जगण्याविषयीचा मोह सुटत नाही.  मनाने मात्र आपण या जगण्यातच गुंतलेले असतो.

फसवणूक तर झालेलीच असते. ज्यांना आपण आपली माणसं म्हणून मनात स्थान दिलेलं असतं त्यांनीच पाठीमागून वार केलेला असतो किंवा कठीण समयी साथ सोडलेली असते. मनात नक्की कोण आपलं कोण परकं, कुणावर विश्वास ठेवावा याचा प्रचंड गोंधळ उडालेला असतो.  मनाला जगण्यापासून पळून जावसं वाटत असतं पण तरीही पावलं मागे खेचली जातात कारण मोह, लोभ यापासून मुक्ती मिळालेली नसते.  पलायनवाद आणि आशावाद यामध्ये सामान्य माणसाची विचित्र होरपळ  होत असते. जगावं की मरावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते आणि डॉक्टर श्रोत्रींनी या द्विधा मनस्थितीचा अत्यंत परिणामकारक असा सहज सुलभ शब्दात या कडव्यातून वेध घेतलेला  आहे हे जाणवतं.

कशास आलो कशास जगतो

या ओळींमागे आणखी एक भावार्थ आहे.

माणसाचा जन्म पूर्वसुकृतानुसारच होतो.

जन्मत:च  त्याने करावयाची कर्मेही ठरलेली असतात. पार्थ का भांबावला. कारण युद्ध करणे,अधर्माशी लढणे हा त्याचा क्षात्रधर्म होता. पण तो मोहात फसला. गुरु बंधुंच्या पाशात गुंतला आणि किंकर्तव्यमूढ झाला. माणसाचाही असाच अर्जुन होतो. तो त्याची कर्मं किंबहुना त्याला त्याची कर्मं कोणती हेच कळत नाही. भलत्याच मोहपाशात अडकतो. भरकटतो,सैरभैर होतो.आणि हीच त्याच्या जीवनाची समस्या बनते.

मोह मनाचा कुठे गुंततो या काव्यपंक्तीला एक सहजपणे प्राप्त झालेली अध्यात्मिक झालर आहे. मनुष्य जीवनाला काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर या षड्रिपुंनी  ग्रासलेलं तर आहेच. स्थितप्रज्ञता मिळवणे  किंवा त्या पायरी पर्यंत पोहोचणे  ही फार मोठी तपस्या आहे आणि जोपर्यंत माणूस हा नर असतो नारायण नसतो तोपर्यंत त्याला या सहा शत्रूंचा वेढा असतोच.  त्यात मोहाची भावना ही अधिक तीव्र असते आणि त्यासाठी माणूस जगत असतो आणि जगताना मोहापायी अनेक दुःखांचा वाटेकरी  होत असतो. चिंतित, पीडित असतो. डॉक्टर श्रोत्रींनी या कडव्यात केलेलं भाष्य हे वरवर पाहता जरी नकारात्मक वाटत असलं तरी ते एक महत्वाचा  संदेश देतं. माणसाच्या वाट्याला दुःख का येतात याचे उत्तर या काव्यात मिळतं. विरक्ती, दूरस्थपणा, अलिप्तता या तत्त्वांचा यात अव्यक्तपणे पाठपुरावा केलेला आहे. एकाच वेळी जेव्हा आपण जीवन ही एक समस्या आहे असं म्हणतो त्याचवेळी त्या समस्येला सोडवण्याचा एक मार्गही त्यांनी सूक्ष्मपणे सुचवला आहे असे वाटते. “सूज्ञास जास्ती काय सांगावे?” हा भाव या कडव्यात जाणवतो.

 सदैव धडपड हीच व्यथा का

 जीव कष्टतो कशा फुकाचा

 स्वप्न यशाची दुर्मिळ झाली

 मार्ग शोधता नजर पोळली ।२।

माणूस आयुष्यभर मृगजळापाठी धावत असतो.  तो एक  तुलनात्मक आयुष्य जगत असतो.  तुलनात्मक आयुष्य म्हणजे जीवघेणी  स्पर्धा.  स्पर्धेत असते अहमहमिका, श्रेष्ठत्वाची भावना, I AM THE BEST  हे सिद्ध करण्याची लालसा आणि त्यासाठी चाललेली अव्याहत धडपड.  जिद्द, महत्त्वाकांक्षा स्वप्नं बाळगू नयेत असे मुळीच नाही. SKY IS THE LIMIT.

आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्याचा पिंजरा  या विचारात तथ्य नाही असे मुळीच नाही. झेप घेणं, भरारी मारणं, ध्येय बाळगणं,  उन्नत प्रगत होणं यात गैर काहीच नाही पण त्याचा अतिरेक वाईट.  पंखातली ताकद अजमावता आली नाही तर नुसतेच कष्ट होतात. फुकाची धावाधाव,  पळापळ हेलपाटणं होतं.  स्वप्न पाहिलं पण यश मिळालं नाही अशीच स्थिती होते.  माणूस दिशाहीन होतो भरकटतो आणि अखेर जे साधायचं ते साधता आलं नाही म्हणून निराश होतो. आयुष्याच्या शेवटी प्रश्न एकच उरतो.. काय मिळालं अखेर आपल्याला? का आपण इतकं थकवलं स्वतःला?  ज्या सुखसमृद्धीच्यापाठी आपण धावत होतो तिला गाठले का? मुळात सुख म्हणजे नेमकं काय?  हे तरी आपल्याला कळलं का? सुखाचा मार्ग शोधता शोधता नजर थकली. समोर येऊन उभा ठाकला तो फक्त अंधार. ही वस्तुस्थिती आहे. हेच माणसाचं पारंपारिक जगणं आहे आणि याच वास्तवाला उलगडवून दाखवताना डॉ. श्रोत्री मिस्कीलपणे त्यात दडलेल्या अर्थाचा, प्रश्नाचा आणि उत्तराचाही वेध घ्यायला लावतात. पाठीवर हात फिरवून सांगतात,” का रे बाबा! स्वतःला इतका कष्टवतोस? तू फक्त कर्म कर.  कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. त्या कर्मांवरही तुझा हक्क आहे. पण कर्मातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करू नकोस.  अपेक्षा मग ती कोणतीही असू देत… यशाची, स्वप्नपूर्तीची, सुखाची, समृद्धीची पण अंतिमतः अपेक्षा दुःख देते.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मलहेतुर्भूमा ते संङ्गोsस्तवकर्मणि।।

समस्येचे मूळ कसे शोधावे याची एक दिशा या काव्यातून दिलेली आहे.  हे काव्य  अत्यंत चिंतनीय आहे. प्रत्येक कडव्याच्यामागे तात्त्विक अर्थ आहे. हे वाचताना मला सहजपणे विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांच्या भाष्यांची आठवण झाली.  ते म्हणत,

“आपले ईहलोकीचे जीवन— कलह, द्वेष, मत्सर, युद्धे, काळजी, भीती, दुःख्खे यांनी भरलेले आहे.  याच्या मुळाशी मनो बुद्धी विषयीचे अज्ञान आहे.  नेमकं हेच ज्ञानमीमांसात्मक सत्य डॉ. श्रोत्रींनी अत्यंत सुबोधपणे समस्या या त्यांच्या लघुकाव्यातून मांडलेलं आहे. या काव्याबद्दल मी गमतीने म्हणेन मूर्ती छोटी पण कीर्ती महान

असे हे आत्मचिंतनात्मक, समत्व योग असलेले, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे  नेणारे उत्कृष्ट गीत.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares