हिन्दी साहित्य – आलेख ☆ ॥ मार्गदर्शक चिंतन॥ -॥ कर्मण्येवाधिकारस्ते’ ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

मार्गदर्शक चिंतन

☆ ॥ कर्मण्येवाधिकारस्ते’ ॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆

अर्थ है ”केवल कर्म पर ही तेरा अधिकार है यह मुहावरा विश्व प्रसिद्ध ग्रन्थ’‘ भगवत्ï-गीता के सुप्रसिद्ध श्लोक का एक चतुर्थांश है। भगवान श्री कृष्ण ने गीता में अर्जुन को समझाने के बहाने विश्व के मानव मात्र को कर्म करने का जो  अमर संदेश दिया है, वह अनुपम लोक कल्याणकारी सिद्धान्त है। इसमें कर्म की महत्ता प्रतिपादित की गई है क्योंकि कर्म के बिना न तो नव सृजन संभव है और न सृष्टि का संचालन। कर्म न केवल जीवन की आवश्यकताओं की पूर्ति के लिए ही आवश्यक है वरन्ï दैनिक जीवन में नवसृजन, प्रसन्नता तथा आनन्द की प्राप्ति और प्रगति व विकास के लिए भी अनिवार्य है। बिना कार्य के कोई उत्पादन संभव नहीं। खेत, हल और बीज के होते हुए भी यदि कि सान श्रम पूर्वक कर्म न करे तो फसल का उत्पादन असंभव हैं। ईंट, सीमेंट, रेत आदि के होते हुए भी यदि मजदूर परिश्रम न करे तो भवन नहीं बन सकता। इसी तरह केवल इच्छा करने मात्र से कोई उपलब्धि नहीं पा सकता। हर छोटी-बड़ी इच्छा को पूरी करने के लिए प्रकृति प्रदत्त समस्त साधनों के होते हुए भी बिना कर्म किए अर्थात्ï सोच-विचार श्रम किए बिना कुछ पाया नहीं जा सकता। कर्म के द्वारा इच्छानुसार अर्जन के लिए ही ईश्वर ने प्राणियों को कर्मेन्द्रियाँ दी हैं। कर्म के द्वारा कुछ भी असंभव नहीं है। आज की बड़ी-बड़ी वैज्ञानिक उपलब्धियाँ  मनुष्य के कठिन श्रम से किए गए कर्म के परिणाम हैं। कर्म की सृजनशीलता के आधार पर ही मनुष्य ने आज अन्तरिक्ष में उड़ान भरी है और कर्म के विश्वास पर ही कल और भी नये-नये चमत्कारों की प्राप्ति के लिये प्रयासरत है। कर्म की महानता को ही प्रतिपादित करते हुए तुलसीदास जी ने मानस में कहा है-

‘कर्म प्रधान विश्व करि राखा’-‘जो जस करिय सो तस फल चाखा॥’

इस संसार में कर्म की प्रमुखता है जो जैसा करता है वैसा ही परिणाम पाता है कर्मठता के विपरीत अकर्मण्यता को अपनाने वाले आलसी, सदा निराश और और उदास बने रहते हैं। केवल कामनाओं के स्वप्न देखते रहते हैं पर पाते कुछ नहीं। ‘दैव दैव आलसी पुकारा’ केवल भाग्य पर पूर्ण भरोसा करना उचित नहीं है। भाग्य भी उसी का साथ देता है जो कर्म करने को उद्यत होते हैं तथा कुछ पाने के लिए महत्वाकांक्षाएँ सँजोते हैं तथा श्रम करते हैं। लोक मान्य तिलक ने भी अपने ग्रंथ ‘गीता-रहस्य’ या ‘कर्म योग शास्त्र’ में कर्म और कत्र्तव्य के लिए मनुष्य को उन्मुख होने की सलाह दी है और गीता की वृहत व्याख्या में जीवन के युद्ध क्षेत्र में एक कर्मठ योद्धा की भाँति डटकर हर समस्या का सामना करने को कहा है। यही पुरुषार्थ है। संत बावरा जी महाराज ने भी कहा गीता की व्याख्या करते हुए कर्म और कर्मठता की पुरजोर वकालत की है। उन्होंने ईश्वर की उपासना और अपने कर्माे व कत्र्तव्यों की पूर्ति में लगे रहकर पूरी करने को श्रेष्ठ माना है। संसार के कर्मक्षेत्र से भागकर सन्यास लेने को श्रेयस्कर नहीं माना है।

यह तो सहज सभी के अनुभव की बात है कि कुछ न करने से बेहतर हमेशा कुछ कर्म करना ही हितकारी है क्योंकि कर्म से ही इच्छा की पूर्ति होती है। शायद इसी आशय को व्यक्त करती है यह सहज सी लोकोक्ति-”बैठे से बेगार भली।’‘ सक्रियता ही जीवन है। हाँ गीता का यह कथन और भी सार गर्भित है कि कर्म तो निरन्तर करते रहना चाहिए पर उसके फल के प्रति आशान्वित न रखकर हर कार्य करना चाहिए। व्यक्ति के हाथ में कर्म करने का अधिकार तो पूरा है और अच्छे कर्म का परिणाम भी अच्छा होता है किन्तु फिर भी फल ईश्वर के हाथ में है। इस भावना से मन लगाकर काम करने से मन में कभी निराशा नहीं होती और निरपेक्ष कत्र्तव्य बोध से, विपरीत परिणाम होने पर भी ईश्वरेच्छा का भाव होने के कारण किसी हितकारी विकास के लाभ की आशा न तो टूटती है और न हार का अनुभव ही होता है।

गीता के जिस परम उपदेश ने हताश और विषप्ण अर्जुन को युद्ध क्षेत्र कुरुक्षेत्र में अपने कत्र्तव्य की पूर्ति के लिए प्राणपण से जूझने को तैयार कर दिया वह हम सभी को कत्र्तव्य परायणता और कर्म के प्रति गहननिष्ठा की प्रेरणा देता है तथा यह शिक्षा नव जीवनदृष्टि देती हुई न तो कभी जीवनरण में हिम्मत हारने की और न ही कभी कर्म से विरत होने की, मूल्यवान सीख देती है। संकट के समय में भी मन को ताजगी और उत्साह से लबरेज रख कत्र्तव्य में जुटाये रखने वाली गीता यही कहती है कि-

आदमी है खुद अपना मित्र, स्वयं करना होता उद्धार,

समय को देता जो सम्मान, साथ देता उसका संसार।

बढ़ाचल, कभी न हिम्मत हार, कभी मत छोड़ कर्म का प्यार,

कर्म है जीवन का आनन्द, यही है जीवन का आधार॥

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

 ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, म.प्र. भारत पिन ४६२०२३ मो ७०००३७५७९८ [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे माहेर… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ माझे माहेर… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘पहिल्याच सरीचा ओला सुवास आला

माहेरच्या दिसांचा, क्षण एक भास झाला…’

होय,आषाढाचे सावळे गच्च मेघ आकाशात दाटी करतात,भिरभिर गार गार वारा चहूबाजूस भिरभिरू लागतो आणि मग मन आपोआपच पंढरीकडे धावू लागते. 

माझे माहेर पंढरी ।  आहे भीवरेच्या तिरी ।।

आषाढ लागताच माहेरची ओढ लागून रहाते.डोळ्यांपुढं पंढरीची वाट दिसू लागते . तन मनात टाळ मृदंग दुमदुमत रहातो अन सुरू होते माहेरी जाण्याची लगबग ! 

सामान ..सुमान ..आवराआवरी ..अहं ! माहेराला जाताना मुळी चिंता कसली? तिथं काळजी घ्यायला आहेत ना मायेची माणसे !आपण फक्त तिथवर जायचं बस्स ! संसारातल्या चिंता,कटकटी ,ताण तणावापासून मुक्त होऊन पुन्हा नव्यानं आव्हान स्वीकारायला सज्ज व्हायला माहेरात थोडे दिवस जावेच नै का ?

मोह मायेपासून थोडे दिवस का होईना अलिप्त व्हावं–संसाराच्या चिंता त्या जगंनीयंत्या विठू माऊलीच्या पायी वहायला…तो घेईल ना आपली काळजी, मग कशाला व्यर्थ चिंता ?आपण फक्त निश्चिन्त मनाने सगळं जिथल्या तिथं टाकून माहेराची वाट चालू लागायची. त्याला डोळे भरून पहाण्यासाठी, त्याला हृदयात जपण्यासाठी,अवघा देह त्याच्या त्या सावळ्या रुपात एकवटण्यासाठी !

एक पोत्याची खोळ , डोईवर तुळस ,चारदोन मोजके आवश्यक कपडे न टाळ– बस्स ! पंढरीचा प्रवास सुरु होतो –वाऱ्याच्या चिपळ्या दुतर्फा पिकांतून ,झाडाच्या पानातून वाजत रहातात—‘ जय जय रामकृष्ण हरी…’ त्यांना सुद्धा वर्षोनवर्षीच्या या जयघोषाची जणू सवय जडलीय.वारकरी चालू लागले की मग झाडांना ,पशु पक्ष्यान्नासुद्धा  त्या तालातच डुलावं ,झुलावं आणि गावं वाटू लागतं .भुरभुर पावसात आनंदाने चिंब होऊन ती सुद्धा विठुरायाशी एकरूप होतात. तहान भूक हरपून पावलं फक्त चालत रहातात ..नामघोष अंतर्मनी निनादत…तू कोण ? मी कोण? कुठला  ? नाव ? गाव ?– स्व विसरून त्या पंढरीच्या वाटेवरील गर्दीतला एक ठिपका ! पाय दुखतात,सुजतात पण पर्वा कसली? चालत रहायचं फक्त. क्षण एक विसावा घ्यावा, एकमेकांचा हालहवाल पुसावा अन झपझप आनंदाने चालू लागावं पाऊस वाऱ्याला झेलत.

माऊली ..माऊली ..येते ग्यानबा तुक्याची पालखी ..अन तल्लीन होतात सारीच गात्रे .. नुरते भान देहाचे मग काही … ओथंबते चिंब चिंब मन भक्ती रसात . मग पावलं चालत नाहीत तर मन चालत रहातं, पीस होऊन तरंगत रहातं  आभाळभर.

टाळांचा आवाज गगनाला भिडतो ,मृदंग खोल खोल काळजाला भिडतो, आणि माहेर  जवळ आल्याची ग्वाही देतो.

अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर..।।

पंढरपुरात घरंगळत घरंगळत कधी दाखल होतो कळतच नाही. चंद्रभागेच्या त्या वाळवंटात जिथं तिथं विठू हसतहसत बाहू पसरून आलिंगन देत रहातो सगळ्यांना आणि क्षेम विचारत रहातो, “ फार त्रास नाही नाझाला येताना ? सर्वजण आलात ना व्यवस्थित ? पाठीमागे नाही ना उरले कोणी? “

गार गार वाऱ्यात रात्री  विठूच्या मायेची सावळी उबदार घोंगडी अलगद सगळ्या लेकरांना कुशीत घेते. शांत शांत सुखाची झोप प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईच्या कुशीत..कशाला हवी मऊ मऊ पिसाची गादी ,उशी अन उबदार दुलई ? आभाळाच्या मंडपाखाली सर्व भेदाभेद मिटून जातात. गरीब-श्रीमंत,उच्च -नीच ,लहान- मोठा…सगळे एकजात एकसारखे !

काकड आरती ,भजन कीर्तन ,नामसंकीर्तन– पावलं मन देह थिरकू लागतो तालासुरात …आनंदाचा पूर ओसंडून वहात रहातो मनामनातून पंढरपुरात. अबीर बुक्का,ओल्या तुळशीमाळेचा  सुगंध आसमंतात दरवळू लागतो. अवघा देह पंढरपूर होतो.

सावळे सुंदर …रूप मनोहर

राहो निरंतर हृदयी माझे….. 

झुंबड उडते दर्शनाला ….निमिषार्ध एक चरणावर डोकं ठेवून मागणं  मागायला ..पण काय बरं मागायच होतं ?

मागणे न काही सांगण्यास आलो

आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

आत्तापर्यंत इतकी पायपीट केली ती काही मागण्यासाठी ?छे ! फक्त त्याचं रूप डोळे भरून साठवायला ..आणि तो क्षण येतो ..निमिषार्धात आपलं डोकं चरणांवर विसावतं  अन फक्त ‘ सुखी ठेव सगळ्यांना ‘ अशी विश्वकल्याण आणि विश्वसुखाची याचना होते, कारण मीपण मागेच कुठेतरी गळून पडते. नेत्री अश्रुधारा वाहू लागतात. सोडावे वाटत नाहीत ते चरण ..तरी सोडावे लागतात. गर्दीत पुन्हा कुणीतरी मागे खेचते अन पुन्हा एक जडभार ठिपका घरंगळत घरंगळत जातो वैष्णवांच्या गर्दीत.अणू रेणूत विठ्ठल साठवून.

कुंकू ,अबीर ,प्रसाद, लाखेच्या बांगड्या …आठवत रहातात माहेराला येताना पाय धरलेल्यांच्या मागण्या आणि सुरू होतो परतीचा प्रवास…नको वाटत असतो  तो प्रपंचाचा भार ,पण जावेच लागते माघारी, निदान उपकारापुरता तरी तो पेलण्यासाठी ..जड जड पावलांनी आणि अंतःकरणाने …काहीतरी विसरलेय, चुकलंय ही अनामिक हुरहूर मनात घेऊन …… 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे 

भिंतीवर कॅलेंडर लावले जाते, हे ठीक. पण कॅलेंडरच्याच भिंती पण तयार होतात. कुठे ??????

अहो, रसवंती गृहात!

नवनाथ, गणपती, शंकरपार्वती,  दत्तगुरू, साईबाबा, रामलक्ष्मणसीता, ज्योतिबा,  तुळजाभवानी,  अंबाबाई, तिरूपती यांच्या कॅलेंडरनीच बनलेल्या असतात त्या भिंती! हे सगळे जणू उसाचा रस प्यायला आलेले असतात, त्याचबरोबर राजेश खन्ना पासून रणवीर पर्यंत,  वैजयंती मालापासून आलिया भट पर्यंत  सर्व नटनट्या नटूनथटून हजर असतात. अशा रंगीबेरंगी भिंती,  चिमुकली टेबले आणि बाक, चरकाच्या घुंगरांचा खुळखुळ आवाज आणि आलेलिंबू घालून केलेला तो गोड गार उसाचा रस…अहाहा! त्या छोट्याश्या जागेत केवढा परमानंद असतो, ते तिथे बसून रस प्याल्याशिवाय कळणार नाही. अजूनपर्यंत अशा भिंती शिवाय असलेलं  एकही रसवंतीगृह मी बघितलं नाही.

माझ्या बाबांचे एक मित्र पोलीस होते.त्यांना भेटायला बाबा पोलीस चौकीत गेले होते, मी पण बरोबर होते. तिथे भिंतीवरचे ते गुन्हेगारांचे फोटो बघून मी इतकी घाबरले होते की त्या दिवशी जेवलेच नाही. पुढे कित्येक दिवस त्या भिंतींच्या आठवणींचा धसका मनात होता.

कारागृहाच्या भिंती हे अतिशय दारूण सत्य गुन्हेगारांना स्वीकारावंच लागतं. काळ्याभोर दगडांच्या उंच उंच भिंतींच्या आत काय आहे, हे बाहेरून कधीच कळत नाही. जगापासून दूर ठेवणा-या भिंतीही गुन्हेगारांना काही शिकवत असतील का?

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय बदलले आहे ? ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ काय बदलले आहे ? ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते की, “ जग बदलत आहे “. पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!!

आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!!

वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!!

सूर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!!

फुलाने सुगंध नाही सोडला..,  तर वा-याने वाहणे नाही सोडले…!!!

नदीने आपला मार्ग नाही बदलला.., तर सागराने आपली मर्यादा नाही सोडली…!!!

पक्षांनी विहार करणे नाही सोडले.., निसर्गाने कोमलता नाही सोडली.., ईश्वराने दयाळूपणा नाही सोडला…!!!

मग नेमके बदलले आहे ते काय ?—–

 बदलला आहे तो फक्त माणूस.., माणसाने माणूसकी सोडली…!!!

सृष्टी त्रेतायुगात अशीच होती. सत्ययुगात पण अशीच होती. द्वापार युगातही अशीच होती. आणि आता कलियुगातही तशीच आहे…!!!

बदलला आहे फक्त केवळ माणूस आणि त्याचे विचार. पण तो मात्र साऱ्या जगाला दोष देत असतो…!!!

 माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा…!!!

आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की, आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ शकत नाही…!!!

 तसेच जग बदललेय म्हणून जगरहाटीला दोष देऊ नका, समाधानी रहा सर्वांचे आभार माना…!!!

आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!                              

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे 

घरांप्रमाणे आता कार्यालयातही भिंतीना असेच महत्त्वाचे स्थान आहे. नवीन पद्धतीप्रमाणे Corporate offices मध्ये कमी उंचीच्या फायबर ग्लासच्या पार्टिशन्स करतात,  हेतु हा की प्रत्येक कर्मचा-याची काम करताना एकाग्रता साधणे, अलगपणा जपणे, त्याचबरोबर सहका-यांना मदतही करणे. या छोट्या उंचीच्या  भिंतींचे विचार किती उच्च आहेत नाही?

चीनची भिंत पूर्वी पासून प्रसिद्ध. गेल्या शतकापासून या भिंतीला फक्त लांबीचे महत्त्व उरले आहे. कारण जगाने चीनकडे किंवा चीनने जगाकडे ही भिंत ओलांडून संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याची उपयुक्तता आणि परिणाम किंवा सौहार्द की विनाश,  हा विषय वेगळा!

पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी मधली भिंत पडली. पण ती पडल्यानंतर खरंच पूर्व-पश्चिम जर्मनी तले अंतर कमी झाले व संबंध चांगले झाले.

शाळेच्या भिंतींची प्रत्येक वीट,  प्रत्येक चिरा वंदनीय असतात. भिंतीवरचे बाराखडीचे, अक्षरांचे, शब्दांचे, अंकांचे, पाढ्यांचे तक्ते,  सुविचारांनी रंगलेल्या भिंती कोणीच विसरणार नाही.  वर्गात आता भिंतीवर फळ्याबरोबर digital screens ही असतात. मातीच्या गोळ्याला सुबक आकार देऊन छोटुल्याला मोठा करणा-या शाळेच्या भिंतीं…..

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी पाहिलेला सुखी माणूस…व त्याचा ७०% चा मंत्र ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

??

☆ मी पाहिलेला सुखी माणूस व त्याचा ७०% चा मंत्र ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

१) दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी लीगल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होतो. ती एक अमेरिकन कंपनी होती, व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा पुरवायचा. तो जर्मनीमध्ये जन्मलेला, त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण जर्मनीमध्ये झाले. त्यानंतर त्याने पार्टटाईम नोकरी करून त्याचे इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केले. नंतर तो त्या सॉफ्टवेअर कंपनीत CTO म्हणून काम करू लागला. त्याच्यासोबत बऱ्याच वेळा संपर्क होत असल्याने बऱ्यापैकी ओळख झालेली. त्याचे घर ७०० ते ८०० स्क्वेअरफूट इतके लहान आहे. परंतु त्याचे वार्षिक वेतन तीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपये होतात. त्याची पत्नी पेशाने डॉक्टर आहे. तरी सुध्दा त्याचे घर लहान आहे, म्हणजे अमेरिकेत अशी घरे सर्वात लहान समजली जातात. तो साधी कार व आयफोनचे साधे मॉडेल वापरतो. मोजकेच कपडे, एक छोटीशी डायरी, मोजकेच ८-१० मित्र.. कमीत कमी तणावात काम करणारा व कामानिमित्त जगभर फिरणारा असा हा माणूस– त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने ७०% चा एक मंत्र सांगितला. 

२) महाग फोन : आपल्या देशात बरेच जण स्टाईल व दिखावा करण्यासाठी महागडा आयफोन वापरतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे एक लाखापर्यंत मिळते. परंतु त्यातले ७०% फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्सव्यतिरिक्त फोनचा वापर सोशलमीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे १० हजाराच्या स्वस्त फोनमध्ये सुध्दा केली जाऊ शकतात, म्हणजे महागड्या फोनमध्ये ७०% फंक्शन व aps निरुपयोगी असतात.

३) महागडे घर : आजकाल मोठमोठे बंगले बांधले जातात किंवा उच्चभ्रू वसाहतीत थ्री-बीएचके, फोर-बीएचके फ्लॅट किंवा ड्युप्लेक्स खरेदी करण्याचे बऱ्याच जणांना फॅड असते, परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ ३०% उपयोग आपण करतो. जे अशी घरे कर्ज काढून घेतात, ते आपला ७०% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हप्ते भरण्यासाठी अधिक काम करावे लागते.

४) महागडी कार : हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रॅंडची घेतात. परंतु त्याचा वापर हा केवळ ३०% च होत असतो. मुंबईतले लोक कार तर घेतात. परंतू सुरूवातीचे काही दिवस वगळता नंतर लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबियांसोबत बाहेर प्रवास क्वचितच होतो. तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळ जवळ ७०% उपयोगात आणली जात नाही. तिचा वापर हा सरासरी ३०% च केला जातो.

५) महागडे कपडे : उच्च, आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून लोक ब्रॅंडेड रेडीमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रॅंडेड व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते. परंतू हे कपडे खूप कमी, म्हणजे  फक्त ठराविक वेळीच वापरले जातात, एरवी कपाटातच पडून राहतात.  म्हणजे हे कपडे ७०% निरुपयोगी असतात. लग्नातला सूट ९९% जण परत वापरतच नाहीत. 

६) मित्र/नातेवाईक : प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात. ते आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्यासोबत सहभागी होतात. परंतु यातले ७०% नातेवाईक निरुपयोगी असतात , कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता तेव्हा त्यापैकी ७०% लोक हे आपल्यापासून दूर होतात, किंवा गरजेच्या वेळी मदत नाही करत. गर्दीपेक्षा दर्दी लोकांत रहा.

७) कमाविलेला पैसा : आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते, ज्या व्यक्तीजवळ प्रचंड संपत्ती असते, तो त्यातल्या केवळ ३०% संपत्तीचाच उपयोग करत असतो. त्यापैकी ७०% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अतिप्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कमवितो हेच कळत नाही. पोरांसाठी कितीही कमवून ठेवा, तुम्ही मेल्यावर ते विकूनच  खाणार. काही मूर्ख रिटायर झाल्यावर बंगला बांधतात व दोन-तीन वर्षानी मरून जातात. शेवटी त्या बंगल्यात त्याचा हार घातलेला फोटो असतो. फोटो अडकवायला बंगला बांधता का? 

८) भांडी व साड्या : आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात. परंतु त्यापैकी ७०% भांडी ही विनावापरामुळे धूळ खात पडलेली असतात व दैनंदिन वापरासाठी ठरलेलीच ३०% भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बऱ्याच ठिकाणी आधुनिक लाईफस्टाईल म्हणून कितीतरी बायका साड्या नेसत नाहीत. इतर कपडे वापरतात. आणि फक्त ठराविक कार्यक्रम समारंभात साड्या नेसतात . त्यामुळे त्यांचाही ७०% वापर होतच नाही.

आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत ७०% पैसा, वेळ, संसाधने, वस्तु वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमावण्याचे, महागड्या वस्तु खरेदी करण्याचे वेड असते. परंतु पाश्चात्य देशातील लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुध्दीमत्ता विकास, अनुभव व जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर अधिक भर देतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात. त्यांच्याकडे अनावश्यक गोष्टींचे ओझे नसते. 

Do not collect assets… Collect happiness,  & achievement, experience  & enjoyment in life… Earn honour… Earn respect… Earn Name. 

CTO च्या वेतनाच्या तुलनेत त्याचा खर्च फक्त २०% होता.  त्यामुळे तो ९९% तणावरहित काम करू शकत होता व खूप आनंदी होता. 

त्याने एकच अत्यंत महत्वाचा संदेश दिला,  ” Do not buy, hold, own anything which you can’t use, consume, monitor. Do not carry any unnecessary weight or burdens on your head, mind and brain.”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

(“पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली… ) इथून पुढे —–   

सैनिक पुढे म्हणाला, ” मी म्हणालो, ” त्यांचा गोळीबार चालूच राहील… वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही… मी हे उरलेले तीस फुट अंतर जिवावर उदार होऊन जातो, म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्याच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या खंदक (बंकर) कडे पळत जातो आणि हातबाॅम्ब (ग्रेनेड) टाकून तो उध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या.” 

मी हातात हातबाॅम्ब (ग्रेनेड) घेऊन शत्रूच्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहिले व म्हणाला ‘ तू वेडा आहेस का..? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत…. आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण (कव्हरिंग) दे,’– आणि उत्तराची वाट न पाहता, जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकरच्या दिशेने पळत सुटला.”

“ पाकिस्तानी हेवी मशीनगन (H.M.G.) च्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीनगनमधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”

“ सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर. मी त्यांचे डोके हातात धरले, त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला. “ 

“ मी आपल्या वरिष्ठांना, तुमच्या गावी त्याचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी मला देण्याची विनंती केली.  परंतु सर., मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगिरीवर मला पाठविण्यात आले.”

“कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतिम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहिली असती. ते मी करू शकलो नाही. पण मला ही फूलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर. ” आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला.

शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मूक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभीर्याने पाहिले आणि सैनिकानेही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले.

शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहित नाही. आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, “ माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सदरा विकत घेतला होता. पण तो आला नाही. आणि आली… त्याच्या वीरमृत्यूची बातमी…”

“आता तो सदरा कोण घालेल ? … जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तेथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा याठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती. परंतू आता मला माहित आहे की हा सदरा कुणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या.”

त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्विकारले.

त्या कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते “ जय हिंद ।” 

आत्ता हे जाणण्याची वेळ आली आहे …..

कारगिल हिरोचे नाव: कॅप्टन विक्रम बत्रा.

हिरोच्या वडिलांचे नाव: गिरधारी लाल बत्रा.

हिरोच्या आईचे नाव: कमल कांता.

माझ्या प्रिय मित्रांनो, हे लोक आमचे वास्तविक नायक आहेत.

या बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवू या.

Celebrate the Real Activists and not Just Celebrities.

हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे. 

जयहिंद. 

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ते, ती आणि मी कुकरी क्लासेस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 ते, ती आणि मी कुकरी क्लासेस !😅💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“पंत, पंत, पंत हे आता तुम्हीं नवीन कुकरी क्लासच काय काढलंय मधेच ?”

“अरे मोऱ्या थांब थांब, असं ओरडायला काय झालं तुला एकदम आणि आमचा पेपर आणलास का ते सांग आधी ?”

“आणलाय, हा घ्या आणि बोला !”

“काय बोलू मोऱ्या ? मस्त पावसाला सुरवात झाल्ये ! वाटलं नव्हतं की हा परत इतक्या लवकर येईल !”

“पंत, मी तुम्हांला तुम्हीं चाळीत चालू करणार असलेल्या कुकरी क्लास बद्दल विचारतोय आणि तुम्ही पावसाचं काय सांगता आहात मला !”

“अरे मोऱ्या मला वाटलं असा मस्त पाऊस पडतोय तर तुला काकूच्या हातचा आलं घातलेला चहा हवा असेल आधी, म्हणून म्हटलं !”

“पंत चहाच नंतर बघू ! आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या !”

“कुठला प्रश्न मोऱ्या ?”

“तुम्ही चाळीत कुकरी क्लास चालू करणार आहात आणि त्याला लेले काका, जोशी काकांच ऑब्जेकशन आहे आणि चाळीचा सेक्रेटरी या नात्याने त्या दोघांनी माझ्याकडे तशी लेखी तक्रार पण केली आहे !”

“मोऱ्या, त्या घाऱ्या जोशाला आणि त्या बिनडोक लेल्याला काडीची नाही  अक्कल, तेव्हा तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देवू नकोस !”

“असं कसं पंत, चाळीचा सेक्रेटरी या नात्याने मला त्यांच्या तक्रारीची दखल घेणं भाग आहे !”

“बरं बरं, काय तक्रार आहे त्यांची?”

“तुम्ही हा कुकरी क्लास चाळीत सुरु करू नये असं त्यांच म्हणणं आहे आणि त्या लेखी तक्रारीवर पाठिंबा म्हणून 23 चाळकऱ्यानी सह्या पण केल्या आहेत !”

“अरे पण का ?”

“पंत, कारण मागे तुम्हीं चाळीत योगासनाचे फुकट वर्ग चालू केलेत, त्यात जोशी काकूंचा पाय फ्र्याक्चर झाला होता, आठवतंय ना ?”

“नं आठवायला काय झालंय मोऱ्या ? अरे ही गेल्या महिन्यातच घडलेली गोष्ट ! अरे मी त्या बयेला सांगितल, की हे विचित्रासन तू करू नकोस, तुझं वजन जास्त आहे ! तरी ऐकायला म्हणून तयार नाही ती बया आणि घेतलान पाय फ्र्याक्चर करून, त्याला मी काय करणार ?”

“आणि लेले काकूंच्या हाताचं काय ?”

“अरे मोऱ्या मी त्या महामयेला म्हटलं, हे मयुरासन तुला जमेल असं वाटत नाही तर तू ते करू नकोस, त्या ऐवजी मी तुला दुसरं आसन सांगतो !”

“मग ?”

“मग काय मग मोऱ्या ? अरे लेल्याची बायको शोभयला नको ती महामाया, तो एक हट्टी तर ही दहा हट्टी !”

“म्हणजे ?”

“अरे हट्टास पेटून केलेन तीन मयुरासन आणि घेतलान हात मोडून, त्याला मी कसा जबाबदार सांग बरं मला ?”

“बरोबर आहे तुमच पंत, पण तुम्ही हा कुकरी क्लास चालू करू नये असं त्यानी तक्रारीत म्हटलंय, म्हणून मी तुमच्याकडे आलो !”

“अरे पण मोऱ्या, हा कुकरी क्लास सुद्धा मी योगाच्या क्लास सारखा फुकट चालू करतोय, तर त्याला त्यांच का ऑब्जेक्शन हे सांगशील का मला जरा ?”

“सांगतो ना पंत, हा कुकरी क्लास चाळीत सुरु करून तुम्ही चाळीत हिंसेचा प्रचार आणि प्रसार करणार आहात, असं त्यांच म्हणणं आहे !”

“हिंसा ?”

“हॊ, आता तुम्ही कुकरीचे क्लास घेतांना, ती कशी चालवायची, कसे वार करायचे, कशी फेकून मारायची हेच शिकवणार नां? मग एक प्रकारे हा हिंसेचा प्रचार आणि प्रसारच नाही का ?”

“बघितलंस, बघितलंस काय अकलेचे दिवे पाजळतायत तुझे लेले काका आणि जोशी काका !”

“म्हणजे ? मी नाही समजलो पंत !”

“मोऱ्या, अरे त्या दोन बैलांना वाटलं मी कुकरी क्लास घेतोय म्हणजे नेपाळी गुरखा लोकं जी कुकरी वापरतात, ती कशी चालवायची हे मी त्या क्लास मध्ये शिकवणार म्हणून !”

“हॊ, मला पण तसंच वाटलं, म्हणून मी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नां पंत !”

“मोऱ्या गाढवा, अरे तू तर चांगला शिकला सवरलेला आजचा तरुण आणि तुला कुकरीचा तोच एक अर्थ माहित आहे ? दुसरा अर्थ माहित नाही ?”

“आहे ना पंत, जेवण बनवणे !”

“अरे बैला, मग त्या दोन नंदी बैलांना सांगितलं का नाहीस तसं ?”

“सॉरी पंत, पण तेंव्हा लक्षात आलं नाही माझ्या.  पण मग तुम्ही तुमच्या क्लासच नांव ‘ते, ति आणि मी कुकरी क्लासेस’ असं विचित्र का ठेवलंय ?”

“मोऱ्या, जेवण करतांना अत्यावश्यक असलेल्या तीन पदार्थांच्या नावांचे शॉर्टकट आहेत ते !”

“म्हणजे काय पंत ?”

“अरे बल्लवा, तू…”

“पंत मी मोरू, हा बल्लव कोण आणलात तुम्ही मधेच ?”

“मोऱ्या, अरे मला तुला बैला म्हणायचं होतं पण चुकून बल्लवा असं तोंडातून बाहेर पडलं !”

“ठीक आहे पंत, पण ते तुम्ही तुमच्या कुकरी क्लासच्या नावाच्या शॉर्टकटच काहीतरी सांगत होतात !”

“हां, म्हणजे असं बघ, कुठलही जेवण करतांना आपल्याला तेल, तिखट आणि मीठ यांची गरज लागतेच लागते, हॊ की नाही ?”

“बरोबर पंत !”

“मोऱ्या, म्हणूनच आजच्या तुमच्या जमान्यात शोभेल असं ट्रेंडी नांव मी माझ्या कुकरी क्लासला दिलं आहे !”

“धन्य आहे तुमची पंत !”

© प्रमोद वामन वर्तक

०८-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे 

सर्वसाधारणपणे घराच्या बाहेरच्या भिंतींवरून इमारतीचे आकारमान,  घरमालकाची आर्थिक सुस्थिती आणि बांधकामाचे कौशल्य व्यक्त होते. खरी ओळख असते ती, घरातल्या आतल्या भिंतींची,.

पूर्वी भिंतीवर पूर्वजांचे फोटो, अर्थात ब्लॅक अॅड व्हाईट.  देवांचे फोटो,  राजा रविवर्म्याची चित्रे ओळीने लावलेली असत. आता एखादी कलाकृती,  नैसर्गिक देखावा यांच्या फ्रेम्स असतात. हल्ली चायनीज शुभचिन्हे लावायची फॅशन आहे. भिंतीवर ची अशी प्रतिके घरातल्यांची मनोवृत्ती व्यक्त करतात.

हल्ली खूपशा घरात वास्तुशास्त्रानुसार फ्रेम्स आणि पिरॅमिड्स असतात. जास्त करून बहुमजली सदनिकांमध्ये अशा प्रकाराच्या वस्तू असतात. सहाजिकच आहे, कष्टांनं मिळवलेल्या वास्तूमध्ये सुख, शांती, समाधान,  प्रगती असावी असे वाटणे नैसर्गिक आहे आणि तसे उपाय करणे, आवश्यक आहे.

मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते.  तिच्या घरात एकदम सुने सुने वाटत होते. एकाही भिंती वर एकही चित्र, फोटो, फ्रेम्स काहीच नाही.  भिंती अगदी ओक्याबोक्या दिसत होत्या. मला तिची मनःस्थिती माहीत होती. 5-7 वर्षापूर्वी तिचे यजमान गेले. मुले लहान होती. बिचारी कशीबशी संसार पुढे रेटत होती. त्या भिंतींच्या मुकेपणाने तिचं मुकेपण व्यक्त होत होतं.

काही वर्षांपूर्वी भिंतीवर कॅलेंडर असायचेच. एकच नव्हे तर अनेक दिनदर्शिका लावल्या जायच्या. पण आता कॅलेंडर मोबाईल वर उपलब्ध आहे.  त्यामुळे कॅलेंडर भिंतीवरून हातात आले आहे.

ठराविक भिंती ला ठराविक रंग देणे याचाही नियम आहे. अंतर्गत सजावट करणारे व रंगारी लोकां ना ते बरोबर माहीत असतं. भिंतींच्या रंगाचा तिथे रहाणा-या लोकांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो.

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Mother’s day – एक शोकांतिका… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ Mother’s day – एक शोकांतिका… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

खरं तर एक स्त्री रोग तज्ञ म्हणून हे प्रसंग मला नवीन नाहीत.  पण हे सगळे मागच्या तीन ते चार दिवसात एकत्रित घडलेत . Mother’s day च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आईप्रती भावनांचा जो काही धुमाकूळ घातला जातोय, आजचा लेख त्यावर शोकांतिका म्हणून नक्की वाचा ! एकच वाटतं, अजूनही २०२२ साली, नको तो जन्म बाईचा….

प्रसंग १

१९ वर्षाची पहिलटकरीण,  बाळाचे ठोके कमी होताहेत  म्हणून सिझरला शिफ्ट करत असताना, नवरा हात जोडून, ” मॅडम, बाळ वाचेल ना? लवकर करा सीझर ….” तोच नवरा मुलगी झाली हे कळल्यावर तोंडावर सांगून गेला, ” आधीच्या दोन बायकांना मुलीच झाल्या म्हणून तिसरं लग्न केलं होतं, हिलाही मुलगीच झाली. माझा आणि हिचा काही संबंध नाही….” 

तिसरं लग्न त्याचं, हिचं पहिलं? कोणी लावलं? इतकी लग्न officially कसं  करू शकतं कोणी? आता ही काय करणार? सगळे प्रश्न अनुत्तरित ठेवून तो माझ्या डोळ्यासमोर निघून गेला.

प्रसंग २

प्रचंड सुजलेली , BP वाढलेली, दिवस पूर्ण भरलेली बाई आणि नवरा लेबर रुमला आले. येताच पहिलं वाक्य, पैसे नाहीत, करायला कुणी नाही. हॉस्पिटल मॅनेजमेंटला फोन करून बिलात सवलत मिळवून घेतली. डिलिव्हरी झाल्यावर गुंतागुंतीमुळे पेशंटला ICU त ठेवले. पैशाची सोय करून येतो म्हणून तिला लेबर रूममध्ये सोडून गेलेला नवरा अजूनही परत आलेला नाही. तिला घरच्यांचा नंबरही पाठ नाही. हॉस्पिटलने, डॉक्टरांनी कशी आणि किती जबाबदारी घ्यायची ? आहे उत्तर ? 

प्रसंग ३

२७ वर्षीय बाई, परवा रात्रीपासून ब्लिडिंग होतंय म्हणून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत दाखल. नाडी १३०, bp ८०/५०, पांढरीफटक पडली होती. हिमोग्लोबिन रिपोर्ट आला ३ ग्रॅम. योग्य ते उपचार, रक्त देऊन तिला सेटल केल्यावर रागावले, ” इतकं कशाला अंगावर काढायचं? यायचं ना लगेच… जीवावर बेतलं असतं .” तिचं त्यावर उत्तर, ” ताई, नवऱ्याला दोन दिवस सांगते आहे, दारूला पैसे असतात पण मला दवाखान्यात न्यायला नाही. चक्कर येऊन पडले म्हणून उचलून आणली “

–  काय बोलणार, आहे उत्तर ?

प्रसंग ४

गर्भनलिकेत राहिलेला गर्भ फुटून ( ectopic pregnancy ) पोटात रक्तस्त्राव झाला होता. Emergency ऑपेरेशन करून त्या बाजूची गर्भनलिका काढून टाकली आणि बाईचा जीव वाचला. नवऱ्याची प्रतिक्रिया, ” दुसऱ्या नळीवर प्रेग्नन्सी राहीलच असं लिहून द्या, तरच बिल भरतो. नाहीतर एवढ्या बिलात तर दुसरं लग्न होईल माझं….” 

— चूक डॉक्टरची, तिची की नवऱ्याच्या प्रवृत्तीची ? 

काल २४ तासांची ड्युटी करून हा लेख लिहिण्याचा अट्टहास मी एवढ्यासाठी केला की उद्या mother’s day म्हणून खूप कौतुक करतांना ह्या असहाय्य आयांची तुम्हाला आठवण यावी. अरे, नका देऊ आईला लाखोंचे गिफ्ट्स, द्या एका स्त्रीला सन्मान, काळजी घ्या तिच्या आरोग्याची. बदला दृष्टिकोन तिला creation आणि recreation चे साधन म्हणून बघण्याचा !

एक कळकळीची विनंती, आजूबाजूला अशी महिला दिसली तर जरूर मदत (उपकार नाही) करा. Mothers day ला घ्या ना विकत १०० लोहाच्या गोळ्या आणि वाटा तुमच्या घरातल्या कामवाल्या बायांना, सिक्युरिटीच्या बायकांना किंवा साईटवर काम करणाऱ्या महिलांना. घेऊन जा एखाद्या प्रेग्नन्ट गरीब महिलेला दवाखान्यात किंवा द्या तिला सकस आहाराचं पॅकेट !

— प्रत्येक स्त्री मध्ये आई बघा, आई बघा….

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर (स्त्री रोग तज्ञ)

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares