(प्रत्येक कवि की कविता के सृजन के पीछे कोई न कोई तथ्य होता है, जो कवि को तब तक विचलित करता है, जब तक वह उस कविता की रचना न कर ले। और शायद यही उस कविता की सृजन प्रक्रिया है। किन्तु, इसके पीछे एक संवेदनशील हृदय भी कार्य करता है। ऐसी ही संवेदनशील कवियित्रि सुश्री प्रभा सोनवणे जी ने मेरे अनुरोध को स्वीकार कर “कवितेच्या प्रदेशात” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने हेतु अपनी सहमति दी है। इसके लिए हम आपके आभारी हैं। अब आप प्रत्येक बुधवार को उनकी रचनाओं को पढ़ सकेंगे।
यह सच है कि- कवि को काव्य सृजन की प्रतिभा ईश्वर की देन है। उनके ही शब्दों में “काव्य प्रतिभा ही आपल्याला मिळालेली ईश्वरी देणगी आहे हे नक्की!” आज प्रस्तुत है काव्य सृजन पर उनका आलेख “निर्मिती प्रक्रिया”)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात ☆
☆ निर्मितीप्रक्रिया ☆
मला आठवतंय मी पहिल्यांदा कविता लिहिली ती इयत्ता आठवीत असताना हस्तलिखितासाठी, *माँ पाठशाला* या शीर्षकाची ती हिंदी कविता होती, आठवी ते अकरावी या काळात मी तुरळक हिंदी कविता लिहिल्या, त्या रेडिओ श्रीलंका- रेडिओ लिसनर्स क्लब च्या रेडिओ पत्रिकांमध्ये प्रकाशित ही झाल्या!
१९७० सालापासून कविता सतत माझ्या बरोबर आहे, आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली आहे!
चित्र काव्य, विषयावर आधारित काव्य रचताना, कुठली तरी घटना, स्थळ आपल्या मनात येतं आणि आपण कविता रचत जातो,
आपल्याला आवडलेलं, खुपलेलं, खदखदणारं कवितेत उतरत असतं, मी सकाळ नाट्यवाचन स्पर्धेसाठी ग्रामीण भागात परीक्षक म्हणून जात असताना, नुकतीच घडलेली जवळच्या नात्यातल्या तरूण मुलीच्या आत्महत्येची घटना मनाला क्लेश देत होती, भोर च्या शाळेत नाट्यवाचनाचे परिक्षण करत असताना अचानक रडू कोसळले आणि तिथेच पहिला शेर लिहिला—
*तारूण्यातच कसे स्वतःला संपवले पोरी*
*आयुष्याला असे अचानक थांबवले पोरी*
काफिये रदीफ़ काहीच मनात योजले नव्हते, मी एकीकडे नाट्यवाचन ऐकत होते, विद्यार्थ्यांना, नाटकाला गुण देत होते आणि त्याचवेळी मला शेर सुचत होते….
(स्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की पंचम कड़ी फोटो …।इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
मी_माझी – #5 – फोटो …
ए तू फ्रेममध्ये येत नाहीयेस… संध्याचा अजून जवळ उभी राहा…
पटकन काढ रे, किती वेळ लावतोस… रेड आय येणार नाही ना…
फ्लॅश हवाय का?
Instructions देऊन देऊन फोटोग्राफरला भंडावून सोडतो नाही…
हे सगळं झाल्यावर फोटोग्राफरने say cheese म्हटलं की आपले सुंदर हास्य चेहऱ्यावर आणतो आणि फोटो क्लिक केला जातो…
त्यानंतर जनरली फोटोग्राफर thank you म्हणतो… तो हे म्हणायच्या आधीच आपण, ए बघू बघू कसा आलाय फोटो?
ए काय रे, मी थोडी झाकली गेली आहे ना, पदर नीट नाहीये, अशी अनेक कारणं सांगून त्याला पुन्हा फोटो काढायला भाग पाडतो…
मला नेहमी प्रश्न पडतो, फोटोग्राफर thnq का म्हणत असेल?
आज लक्षात आलं बरं का !
पुन्हा माझ्याकडून फोटो काढून घेऊन नका, परवडणार नाहीत तुमच्या instructions … ???
असो, विनोद बाजूला ठेवू या… पण फोटो म्हटलं की सगळ्यांना किती उत्साह असतो नाही ! प्रत्येकाला तो क्षण capture करायचा असतो, कायमचा… त्यातील आनंद, उत्साह, जोश, सौन्दर्य…. सगळं हवंहवंसं असतं… आणि महत्वाचं म्हणजे कदाचित भविष्यात हे फोटो पाहून हे क्षण पुन्हा जगायचे असतात… खूप गुंतलेले असतो भावनिक, आर्थिक, शारीरिक दृष्ट्या… ज्याने कोणी फोटो काढण्याची concept निर्माण केली त्याला शतशः नमन !
शेवटी काय, जे चांगलं आहे, आपलं आहे ते आपण धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, असं नाही का वाटत… आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, प्रसंग आपल्याला काही ना काही देऊन जातो, आणि तो आपल्या मुठीत पकडण्याचा अट्टहास असतो… पण… एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी… ह्या केसमध्ये फोटोग्राफर आपल्या समोर उभा नसतो, तर तो अंतस्थ असतो… त्यामुळे त्याला instructions देत असताना नक्की काय द्यायच्या आहेत हे ठरवायला वेळ नसतो, त्याची तयारी खूप वर्षांपासून करावी लागते, तेव्हा कुठे थोडं थोडं कळतं की फ्रेममध्ये काय पाहिजे, काय नको, angle कोणता असला पाहिजे, वगैरे… कारण इथे re take घेता येत नाही, एवढाच काय तो फरक… हो ना !
(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। इसके अतिरिक्त आप एक आदर्श एवं सम्माननीय शिक्षिका भी हैं । आपके शैक्षणिक अनुभव अनायास ही हमें अपने बचपन के दिन याद दिला देते हैं। इस संक्षिप्त आलेख में हम अपने समय एवं वर्तमान समय के पलकों और बच्चों की बदलती मानसिकता के सामाजिक प्रभाव /दुष्प्रभाव का अवलोकन करते हैं।
यह आलेख पालकों के माध्यम से उनके बच्चों के लिए है। आज के ही अंक में हम श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी की बच्चों के लिए “लू की आत्मकथा” प्रकाशित कर रहे हैं। आशा है आप सबको पसंद आएगी। हाँ अपने बच्चों/पोते/पोतियों /नाती/नातियों को यह कथा सुनाना मत भूलिएगा। श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी एक प्रसिद्ध बाल साहित्यकार हैं।)
चिमणीचा दात
आजकाल डब्यात पोळी भाजी देण्यापेक्षा बरेचसे पालक मुलांना पाच दहा रूपये देण्यात धन्यता मानतात मग ही मुल चीप्स कुरकूरे इत्यादी फास्टफूड आणून खाण्यात नुसती धन्यताचा नव्हे तर श्रीमंचे लक्षण समजतात कुणाला एक कण न देता खातात तेंव्हा आपले लहानपणीचे दिवस आठवाल्या शिवाय राहात नाहीत. एखादा चिंचेचा आकडा, एखादा आवळा कधीकधी एकच चिंचोका सुद्धा चिमणीच्या दाताने दोनचार जणांना नक्कीच पुरत असे. तो देताना देणाऱ्याला कधीही श्रीमंतीचा गर्व नसायचा किंवा खाणार्यालाही कधीच गरीबी जाणवत नसे. प्रत्येक मित्रा जवळची प्रत्येक वस्तू सर्वांनाच आपली वाटायची. अगदी पूर्ण बिस्कीट पुडा एकट्याने खाल्ला आणलेले पूर्ण फळ एकट्याने फस्त केले अससस अगदी अभावानेच होई.
जी वस्तू चिरून मोडून फोडून देता येत नसे ती नक्कीच चिमणीच्या दाताने दिली जाई कारण आई सांगायची एकट्याने खाल्ले की वटवाघूळच्या जन्माला जाव लागत आणि मग असं एकट दिवसभर लटत राहावं लागतं. तेंव्हा ते अगदी मनोमन पटायचं कारण वटवाघुळाला कधी कुणी मजा करताना मित्रात बागडताना पाहिलेले नव्हते. म्हणूनच वाटून खाण्याची संस्कृती निर्माण झाली.परंतु वरचेवर ही संस्कृती लोप पावताना दिसते.
(स्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की चतुर्थ कड़ी भूक …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
(e-abhivyakti की ओर से सुश्री आरूशी दाते जी का ‘काव्यानन्द प्रतिष्ठान, पुणे’ की ओर से विश्व महिला दिवस पर आयोजित काव्य प्रतिस्पर्धा में प्रथम स्थान प्राप्त करने के उपलक्ष में हार्दिक अभिनंदन।)
मी_माझी – #4 – भूक …
भूक हा शब्दच अनेक उलाढाली घडवून आणायला कारणीभूत ठरतो… हो ना!
शाळेत गेलं की आईने डब्यात काय दिलं असेल? किंवा घरी पोचल्यावर आई खायला काय देईल? हे विचार कायम ऑन असतात,
(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। इसके अतिरिक्त आप एक आदर्श एवं सम्माननीय शिक्षिका भी हैं । आपका यह आलेख निश्चित ही इसका प्रमाण है कि माह में कम से कम एक दिन विद्यार्थियों के लिए “बस्ता मुक्त पाठशाला” प्रयोग उनके सर्वांगीण विकास के लिए कितना आवश्यक है।)
☆ दप्तर मुक्त शाळा ☆
प्रचलित शिक्षण पद्धती ही कृती प्रधान व विद्यार्थी केंद्रित असल्यामुळे ती विद्यार्थ्यांना आनंददायी कशी वाटेल यावर भर असून घोकंपट्टी, अभ्यास, शिक्षा, सक्ती, या गोष्टींना गौण स्थान प्राप्त झाले असून विद्यार्थी स्वछंदी राहून कृतितून शिकला पाहिजे ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात स्विकारली गेल्यामुळे .
दप्तर विना शाळा, बाल आनंद मेळावा, गणितीय बाजार सहल वनभोजन/निसर्ग सहल, परिसर भेट/ क्षेत्र भेट इत्यादी उपक्रमांना महत्त्व प्राप्त झाले..
या पैकीच एक उपक्रम म्हणजे दप्तर विना शाळा महिन्यातून एक दिस आम्ही हा उपक्रम घेतो. या दिवशी मुलांनी दप्तर न घेता शाळा करावयाची असते.
नुतन वर्षा निमित्त आम्ही आज हा उपक्रम घेतला. ससकाळी मुलांनी सर्व बोर्ड ताब्यात घेतले अगदी सुचना फलक सह सुंर हस्ताक्षरात मुलांनी सर्व फलकांवर शुभेच्छा लेखन केले सुंदर सजावट करून. अगदी रांगोळी काढण्या पासून ते सफाई पर्यंत सर्व कामे मुलांनी एकमेकांच्या सहकार्याने केली. सर्व शिक्षक विद्यार्थी यांना शुभेच्छा देऊन झाल्यानंतर लघु मध्यंतर घेतली. त्या नंतर त्या ऐतिहासिक पात्र ठरवून देण्यात आलेले होते त्या साठी लागणारे ढल तलवार इत्यादी भाला पट्टा , बिचवा वाघनखे इ प्रतिकृती मुलांच्या मदतीने तयार केल्या त्यामुळे त्यांना हत्यारे व त्यांचे उपयोग समजले. मधल्या सुट्टी नंतर त्यांना ठरवून दिलेल्या पात्रांचे संवाद म्हणून घेतले. त्यांना यू ट्युब वरील व्हीडीओ दाखवल्यामुळे ते बर्याच प्रमाणात मुलांनी हुबेहूब वटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जे पाठांतर रागवून दडपशाहीने झाले नसते ते पाठांतार मुलांनी उत्तम प्रकारे व सहजतेने केले .शिवाय साभिनय सादरीकरण केल्याने वाचन अस्खलीत केले योग्य स्वराघातासह केले .प्रत्येकाला वेगळा संवाद निवडून घेतलेला असल्यामुळे पूर्ण पुस्तकाची उजळणी झाली तिही न कंटाळता अगदी आनंददायी पद्धतीने. म्हणून महिन्यातून किमान एक दिवस अशी दप्तराविना परंतु नियोजन बद्ध शाळा आवश्य घ्यावी ज्यामुळे अभ्यास तर होतो परंतु तणाव रहीत वातावरणात. यात परस्पर सहकार्य नेतृत्व धाडस सभाधीटपणा इ गुणांचे मूल्यमापन करता येईल अनेक चांगल्या सवई मुलांना लावता येतील.
(स्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की तृतीय कड़ी अथांग …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
सहज डोकावले… तसं डोकावायचं काही कारणही नव्हतं… पण किती वर्षांपासून हे करायचं राहूनच गेलं होतं… राहून गेलं होतं की मी ते मुद्दामून करत नव्हते…?
त्याने काय फरक पडणार आहे? गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात… मग उगाच दोष, आरोप वगैरे कशाला…?
असो, तर मी काय म्हणत होते?
काहीच नाही गं, तू आता काही बोलूच नकोस… फक्त ऐक…
पण काय ऐकू?
शांत हो, गप्प बस, डोळे बंद कर आणि ऐक सगळं…
म्हणजे?
काहीच बोलायचं नाही?
…………………….
सगळं कसं शांत झालं होतं. थोडंसं कोरडं कोरडं वाटत होतं. मी जरा अस्वस्थच झाले होते. पण आज पर्याय नव्हता. एकेक आवाज नाहीसा होऊ लागला, तशी माझी उत्सुकता वाढू लागली. प्रत्येक क्षणी काय घडतंय ह्याकडे लक्ष जायला लागलं. हळू हळू रंगही नाहीसे झाले, तरंग शांत झाले, तसे शहारे बोलू लागले.
सुरुवातीला अर्थ लागत नव्हते, पण आता काठावर बसून समोरच्या डोहातील माझं प्रतिबिंम्ब दिसत होतं, ते माझं आहे ह्यावर विश्वास ठेवताना अनेक गोष्टींनी
मनाभोवती फेर धरायला सुरुवात केली आणि… आणि पुन्हा गोंधळ, आरडा ओरडा, कोलाहल… असं वाटायला लागलं जणू कडेलोट होतोय, त्या डोहात जर मी पडले तर नाका तोंडात पाणी जाऊन जीव गुदमरेल.
नाही, नाही, मला ह्यातून बाहेर काढा, मला जगायचं आहे, हा आक्रोश सुरू झाला… जगण्याच्या धडपडीमध्ये, गटांगळ्या खात खात, त्या थंड पाण्याची बोच सहन करत पोहत राहायचे होते, थांबले तर, होत्याचं नव्हतं होणार हेच माहीत होतं.
आजही नेमकं तेच झालं… हात पाय मारत राहिले, पण एक वेळ अशी आली की माझ्या संघर्षामध्ये मी कुठेच नव्हते… हे लक्षात आलं…
म्हणजे?
ह्याचं उत्तर शोधायलाच हवं. ह्या संघर्षात मी नाही, असं कसं होईल ?
म्हणजे, बघ हं, ह्या डोहाकडेच बघ ना… पाऊस पडला की ह्यात पाणी साठणार, मग लोकं ते पाणी वापरणार, कोणी दगड मारतील, कोणी पोहायची मजा घेतील, कोणी माझ्यासारखे असतील, जे पाण्यात उतरायला कदाचित घाबरतील. आणि पाण्यात उतरले तर त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहताना जीव मेटाकुटीला येईपर्यंत जीव वाचवायचा.
हाच डोह जेव्हा नदीला जाऊन मिळतो, तेव्हा आपल्याला फार कष्ट घ्यायला लागत नाहीत, नाही का! वाहणे आपोआप चालू राहते. तेव्हा एकच दिशा असते, समुद्राची अथांगता गाठणे, होय ना !
फारसं काही कळत नव्हतं. म्हणून मग पाण्यातून बाहेर येऊन काठावर बसले. आणि डोकावू लागले.
प्रपंचरूपी डोहाला सर्वस्व मानून, जगण्याच्या गर्दीत स्वतःला हरवून बसले होते. ह्यातून मार्ग काढत भक्तिमय नदीचा एक भाग बनून परमेश्वराच्या अथांगतेमध्ये झोकून द्यायचं आहे, ह्याची जाणीव झाली, आणि… सगळं शांत झालं, एक अनुभूती मनाचा ताबा घेऊ लागली, जीवाला सतत अस्वस्थ करणारी भावना नष्ट होऊन सगळं हलकं वाटू लागलं, जणू मी पाण्यावर तरंगते आहे. अथांग… !
(स्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की द्वितीय कड़ी स्वतःपण… । इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
स्वतःशी बोलता आलं पाहिजे,
बोलता बोलता थांबता आलं पाहिजे…
हे कसं जमायचं?
ह्याच विचारात स्वतःशी कधी बोललेच नाही,
आणि जेव्हा बोलले, तेव्हा,
स्वतःची ओळख पटेना !
मी कशी आहे, कशी असायला पाहिजे, कशी होते,
का होते, असे अनेक प्रश्न रुंजी घालतात…
उत्तरांच्या जंजाळात मी स्वतःचं स्वतःपण विसरून जाते…
(हमें आपको यह सूचित करते हुए अत्यंत प्रसन्नता का अनुभव हो रहा है कि सुश्री आरुशी दाते जी को हाल ही में साहित्य संपदा द्वारा आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा में उनकी कविता “वसंत” को द्वितीय पुरस्कार से सम्मानित किया गया है। e-abhivyakti की ओर से आपको हार्दिक बधाई।
आप e-abhivyakti में प्रकाशित पुरस्कृत कविता “वसंत” को इस लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं >>> http://bit.ly/2YTTIFX )
प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की प्रथम कड़ी Space । इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे।
ती रुसली आहे हे त्याला माहित होतं, त्यानेही तिचा रुसवा जाण्याची वाट पाहिली… ह्या वाट पाहण्यात दोघांनी स्वतःला योग्य वाटली ती उत्तर घेऊन पुढे वाटचाल केली… मागे फिरण्याचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला…
योग्य अयोग्य ठरवायला मौनातल्या शब्दांना आधारच उरला नव्हता… स्वतःच स्वतःचे पाऊल त्या वाटेकडे न्यायचे नाही हा निर्धार पक्का झाला होता… ती म्हणते हेही माझे प्रेमच आहे, त्याला स्वातंत्र्य देण्याचे …
पण त्याला काही सांगायचं होतं का? असेल तर मग तो काही बोलला का नाही… ? तिच्या मनात हे प्रश्न अजूनही रुंजी घालत आहेत …
तो बोलला नाही, म्हणजे त्याची संमती होती का? की ती त्याची वाद संपवण्याची नवीन युक्ती होती?
Space… space…
की दोघांमधील अंतर?
सामनजस्यातून निर्माण केलेलं?
विचारांच्या स्पेस मधून फिरणं फार कठीण आहे…
ह्याची जाणीव होईल तेव्हा वेळ आणि काळ आपली कामं उरकून पुढे गेलेली असतील का?
अनेकविध प्रश्नांच्या गुंत्यातून बाहेर पडताना एक गोष्ट नक्की लक्षात येईल की आपण विणलेलं जाळं, आणि त्याचं गारुड आपल्यावर नक्की परिणाम करतं हे नक्की !
☆डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्यातील नाते☆
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा राष्ट्र निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर जी के १२८ वीं जंयती पर “काव्य विचार मंच द्वारा राज्यस्तरीय लेख प्रतियोगिता हेतु रचित शोधपूर्ण लेख जिसमें डॉ आंबेडकर जी एवं रमाई जी के सम्बन्धों का उल्लेख मिलता है।) )
उजेडाच्या झाडाखाली, रमा मातेची पाखर.
शब्दा शब्दांतून झरे, तिच्या स्नेहाचा पाझर.. . !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक उजेडाच झाड. रमाबा ई आंबेडकर या नावाची पखरण वैवाहिक जीवनात होताच हे उजेडाच झाड आपल्या कार्य कर्तृत्वाचा परीघ वाढवीत गेलं. रमा वलंगकर हे रमाबाईचे माहेरचे नाव. भायखळ्याच्या भाजी मार्केट मध्ये इ. स. 1906 मध्ये रमाबाई आणि भीमराव आंबेडकर विवाह बद्ध झाले. चौदाव्या वर्षी बाबासाहेबांचे दोनाचे चार हात झाले. अवघ्या नऊ वर्षाची रमाई बाबासाहेबांची सहचारिणी झाली आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले.
गतीमान आयुष्याची, नितीमान वाटचाल
भवसागरी झेलली, सुख दुःखे दरसाल. . .!
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. माहेरची परीस्थिती जेमतेम होती. कुठलाही डामडौल नाही दिखावा नाही. अत्यंत साधेपणाने हा विवाह संपन्न झाला आणि रमाबाईच आयुष्य गतीमान झालं. दाभोळच्या बंदरात वडील मासेमारी करायचे. तीन बहिणी आणि लहान भाऊ असा परिवार असताना घरच्या जबाबदाऱ्या लहानग्या रमा ला स्वीकाराव्या लागल्या. फुलत्या वयात आई, वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून या उजेडाच्या झाडाखाली विसावली.
वैवाहिक जीवन सुरू झाले पण कष्टमय जीवन पाठराखण करीत होते. सासू, सासरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यावेळी रमाई ने बाबासाहेबांना वयाने लहान असूनही खूप मोठा आधार दिला. मायेचं छत हरवलेली रमा प्रतिकूल परिस्थितीचा प्रत्येक वार पावसाची सर झेलावी इतक्या सहजतेने झेलत होती.
जेव्हा रमा वयात आली तेव्हापासून हे मृत्यू सत्र ती अनुभवीत होती. ‘पोटच्या मुलाचे निधन’ हा ही धक्का रमाबाई ने कणखर पणे पचवला.
मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या अजाण वयात रमाईच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. इ.स. १९१३ साली बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार यांचे निधन झाले. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना मुलगा रमेशचा याचे अकाली निधन झाले. १९१७ सालच्या ऑगस्ट मध्येच बाबासाहेबांची सावत्र आई जिजाबाई यांचे निधन झाले. याच दरम्यान मुलगी इंदू, रमाईचा दिर, आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा यांचे निधन झाले . हे मृत्यू सत्र एकोणीशे सव्हीस पर्यंत चालूच राहिले इ.स. १९२१ मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्नचा मृत्यू अविस्मरणीय दुःख या काळात पचवावे लागले. भीमराव आणि रमाई दोघांनी परस्परांना धीर देत,स्वतःला सावरत या परिस्थितीतून मार्ग काढला. रडत बसण्यापेक्षा पडेल ते काम करून संसार सावरण्याची रमाई ची जिद्द महत्वाची ठरली.
संसारात प्रतिकूल परिस्थिती पाठ सोडत नव्हती. प्रसंगी शेणी,गोव-या थापून त्या बाजारात विकून संसार सावरला. भल्या पहाटे उठून रस्त्यावर पडलेले शेण उचलून आणायचे काम सोपे नव्हते पण मोठ्या जिद्दीने रमाई कष्ट करीत राहिले. तिने केलेले हे कष्ट भीमस्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक वेळी उपयोगी पडले.
इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी अतिशय बिकट परिस्थिती आलेली. कुटुंबाची खूपच वाताहत होत होती. दुष्काळाच्या आगीत सारे कुटुंब होरपळत होते भीमरावांच्या समकालीन निष्ठावान कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही आर्थिक मदत रमाई ला देऊ केली. . तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे स्विकारले नाहीत. स्वाभिमानी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी झगडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई भीमराव आंबेडकर.
अनेक नातलगांचे मृत्यू पहाताना रमाई खचत गेली. पण हार न मानता भीमस्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बाबा साहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून काही दुःखे स्वतः पचवीत गेली.त्यांना तातडीने कळविले नाही. परदेशा गेलेल्या बाबासाहेबांना रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. ज्ञानसाधना करताना कुठलाही अडथळा नको म्हणून काही परिवाराचे हालअपेष्टा, संसार खस्ता रमाई ने स्वतः सहन केल्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशी असताना . रमाई एकट्याने संसाराचा डोलारा सांभाळत होती.. घर चालवण्यासाठी तिने शेणी, गोवर्या विकल्या .. सरपणासाठी वणवण फिरत, पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत ती जायची. त्या वेळी बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते या बातमीने बाबासाहेबांना कमी पणा येईल . म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर, रमाई वरळीला जाऊन गोवर्या थापायची काम करायची. मुलांसाठी उपास तापास करत रमाई भीमरावाच्या भीमस्वप्नांना आकार देत गेली.
अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेले बाबासाहेब जेव्हा समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले,तेव्हा ही रमाई अर्धपोटी उपाशी राहून बाबासाहेबांना भक्कम साथ देत गेली. तिच्या सहयोगाने बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करु लागले, पण रमाई ने त्या ज्ञानसाधनेत कधी व्यत्यय येऊ दिला नाही. रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने ,स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत तर केलीच पण पत्नीची सारी कर्तव्ये चोख पार पाडली.
संकटांचा केला नाश, ध्येय पूर्तीचाच ध्यास
कधी ऋतू विरहाचा, कधी सौभाग्याचा श्वास. . !
नाही धडूत नेसाया,तरी हार ना मानली.
भरजरी फेट्यातून, परिस्थिती हाताळली. . !
डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मायदेशी मुंबईत परतले तेव्हा त्यांच्या स्वागताला सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर मुंबई बंदरात आले होते. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी देखील नव्हती. अशावेळेस बोभाटा न करता रमाई ने मोठ्या शिताफिने हा प्रश्न सोडवला. छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा त्याची साडी नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी रमाई सामोरी गेली.
डॉक्टर बाबासाहेब रमाई ला रामू म्हणून हाक मारायचे. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने संपूर्ण बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्यांना शुभेच्छा देत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र या सा-यातून लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते त्या गर्गेदीतून वाट काढीत रमाई जवळ गेलेत्यांनी विचारले,” रामू तू लांब का उभी राहीलीस? ” तेव्हा रमाई म्हणाली,” तुम्हाला भेटण्यासाठी समाज बांधव आतूर झालेले असताना मी तुमचा इथे वेळ घेणे योग्य नाही. मी तर तुमची पत्नीच आहे. आपण एकमेकांना कधीही भेटू शकते” हे पारिवारीक नात रमाई ने जीवापाड जपले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाई प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायची. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर , प्रत्येकाशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात, वाचनात , महत्वाच्या कामात आहेत, नंतर सवडीने भेटा.” असे सांगे. अशी पाठवण करताना रमाई प्रत्येकाचे त् नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत त्या व्यक्तीला नोंद करून ठेवण्यास सांगत.
मानव्याची उषःप्रभा, असणारी, तमाम भीमलेकरांची संजीवनी रमाई संस्काराचे ज्ञानपीठ, मनोमनी रूजवीत गेली. संसार करताना आलेले अडीनडीचे दिवस, शिताफीने दूर केले. अनेक छोट्या मोठ्या गृहोपयोगी वस्तूची सचोटीने विक्री करून पै पे जोडत परीस्थिती सावरणारी रमाई बाबासाहेवांच्या जोडीने समाज कार्यात सहभागी झाली.दागदागिन्यांचा सोस नसलेली रमाई दुसर्याला आनंद देण्यासाठी जगली.
रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली रमाईचे शरिर अतोनात केलेल्या कष्टाने पोखरुन गेल होते.दरम्यान रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच गेला. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला त्यावेळी बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. पण कुठल्याच औषधोपचारारला रमाईचे शरीर साथ देईना. या काळात बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे ती बोलू शकत नव्हत्या. आपल्या रामूला बाबासाहेब स्वतः औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असे. पण काही केल्या रमाईचा आजार बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला . २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांची रामू बाबासाहेबांना सोडून गेली.
बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात बाबासाहेबांनी या भावना शब्दांकित केल्या आहेत. . ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला तेव्हा अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’ आपल्या पत्नीबद्दलच्या,रमाई बद्दलच्या या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या. आणि रमाई भीमराव यांच नात समाज बांधवांच्या काळजात घर करून राहिल.
मान द्यावा, मान घ्यावा, ही रमाईची शिकवण आजही भीम लेकरांच्या मनी, एक एक साठवण.. म्हणून शिलकीत आहे पोलादी पुरूष झालेली रमाई जीवनाच्या वादळात कधी डगमगली नाही. भीमरावाच्या कार्याला, तीन दशकांची साथ देणारी रमाई, अनाथांची नाथ… झाली. अशी, माता, पत्नी, गुणी कन्या जगती आदर्श ठरली. ‘रमा ची रमाई झाली’ तिला समाजाने, मान दिला. तिचे स्वागत सहर्ष… सर्व ठिकाणी केले गेले. तिच्या कर्तृत्वात, संस्काराची मोतीमाळ हीती. तिच्या कार्याची प्रेरणा, सदा सर्वकाळ… मना मनात तेवत राहिल.
घटनेचे शिल्पकार डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जेव्हा जेव्हा घेतल जाईल तेव्हा तेव्हा ही माता रमाई आसवांची शाई बनून जगताला सांगत राहिल.
(सुश्री प्रभा सोनवणे जी हमारी पीढ़ी की एक ज्येष्ठ मराठी साहित्यकार हैं । उनका यह संस्मरण आलेख/संस्मरण निश्चित ही हमारी समवयस्क पीढ़ी को अस्सी के दशक के दिन याद दिला देगा। )
मनस्वी, अविचाराने, अव्यवहार्य असं मी अनेकदा वागलेली आहे.
आई वडिलांची भीती वाटायची, धाक होता. खरंतर चाकोरीबध्द आयुष्य असायला हवं होतं, पण मी चाकोरी बाहेरचे अनुभव घेतले,आठवीत असताना मुली म्हणाल्या कुठेतरी सहलीला जाऊ, एक मैत्रीण म्हणाली, “हिच्या शेतावर जाऊ” – म्हणजे माझ्या, आई परवानगी देणं शक्य नव्हतं, मैत्रिणीच्या शेतावर, जवळच जाणार असं सांगितलं, आमचं गाव, शेत पंधरा किलोमीटर होतं, एसटी नं जावं लागणार होतं जवळ कंपासबॉक्स साठी वडिलांनी दिलेले पैसे होते ते खर्च केले, ट्रीप चा आनंद घेतला, सहाजणी गेलो होतो, सहल छान झाली, त्या सहलीवर आशा देव नावाच्या आमच्या मैत्रिणीने कविताही केली, अर्थातच संध्याकाळी आईला समजलं, बोलणी खावी लागली, पण एक वेगळा अनुभव घेतला! लग्न अतिशय जुन्या मताच्या घरात झालं, हातात बांगड्या, डोक्यावर पदर! मैत्रिणीबरोबर ब्युटीपार्लर मध्ये गेले तिथे ब्युटीशियन म्हणाली, कुरळ्या केसांसाठी बॉयकट बेस्ट, मैत्रीण म्हणाली तिच्या घरी चालणार नाही!पण मी एक दिवस जाऊन बॉयकट करून आले, पण स्ट्रीक्टली डोक्यावर पदर घेऊन वावरले! १९८३ सालची गोष्ट!
कवितेमुळे बाहेरचं जग दिसलं, बॉयकट, बांगड्या न घालणं याला मान्यता मिळाली….म्हणजे कुणी नावं तरी ठेवली नाहीत! कवितेच्या कार्यक्रमांना जाणं हे माझ्यासाठी दिव्यच होतं, विरोध पत्करून बाहेर पडले!
येरवड्याच्या शाळेत नोकरी साठी अर्ज करा,नंतर सुट्टीत बी.एड.करा असे एका सुहृदाने सुचवलं! पण जिद्द, महत्वाकांक्षी काहीच नव्हतं,
पुढे स्वतःचा दिवाळी अंक सुरु केला तिथेही चिकाटी कमी पडली, पुढे एका मोठ्या अंकाच्या संपादकाने स्वतः फोन करून संपादकीय विभागात आमंत्रित केलं, दोन महिने बिनपगारी काम केले, पैसे त्यांनी दिले नाहीत मी मागितले नाहीत, हा अव्यवहारीपणा!
पण त्याची खंत वाटली नाही, तो एक चांगला अनुभव होता, बस रिक्षाचे पैसे अक्कल खाती जमा!
अविचाराचे अनेक प्रसंग घडले, पण मी हे स्वतःच मान्य करते मी आळशी आणि बिनमहत्वाकांक्षी बाई आहे त्या मुळे *जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया*
स्वतः कष्ट करून अर्थार्जन करायला हवे होते असे वाटते कधी तरी, पण फार खंतही वाटत नाही! कारण तसं सुखवस्तू आयुष्यच वाट्याला आलं कुठलं ही चॅलेंज नसलेलं!
माझ्या इतर जावांपेक्षा माझं आयुष्य वेगळं आहे, फक्त घरात रमले असते तर आयुष्य वेगळं झालं असतं, मी शिस्तबद्ध, गृहकृत्यदक्ष, संसारी अजिबात नाही, पण गृहिणीपद ब-यापैकी सांभाळले, रांधा वाढा उष्टी काढा इती कर्तव्य अजूनही चालूच आहेत!