☆ तुरटी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆
माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती,”आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.”
फोनवर ती बरेच काही बोलत होती.बोलता बोलता ती म्हणाली, “पंधरा- वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.”
मला हसूच आलं.
आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो.
हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.
खरंतर…आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात, पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो.
कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात. आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं, की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते.
तसंच…
आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले, तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत. आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की, वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात…
जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण,आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू.
जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो.
आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो…
मेंदूला वाचा नसते. तो मुका असतो. त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते, त्याला तरी ते कळले पाहिजे.
काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी.
अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे…
पण ९०-९५ टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.
मेंदू सृजनशील आहे, त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे.
ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत, त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे.
आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले कुटुंबीय, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे.
या पलीकडे काय असू शकते?
लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले, की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते.
मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे…
लेखिका : अज्ञात
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ 🌧️ म्हण बदलायची वेळ आली ? 🤣 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“गर्जेल तो पडेल काय ?” ही दरवर्षी पावसाळ्यात कानावर पडणारी म्हण, यावर्षीपासून इतिहास जमा होणार की काय, अशी मला पावसात न भिजताच ओली भीती वाटायला लागली आहे मंडळी ! असं वाटायच कारण म्हणजे यंदा पाऊस आला पण नेहमीसारखं त्याचं आगमन सुरवातीला विशेष जाणवलं नाही. नंतर नंतर त्यानं अनेक राज्यात हैदोस घातला ही बाब आलाहिदा, पण यंदा त्याच आगमन जणू निसर्गाने ढगाला सायलेंसर लावला आहे अशा स्वरूपातच होतंय, हे आपण पावसात न भिजताच मान्य कराल याची मला कांदा भजी खाता खाता खात्री आहे ! या मागची वैज्ञानिक कारण काय आहेत यावर हवामान खाते विजेसारखा प्रकाश टाकेल न टाकेल, पण आपल्या सारख्या सुज्ञ लोकांच्या, पावसात ओल्या झालेल्या सुपीक डोक्यातून याच काय उत्तर असेल ते आपण, म्या पामराला लवकरात लवकर कळवले तर बरं होईल. नाहीतर काय होईल, आत्ता कांदा भजी खायला कितीही कुरकुरीत लागत असली तरी एखाद्याच्या ओल्या डोक्यातून आलेलं एखादं या मागच भन्नाट कारण माझ्या जिभेची चव बीघडवायला पुरेसं आहे, होय की नाही ? आणि ती व्यक्ती माझ्यासारखा कांद्या भज्या बरोबर गरमा गरम आल्याचा चहा न घेता इतर काही “अमृततुल्य पेय” पीत असेल तर मग माझं रक्षण धो धो पडणाऱ्या पावसात वरचा छत्रीधारी सुद्धा करू शकणार नाही, याची मला बालंबाल खात्री आहे !
हे ढगांच असं मूकं राहणं, विजांच न कडकडणं मला अजिबातच आवडलेलं नाही मंडळी. त्यामुळे होत काय, खराखुरा पावसाळा यंदा आला आहे असं वाटतच नाही माझ्या सारख्या सामान्य माणसाला. मग पावसाळी पिकनिक ठरवायचा मूडच जातो माझा !
मंडळी मी जेंव्हा माझ्या नसलेल्या डोक्याला थोडा ताण दिला तेंव्हा याच एक उत्तर माझ्या डोक्यात चमकून गेलं, बघा तुम्हांला पटतंय का ! सध्या सर्वपक्षीय नेत्यांचा, या नां त्या कारणाने जो घोषणारुपी गडगडाट चालला आहे त्याला घाबरून मेघांचा घसा तर बसला नसेल ना? हे माझं कारण मलाच पटलं आणि मी परत एकदा कांद्या भज्या बरोबर आल्याच्या चहाचा घोट घेतला आणि भरून पावलो !
ताजा कलम- कुठल्याही निसर्ग कोपाला लागू असलेलं “हा ग्लोबलवार्मिंगचा परिणाम आहे” हे घासून गुळगुळीत झालेलं उत्तर देवून माझ्या डोक्याची आणखी शकलं करू नयेत, कारण हा निसर्गकोप नक्कीच नाही !
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
पंढरीच्या वारीला सातशे / आठशे वर्षांपासूनचा इतिहास आहे. कोरोनाचा काळ सोडला तर यात खंड पडलेला आपल्याला दिसत नाही. काय असेल पांडुरंगाकडे? का जातात इतकी लाखो माणसं पंढरीच्या वारीला? इतकी धाव, इतकी ओढ का दिसते माऊलीच्या भेटीसाठी? पंढरीचा पाडुरंग भेटल्यावर खरंच समाधानी होतात का हे भक्त? ही भक्ती खरंच, खरी असते का?
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ||
विठ्ठलाचे नाव घेवू होऊनि निसं:ग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ||
इतकं निस्संग, निर्मळ, स्वतःला हरवून विठ्ठलात लीन होऊन जगता येते? बुद्धाच्या मते जीवन हे दुःखमय आहे. न शमणारी तृष्णा हे दु:खाचे मूळ कारण आहे. दुःख निवारणासाठी त्यांनी अष्टांग मार्ग आणि पंचशील सांगितले. दुःख आणि वेदनेचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येत असतोच. सामान्य माणसाने वारी हे दु:ख निवारणार्थ साधलेला एक मार्ग तर नसेल..! वारीला जाता न येणाऱ्यांना खूप खंत वाटते का? असे अनेक प्रश्न मला विद्यार्थी जीवनात पडायचे..
आई म्हणायची,
सखू निघाली पंढरपूरा
येशी पासूनी आली घरा !
घरदार सोडून, अनंत व्याप सोडून लोक वारीला चालत जातात. सर्व सुखंदुःखं बाजूला सारुन एकमेकांना “माऊली” म्हणत, एकमेकांना नमस्कार करत अनेक स्त्री-पुरुष भक्तीमय वातावरणात विलिन होतात. तन-मन-भान विसरुन पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. देहभान विसरुन मनाच्या आनंदाचा वारकऱ्यांनी साधलेला हा परमोच्च क्षण असावा.
“पुंडलिक वर दे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय !”
असा जयघोष अखंड चालू असतो. पण या जयघोषात रुक्मीणी, जनाबाई, सोयराबाई, कुठेच नाहीत याची खंत मात्र माझ्या सारख्यांना वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा समतेचा भाग वेगळा असला तरी विचार करायला लावणारा आहे हे मात्र नक्की.
माझे आई वडील दोघेही विठोबाचे निस्सिम भक्त होते. आई दूसरा कोणताच देव मानत नव्हती. सर्व देवांचा देव म्हणजे विठोबा अशी तिची धारणा होती. वडीलांना संकष्टी सुद्धा करु द्यायची नाही. फक्त एकादशी करायची असा तिचा आग्रह. घरातले सगळेच एकादशी करायचे. आम्हा लहानांना ते ऐच्छिक होते. पण आम्ही वेगवेगळ्या पदार्थाच्या आशेने एकादशी करायचो. आठवड्यातून दोन वेळा भजनी मंडळासोबत घरी भजन असायचे.. एकनाथ षष्ठी, रामनवमी, गोकूळ अष्टमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे सगळे दिवस अहोरात्र चोवीस तास भजन करुन साजरा केले जायचे. माझ्या आईने स्वाक्षरी करण्यापुरतीच अक्षरे गिरवलेली होती. ती कधी शाळेत गेली नव्हती. पण माझी आई म्हणजे लहानपणीची शाळा आणि मोठेपणीचे जीवन विद्यापीठ होते. सगळे अभंग तिला तोंडपाठ असायचे. तीचे बालपण कर्नाटकातले. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी लग्न होऊन महाराष्ट्रात जत येथे आली. केवळ कन्नड बोलता येणारी आई आमच्या मराठी शाळेतील शिक्षणामुळे आमच्याशी हळू हळू मराठी बोलायला शिकली. रेडीओवर लागणारे अभंग लक्षात ठेवून, आठवून, आठवून अभंग म्हणू लागली. भजनी मंडळात बऱ्याच वेळा ही एकटीच बाईमाणूस असायची. माझा विठोबा सगळं व्यवस्थीत करेल. हा तिचा विश्वास होता. वडील तलाठी नंतर सर्कल म्हणून प्रमोशन मिळाल्यावर नोकरी निमित्त बाहेर गावी असायचे आणि आई अभंगात रमून जायची. संतांचे अभंग हाच तिच्या ज्ञानाचा झरा होता. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांचे त्यावेळी मंदिरात आणि घरी वाचन व्हायचे, ते ऐकायला ती जात असे. वडीलही तिच्या सोबत भजनात रमून जायचे. त्याच्या जगण्या वागण्यात बोलण्यात भक्तीचा सुगंध दरवळत राही. भजनी मंडळात अनेक जाती धर्माचे लोक होते. ते खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगत होते. पांडुरंगाच्या भक्तीने सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणले होते एका पातळीवर आणले होते. हा खूप मोठा आनंदाचा भाग होता. वारीने सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना सामावून घेतले आहे. त्यामुळे आमच्या लहानपणी आम्हाला मानवता हा एकच धर्म माहीत होता.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे
अशाच भावनेची कालची वारी होती. आजचीही वारी भक्ती या एकच भावनेने एकत्र चालते असे माझे मत आहे. अशा भक्तिमय वातावरणातले माझे बालपण.
आईचे सगळे लक्ष अभंगाकडेच असायचे. ती बऱ्याचदा मला विणा घेऊन भजनाला बसवायची.
तुकोबा म्हणतात तसे
“आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे”
अगदी अशीच होऊन जगायची माझी आई…
तुकोबांच्या अभंगानी तिला नवे विचार मिळाले. तीने कधी वड पुजलेला अथवा कधी कर्मकांड केलेले आम्हाला आठवत नाही. एवढेच काय ती चालत वारीला कधीच गेली नाही. मुलाबाळांना मागे ठेवून जाणे तिला मान्य नव्हते. मुलाबाळांना गर्दीत घेऊन जायला नको म्हणून आम्हाला लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पंढरपूरला घेऊन जायची. वडील सोबत असायचे. आम्ही दोन दिवस तिथे मुक्काम करुन मनसोक्त दर्शन घेऊन परतायचो.
जनाबाईला दळण दळायला विठोबाने मदत केली. तशी आपली दुःखं कमी करायला आणि ती सहन करायला पांडुरंग आपल्याला बळ देईल किंबहुना तोच संकटाना सामोरे जाण्याचं बळ देतो असे तिला वाटायचे.
सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी
देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी
हे तीचं आवडतं गाणं. मी अभ्यासात रमायचे ती अभंगात रमायची. विपश्यना, विज्ञान, मानसशास्त्र यापैकी काहीच तिला माहित नव्हते. पण तिला जगणं, माणसांना समजून घेणं, आणि मनाचा समतोल साधणं माहित होते. म्हणूनच विवेकाच्या पातळीवर जाऊन अयोग्य वागणाऱ्या स्वतःच्या पोटच्या मुलाला घरातून बेदखल करणं तिला शक्य झाले असेल. सगळी सुखंदुःखं तुळसीच्या हाराच्या रुपाने पांडूरंगाच्या गळ्यात घालून ती किती सहज जगत होती..! हे मी पाहिले आहे. आज तीच्या या श्रद्धारुपी निष्ठेचे मला राहून राहून आश्चर्य आणि कौतुक वाटते. स्वतःच्या कर्तव्यात तिने कधी कसूर केली नाही. पहिला संसाराची वारी मग विठोबाची वारी. गरजेनुसार शेतातली काम सुद्धा ती न डगमगता, न कंटाळता आनंदाने करायची. तीच्या तोंडी सतत अभंग. ती काम करत अभंग गुणगुणायची.
“कांदा, मुळा,भाजी अवघे विठाई माझी.”
असे म्हणत तिची कामं चालू असायची. मला आठवतंय जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची तेव्हा एक गाणं ती नेहमी म्हणायची…
कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
हलाहला ते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो.
बहिणाबाईची कविता तिला माहित होती.
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आईला कविता पाठ होती. रेडीओवर ऐकलेलं सगळं तिच्या लक्षात असायचं. माझ्यावर आध्यात्मिक संस्कार तिच्यामुळेच झाले.. तिच्या विठोबावरील भक्तीतला भाव आज मला कळतो. सगळं विठोबावर सोपवून ती किती आनंदी असायची ! आणि मी रोज नवे प्रश्न निर्माण करुन उत्तर शोधत राहते. विठोबा किंवा पांडुरंग म्हणजे आपण आपल्या जगण्या वागण्यात मनाशी केलेला एक उत्तम, निस्पृह, निर्मळ, विवेकी संवाद व निश्चय आहे. असे मला माझ्या आईच्या भक्तीतून जाणवले.
विज्ञानाने शरीरा बरोबर मनाच्या अगणित प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आणि योग्य उपचार पद्धती विकसित करण्यात यश मिळविले आहे. विज्ञानाकडून उत्तर मिळाले असले तरी विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांना पूरक आहेत. येथे कर्मकांडाला अजिबात थारा नाही. हे आवर्जून ध्यानात घ्यायला हवे. विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घातली तर आपल्याही मदतीला विठोबा/ पांडुरंग नक्की येईल. म्हणूनच
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण
एकवीसावे शतक हे मानसिक आजाराचे असेल असे काही तज्ञ लोक म्हणायचे. मला तेव्हा खरे वाटत नव्हते. असे होणे शक्य नाही असे मला वाटायचे. पण हे सत्य आहे. प्रत्येक चार माणसामागे एका माणसाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. यात स्त्रीयांची संख्या अधिक आहे. मी refer करत असलेल्या psychiatrist ची ओपीडी , hospitals तुडूंब भरलेली दिसतात. आपल्याकडे मानसरोगतज्ञ/ मानसविकार तज्ञ संख्येने तसे खूपच कमी आहेत.
माणसात देव अनुभवणारी, समुपदेशन आणि रुग्णसेवेत रमणारी, समतेचा आग्रह धरणारी मी. तुम्हा सर्वांना माऊलीच्या रुपात पाहते. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. आज माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. माणसाना बोलत करणं, प्रसंगी त्यांचा आवाज होणं, त्यांना व्यक्त होऊ देणं, त्यांच्या मनातील भाव-भावना केवळ शांतपणे ऐकून घेणं. त्यांच्या मनातील वादळांना वाट करून देण्याची नितांत गरज आहे. ज्याची त्याची लढाई, जो तो लढतोच असतो. केवळ आपण सोबत आहोत, सगळं व्यवस्थीत होईल, एवढंच सांगण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे एखाद्याने मन मोकळं करण्यासाठी, मन हलकं करण्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवून सांगितलेली गोष्ट त्यांच्या माघारी दूसऱ्या कुणाला सांगू नये. एवढे मोठे मन प्रत्येकाकडे असायला हवे. मनोविकारांना मात्र औषधोपचारीची गरज असते. हे विसरून चालणार नाही. शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला येणार आहे. माणसा माणसातील प्रेमभाव मैत्र भाव टिकून राहणे त्यांचे संवर्धन होणे महत्त्वाचे.
माणसांच्या मनात भक्तीचा मळा फुलावा. जो जे वांच्छील तो ते लाभूदे ! आणि मानवी जगणे सुखाचे होऊदे. हीच मागणी माणसातल्या पांडुरंगाकडे.
माणूस जेव्हा एक पायरी वर चढतो तेव्हा तो देव होतो. माणूस जेव्हा एक पायरी खाली उतरतो तेव्हा तो राक्षस होतो.
मला मुलाखती फार आवडतात.प्रत्यक्ष समोर,यू ट्युबवर,दिवाळी अंकातल्या, साहित्य संमेलनाच्या,प्रासंगिक….स ग ळ्या…..मग कलाकार, साहित्यिक,लेखक,शास्त्रज्ञ, नाटककार, संगीतकार, शैक्षणिक क्षेत्रातले…अगदी वडापाव विकणाऱ्यापासून बिल्डर पर्यंत कुणीही व्यावसायिक..कुणीही असो….कारण प्रत्येकाचे आर्थिक, सामाजिक , सांस्कृतिक, कौटुंबिक, शैक्षणिक, मानसशास्त्रीय प्रश्न वेगळे…उत्तरं वेगळी….मार्गही वेगळे...
मला आठवतं पूर्वी नॅशनल टी व्ही वर कमलेश्वर मुलाखती घ्यायचे…मजूर बायका,मोलकरणी,रस्ते झाडणाऱ्या ,बोहारणी,भाजीवाल्या....अशा कुणाच्यातरी…अत्यंत सह्रदयतेनी सहज बोलून एक आगळंच विश्व उलगडायचे …त्यांना बोलकं करंत अगदी अनोळखी जग दाखवायचे….हे सारं आपल्या देशातलं…
पण वेगळीच संस्कृती,मग वेगळाच लढा,वेगळेच प्रश्न … सगळ्यांना तोंड देत निराशेच्या गर्तेतून अत्युच्च शिखरी जाणारी परदेशी माणसं पाहिली मुलाखतीत….मग आपली अडचण अगदीच क्षुल्लक वाटायला लागली..निराशेवर मात करायचं बळ मिळालं… आपल्याकडच्या सारखेच ते लढतांना पाहिले…दोन्हींनी मन थक्क झालं..त्यांचा लढा, चिकाटी,यश पाहून.
तर एका मुलाखतीत भेटली आफ्रिकन अमेरिकन महिला…ओपरा विनफ्रे नाव तिचं…पहा हं ..जगातला सर्वोत्तम टॉक शो तिच्या नावावर..दोन दशकं Top rating मुलाखतींचा कार्यक्रम घेणारी….२०११ मधे “विशेष ऑस्कर पुरस्कार”मिळवणारी...जगातल्या १०० विशेष व्यक्तींपैकी एक.... २०१३ मधे ओबामांकडून “सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान” मिळवणारी….आणि हे ठळक … अजून बरंच बरंच काही….कुणी म्हणेल एका व्यक्तीच्या आयुष्यात एवढं?तर कुणी म्हणेल असे किती तरी आहेत….होय खरं आहे….पण या गौरवाच्या यशाच्या मालिकेबरोबरंच कमाल आहे संघर्ष लढ्याची आणि सकारात्मकतेची…..
कोण होती ही ओरपा? होय होय ओरपाच होतं तिचं नाव …पण लोक ओपरा असंच बोलवत…मग तिनं तेच नाव स्विकारलं….तिची आई लोकांकडे मोलकरणीचं काम करी..काबाडकष्ट….१५व्या वर्षीच तिला ही मुलगी झाली.Single Mother …म्हणजे अजून झगडा….ती सदैव कामात.या मुलीकडे लक्ष द्यायला तिला वेळंच नव्हता.दारीद्र्य पाठी लागलेलं..इतकं काम करूनही जेमतेम दोन घास पोटात…मग चिमुकली पोर दिसेल मिळेल ते ऊष्टमाष्टं खाई,…कचऱ्यातंच खेळ मांडी..वळण वगैरे कोण लावणार?…,नव्हतंच कुणी…कसंबसं ६व्या वर्षांपर्यंत आईनं सांभाळलं आणि हे गाठोडे आपल्या आईकडे पाठवून दिलं….तिथेही फारसा फरक नव्हता….पण वेळेवर दोन घास पोटात जात.आजी मायेनं काळजी घेई.न्हाउमाखू घाली.स्वच्छ ठेवी…रविवारी चर्चमध्ये नेई.बायबल कानावर पडे…गोष्टी सांगे.थोडंफार शाळेत जाणं होई.मग अक्षर ओळख झाली.पण पैसा दुर्मिळच….सभोवती बऱ्या घरातली मुलं असंत.आपला कमीपणा झाकण्यासाठी ती घरातच पैसे चोरायला लागली.आजीनं हे मान्य करणं शक्यच नव्हतं…..परत रवानगी आईकडे झाली.ती मोठी होत होती.मग गल्लीतल्या पासून नातेवाईक,भाऊ,मित्र साऱ्यांनी अत्याचार केले.त्यातून एक मूल झालं.पण अशक्त असल्यानं ते जगलं नाही.ते सुटलं आणि ती पण…..ती शाळेत जात होती खरी पण सोबतची श्रीमंत मुलं पाहून तिला न्यूनगंड वाटे…पुन्हा चोऱ्या…खोटे आभास….तेच दुष्टचक्र…..दुःख,दारीद्र्य,दैन्य,,वेदना ,यातना, अत्याचार हाच शब्दकोश जगण्याचा…त्या चोऱ्यांनी आई वैतागली आणि तिला सावत्र बापाकडे टेनेसीत दिलं पाठवून..
पण हा Turning point ठरला…जीवनाचा स्वरंच बदलला.तो फार चांगला “माणूस ” होता.तिथे शिस्त होती.नियम होते… सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगणं सुरक्षित होतं..मोजकं पण समाधानी होतं.परिस्थितीनं गांजलेली ही मुलगी हुषार आहे.बुद्धीमान आहे.तिला संधी हवी.ज्ञान हवं.दिशा हवी.तिच्या आत्मविश्वासावरची धूळ झटकायला हवी हे सारं सारं त्यानं जाणवलं.ती खरंच हुषार बुद्धीमान होती.. वाह्यात,मवाली,चोरटी,टारगट ही तिची ओळख संपली,मिटली आणि ती एक” ब्रिलियंट स्टुडंट ” झाली.ओल्या मातीचा गुणांनी भरलेला घट झाला.तिच्या बोलण्यात वेगळंच कौशल्य जाणवे.. नाटकात ती फार छान अभिनय करी…. अशाच एका नाटकाच्या रिहर्सलला एका व्यक्तीला तिचे गुण जाणवले आणि आपल्या रेडिओ चॅनल वर त्यानं तिला न्यूज रीडरची पोस्ट दिली…हा उज्वल भविष्याचा देखणा दरवाजाच होता.पहिलं दार होतं ते राजरस्त्याकडे उघडणारे…
ती ऑफर तिनं स्विकारावी…पण अभ्यास सोडला नाही…नोकरी करत करत स्कॉलरशिपचा अभ्यास केला …ती मिळवली पण….. कॉलेज अक्षरशः गाजवलं….ती दोन ब्युटी कॉंटेस्ट जिंकली….Miss Tenesi आणि Miss Black National Beauty……आता तिला बाल्टीमोर टी व्ही वर न्यूज रीडरची नोकरी मिळाली…मग ती मेरीलॅंडला गेली.असं काम करणारी ती “पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला ” ठरली.हे खूपच ग्रेट होतं.मोठा गौरव होता तिचा…..
ती फारच सेन्सिटिव्ह होती. बातमी कोरडेपणानी बा त मी न करता त्यातला इमोशनल आस्पेक्ट पहावा असं तिचं मत होतं.पण अत्यंत प्रॅक्टिकल मालकाला हा इमोशनल व्ह्यू नको होता…आणि या वादात जॉब गेला.परत निराशा…..पण यावेळी अनुभव, आत्मविश्वास,शिक्षण सोबत होतं . आणि एक रस्ता बंद झाला की नवे अनेक उघडतात असं म्हणतात तसंच झालं.. “People are talking ” अशा Talk show ची ती होस्ट झाली.ती लोकांना सहजपणे बोलकं करी…लोकही मोकळेपणाने बोलत.हा कार्यक्रम फारच लोकप्रीय झाला.( माझ्या मनात कमलेश्वर आणि आमीर खान चे कार्यक्रम उमटून गेले.)मग शिकागोचा Morning Show मग Oprah Show रांगच लागली.. दोन दशकं म्हणजे २० वर्ष हे शो Top rating show म्हणून गाजले आणि Oprah होस्ट म्हणून….ती सर्वात श्रीमंत ,पैसे मिळवणारी कलाकार होती.
ती श्रीमंत झाली पण तो जुना काळ ती कधीच विसरली नाही आणि Oprah Winfrey Leadership Academy चा जन्म झाला.तो तिच्या कर्तुत्वातला समाज कारणाचा कळस मानला पाहिजे.जे आपण सोसलं ते इतरांना सोसायला लागायला नको म्हणून तिनी अनेकांना मदत केली.दिशा दिली.मार्ग दाखवले … नाही तर ते निराशेने संपले असते किंवा गुन्हेगारीकडे वळले असते.
२०११ मधे तिला विशेष ऑस्कर पुरस्कार दिला गेला.Times,Forbes सारख्या जगद्विख्यात मासिकांच्या कव्हर पेजवर तिला मानाचं स्थान मिळालं.२०१३ मधे ओबामांनी तिला ” सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान ” प्रदान केला.
कुठून कुठे आलं जीवन?एका दरिद्री गलिच्छ वस्तीत अपमानित असुरक्षित जगणारी Oprah किती उंचीवर पोहोचली.झगडत यशस्वी झाली.
तिची मतं ठाम होती.त्यानुसार तिनं कुणाची कॉपी केली नाही.स्वतःच्या विचारांनी ती Authentic झाली.तिनी फक्त यश हे ध्येय मानलं नाही..ती नवनवे मार्ग शोधत राहिली.ती फार ईमानदार, प्रामाणिक होती.समोरच्याची अडचण ओळखून तिनं योग्य सुंदर दिशा दिली.मदतीचा हात देत ग्रहदशाच बदलली म्हणा ना….अनेक घरं तिच्यामुळे सुखी झाली.तिनं आधाराचा हात सोडला नाही आणि अशा ६८,०००/ लोकांना तिनं हात दिला.
तिचा भूतकाळ भयंकर होता.पण तो मागे सोडून तिनं भविष्य घडवलं.भूतकाळ विसरा आणि जीवन नव्यानं Design करा असं म्हणते ती.. आणि तसं तिनं केलंही…
कुणी म्हणेल हे मिळणं तिच्या दैवात असणार…बरोबर आहे..दैवाची साथ हवीच…पण दैवात लढा पण असतो तो आपण पहायचा आणि शिकायचं….कारण प्रयत्नांचं मोल कधीच कमी होत नाही ..केवळ ३२ व्या वर्षी १२०चॅनल्सवर तिला १०लाख लोक पहात होते. संकटात आतल्या आत ती अनेकदा तुटली असेल….पण लढाई सोडली नाही.हार मानली नाही..परिस्थिती इतकी पालटली की तिनं तिच्या चॅनलचं नाव ठेवलं “HARPO” अगदी तिच्या “OPRAH ” नावाच्या उलटं. कमाल आहे ना!!
म्हणूनच वाटतं… असं काही पाहिलं ऐकलं की मनात येतं
“कितीही निराश असा….हे जगणं पहात रहा
मात करा अडचणींवर,
मग आशेचे किरण बोलावतीलंच पहा
जगणं त्यांचं देईलच दिशा,,,
कमीत कमी लढायचा तरी
घेऊया वसा!!”
आणि हो …एवढ्या यशानंतर तिच्या त्या वाक्याने तर मी हाललेच आत…ती म्हणते….
विरंगुळा म्हणून आजी आपल्या लेकाकडे राहायला आली. आज रविवार, सगळे घरी एकत्र भेटतील या विचाराने सुखावली. सकाळी उठल्यावर पाहते तर तीन खोल्यात तीन माणसं बघून भांबावली. लेकाची आणि सुनेची खोली वगळून तिने नातीच्या रूमकडे पावलं टाकली. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली नात आजीला पाहून ‘ये बस’ म्हणाली. नाश्त्याला काय करायचं हे विचारायला आले होते, असं म्हणत आजी मऊ गादीवर बसताच बेडमध्ये रुतून गेली. नातीने तिघांच्या फॅमिली व्हॉट्स अप ग्रुपवर आजीचा मेसेज फॉरवर्ड केला. स्वीगीने मागवून घेऊया असा आईचा रिप्लाय आला. घरातल्या घरात मेसेजवर बोलणारे लोक पाहून आजी आश्चर्यचकित झाली. इथे हाकारे ऐकू आले नाहीत, तरी मेसेज पुढच्या क्षणाला रीड होतो, असं नात म्हणाली. गृह कलह टाळण्याचा नवीन फंडा बघून आजी इम्प्रेस झाली. नातीकडून मोबाईल शिकून घेत फॅमिली ग्रुपमध्ये टेम्पररी ऍड झाली. आजी तिच्या सेपरेट रूममध्ये मोबाईलसह दहा दिवस सुखाने राहिली. मुलाला-सुनेला आशीर्वादाचा इमोजी आणि नातीला gpay करून परत निघताना ग्रुपमधून लेफ्ट झाली.
(‘शांतीप्रिय माणसं’ ग्रंथातून साभार)
लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सांगू कशी तुला मी…? – लेखक – डाॅ. शमा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆
रविवारची सकाळ. उगीचच सुट्टी म्हणून लोळत पडले होते. घड्याळाचा काटा आठच्या पुढे पुढे जातानाही आळस संपण्याचे चिन्ह दिसेना. घरातील मोठ्या व्यक्तींचा धाक काळाने केव्हाच ओरबाडून नेला होता. खरं म्हणजे धाक कसला, धाकाच्या अंगरख्यात लपलेले प्रेमाचे छत्र हरवून गेले होते. मन झरकन चिंचोळ्या भूतकाळाच्या गुहेत उलट दिशेने धावायला लागले.
अगदी बालपणापासून, नंतर सासरी आल्यावर देखील, घरात आई-बाबांचे छत्र होतेच. सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे हा घरोघरी असणारा विधिलिखित नियम होता. सकाळी सहा नंतर अंथरुणात लोळण्याची कधी हिंमत नसायची. अगदी लहानपणापासून शिस्तीत जगण्याचा, एक संस्कार मनावर पक्का झाला होता.
त्यावेळी त्या शिस्तीचा खरंतर थोडा रागच यायचा पण लग्न होऊन सासरी आल्यावर त्या झालेल्या संस्काराची खरी किंमत कळली. टापटीप रहाणे, व्यवस्थित वस्तू आवरणे, वस्तू जागेवर ठेवणे, लवकर उठणे, व्यायाम करणे, शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्याकडे नीट लक्ष देणे. …आता असं वाटतं आमच्या आई-बाबांनी फार धन-दौलत नाही दिली आम्हांला, पण संस्कारांच्या लेण्यांनी मात्र नक्कीच आम्हांला सजवलं.
हे संस्कारांचे लेणं फक्त आमच्याच कडे होते असे नाही. आमच्या त्या मध्यवर्गीय दुनियेत प्रत्येक पालक असेच घडवत असत आपल्या पाल्याला. पण त्यामुळे आमच्या पिढीला एका शिस्तीतून दुसऱ्या शिस्तीच्या घरात येताना त्याचा त्रास झाला नाही.
हळूहळू आई-मुले, वडील-मुले, सासू-सून, सासरे-सून ही सगळी नाती पूर्वीपेक्षा अधिक जवळ येऊ लागली. प्रेमामध्ये काही फरक असेल पूर्वी आणि आत्ता असं अजिबात नाही. पण त्या प्रेमळ अंगरख्याला असणारी शिस्तीची किनार मात्र हळूहळू उसवू लागली. मोकळ्या नात्यांच्या मोकळीकित शिस्तीचा धाक सैल होत गेला.
पूर्वी आई-वडील म्हणायचे, “वळण नसेल तर सासरी गेल्यावर जड जाईल. आत्ताच शिका सगळे”. आता आई वडील म्हणतात, “जाऊदे, लग्नानंतर जबाबदारी येणारच आहे पोरीवर, तेंव्हा राहूदे थोडे मोकळे.”
पूर्वीचे सासू-सासरे म्हणायचे, “तुम्ही नीट तर पुढची पिढी नीट.” आणि आताचे सासू- सासरे म्हणतात “कशाला नवीन सुनेला धाकात ठेवायचे? लागेल वळण हळूहळू. आपण जसे थोडे का होईना दडपलेपणाने वावरायचो तसे नको मुलांना”, आणि नकळत त्यामुळे पुढच्या पिढीवरील शिस्तीचा अंकुश सुटतच गेला.
आता आपण, म्हणजे आमची पिढी नकळतपणे आपल्याच मुलांना, मुलींना व्यवस्थितपणा नाही, टापटीप नाही या तक्रारी करतो. म्हणजे सासुच सुनेची तक्रार करते असं नाही, आई देखील मुलीच्या या बेशिस्त गुणांचे पोवाडे गातेच की. मग लक्षात येतं मुलांना दोष देण्यापेक्षा ती नैतिक जबाबदारी आमच्याच पिढीची तर नसेल नं?
आता असं वाटतं, घरातील मोठ्या लोकांचा मनावर असलेला एक धाक आम्हांला खूप काही देऊनच गेला. आमच्या शिस्तबद्ध, आखीव-रेखीव जीवनाचे खरे श्रेय हे आमचे नसून ते आमच्या मागच्या पिढीचे आमच्यावर असलेले फार मोठे उपकारच आहेत. मुलांना, मुलींना, सुनांना एखादी गोष्ट सडेतोड सांगतांना, मुलांना काय वाटेल, सुनेला काय वाटेल याचा विचार करण्याची कधीही त्या पिढीला गरजच पडली नाही. सगळे नियम सडेतोड!.
आत्ताची कोणत्याही घरातील आई ही आपल्या मुली, मुले, सूना यांना वळण लावत नाही, संस्कार करत नाही असे नाही, पण थोडे लाडाचे प्रमाण मात्र आमच्या पिढीचे वाढते हे नक्की. काहीवेळा कुठे सारखे संस्कार, शिस्तीच्या दावणीला मुलांना बांधायचे म्हणून सोडून द्यायचे. कधी, ‘आपल्याला झेपतेय नं काम, मग सारखे मुलांना बोलून ते काम करवून घेण्यापेक्षा झेपेल तितके काम करायचे आणि मोकळे व्हायचे’. सुनेला, मुलांना, मुलींना सारखे वळण लावत बसलो तर घरातले वातावरण बिघडेल अशी मनात भीती बाळगून गप्प रहायचे. गप्प राहून घराचा गाडा त्या माउलीने ओढत रहायचा. घरा-घरातील हाच सोहळा थोड्याफार फरकाने, असाच साजरा होताना दिसतो सगळीकडे.
मला असं वाटतं, म्हंटल तर प्रॉब्लेम, म्हंटल तर ‘सध्या सगळीकडे असेच चालते’ म्हणून सोईस्कर सोडून देणं. पण मनात मात्र धगधग! ‘बोलू का नको? सांगू का नको?’
मुलांच्या किंवा मुलींच्या दोघांच्याही बाबतीत चुकतं तिथं वेळीच मुलांना खडसावणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मुले (मुलगा मुलगी) दोघेही जर व्यसने, स्वैराचार, याची एकेक पायरी चढताना दिसत असतील तर वेळीच त्यांना थोपवणे ही आमच्या पिढीचीच जबाबदारी आहे.
सुरवातीला मुलांच्या किंवा मुलींच्या रात्र-रात्र बाहेर रहाण्याचे कौतुक होते. कोणत्या नवीन चवीची मद्ये मुलांनी टेस्ट केली याचेही कौतुकच केले जाते. नवी पिढी, नवा जमाना आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण नंतर स्वैराचाराच्या पायऱ्या चढत चढत मुले जेव्हा अवनतीच्या उत्तुंग शिखरावर पोहचतात तेव्हा त्या शिखरावरून दरीत कोसळणाऱ्या मुलांना फक्त दुरून पाहून परिस्थितीला दोष, नशिबाला दोष देण्यापलीकडे काहीही आपल्या हातात उरलेलं नसते.
घरातील छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त मुलांमध्ये रुजवणे जितकी महत्वाची गोष्ट तितकीच किंवा त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुले व मुली घराबाहेर वावरताना त्यांच्यावर एक मर्यादेचा अंकुश असणे गरजेचे आहे. चारित्र्य, व्यसने, पार्ट्या, कुठे किती थांबायचे हे मुलांना समजत नसेल तर पालकांनी हस्तक्षेप करणे खरे तर अगदी आवश्यक. पण आजकाल सांगू कशी तुला मी?’ या परकेपणातून, संकोचातुन, भीतीमधून पुढच्या पिढीचे आपण नुकसान करतो हेच मुळी आपण विसरून जातो.
मुलांच्या कोणत्याही चुकांना निर्भीडपणे विरोध करणारा समाज कुठेतरी हरवत चालला आहे. मुलांना बोललं तर राग येईल, विरोध केला तर संबंध बिघडतील या भीतीतून प्रत्येक चुकीची गोष्ट थंडपणे पहाणे हे मुलांवरील प्रेम थंडावण्याचेच एक लक्षण आहे.
ज्या मुलांवर तुम्ही प्रेम करता, त्या मुलांना चुकले तर रागावण्याचा तुमचा अधिकार आहेच. सुनेला जर तुम्ही तुमची मुलगी समजून मुली इतके तिच्यावर प्रेम करत असाल तर मुलीच्याच नात्याने तिला रागावण्याचा पण तुमचा अधिकार आहे. उलट मोकळेपणाने तिला चुका न सांगणे, न रागावणे म्हणजे तुमच्या नात्यात अजून परकेपणाच आहे असं समजायला हरकत नाही.
संस्कार एका पिढीतून पुढच्या पिढीत जात असतात. कळत -नकळत तुमची मुले तुमचे अनुकरण करत असतात. मग ते मोबाईल तासन तास बघणे असो, दुसऱ्याचा अनादर करणे असो किंवा बेशिस्तीचे वर्तन असो. एक म्हण आहे, पुढला बैल नेटा तर दाविल दाही वाटा’
खरं म्हणजे पुढची पिढी खूप हुशार आहे, समंजस आहे, कित्येक बाबतीत आपल्या पेक्षा सरसच आहे. चुका होतात पण चुका स्वीकारणं व त्या सुधारणे या दोन्ही साठी हिम्मत लागते. आणि त्यापेक्षाही अधिक हिम्मत मुलांच्या चुका योग्यवेळी निदर्शनास आल्यास त्या मुलांना त्या पासून परावृत्त करण्यात असते.
केवळ चांगुलपणा मिळवण्यासाठी आमच्या पिढीने म्हणजे आई, वडील, सासू, सासरे, आजी-आजोबा या सगळ्यांनीच ‘सांगु कशी तुला मी ?’ या भूमिकेचा त्याग करणे ही एका सशक्त समाजाच्या निर्मिती साठी असलेली छोटीशी गरज आहे.
आजचा हा लेख श्री. उदय मोडक, धारवाड, कर्नाटक यांच्या सौजन्याने.
लेखक : डॉ. शमा देशपांडे
प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आजही माझ्या स्वप्नात तेच घर येतं. एक मजली, खालच्या पायरीवर पाण्याचा नळ असलेलं, वर जाण्यासाठी एक लाकडी जिना, उजवीकडे दरवाजा, मधल्या भागातलं छोटसं लँडिंग, दरवाजा लाकडाचा आणि घरात जाताना ओलांडावा लागणारा लाकडी उंबरठा. दरवाजाच्या बाहेरच्या,वरच्या भागावर लटकणारी एक लोखंडी साखळी. बाहेर जाताना ती साखळी अडकवायची आणि त्यात लोखंडी कुलूप लावायचं. जाताना दोन वेळा कुलूप ओढून बघायचं. आता हे आठवलं की वाटतं त्यावेळी अशा कुलपातलं बंद घर कसं काय सुरक्षित राहायचं? आता आपण घराला दोन दोन दरवाजे, एक जाळीचा, एकाला पीप होल, अत्याधुनिक कुलुपे, गुप्त नंबर असलेली, शिवाय कॅमेरे, सीसीटीव्ही आणि असेच बरेच काय काय… तरीही आपलं घर सुरक्षित राहील का? याविषयी शंकाच असते.
तो काळच वेगळा होता का? स्वप्नात जेव्हा जेव्हा मला ते घर दिसतं तेव्हा तेव्हा मी मनोमन त्या वास्तुदेवतेस मनापासून नमस्कार करते. कारण याच वास्तुदेवतेने माझी जडणघडण केली. इथेच मी खरी मोठी झाले आणि आयुष्यातले असंख्य आनंदाचेच नव्हे तर अनेक संमिश्र भावनांचे क्षण वेचले.
४/५ शा.मा. रोड, धोबी गल्ली, टेंभी नाका ठाणे.
या पत्त्याला माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण माझं बालपण याच गल्लीत गेलं. बालपणीचा तो रम्य काळ आणि धोबी गल्ली याचं अतूट नातं आहे. या गल्लीचं आजही माझ्या मनात अस्तित्व आहे. ती जशीच्या तशी माझ्या नजरेसमोर अनेक वेळा येते, हळूहळू आकारते आणि चैतन्यमय होते. अरुंद पण लांबलचक असलेली ती गल्ली, एकमेकांना चिकटून समोरासमोर उभी असलेली काही बैठी,काही एक मजली घरं.. त्या सर्व घरांची दारं मनातल्या मनात फटाफट उघडली जातात आणि माझे ते बाल सवंगडी माझ्या भोवती नकळत गोळा होतात. चित्रा,चारू, बेबी, दिलीप, सुरेश, अशोक, लता, रेखा, अरुण, शरद, आनंद कितीतरी आणि मग आमचे खेळ रंगतात.
डबा ऐसपैस, लगोरी, सागरगोटे, कंचे, लंगडी, खो-खो, अगदी क्रिकेट सुद्धा! आरडाओरडा, गोंगाट, धम्माल!
पद्धतशीर क्रीडा साहित्य म्हणजे काय याच्याशी आमची ओळख ही नव्हती. खरं म्हणजे आम्हाला त्याची जरुरीच भासली नाही. धुणं धुवायच्या धोपटण्याने आम्ही क्रिकेट खेळलो. असमान उंचीच्या मिळेल त्या काठ्यांनी आम्ही यष्टी रचली. गद्र्यांचं घर ते सलाग्र्यांचं घर ही आमची विकेट आणि त्यापलीकडे चौकाराच्या, षटकाराच्या रेषा. समोरासमोर असलेल्या पायऱ्यांवर उभे राहून फिल्डींग व्हायचं आणि असं आमचं गल्ली क्रिकेट जोरदार रंगायचं. रडी खडी सगळं असायचं पण मुल्हेरकरांचे नाना आमचे थर्ड अंपायर असायचे. नाना तसे काही फारसे खिलाडू वृत्तीचे नव्हते. आम्हा खेळणाऱ्या मुलांचा खूप राग राग करायचे. चुकून त्यांच्या गॅलरीत आमचा बॉल गेला तर ते परतही द्यायचे नाहीत.
“मस्तवाल कार्टी! रविवारी सुद्धा शाळेत पाठवा यांना. नुसता गोंगाट करतात, दुपारची वामकुक्षीही घेऊ देत नाहीत.” पण तरीही आम्ही खेळत असताना गॅलरीच्या धक्क्याला टेकून उभ्याने आमचा खेळही बघत असत आणि त्यांना अंपायरचा मान दिला की मात्र ते खूष व्हायचे. आम्ही पोरंही काही साधी नव्हतो बरं का! चांगले चतुर, लबाड, लुच्चेच होतो आणि प्रचंड मस्तीखोरही. आज जेव्हा मी पाठीवर पुस्तकांनी भरलेली बॅग पॅक घेऊन स्कूलबसच्या रांगेत आजी किंवा आजोबांचा हात धरून उभं असलेलं बाल्य बघते ना तेव्हा पोटात कळवळतं कुठेतरी. हरवलेलं, बॅकपॅक मध्ये कोंबलेलं ते बालपण माझं काळीज चिरून जातं.
धोबी गल्लीतली ती घरं म्हणजे नुसत्या चुना मातीच्या भिंती नव्हत्या. या भिंती बोलक्या होत्या. या भिंतींच्या आत आणि पलीकडे असलेल्या जगाचा एक सुंदर बंध होता. एक रक्ताचा आणि दुसरा सामाजिक. घरात असलेली नाती आणि भिंतीच्या पलिकडची नाती बांधणारा तिथे एक अदृश्य पूल होता आणि या पुलावरच मी घडले. त्या वातावरणात मी वाढले, तिथे माझ्यावर असंख्य वेगवेगळे संस्कार झाले.
माझी संस्कारांची व्याख्या आणखी थोडी निराळी आहे. सर्वसाधारणपणे संस्कार म्हणजे मोठ्यांचा मान ठेवणे, रीती, परंपरा, देवधर्म पाळणे, नेहमी खरे बोलणे, नम्रता, शालीनता, सुहास्य, सुभाष्य वगैरे वगैरे खूप काही. संस्कार म्हणजे एक आदर्श तत्वांचं भलं मोठं गाठोडच म्हणा ना! ते तर आहेच. ते नाकारता येणारच नाही पण त्या पलिकडे जाऊन मी म्हणेन संस्कार म्हणजे स्वतः केलेलं निरीक्षण. आजूबाजूच्या वातावरणातून मिळालेली अनेकविध चांगली वाईट भलीबुरी टिपणं आणि या सगळ्या तुकड्या तुकड्यांमध्ये मी कोणता तुकडा हे योग्य रितीने शोधणं, ते शोधता येण्याची क्षमता असणं म्हणजे संस्कार.
धोबी गल्लीत माझं बालपण फुलत असताना कळत नकळत अनेक चांगल्या वाईट भावभावनांचं, प्रसंगांचं नकळत मेंदूत झालेलं रजिस्ट्रेशन आजही डिलीट झालेलं नाही. बालपणी हसताना, खेळताना, भांडताना, बागडताना, बघताना फारसे प्रश्न पडले नसतील किंबहुना प्रश्न विचारण्याची क्षमता तेव्हा नसेल पण पुढच्या आयुष्यात जगताना आणि मागे वळून पाहताना अनुभवलेल्या या प्रसंगांनी आपल्याला किती शिकवण दिली याची जेव्हा जाणीव होते ना तेव्हा संस्काराची व्याख्या व्यापक होते.
धोबी गल्ली म्हणजे माझ्यासाठी बालभारती होती.
धोबी गल्लीतलं जग लहान होतं. काही थोड्याच लोकसंख्यांचं होतं. फार तर दहा-बारा घरं असतील पण आता विचार केला तर वाटतं जग लहान किंवा मोठं नसतं. जे जग तुम्हाला किती दूरवर नेऊ शकतं किंवा किती दूरवरचे दाखवते, किती विविधतेत तुम्हाला वावरायला लावते त्यावरून त्याचं क्षेत्रफळ ठरत असतं.
धोबी गल्ली तशी होती.
ते एक निराळं जग होतं. लहान— थोर सर्वांचंच. या गल्लीत जितकी एकजूट आणि एकोपा अनुभवला तितक्याच मारामाऱ्या आणि आणि भांडणही पाहिली. जिथे देवांच्या आरत्या ऐकल्या, म्हटल्या तिथे प्रचंड शिवराळ भाषेचाही भेसूरपणा अनुभवला.
मुळातच या धोबी गल्लीचे दोन भाग होते. एक इकडची गल्ली आणि एक तिकडची गल्ली. दोन्ही भागातलं जग निराळं होतं, दोन्ही भागातली संस्कृती वेगळी होती. आम्ही मुलं इकडच्या गल्लीतली होतो. कुटुंबात सुरक्षितपणे वाढत होतो. आम्ही शाळेत जात होतो, अभ्यास करत होतो, गृहपाठ, परीक्षा.. सहामाही— वार्षिक यांचा तणाव बाळगत होतो, परवचा, शुभंकरोती प्रार्थना म्हणत होतो. मे महिन्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत मुक्तपणे धांगडधिंगा घालत होतो. घरातल्या मोठ्या माणसांचा दमही खात होतो आणि प्रत्येक जण कधी ना कधी, लपून-छपून गुन्हेही करत होते. गुन्हा शब्द फार मोठा वाटेल पण त्यावेळी घंटीच्या गाडीवर जाऊन बर्फाचा गोळा खाणे, कुणाच्या परसदारात जाऊन झाडावरच्या कैऱ्या नाहीतर जांभळं तोडणे, बटुबाईच्या कोंबड्यांना पळवणे, नाहीतर तिकडच्या गल्लीत राहणाऱ्या एबी आणि रोशन या बहिणींशी गप्पा मारायला जाणं वगैरे अशा प्रकारचे मोठ्यांचे अज्ञाभंग करणारे गुन्हे असायचे.
इकडच्या गल्लीतलं पहिलं घर होतं मथुरे यांचं आणि शेवटचं दिघ्यांचं. त्यामुळे मथुरे ते दिघे हे आमचं जग होतं पण पलीकडच्या म्हणजेच तिकडच्या धोबी गल्लीतलं जीवन फार वेगळं होतं. तिथे राहणारी माणसं, त्यांचे व्यवसाय, त्यांचे आचार विचार वागणं अगदी त्यांचा आर्थिक स्तर, जात धर्म यांतही भेद होते. हे अंतर , हा भेद त्यावेळी का राखला गेला, का बाळगला गेला किंवा तो का पार करता आला नाही हे सारे प्रश्न आता मनात येतात पण त्यावेळी मात्र माझं बालपण या दोन भिन्न विश्वात नकळतपणे विभागलं गेलं होतं.
बाकीचं फारसं आठवत नाही पण एबी आणि रोशन या ईस्रायली बहिणींबद्दल मात्र मला खूप कुतूहल होतं हे नक्कीच. त्या दोघी अतिशय सुंदर होत्या. त्या काळात त्या हिंदी सिनेसृष्टीतल्या समूह नृत्यांगना होत्या. त्यांच्याकडे नृत्य शिकवायला कोणी कोणी येत. खरं म्हणजे आम्हाला त्यांच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती पण त्या दोघींना त्यावेळी मस्त फॅशनेबल कपडे घालून, आता आपण ज्याला मेकअप म्हणतो पण त्यावेळी रंगवलेल्या चेहऱ्याने त्यांना गल्ली ओलांडताना मी अनेकदा माझ्या घराच्या खिडकीतून पहायची आणि खरं सांगू मला त्या दोघींबद्दल खूप आकर्षण वाटायचं. त्याही वयात वाटायचं की यांच्याशी आपण का नाही बोलायचं? का नाही त्यांच्याशी मैत्री करायची?
त्या उदरनिर्वाहासाठी सिनेमात गेल्या. त्यांच्यावर घर चालवण्याची जबाबदारी होती. रोशन तर साधारण माझ्याच वयाची होती. एबी थोडी मोठी होती.
उदरनिर्वाह,घर चालविणे यातलं गांभीर्य तेव्हा मला कळतही नव्हतं. इतकंच कळत होतं आपल्यापेक्षा त्या वेगळ्या आहेत.
काही वर्षांनी ते सारं कुटुंब पॅलेस्टाईनला स्थलांतरित झाले.
अशा या पार्श्वभूमीवर आजही ती धोबी गल्ली मला एखाद्या स्थितप्रज्ञा सारखी भासते. तिथल्या घराघरांमध्ये घडणाऱ्या घटनांची खरी साक्षीदार वाटते. सर्व धर्म आचार विचार समावेशक वाटते.
तो एक अथांग जीवन प्रवाह होता आणि माझं बालपण त्याच प्रवाहात वल्ही मारत घडत होतं.
☆ “गंधर्व स्मरण …” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
“नाना”, बालगंधर्व ह्यांचं एक नाटक “संत कान्होपात्रा” – ह्या नाटकावर त्यांचा अतिशय लोभ होता. त्यातील कान्होपात्रा ह्या भूमिकेत ते अंतर्बाह्य रंगत असत. जेव्हा हे नाटक प्रथम रंगभूमीवर आले, तेव्हा त्यातील शेवटचा – पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या देवालयातील प्रवेश, म्हणजे श्री विठ्ठलाची मूर्ति आणि त्यालगतचे गर्भगृह, हे पडद्यावर दाखवत असत.
बालगंधर्व ह्यांनी त्यांच्या नाटकातील मंडळींना पंढरपूर येथे पाठवले. तिथली छायाचित्रे आणवली अन् रंगभूमीवर तसेच्या तसे सर्व उभे केले. ह्यासाठी सावंतवाडी येथील ‘भावजी’ ह्या नावाचा कसबी कलाकार नानांनी गाठला. सुतारांच्या सोबत हे कलाकार काम करू लागले. भावजी ह्यांनी विठ्ठलमूर्तिकरता शिरसाचे लाकूड मुद्दाम निवडून आणले, अन् त्या मूर्तीचे काम प्रचंड जीव ओतून केलं. मंदिराचा सेट आणि मूर्ति, सर्व घडवण्यासाठी २ वर्षं काळ गेला. अतिशय देखणी मूर्ति घडवली, ज्याने लोक तासंतास तिच्याकडे बघत बसत. दुर्दैवाने ती व्यक्ती पुढं मानसिक संतुलन बिघडून बसली, पण नानांनी त्यांच्या कलागुणांना जाणून त्यांची अखेरपर्यंत काळजी घेतली. त्यांस अंतर दिले नाही. पुढं हा मंदिराचा देखावा अन् मूर्ति प्रथम मुंबईत ‘रॉयल ऑपेरा हाऊस’मधे दाखवले गेले, जे पाहण्यास प्रचंड गर्दी लोटली.
त्यानंतर नाना कंपनीला घेऊन पंढरपूर येथे गेले. कान्होपात्रा प्रयोग लावला. मंदिराचा सेट अन् विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली. प्रयोग रंगला. थिएटर प्रचंड गर्दीने भरून गेले होते. नाटक पाहताना सर्व थिएटर स्तब्ध होते, डोळे लावून तो थाट अन् अभिनय बघत होते. नाटकाच्या शेवटी पांडुरंगाच्या पायांवर डोके ठेवून कान्होपात्रा देह ठेवते, ह्या प्रसंगानंतर पडदा पडून प्रयोग संपला. रसिक त्या प्रयोगाने इतके प्रचंड भारावून गेले. त्यांना भान राहिले नाही. सर्व रसिकांनी स्टेजवर येऊन कल्लोळ केला. सर्वांचे म्हणणे, ‘आम्हाला कान्होपात्रा ह्यांचे दर्शन पाहिजे’!!
ही गर्दी स्टेज मॅनेजरला पांगवता आली नाही. काय करायचं त्यास समजेना. एवढा कसला गलबला झाला म्हणून बालगंधर्व मेकअप न उतरवता स्टेजवर आले, तेव्हा काय विचारावे? लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी टेकवून नमस्कार केला. गर्दी कमी होता होईना. सर्वांना दर्शन घ्यायचेच होते आणि नाना मात्र, “अरे देवा! हे काय करता? माझ्या काय पाया पडता?” म्हणत लोकांना विनंती करत होते, “असे नका करू, असे नका करू!!!” सर्व प्रेक्षकांचे दर्शन घेऊन झाले. “झाले आमचे काम”, असे म्हणत सर्व प्रेक्षक निघून गेले.
त्याच वेळी योगायोगाने एकादशी आली. नानांच्या मनात पांडुरंगाला महापूजा, अभिषेक करण्याची प्रचंड इच्छा जागी झाली. पंचामृत स्नानासाठी त्यांनी तयारी केली. कोऱ्या दुधाच्या घागरी आणल्या, त्यातील अनेक घागरींमधील दुधाचे विरजण लावून पंचामृतस्नानासाठी श्री पांडुरंगाची महापूजा सिद्धता झाली.श्री विठ्ठलाला भरजरी पोशाखही तयार करून घेतला. एकादशी दिवशी भल्या पहाटे नानांनी चंद्रभागेत स्नान केले, सोवळे नेसून आत गाभाऱ्यात जाऊन पंचामृत स्नान आणि पूजन केले. हा सोहळा गाजला. ही बातमी समजली म्हणून हे सर्व बघायला पंढरपूरच जणु तिथं लोटले होते. पूजा झाल्यावर अतिशय आपुलकीने प्रेमाने सर्वांना पंचामृत तीर्थ, प्रसाद वाटला… ही त्यांच्यामधील मुरलेल्या ‘कान्होपात्रा’ची खरी आणि ‘नाना’ ह्या व्यक्तीची खरी भक्ती!!!
बालगंधर्व हे निरपेक्ष स्नेहाचे, निःस्वार्थ प्रेमाचे लोभी होते. उत्कट प्रेमाचे तंतू जपून ठेवणारे अतिशय हळवे व्यक्तिमत्त्व!! जीवन हे सौंदर्य आस्वादासाठी अन् त्यातून प्राप्त होणारा दिव्य आनंद अनुभवण्यासाठीच आहे. नानांनी आयुष्यभर जणु हाच प्रसाद स्वतःच्या कलेतून, गायनातून भरभरून सर्वांना दिला. त्यास अनुभवून तर त्यांच्या काळास “गंधर्वयुग” म्हणून मानले जाते!!
ह्या गंधर्वयुगाची सुरूवात २६ जून १८८८ ला नानांच्या जन्माने झाली, त्यास काल १३६ वर्षे झाली!!
दोन दिवसांवर आषाढीवारीसाठी ज्ञानेश्वरमहाराज पालखी प्रस्थान आहे पंढरपूरकडे आणि कालच नानांचा जन्मदिवस झाला, म्हणून हा लेख ! हा एक योगायोगच!
27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.
28. गोळीरोधक जॅकेट, अग्निरोधक, कारचे वायपर व लेझर प्रिंटर्स … ही सर्व स्त्रियांनी शोधलेली साधने आहेत.
29. मध हे एकमेव खाद्यान्न चिरकाल टिकते.
30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.
31. साप तीन वर्षांपर्यंत झोपू शकतो.
32. सर्व विषुववृत्तीय अस्वलेडावरी असतात.
33. विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.
34. फुलपाखरे पायांनी चव अनुभवतात.
35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.
36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला नाही.
37. मृत्यूपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.
39. मुंग्या विष प्राशनानंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.
40. वीज-दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.
41 रक्ताचा तीस फूट फवारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते.
42. उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात.
43. इअरफोन एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.
44. सिगरेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.
45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.
माहिती संकलक : अज्ञात
प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल)
मागील भागात डार्कवेब चांगल्या कामासाठी कोण आणि का वापरते याबद्दल चर्चा केली. आज मात्र डार्कवेबच्या अनुचित वापराबद्दल बोलणार आहे. यातील सगळ्यात वाईट गोष्ट ही की डार्कवेबचा ७०% ते ८०% वापर अनुचित गोष्टींसाठीच केला जातो.
डार्कवेबवर त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात ज्याला सभ्य समाज मान्यता देत नाही. किंवा त्या त्या देशाचे कायदे अटकाव करतात. इथे तुम्हाला हत्यारांची खरेदीविक्री, माणसांची खरेदी विक्री, लहान मुलांच्या अश्लील फिल्म, आतंकवाद्यांचे परस्परातील व्यवहार या सगळ्याच गोष्टी येतात. कारण यावर कोणत्याही देशाच्या सरकारला किंवा सुरक्षा यंत्रणाना नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकत नाही. ज्यावेळी एखादी गोष्ट पूर्णतः बंद करणे शक्य नसते त्यावेळी त्या गोष्टीचा समाजासाठी चांगला वापर कसा करता येईल हेच बघणे जास्त फायदेशीर असते. आणि तेच अनेक देशांच्या सुरक्षा यंत्रणा करतात.
याचे एक उदाहरण देतो. अमीर खानचा एक चित्रपट आला होता. ‘सरफरोश’ नावाचा. त्यात दोन पात्र दाखवले आहेत. एक आहे इन्स्पेक्टर ‘सलीम’ आणि दुसरा आहे ‘फटका’ ( जो मुंबईच्या अशा भागात राहतो जिथे अपराधिक गोष्टी केल्या जातात. ) इन्स्पेक्टर सलीम कायम त्या ‘फटका’ला पैसे देऊन त्याच्याकडून वेगवेगळी माहिती मिळवत असतो. आता जर तो अधिकारी त्या भागात ये जा करत असेल तर त्याला ते बंद करता येणे शक्य नाहीये का? उत्तर मिळते, ‘नाही’. कारण त्याने एका ठिकाणी धाड टाकली तर तो व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी चालू होईल. दुकान बंद करता येईल पण पण मानसिकता कशी बदलणार? त्यापेक्षा त्या गोष्टी तशाच चालू द्यायच्या, फक्त त्यातून समाजाचा समतोल ढळणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी त्याच प्रमाणे अनेक सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी आपली ओळख लपवून डार्कवेबवर वावरत असतात. आणि त्या ठिकाणी जी माहिती मिळेल त्यातून समाजाचे कमीत कमी नुकसान होईल याचा प्रयत्न करतात.
आता काहींना असाही प्रश्न पडेल की नुसते वावरल्याने माहिती कशी मिळते? डार्कवेबवर कायम वेगवेगळे समूह बनवले जातात. जे अगदी काही दिवसांपुरते किंवा अनेकदा तर काही तासांपुरते सक्रीय असतात. ज्या सदस्यांना अशा समुहात सामील व्हायचे असते त्यांना एक लिंक पाठवली जाते ज्याच्या आधारे ते त्या समूहात सभासद बनतात. ( whatsapp चा वापर करणाऱ्या माणसाला हे लगेच लक्षात येऊ शकेल. कारण त्याचे बरेचशे कार्य डार्कवेबसारखेच असते. ) त्या समूहाच्या माध्यमातून संदेश दिले घेतले जातात. किंवा मग एखादी खरेदी विक्री केली जाते. एकदा का त्याचा उद्देश पूर्ण झाला की तो समूह बंद केला जातो. आणि हेच कारण आहे की जोपर्यंत सुरक्षा यंत्रणा अशा समूहातील गोष्टी डिकोड करतात, समूह बंद केलेला असतो किंवा त्या सदस्यांनी आपले स्थान बदललेले असते. मग कसे कुणाला पकडता येईल?
तुम्हाला हे whatsapp चे उदाहरण यासाठी दिले कारण मध्यंतरी एका मित्राशी चर्चा करताना त्याने हा प्रश्न उपस्थित केला होता की, whasapp ला डार्कवेब म्हणता येईल का? इथेही सगळे संदेश एनकोड करून पाठवले जातात. इथे कधीही समूह तयार करता येतो, कधीही बंद करता येतो. इथे कोणकोणते समूह आहेत हे कुणालाही कुणी सांगितल्याशिवाय समजत नाही. तुम्हालाही हा प्रश्न पडला का? या प्रश्नांचे उत्तर आहे, ‘whatsapp ला डार्कवेब म्हणता येत नाही.’ याला दोन कारणे आहेत. पाहिले कारण म्हणजे इथे तुम्ही तुमच्या फोन नंबर किंवा इमेल आयडी वरून लॉगीन होतात. या दोन्ही गोष्टी तुमची ओळख असतात. म्हणजेच इथे तुम्ही आपली ओळख लपवू शकत नाहीत. आणि दुसरे कारण म्हणजे तुम्ही whasapp वर जे समूह बनवतात त्याचा डेटा जरी एनकोड केलेला असला तरी तो एका सर्व्हरवर साठवलेला असतो. आणि जर सुरक्षा यंत्रणानी सबळ कारण देऊन मागणी केली तर तो त्यांना मिळू शकतो.
आता अजून एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. नेटवर्क जर सर्व्हर आणि क्लाईंट मिळून तयार होते तर इथेही सर्व्हर असणार ना? हो असतोच. पण कोणत्याही सरकारचे त्यावर नियंत्रण नसते. सरकारला त्यावर का नियंत्रण ठेवता येत नाही हे मात्र पुढील भागात.