मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा : लेक लाडकी या घरची ☆ सुश्री निशा डांगे

सुश्री निशा डांगे 

☆ जीवनरंग : लघुकथा – लेक लाडकी या घरची – सुश्री निशा डांगे

मृणाल माझी सून चार वर्षांपूर्वी सोनपावलाने घरात आली. तिच्या येण्याने जणू काही घराचा स्वर्गच झाला. क्षणार्धात तिने सर्वांची मने जिंकली. सतत हसतमुख असणाऱ्या मृणालणे आपल्या हास्यातुषाराने घरातील वातावरण आनंदी केले. घरातील सर्वच जबारदाऱ्या कौशल्यपूर्वक सांभाळून ती आपली वैद्यकीय सेवा करीत असे. माझ्या सर्व मैत्रिणींना हेवा वाटावा अशी सून मला लाभली. कधी सुनेची लाडकी मुलगी झाली कळलेच नाही. एकदम मागून येऊन मला बिलगायची. “आई” म्हणून तोंडभरून प्रेमाने हाक मारायची. मृणाल आजही तशीच बिलगते, मायेने आमचं सगळं करते पण तिच्या हास्यातील खळखळणं केव्हाच संपलंय. केवळ आमच्यासाठी हृदयात अपार दुःख साठवून कृत्रिम हास्य तिच्या ओठांवर असते. ती कधी जाणवू देत नाही पण मी तिची आई झालेय नं आता त्यामुळे तिचं दुःख माझ्या नजरेतून सुटत नाही. झोपेत ओली झालेली उशी मला तिच्या अंगावर पांघरून घालतांना दररोज दिसते.

मंदारला जाऊन आज चार वर्षे झालीत. मृणाल माहेरी न जाता आमच्यासाठी सासरी थांबली. मंदार आमचा एकुलता एक मुलगा तो गेल्यावर आम्ही एकाकी पडलो . मृणालने नवरा गेल्याचे दुःख पचवून मंदारची सर्व जबाबदारी उचलली. आम्हा म्हाताऱ्यांची आधारकाठी झाली. मृणाल आणि मंदार एकाच वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते. एक दिवस मंदार मृणालला घरी घेऊन आला व आम्हाला म्हणाला ही तुमची होणारी सून . मुलाने असे परस्पर सूत जुळवले त्याचं जरा मनाला लागलं पण मृणालला पाहताक्षणी वाटले इतकी गोड, गुणी मुलगी आम्हालाही शोधून मिळाली नसती. फार थाटामाटात विवाह सोहळा होऊन मृणाल सून होऊन घरी आली. दोघेही एकाच इस्पितळात काम करत होते. नवीन जोडप्याचा सुखाचा संसार चालू होता आणि अचानक एका अपघातात मंदार गेला. लग्नाच्या एका महिन्यात मृणालला वैधव्य प्राप्त झालं. ह्या प्रचंड आघातातून सावरून तिने मंदारचे नेत्रदान करण्याचा निर्यण घेतला. म्हणाली आई,” मंदारचे डोळे राहिले तर मला सतत वाटेल तो मला बघतोय, त्याच्या सुंदर डोळ्यांनी हे सुंदर जग दुसऱ्या कोणालाही पाहू दे.” आम्हाला तिचा निर्णय पटला. मंदारचे नेत्रदान झाले.

आज मी सुद्धा एक निर्णय घेतलाय तो म्हणजे माझ्या सुनेचा पुर्विवाह करण्याचा. तिलाही हक्क आहे आयुष्याची पुन्हा नविन सुरुवात करण्याचा, पुन्हा खळखळून हसण्याचा. तिच्यासाठी स्थळ शोधत असतांना महेश कुळकर्णी नावाच्या मुलाचे तिच्या योग्य एक स्थळ सांगून आले. ते भेटण्यासाठी आले तेव्हा मुलाला बघून मृणालच्या दुःखाचा बांध फुटला ती एकदम रडू लागली. ,” मृणाल काय झाले? तू एकदम अशी…….”

“आई, हा ……. म्हणून तिने महेशच्या डोळ्यावरच्या गॉगलकडे हात दाखविला. मग महेशच तिला सावरून बोलू लागला हा तोच गॉगल आहे जो तुम्ही मला मंदारच्या डोळ्यांसाठी भेट म्हणून इस्पितळात माझ्या बिछान्यावर ठेवून गेला होतात. त्यासोबत एक चिठ्ठीही होती असे म्हणत त्याने खिशातील एक कागद तिच्या समोर ठेवला त्यात लिहिले होते मंदारच्या डोळ्यांची काळजी घ्या. मंदारची खरी काळजी तर तुम्ही आहात न मी तीच घेण्यासाठी आलोय.

©  सुश्री निशा डांगे

पुसद

मो 84218754

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अबोली ☆ सुश्री मानसी चिटणीस

☆ मनमंजुषेतून :  अबोली  – सुश्री मानसी चिटणीस

लहानपणापासूनच मला अबोली आवडते..माझं नाव अबोली का ठेवलं नाहीस म्हणून मी  आईवर  कितीदातरी रूसले

असेन. आमच्या मागच्या अंगण्यात अबोलीचं रान होतं. मी रोज फुलं वेचून आणायचे आणि हट्टाने आजीकडून त्याचा गजरा करून घ्यायचे. रोज वेणीत माळायचे. त्या अबोलीच्या गजऱ्यासाठी मी माझे केस ही वाढवले होते..

चुकला पिर मशीदीत तशी मी बघावं तेव्हा त्या अबोलीच्या रोपांसोबतच असायचे..असं कोणतं नातं , ऋणानूबंध आमच्यात होते काय माहित पण माझं अबोली वेड कायम राहिलं..

लग्न झाल्यावर कित्येक वर्ष गेली आणि संसारीक अबोल्यात माझीच अबोली झाली..अंगणातली अबोली मनात लपून गेली आणि मी अबोली होत गेले. तिचे केशरी रंग रुजवत राहिले रोज नव्याने. अबोली होवून जगताना तिला नेहमीच समजायची माझी भाषा अन् मला तिची सळसळ मोहवायची.

साधारण वर्षभरापुर्वी एका झाडवाल्याकडे मला ती मिळाली  आणि माझं अबोलीप्रेम पुन्हा उफाळून  आलं. एखादी जिवलग मैत्रीण भेटावी असा आनंद झाला. वर्षभर ती छान फुलली, डवरली, मोहरली पण  साधारण महिनाभरापुर्वी काही कारणास्तव आम्हाला सगळ्यांनाच  पंधरा दिवस गावाकडेच रहावं लागलं आणि त्यावेळात घरातली सगळी झाडे सुकून गेली त्यात माझी प्रिय अबोली सुद्धा सुकली..

मन उदास होतं एकदम. ही झाडं म्हणजे माझा जीव की प्राण..पुन्हा नवी झाडं आणली , रुजवली तेव्हा जरा जिवात जिव आला..पण अबोली काही गवसली नाही..मी आजूबाजूच्या साऱ्या नर्सऱ्या शोधल्या पण कुठेच सापडली नाही आणि मनाची तलखी मात्र वाढत राहिली. असेच आठ दहा दिवस गेले..

एक दिवस दळण टाकायला गिरणीत चालले होते तेव्हा एका घराच्या अंगणात ती मला दिसली आणि मी हरखले. भराभर गिरणीत जाऊन दळणाचा डबा ठेवला आणि जवळपास धावतच पुन्हा त्या घराजवळ  आले आणि दाराची कडी वाजवली. एका काकूंनी दरवाजा उघडला. मी मागचा पुढचा विचार न करता एका दमात बोलून गेले,”मला अबोली खूप आवडते. मी घेऊ का दोन रोप तुमच्या बागेतली ? “त्यांनी आश्चर्याने मला आपादमस्तक न्याहाळले आणि हो..घ्या. एवढे बोलून दरवाजा लावून घेतला.

मी तेवढ्या परवानगीनेही खूष झाले. अलगद तिथली दोन रोपं जमिनीतून मोकळी केली आणि घरी घेऊन आले. आल्या आल्या मोगऱ्याच्या शेजारच्या कुंडीत त्यांना जागा करून दिली. पण दोन दिवस दोन्ही रोपं रुसल्यासारखी वाटत होती..मलाही करमेना त्यांना गोंजारत राहिले वेळेवर पाणी घालत राहिले..

आज सकाळी झाडांना पाणी घालायला ग्रिल  उघडलं तर काय..!दोन्ही रोपांतून दोन पिटुकल्या  कळ्या नुकत्याच उमलल्या होत्या , जशाकाही माझ्याकडे डोळे मिचकावून हसत होत्या..खूप खूप खूप आनंद झाला मला..

अबोलीने माझी मैत्री स्विकारलीय..आता ती पुन्हा फुलेल..बहरेल..मोहरेल माझ्या इतकुश्या अंगणात आणि मनातही..

 

© सुश्री मानसी चिटणीस

चिंचवडगाव

फोन : 9881132407

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मोर्चा ☆ सुश्री वसुधा गाडगीळ

सुश्री वसुधा गाडगिल

☆ जीवनरंग : मोर्चा –  सुश्री वसुधा गाडगिल ☆

 ” घे, ही भाकर खा … ” भाकरीचा तुकडा त्या माणसाच्या तोंडाजवळ नेत बाई त्याला म्हणाली.

बाईचा हात झटकून तो चिडून ओरडला

” कसला वेडेपणा चालवला आहे!”

तेवढ्यात सर्व बायकांनी चारीबाजूने त्याला घेरले.  काहींनी मागून शर्ट धरला , एकीने समोरून शर्टचा कॉलर पकडला.  दोघीतिघींनी त्याला धरले आणि ओरडल्या

” आमच रेशन खाल्ल ना ! आता भाकर खा ! ”

तो  सर्व बायांच्या वेढाखाली अडकला.अखेरीस एका बाईने त्याला भाकर दिली,  भाकरी खाल्ल्याबरोबर त्याने ती थूsss करून थुंकली. तेवढ्यात बायकांनी वाघिणींसारखी  गर्जना केली.. ….

“आमचा वाटच रेशन बळकवण्यात काही लाज  नाही वाटली  आणि आमच्या घरातली भाकरी थुंकतो आहेस!”

“मी …. मी  नाही … मोठ्या साहेब लोकांनी तुमच्या भाकरीची कणिक.. …” म्हणत त्याची जीभ पडायला लागली.

“कान धर, आता आम्हाला उत्तम रेशन देणार की नाही !”

फूड ऑफिसरने स्वताचे कान धरून ग्रामीण महिलांची माफी मागीतली .  नऊवारी नेसलेल्या खेड्यातील  महिलांचा “हल्ला बोल” मोर्चा  यशस्वी झाला होता !

 

© डॉ. वसुधा गाडगीळ 

संपर्क –  डॉ. वसुधा गाडगिल  , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.

मोबाईल  – 9406852480

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ स्वाभिमान (भावानुवाद) ☆ सुश्री माया महाजन

☆ जीवनरंग : स्वाभिमान –  सुश्री माया महाजन ☆

लिंक >> मूळ हिंदी कथा – स्वाभिमान – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

एका नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नासाठी दुसर्‍या शहरात जाण्याचा योग आला. नवरीच्या हातावर मेंदी काढण्यासाठी आलेल्या मुलीकडे लोकं बघत आणि आश्चर्यचकित होत. दुधाळ गोरा रंग, उंच अंगकाठी, तरतरीत नाक डोळे पण मुकी होती. मोठं मन लावून ती आपल्या कामात गर्क होती.

सगळ्या बायका मोठ्या उत्सुकतेने तिला आणि तिच्या कलेला निरखित होत्या. अचानकच एक बाई तिच्याशी काही बोलली तर तिने लिहून दाखविण्याची खूण केली. त्या बाईने कागदावर लिहिले ‘‘तुमच्या या विकारावर आमच्या शहरातील एक ख्यातनाम वैद्यजी इलाज करू शकतील.’’

त्या मुलीने त्याच कागदावर आपले उत्तर लिहिले ‘‘अशक्यच! मी जन्मत:च मुकी आहे आणि खूप इलाज करून झालेत.’’

त्या बाईने परत लिहिले, ‘‘एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? शक्य आहे की तुम्ही बर्‍या व्हाल! तेव्हा किती सुखी न् आनंदी व्हाल!’’

मुलीने त्याखाली लिहिले मी आजसुद्धा याच अवस्थेत जगातील सर्वात आनंदी आणि सुखी मुलगी आहे.

आणि ती मंदसे हसली. आपल्या चेहर्‍यावर स्वाभिमानाची आभा पसरवत राहिली.

मूळ हिंदी कथा – स्वाभिमान – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया महाजन 

मो.-९८५०५६६४४२

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ लघुकथा : दुर्घटना , अट ☆ भगवान वैद्य ‘प्रखर’

श्री भगवान वैद्य प्रखर

संक्षिप्त परिचय

जन्म : 23 डिसेंबर 1946

सेवा-काल: मध्य प्रदेश लोक निर्माण विभाग, भारतीय डाक-तार विभाग, भारतीय आयुर्विमा महामंडळ यांत एकूण 40 वर्ष.

प्रकाशन/प्रसारण :  4 व्यंग्य- संग्रह, 3 कथा-संग्रह, 2 कविता-संग्रह, 2 लघुत्तम कथा-संग्रह , मराठी तून हिंदीत  6 पुस्तकें व  30 कथांचा अनुवाद प्रकाशित। आकाशवाणी हून सहा नाटकांसह अनेक कथा, कविता,लेख प्रसारित ।

पुरस्कार- सम्मान: भारत सरकार चा ‘हिंदीतर-भाषी हिंदी लेखक राष्ट्रीय पुरस्कार’, लघुकथा-संग्रह बोनसाई यास किताब घर दिल्ली चा ‘आर्य स्मृति साहित्य सम्मान 2018, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा सीढ़ियों के आसपास आणि चकरघिन्नी या कथा-संग्रहांस मुंशी प्रेमचंद पुरस्कार(दोन बेळा), अंतस का आदमी या कविता-संग्रहास संत नामदेव पुरस्कार, धर्मक्षेत्रे -कुरुक्षेत्रे ला मामा वरेरकर अनुवाद पुरस्कार इत्यादि

☆ जीवनरंग : लघुकथा : दुर्घटना , अट  –  श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆

☆  दुर्घटना ☆

‘अहो, तुम्हीं फक्त ऐकलेच असेल परंतु आमचे घरी आजसुद्धा जादू चा एक आकर्षक दिवा ठेवलेला आहे.  आमच्या पूर्वजांच्या काळापासून जपून ठेवलेला आहे तो दिवा.’

‘खरंच! पण त्या पासून कार्यसिद्धि कशी काय होत असते हो?’

‘ते तुम्हीं ऐकलच असेल ना, की जादूच्या दिव्याला थोडं घासलं की लगेच जिन्न प्रगट व्हायचा आणि म्हणायचा, ‘बोलो, मेरे आका…आणि जी वस्तू मागितली ती घेऊन तो क्षणार्धात हजर व्हायचा.’

‘व्हायचा म्हणजे …! आजकाल नाही का होत जिन्न प्रगट?’

‘नाही, कांही वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली तेव्हांपासून …’

‘कसली दुर्घटना..?’

‘तेव्हां आमचे ताऊजी (वडिलांचे मोठे भाऊ) म्हणे चौथीमध्ये शिकत होते. आपण स्वत: जादूचा दिवा घासून जिन्न प्रगट करावा, अशी त्यांची खूप इच्छा होती आणि एक दिवस सापडली त्यांना संधी. एकटे असतांना दिवा हाती लागला. मग काय, ताऊजींनी दिवा घासला, तोच समोर जिन्न हजर! जिन्न बघितल्याबरोबर ताऊजींची घाबरगुंडी उडाली. आता त्यास काय मागावे, हे त्यांना सुचेना. त्यांनी कांही दिवसांपूर्वीच आपल्या पाठ्य-पुस्तकात ‘ईमानदार माणूस’ नावाची एक कथा वाचली होती. त्यांना ती खूपच आवडली होती.

कथेतील ईमानदार माणूस, त्यांच्या मनावर चांगलाच ठसा उमटवून गेला होता. बस्‍, झटकन ताऊजींनी त्या जिन्नला म्हंटले, ‘मला एक ईमानदार माणूस आणून दे.’ या घटनेस आज कितीतरी वर्षे होऊन गेलीत. ताऊजींनी केलेली मागणी ऐकून गेलेला जिन्न अद्याप परत आलेला नाही.’***

 

☆ अट ☆

‘काय हो, तो कुख्यात तस्कर वारंवार आत्मसमर्पणाची इच्छा दर्शवितो आहे मग सरकार का बरं त्याची मागणी पूर्ण करीत नाही?’

‘सरकार कशी काय पूर्ण करणार त्याची मागणी? त्याचा खात्मा करण्याकरिता कितीही पोलीसांचा बळी द्यावा लागला तरी चालेल, पण सरकार त्याची आत्मसमर्पणाची मागणी काही पूर्ण करणार नाही.’

‘पण कां बरं?’

‘त्या तस्कराची आत्मसमर्पणाची अटच तशी आहे.’

‘अट हीच ना की त्याचे सगळे गुन्हें माफ करण्यांत यावे आणि त्यावर कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यांत येऊ नये!’

‘नाही हो, ही अट नाही त्याची.’

‘मग ही अट असेल की त्यास सरकारकडून थोडी जमीन अथवा काही आर्थिक मदत देण्यांत यावी जेणे करुन तो आपले व आपल्या कुटुंबियांचे पालन-पोषण सामान्य नागरिकां प्रमाणे करु शकेल.’

‘कित्येक वर्षांपासून निवडणूक लढविण्याकरिता जो गृहस्थ नेत्यांना आणि मंत्र्यांना कोट्यावधि रुपये देतो आहे तो शासनासमोर कशाला अशी भीक मागेल?’

‘मग त्याची अट तरी काय आहे की जी शासनास मान्य नाही?’

‘अहो, त्याच्याकडे त्याची एक वैयक्तिक डायरी आहे आणि त्याची अट ही आहे की आत्मसमर्पणानंतर त्यास त्याची ही डायरी प्रकाशित करण्याची सूट असावी.’ ***

 

© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

संपर्क : मो. 9422856767, 8971063051  * E-mail[email protected] *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ अपशकुनी ☆ भावानुवाद सुश्री माया महाजन

☆ जीवनरंग : अपशकुनी  –  सुश्री माया महाजन ☆

जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला, शेजार्‍या-पाजार्‍यांनी तिचे जगणे मुश्कील करून टाकले होते. पुरुषांची गिधाडाची नजर तिच्यावरच रोखलेली असायची तर बायकांची कुचकट दृष्टी तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असायची.

आपल्या मुलाबाळांच्या भविष्याच्या काळजीने तिने नोकरी धरली. ऑफिसला जायला ती निघायची तेव्हा आणि परत घरी आल्यावर अनेक शंकेखोर नजरा तिच्यावर रोखल्या जायच्या. या सर्वांकडे दुर्लक्ष करून ती मात्र आपल्या जीवन-संघर्षाला सामोरे जात होती, परंतु अनेक वेळा तिच्यासाठी वापरलेला ‘पांढर्‍या पायाची’ शब्द तिच्या कानावर पडत होता.

तिला मनापासून वाटे की त्या वासंती काकूना ओरखडावं ज्यांनी तिच्या नोकरीच्या पहिल्या दिवशीच सार्‍या आळीला ऐकू जार्ईल इतक्या मोठ्याने म्हटलं होतं. ‘‘आग लागो त्या सौंदर्याला ज्याने इतक्या लवकर नवर्‍याला गिळलं आता रोजच आपला अपशकुनी चेहरा दाखवत जाईल, न जाणे किती नवर्‍याचे किती अनर्थ घडवेल! हिला तर इथून हाकलूनच द्यावे.’’

आतापर्यंत ती शांत राहिली होती. पण आज तिने निर्णय घेऊन टाकला की आता यापुढे ती काहीही सहन करणार नाही जर तिच्याविषयी कोणाला सहानुभूती वाटत नसेल, तर तिने का म्हणून त्यांचे टोमणे, अपमान सहन करायचे!

आज तिला पाहाताच वासंतीकाकू जशी बडबडली, ती पाहा येतेय अपशकुनी…

त्याच क्षणी ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘काकू, अपशकुनी मी नाही, तुम्ही आहात. ज्या दिवशी दुर्घटनेत माझ्या पतीचे प्राण गेले. त्या दिवशी सकाळी मी तुमचेच तोंड पाहिले होते. तुम्हीच चालत्या व्हा आमच्या आळीतून!’’

आश्चर्यचकित झालेल्या वासंतीकाकू काही बोलायच्या आधीच त्यांच्यावर एक जळजळीत नजर टाकत ती पुढे निघून गेली.

 

मूळ हिंदी कथा – मनहूस- सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया महाजन 

मो.-९८५०५६६४४२

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा : अकल्पित ☆ सुश्री मंजुषा मुळे

 ☆ जीवनरंग ☆ लघुकथा : अकल्पित ☆ सुश्री मंजुषा मुळे ☆ 

दोन तास झाले तरी ते दार उघडलं नव्हतं. बाहेर थांबलेल्या त्या दोघांची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत होते… त्यासाठीच अमेरिकेहून परत आले होते.

एकदाचं दार उघडलं. नर्स बाळांना घेऊन आली. दोघांनाही प्रचंड आनंद झाला.त्या बाईला तिळं  होणार हे खरंतर आधीच माहिती होतं. पण तीनही बाळं सुखरूप असणं, ही त्या दोघांसाठी फार मोठी गोष्ट होती.

अनेक डॉक्टरांचे उंबरे झिजवून, अनेक प्रकारच्या टेस्टस करून, खूप वेगवेगळ्या शक्यतांवर, पर्यायांवर खोलवर चर्चा करून, त्यांनी हा निर्णय घेतला होता…… आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय. तिला मूल होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ ठरली होती. पण तो सक्षम होता. एखादं मूल दत्तक घ्यावं, असं तिचं म्हणणं होतं. पण “मला माझे मूल होऊ शकत असेल, तर काय हरकत आहे? ‘’हे त्याचं म्हणणं, त्याच्यावरच्या अतीव प्रेमापोटी, त्याच्या भावना जपण्यासाठी, खूप विचारांती तिने मान्य केलं होतं, आणि ‘सरोगसी’ चा पर्याय स्वीकारला होता. आज त्या ‘सरोगेट मदर’ ची प्रसूती झाली, आणि त्याला तीन मुलं झाली. तिलाही मनापासून आनंद झाला…. स्वतःच ‘आई’ झाल्यासारखा.

इतक्यात डॉक्टर गंभीर चेह-याने बाहेर आले. स्वतःचं गर्भाशय भाड्याने दिलेली ती बाळंतीण मात्र स्वतःचा जीव गमावून बसली होती. दोघेही एकदम सुन्न झाले. त्यांना मूल देण्याच्या बदल्यात, तिची स्वतःची तीन मुलं पोरकी झाली होती हे सत्य,  पैसे देऊनही बदलणार नव्हतं.

असह्य अस्वस्थता, दुःख, आणि अपराधीपणाची, मनाला घायाळ करणारी तीव्र वेदना……. दोघांनाही काहीच सुचत नव्ह्तं………….

शेवटी तिनेच कसंबसं स्वतःला सावरलं. त्याचा हात हळुवारपणे हातात घेतला…. “हे बघ, ऐक…  तुला तुझं एक बाळ हवं होतं, तर तीन मिळाली. मी एखादं मूल दत्तक घेऊ म्हणत होते, पण आता तीन मुलं दत्तक घेऊ शकेन…. हो…… तिची पोरकी झालेली तीन मुलं. देवाच्या कृपेने, सहा मुलं वाढवण्यासाठी आवश्यक ते सगळं आहे आपल्याकडे… तिच्या आयुष्याच्या बदल्यात, इतकं तर नक्कीच करू शकतो आपण… हो ना?”

तो कृतज्ञतेने तिच्याकडे पहात राहिला. तिच्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा त्याला प्रकर्षाने जाणवला… मग फक्त डोळे बोलले…. आणि अमेरिकेला परत जाण्यासाठी आता एकूण आठ तिकिटं काढली गेली……….

© सुश्री मंजुषा मुळे

मो ९८२२८४६७६२

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा : दोन अलक ☆ सुश्री नीशा डांगे 

सुश्री नीशा डांगे 

संक्षिप्त परिचय

जि. प. शिक्षिका/ साहित्यिका

प्रकाशीत साहित्य:- मुग्धायणी काव्यसंग्रह  प्रकाशनाच्या वाटेवर:- दीर्घकथा संग्रह, लघुकथा संग्रह, बालकथा संग्रह

प्राप्त पुरस्कार:- पदमगंधा राज्यस्तरीय पुरस्कार, शब्द अंतरीचे कडून कोहिनूर पुरस्कार, मनस्पर्शी कडून साहित्य रत्न पुरस्कार, वीरशैव लिंगायत समाजाकडून 2 वेळा समाजभूषण पुरस्कार प्राप्त

 ☆ जीवनरंग ☆ लघुकथा : दोन अलक ☆

अलक लेखन क्रमांक 1

दूरदर्शनवर महाभारत पाहतांना मोहित म्हणाला

“आई तू का नाही ग यज्ञातून एकदम मोठी मुले काढलीस ?”

“का रे?” आई आश्र्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली

मोठा असतो ना तर शाळेतून घरी आल्यावर एकटे राहताना मला भीती वाटली नसती

 

अलक लेखन क्रमांक 2

प्रजासत्ताकदिनी सायंकाळी ध्वज उतरवून गुरुजी घरी गेल्याबरोबर मुलांनी कुंपण नसलेल्या शाळेत धुमाकूळ घातला. रंगीबेरंगी पताका तोडून मुलांनी त्याचे छोटे छोटे ध्वज बनविले आणि आपापल्या घरावर लावले. कोणी भगवा, कोणी निळा, कोणी हिरवा……..

सुश्री निशा डांगे

पुसद

मो 84218754

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – संकीर्ण ☆ लोककथा : वाखन पठारावरील लोककथा  ☆ सुश्री मंजुषा देशपांडे

सुश्री मंजुषा देशपांडे

 ☆ संकीर्ण : लोककथा  : वाखन पठारावरील लोककथा  ☆ सुश्री मंजुषा देशपांडे

ही लोककथा आहे.  एकदा म्हणे समुद्र आणि पृथ्वीमध्ये सर्व बहिण भावंडांच्यात असते तसे भांडण लागले.  या कथेत सूर्याची मुलगी पृथ्वी आणि  समुद्र व चंद्र मुलगे.   पृथ्वी आणि समुद्राचे एक मिनिट पटत नसे. चंद्र धाकटा,  तो कधी पृथ्वीच्या तर कधी समुद्राच्या पार्टीत.  तर पृथ्वी आणि समुद्राच्या  कडाक्याच्या  भांडणाचे कारण म्हणजे समुद्र पृथ्वीच्या हद्दीत शिरत होता आणि त्यासाठी वा-याच्या मदतीने त्याने मोठमोठ्या लाटा निर्माण करून त्याच्या किना-यालगतची पृथ्वीवरील झाडे आणि घरे दणादणा हलवली,  पृथ्वीला भयंकर राग आला ती तडक सूर्याकडे गेली. चंद्र  होताच साक्षीला.  सूर्याने समुद्राला बोलावले,  समुद्र कसला खट,  काय म्हणाला असेल… तर..म्हणे चंद्राने त्याला उकसवलं,  तो जवळ आला,  लांब गेला.  समुद्र आणि चंद्राच्या खेळात वारा सामिल झाला,  आणि त्यामुळे ते.. काय पृथ्वीला त्रास झाला.  समुद्राला काही पृथ्वीची खोडी काढायची नव्हती. असे साळसूदपणे सांगून त्याने चंद्राकडे पाहून डोळे मिचकावले. सूर्याला काही ते दिसले नाही पण पृथ्वीला दिसल्यामुळे तिचा चरफडाट झाला. पण ती काही न बोलता निघून गेली.  तिने समुद्राला धडा शिकवायचा ठरवला,  विचार करता करता तिला एक युक्ती सुचली,  त्या टेथिस महासागराचा तर तिला फारच वैताग येई, कारण त्याच्यामुळे तिचे तुकडे पडल्यासारखे झाले होते.  तिने समुद्रात लपलेल्या हिमालयाला विचारले,  तुला पहायचंय ना आकाश?  तो पौर्णिमेचा चंद्र…ते हिरवेगार देवदार… हिमालयाला पाहिजेच होते.  त्याला समुद्राची भीती वाटे पण तो तयार झाला.  पृथ्वी म्हणाली,  “ज्या दिवशी तो चंद्रोबा फूल फाॅर्मात असतो, त्या दिवशी तो आणि समुद्र भयंकर दंगा करत असतात आणि त्याचे इकडे तिकडे कुठे लक्ष नसते,  त्या दिवशी तू जोरात उसळी मारून वर ये… हिमालय तयारच होता,  तो दिवस अर्थातच पौर्णिमेचा होता. हिमालय वर आल्यावर सर्वानाच आनंद झाला पण समुद्राला भयंकर राग आला, तो त्याच्या अक्राळ विक्राळ लाटा आपटायला लागला.  पृथ्वीला म्हणे, ” तुझे तुकडे करून टाकीन” रागारागात पृथ्वीच्या घरी गेला आणि जोरजोरात दार वाजवायला लागला.  दिवस होते श्रावणाचे, त्यामुळे पृथ्वीबाई ठेवणीतला हिरवा कंच शालू नेसल्या आणि रंगीबेरंगी फूले भावाच्या अंगावर उधळत त्यानी त्याला घरात घेतले ओवाळले आणि म्हटले,  आजपासून आपल्या नात्याची नवी सुरुवात करू.  भांडणे विसरून जाऊ…माझी मुले तुला दरवर्षी नारळ अर्पण करतील. हा दिवस भावा बहिणीच्या स्नेहाचे प्रतिक होईल.  भावाने स्वतःच्या मर्यादेत राहिल्यास… दरवर्षी… अगदी दरवर्षी सर्व भाऊ बहिणी हा सण साजरा करतील… अशी कोपरखळीही मारायला ती विसरली नाही.

ही गोष्ट मूळच्या वाखन पठारावरील मोहम्मद हुसेन या माझ्या सहसंशोधक मित्राने सांगितली होती.

©  सुश्री मंजुषा देशपांडे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – बाई – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा – अनुवाद – सुश्री माया महाजन

सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

☆ जीवनरंग : लघुकथा – बाई – भावानुवाद सुश्री माया महाजन ☆

शहरातील झाडून सर्व महिला समित्यांनी एकत्र येऊन आयोजन केले. खूप मोठ्या संख्येने महिला एकत्रित झाल्या. कलेक्टर कमिशनर, मेयर यांच्या बायकांबरोबरच काही नेत्यांच्या पत्नीदेखील आमंत्रित होत्या.

महिलांवर होणार्‍या अत्याचारांविरोधात मोकळेपणी, स्पष्टपणे चर्चा झडल्या ज्यात हुंडा, कुटुंबाकडून होणारे शोषण, नोकरदार महिलांना सहकारी पुरुषांकडून होणारा त्रास, स्त्री भ्रूणहत्या इत्यादी मुद्यांवर भरपूर चर्चा झाली. या मुद्यांवर काही प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आले.

दिवसभराच्या या व्यस्ततेनंतर माधुरी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा रात्र झाली होती. जेवणे वगैरे उरकल्यानंतर ती थकलेली अशी पलंगावर पडली की नवर्‍याने तिला जवळ ओढले. माधुरी म्हणाली, ‘‘आज मी खूप थकून गेलेय…’’ नवरा एकदम चवताळून म्हणाला, ‘‘सगळा दिवस भाषणबाजी, घोषणाबाजी करताना स्टेजवर नाचताना थकवा नाही आला आणि आता मला पाहताच थकवा जाणवायला लागला का? समजतेस कोण स्वत:ला.’’

नवर्‍याची मारझोड सहन करून त्याची हवस पूर्ण करून जेव्हा ती पलंगावर मूक अश्रू गाळत पडली तेव्हा विचार करत होती, ‘हाच तर मुद्दा आज आपण मांडला होता, नवर्‍याकडून शोषण, उपेक्षा, मानहानी शेवटी बायकोने कसे तोंड द्यावे या सर्वाला! कुठपर्यंत हे सगळे सहन करावे तिने?

यातून सोडवणूक कधी? तिने मांडलेल्या या मुद्यावर प्रस्ताव मंजूर केला गेला. त्यांनी सर्वांनी अभिनंदन केले होते तिचे.

आता तिला वाटायला लागले की अभिनंदन करणारे जणू आता तिला टोमणे मारत आहेत, तिची चेष्टा करताहेत. पाह्यलं? चालली होती मोठी क्रांतिकारी बनायला.

विसरू नकोस तू बाई आहेस बाई…

 

मूळ हिंदी कथा- औरत- नरेन्द्र कौर छाबड़ा, मो.- ९३२५२६१०७९  अनुवाद- माया महाजन, मो.-९८५०५६६४४२

Please share your Post !

Shares
image_print