मराठी साहित्य – मराठी कथा – *अपुरे घरटे* – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

*अपुरे घरटे*

(इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी लघुकथा के लिए  श्रीमति रंजना जी की लेखनी को सादर नमन)

सकाळची वेळ होती कोवळे ऊन पडलेले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होतं.

आज मंगळवार  बाजारचा दिवस असल्यामुळे मजूर लोकांना कामाला सुट्टी होती. ओळखीचे  एकजण सुट्टीच्या दिवाशी “काही काम आहे का ताई” विचारायला आले . काय काम सांगावे हा विचार करत असतानाच, घराच्या दोन्ही बाजूला बाभळीच्या फांद्या मधे डोकावणाऱ्या फांद्या दिसल्या.  येताजाता त्यांचे काटे अंगाला टोचत असत. ” मामा याच्या मधे आलेल्या फांद्या कट कराल का?”  “हो करतो की ताई” असे म्हणून ते कुऱ्हाड आणायला निघून गेले आणि मी शाळेला गेले.

चार वाजता येऊन पाहिले आणि  त्याला फांद्या तोडायला सांगून अक्षम्य अपराध केल्यासारखे वाटायला लागले .

कारण डेरेदार वाढलेल्या बाबळीच्या प्रत्येक फांदीवर सुगरणींचे अनेक घरटे जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आलेले होते जवळपास एक महिन्याच्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते बिचारे जीव घरटे तयार करत होते.

मुख्य म्हाणजे पोर्च मधे बसून त्यांची कारागीरी पाहणे हा माझ्यासाठी आवडता छंदच बणलेला होता. काडी काडी जमवून घरटे तयार करणारे सुगरण पक्षी पाहून एक नवीन चैतन्य मनात संचारत असे, परंतु मात्र मन पुरतं कोलमडून गेलं होतं. या नराधमाने त्या बाभळीच्या  सर्वच्या सर्व  फांद्या तोडून त्यावरील घरटे मुलांना खेळायला देऊन टाकले होते. या माणसाचं काय करावं तेच कळत नव्हतं

जातायेता टोचणाऱ्या  काट्यां पेक्षा शेजारच्या झाडावरून पाहणाऱ्या दहाबारा सुगरणींच्या नजरा आज मला जास्तच टोचत होत्या.

आपण याला फांद्या तोडायला सांगून फार मोठा गुन्हा केला आहे असं सतत जाणवत होतं.  पुढचे दोन दिवस पक्षांची हालत पाहावी वाटतच नव्हती. परंतु नंतर मात्र ते सारे नवीन घरट्याच्या तयारीला लागले. परंतु आजही झाडाकडे पाहिले की ते अपुरे घरटे चटका लावून जाते.

तात्पर्य :- काम करणाऱ्याची वैचारिक कुवत लक्षात न घेता इतरांना गृहीत धरून काम सांगितले की असे अनर्थ ओढावतात, मग पश्चात्ताप करूनही काहीच उपयोग नसतो. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात  घेऊन स्पष्ट सुचना देणे फार महत्वाचे असते.

 

© श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – घरटं  – श्री सदानंद आंबेकर

श्री सदानंद आंबेकर 

 

 

 

 

 

घरटं 

श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है।  गायत्री तीर्थ  शांतिकुंज, हरिद्वार के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से  निरंतर प्रवास

कल आपने श्री सुजित  कदम  जी  का  मराठी आलेख * घराचे घरपण * पढ़ा। आखिर चिड़िया का घोंसला भी तो घर ही है

इसी क्रम में हम श्री सदानंद आंबेकर जी  के आभारी हैं इस मराठी  लघुकथा  – “घरटं के लिए जो कि उनके जीवन के ही एक प्रसंग से प्रेरित है। )

शहरातील प्रसिद्ध समाजसेवक, अनेक धर्मार्थ संस्थांचे प्रमुख आणि नामवंत बिल्डर, डॉ प्रताप आपल्या बालकनी मधे त्यांच्या धर्मपत्नी सह बसून सकाळच्या चहा चा आनन्द घेत होते। देशकाळाची चर्चा होत असतांना अचानक प्रताप चे लक्ष बालकनी मधे ठेवलेल्या उंची लाकडी रॅक कडे गेले, त्यात सर्वात वरच्या कप्यावर दोन सुरेख लहानगे पक्षी येर-झार करीत होते। लक्ष देऊन पाहिले तर कळले कि ते वारंवार येत-जात, वाळके गवत, कापूस, पंख इत्यादि वस्तु आणून तिथे आपले एक घरटं बनवून राहिले आहेत। बायकोला  ती गोष्ट दाखविली तर तिच्या तोंडून सहजपणे निघाले – ‘अय्या, किती सुंदर घरटं बनवून राहिले आहेत ते, कित्ती मज्जा येईल जेव्हां लहान-लहान पिले चीव-चीव करतील ते . . . .’

हे ऐकतांच प्रतापराव लगेच बोलले- ‘हे कसलं सुंदर, यानी तर घरांत कचरांच व्हायचा आणि कसलं ते चीव-चीव म्हणे, उगांच नसला तो कल्ला व्हायचा। छे छे, हा त्रास आत्ताच लांब करायला हवा। तू नोकराला सांग कि ही घाण आत्ताच्या आत्ता इथून फेक।’

यावर त्यांच्या सौ उत्तरल्या – ‘अहो, यांत काय नुकसान होतंय आपलं ? न ते बिचारे तुम्हांला सीमेंट-वाळू मागतांत न तंर तुमच्या प्लॉट चा हक्कं, मग त्यात कसंला त्रास तो? अहो, तुम्हीं पण तर शहराभरांत कुठेहि इमारती उभ्या करता नां, मग या बिचारयांना कां म्हणून हाकलावे? त्या शिवाय तुम्हीं तर गोर-गरीबांना मदतीचे कामं पण करता नं?’

बायकोचे  उत्तर ऐकून लगेच उठून प्रतावरावांनी लांब दंडा हातांत घेतला नि त्या चिमुकल्या पक्ष्यांचं ते घरटं उधळलं आणि बायको कडे पहांत बोलले- ‘अगं तू पण एकदम भाबडीच, आपल्या या बंगल्याची ब्यूटी खराब व्हायची आणि या घरट्याने आपल्याला काय तरी प्रॉफिट मिळणार??’

प्रतापरावांची पत्नी त्यांच्या कडे न समजणार्या नजरेनी नुसती बघत राहून गेली।

©  सदानंद आंबेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या * – सुश्री रंजना लसणे

सुश्री रंजना लसणे 

कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या

(आदरणीया सुश्री रंजना लसणे जी के शिक्षिका/लेखिका हृदय का अभिनंदन।  इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी कथा के लिए सुश्री रंजना जी को सादर नमन)

जून महिना म्हणजे प्रवेशाची गडबड नवीन येणाऱ्या मुलांची ओळख करून घेणे, त्यांच्या आवडी निवाडी जाणून घेणे, एकदम उत्साहाचे वातावरण, मी मुलांशी छान गप्पा मारत होते  एवढयात  एक नवीन विद्यार्थी प्रवेश झाला. नाव ऋषीकेश नावा प्रमाणे  दिसायला सुंदर  गोरागोमटा स्मार्ट  अभ्यासातही चांगला  होता. पाहताच मनात भरावा असं व्यक्तीमत्व, वरकरणी पाहता सर्व काही ठीकठाक वाटायचे, परंतु  दिसतं तसं अजिबात नव्हते. मुलांच्या रोज नवीन तक्रारी,  “मेम याने मला मारलं”. कधी दगड कधी छडी तर कधी लाताळी, बर विचारलं तर एकही शब्द न बोलता गप्प उभा राहायचा समजावून पाहिलं  चिडून पाहिलं एकदोन वेळेस  मारून ही पाहिलं. मुख्याध्यापकांकडे नेऊन टी.सी. देईन असे सांगितले, परंतु काहीच बदल  नव्हता.

एक दिवस तर त्याने एका मुलाचं चक्क  दगड मारून डोके फोडलं. मला या मुलाचं काय करावं खरंच कळत नव्हतं  तीस वर्षाची नोकरी करून मला एका मुलाला समजावून सांगता येतं नव्हतं. मी पुरती हतबल झाले होते. घरच्यांना सांगून पाहावे म्हणून, मुलांना पाठवून “त्याच्या घरून कोणालातरी बोलावून आणा,” असे सांगितले. मुलानी त्याच्या काका म्हणजे मावशीचा नवरा, यांना बोलावून आणले. बहुतेक येताना मुलांनी  काय घडले ते सांगितले असावे.

शाळेत आल्याबरोबर त्यांनी तोंडाने अर्वाच्य शिव्या देत हातातल्या  छडीने बेदम झोडपायला सुरूवात केली. मला ते पहाणे असह्य होऊन “आहो, सोडा त्याला ही काय पद्धत झाली समजावून सांगण्याची, ” म्हणत मी चक्क त्याला त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले . आणि त्यांना

जायला सांगितलं.  “माजलाय साला,” म्हणत तावातावात ते निघून गेले अन्  मला चक्क चपराक मारल्यासारखं झालं. “सॉरी बेटा” म्हणून त्याला जवळ घेताच, एवढा वेळ मुकाटयाने मार खाणाऱ्या ऋषीला भरून आलं आणि चक्क  मला घट्ट घरून एवढा रडला की अक्षरशः पूर्ण वर्ग रडला.

जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी तो शांत झाला.  बाकी मुलांना बाहेर पाठवून त्याची चौकशी केली तेव्हा कळलं की, खरं तर त्याला एकट्या आईला पुण्याला सोडून इथं राहायचं नव्हतं.

त्याचे वडील  सहा महिन्या पूर्वी लाईटचे काम करताना शॉक लागून मरण पावले. आई मामाकडे पुण्याला राहते मामा मामी पण काका सारखेच वागायचे. आई आणि बहिणी यांचे हाल त्याने पाहिलेले होते. दोन मोठ्या बहिणी आई एवढे एकत्र शिवाय याच्या  शिक्षणाचा खर्च एवढे  एकाच ठिकाणी नको म्हणून मावशी उदार अंतःरणाने याला घेऊन आलेली. परंतु सर्वांनी असं अलग अलग राहावे  हे त्याला मान्य  नव्हते . तसेच त्याला आई आणि बहिणींची   काळजी वाटत होती.  “तू नकोस काळजी करू, मी तुझ्या  आईशी नक्की बोलेण, पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच एकत्र राहाल, असे मधेच पुण्याच्या शाळेत तुला कोणी घेणार नाही तुझे वर्ष वाया जाईल पुन्हा चौथीत बसायला तुला आवडेल का ? ”  असे म्हटल्यावर त्याला चे पटले . मी आईला सांगते असे म्हणताच तो खूष झाला . चॉकलेट खाऊन खेळायला गेला  आईचा नंबर मिळवून   त्यांना, “ताई, बाळापूरला  आल्यानंतर मला भेटा आणि तो छान अभ्यास करत आहे,” असे ही सांगितले. हे सर्व सगळ्या मुलांच्या  समोर घडल्यामुळे मुलांनी त्याची तक्रार करणे  नुसते बंद  केले असे नाही, तर तो नेहमी  खूष कसा राहील यासाठी ती सारी न सांगताच प्रयत्न करू लागली . वर्षभरात अप्रतिम  अभ्यास केला, एवढेच नव्हे, तर काका सोबत राहून दाढी कटिंग चे कामही शिकला. त्याच्यातील हा बदल पाहून मलाही समाधान वाटलं मधेच दोनचार वेळा तू पुढच्या वर्षी माझ्याकडे राहातोस का विचारलं परंतु स्वारी जागेवरच अडलेली. शेवटी  त्याच्या आईलाच मी घडलेला सर्व प्रकार समजावून सांगितला, ” ताई कुठेही राहिलात तरी काम तर करावेच लागणार कुणीही सगळ्या कुटुंबाला बसून खाऊ घालणार नाही, मग सगळेच गावी राहा सासरच्या लोकांशी गोड बोलून त्यांची मदत घ्या त्याच्या आधाराने जमलं तर एकत्र किंवा वेगळं का असेना राहा. तुम्हाला त्यांची  मदतच  होईल तिथेच राहून काम बाहेर करण्या पेक्षा त्यांची कामे करा, हेही दिवस जातील.” त्यांनाही ते पटले असावे कांही दिवसातच  त्या राहायला गावाकडे आल्या आणि सगळं व्यवस्थित झालं.

चौथी पास झाल्यावर  सुट्टी नंतर तो परत आला तेव्हा म्हणाला, “आम्ही सर्वजण आमच्या गावीच राहतो. आम्हाला  असलेली शेती  करतो मीही सुट्टीत आणि सकाळ- संध्याकाळी दुकानात काम करून  आईला मदत करतो.” असे सांगताना  त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता.

त्याचे गाव जवळच असल्यामुळे आला की भेटतो “आजी काका पण मदत करतात, ” असे सांगत असतो.

तात्पर्य : एखाद्या निर्णय जरी आपण तो त्यांच्या भल्यासाठी घेत असलो तरीसुद्धा तो घेताना मुले लहान आहेत म्हणून त्यांना गृहीत धरण्यापेक्षा त्यांच मत सुद्धा विचारात घेणे आवश्यक असते. अन्यथा त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

*रंजना लसणे .*

आखाडा बाळापूर

9960128105

Please share your Post !

Shares