मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ परमोच्च अनुभव… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ परमोच्च अनुभव… ☆ श्रीशैल चौगुले ☆

काटेरी टोकावरचे पाखरु

अनुभवाचा परमोच्च क्षण

आता उरते आभाळ कवेत

पंखभरारी अंतीमात मन.

*

गुंतावा सोडवावा अंतरिचा

मोहाला संपवित ते सदन

भाव एकरुप आशा संपुष्टी

वेदना दुःख,पराकोटीचे धन.

*

फडफड झाली हृदयी बळ

अन् चैतन्याचे तारे कण

भेद नाही मृदा क्षितीजात

त्याही पलिकडे मोक्ष ऋण.

*

झुपूर्झा’टोकावर हिंदोळून

आत्मअलिप्त कैवल्य तृण

चंद्र जणू भेटला जन्मात

 तिमीर विरले मुक्ती विजन.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दं व बिं दू ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दं व बिं दू ! श्री प्रमोद वामन वर्तक ☆

दंव भारल्या पानावर

थेंब थबके टोकावर,

आयुष्य क्षणिक उरले

ठसे त्याच्या मनावर !

*

मिळण्या आधी धरेला 

दावी सौन्दर्य स्वतःचे,

किरण पडता अंगावरी 

रूप लाभे मोतीयाचे !

*

नाळ तुटता पानाशी 

क्षणभर दुःखी होतसे,

अंती धरणी मातेला 

आनंदे मिठी मारतसे !

आनंदे मिठी मारतसे !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 217 ☆ बाई ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 217 ?

बाई ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

बाईला वागावंच लागतं बाई सारखं ,

खूप छळ झाला, सहन केली मारझोड,

तरी ती म्हणायची पूर्वी,

“पावसानं झोडलं आणि

नवऱ्यानं मारलं

दाद कुणाकडे मागायची?”

 

 गेले ते दिवस,

ती मागते दाद,मुक्त ही होते,

घेते काडीमोड,

“मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली” !

म्हणत पाट लावते,

एखादी चिंधी – नाग्यासंगती!

पण ती बाईच असते,

ओवाळून टाकते जीव,

एखाद्या नाग्या वरून!

“आम्ही ठाकर ठाकर” म्हणणारी,

आदीवासी स्त्री मुक्तच असते ,

तरीही ती वागते बाई सारखीच,

 

आदीवासी असो की,

पांढरपेशा समाजातील सुशिक्षित,

 

-ती असते परिपूर्ण स्त्री,

आणि सांभाळते आयुष्यभर,

आपल्या बाईपणाची  “चिंधी” !

बाई ला वागावंच लागतं,

बाईसारखं!

© प्रभा सोनवणे

१३  फेब्रुवारी २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेमलता… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ प्रेमलता… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सहज ची भेटता तू अन् मी,

काही चमकले हृदयीच्या हृदयी!

बीज अचानक मनी पेरिले,

प्रीतीचे का काहीतरी !….१

*

तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशी,

बीज अंकुरे मम हृदयी,

प्रेम पाण्याचे सिंचन करता,

अंकुर वाढे चौथ्या दिवशी!…२

*

पाचव्या दिवशी रोप वाढले,

मनी वाढली प्रेम अन् आशा!

प्रीत फुल उमलले त्यावरी,

‘प्रपोज डे’ च्या सहाव्या दिवसा!…३

*

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या सातव्या दिवशी,

फूल प्रीतीचे मिळे मला ,

परिपक्व प्रेम उमटले हृदयी ,

समर्पित केले मी हृदयाला!…४

*

फुल बदलले फळात तेव्हा ,

प्रीत मिळाली मनासारखी!

प्रेमलतेच्या बहराने मज,

प्रेमाचा ठरलो रत्नपारखी!…५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #224 ☆ परिपाठ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 224 ?

☆ परिपाठ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

जीव भांड्यात पडला

भांडे गॕसवर होते

आग देहाची या माझ्या

विस्तवाशी पक्के नाते

*

सखा हिरमुसलेला

शिट्टी वाजवी कूकर

परातीत पीठ पाणी

तव्यावरती भाकर

*

माझ्या हाताला चटके

त्याची भूक चाळवते

त्याला झुणका आवडे

बेसन मी कालवते

*

पहाटेला उठायाचे

रोजचाच परिपाठ

हाडे मोडती दिवसा

रात्री बिछान्याला पाठ

*

सुख दुःखाचा हा खेळ

त्याला संसार हे नाव

रुक्ष शब्दांनी केलेले

सारे लपवले घाव

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मो क्ष ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 😞 मो क्ष ! 😞 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

कसर लागे ग्रंथास आठवणींच्या

सारे विसरण्याची,

वेळ आली साऱ्या ग्रंथांना

जलसमाधी देण्याची !

*

धीर करुनी बुडवता झालो

त्यांना अथांग भवसागरी,

जाऊन पहाता दुसऱ्या दिवशी

सारे तरंगती पाण्यावरी !

*

जरी नव्हती ती अमोल गाथा

तुकयाच्या अभंगापरी,

चाले जीवापाड धडपड त्यांची

लागण्या लगेच पैलतीरी !

*

कळे दोघांना, सुटका नाही

दोघे जीवंत असेपर्यंत,

चितेवरच मिळेल मोक्ष

उमजे दोघांना तो पर्यंत!

उमजे दोघांना तो पर्यंत!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भोग… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ भोग☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

फेकतो फेकू कुणीही जे नको ते बोलताना

आणखी गोत्यात येतो सत्य सारे झाकताना

*

जोडला होता जिव्हाळा स्वार्थ साधाया जरासा

द्वेष तो बाहेर आला संशयाने वागताना

*

प्रेम धागे बांधलेले घट्ट होते काय त्याचे ?

दु:ख झाले  फार नाही प्रेम त्याचे सोडताना   

*

माणसाने माणसाला पूर्णतेने ओळखावे

ध्येय साधे जीवनाचे आग्रहाने मांडताना

*

कोण येथे तत्ववेत्ता वर्तनाने सिद्ध झाला, ?

होवुनी लाचार गेला स्वार्थ त्याचा साधताना

*

जोडलेल्या संगतीचा सोडला हव्यास नाही

वासनांचे खेळ सारे स्वैरतेने खेळताना

*

कोणता आदर्श कोणी पाळला आहे कळेना

 लाख मोलांच्या रुढींचे स्तोम सारे तोडताना

*

अंतरी येथे कुणाच्या आस नाही ध्यास नाही

 लाज आहे सोडलेली भोग सारे भोगताना 

*

चोर बाजारात येथे बोलके पांडित्य मिळते

वाचपोथ्या नाचथोडा कीर्तनातच रंगताना

*

काय लाचारी करावी का कुणाचा दास व्हावे

कोण येतो वाचवाया श्वास अंती मोजताना?

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 160 ☆ हे शब्द अंतरीचे… अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 160 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

अखंड करावे, श्रीकृष्ण भजन

कदापि खंडण, नच व्हावे.!!

*

मनी ध्यास व्हावा, अप्राप्ती भावावी

आवडी धरावी, श्रीकृष्णाची.!!

*

सर्व तोचि देई, सर्व तोचि नेई

नाही नवलाई, या वेगळी.!!

*

कवी राज म्हणे, भावाचा भुकेला

हाकेला धावला, द्रौपदीच्या.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ II सखीII… अशी ही – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ II सखीII… अशी ही – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

ती आली आयुष्यात अन् मी मोठी झाले

अवखळ मुलीची एकदम बाई झाले

*

नको वाटायचे तिचे येणे

सगळ्यात असून दूर बसणे

*

सण नाही वार नाही

तिचे येणे ठरलेले

अन् तिच्या येण्याने माझे बेत उधळलेले

*

बरोबर महिन्याने यायची,

येण्याआधी आठ दिवस चाहुल द्यायची

इतकी सवय झाली तिची 

की नाही आली वेळेवर तर मी चिडायची

*

सगळे तिचे नखरे सहन केले

तिने नाचवले तशी नाचले

*

तिनेच एकदा न येऊन सांगितले गुपित

आई होशील आता गर्भ रुजलाय कुशीत

*

तेवढाच काय तो दुरावा बारा महिन्यांचा

पण नंतर आलीच परत भाग होऊन आयुष्याचा

*

इतकी वर्षे चाललेय तिच्या सोबत

कधी कंटाळा दाखवला नाही

आता मात्र काय झालेय तिचे

मनातलं काही सांगत नाही

*

नसलं मनात तर येत नाही दोन दोन महिने

मी मात्र सैरभैर तिच्या न येण्याने

*

कशासाठी ही चिडचिड कोणालाच कळत नाही

कशासाठी ही कासावीशी माझे मला वळत नाही

*

कधीमधी येत राहून ती मला चिडवणार

तिच्याच मनासारखे वागून ती मला ताटकळवणार

*

ती यायला लागली तेव्हा सोहळा केला होता आईने

तिच्या जाण्याची हुरहुर मात्र सोसतेय मी एकटीने

*

एक वेळ अशी येईल तिचे येणे बंद होईल

एक कप्पा आयुष्यातला कायमचा दूर होईल

*

होईन मी मुक्त बांधिलकीतून म्हणून वाजवावीशी वाटतेय टाळी

तुमचीही परिस्थिती नाही माझ्यापेक्षा वेगळी

*

वाचताना गालात हसाल

ही तर माझीच कहाणी म्हणाल 

*

येते मनाने जाते मनाने ही

बंधन कसले पाठवत नाही

*

येताना तारुण्यपण देते

जाताना म्हातारपणाची चाहूल देते 

*

अशी ही एकमेव मैत्रीण खाशी,

जरी असल्या आपल्या बारा राशी !!

कवी : अज्ञात. 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नदी सागरास मिळे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ नदी सागरास मिळे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नदी सागरास मिळे, ही असे जगी रीत  ll

पुसे काय कोणी तिला, तुझे काय मनोगत ll….1

*

नदी सागरास  मिळे, असे तिला आतुरता ll

दर्याला मिळू जाई, ती आहे समर्पिता ll…..2

*

नदी सागरास  मिळे, समुद्री खारे पाणीll

 सामावते सागरी, तिची गोडी त्या क्षणी ll….3

*

नदी सागरास मिळे,  हेच तिचे कन्यादान ll

पर्वताच्या नशिबी ये, वियोगाचा तोच क्षण ll…..4

*

नदी सागरास मिळे,  होई सागर संगम  ll

मीलन त्यांचे होई, दुग्धशर्करेच्या सम ll…..5

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares