मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 206 ☆ एकच नाम…प्रभू श्रीराम… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 206 – विजय साहित्य ?

एकच नाम…प्रभू श्रीराम ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

गात्री रूजले, एकच नाम..

प्रभू श्रीराम, प्रभू श्रीराम…

*

आली स्वगृही, स्वप्न पाऊली

सुंदर मुर्ती रघुरायाची,

दिव्या दिव्यांची, सजे आवली

करा तयारी, सणवाराची..

आले मंदिरी, प्रभू श्रीराम..||१||

*

चरा चराला, पडे मोहिनी

राम रुपाची, दिव्य बासरी

वेदमंत्र नी, प्राण प्रतिष्ठा

नेत्री भरली, मुर्ती हासरी

घेई अयोध्या, पावन नाम..||२||

*

वेध लागले, चित्त दंगले

पुजा अर्चनी , एकच ध्यास

राम बोल हे, मनी रंगले

साध्य जाहला, दिव्य प्रवास

झाले काळीज,मंगल धाम.||३||

*

घरा घराला, आले बाळसे

गोकुळ झाले, तना मनाचे

लेणे कोरीव, शिल्प छानसे

आतष बाजी, रंग सणाचे

भाव फुलांचे,एकच दाम..||४||

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “ध्येय…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “ध्येय…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

खूप काही करायचं

मनात येतं आणि जातं

जमेल का आपल्याला

विचारात ते हरवून बसतं…

 

भीतीचं प्रस्थ मोठं

कृतीपुढे पडतं थिटं

आपलंच मन वागतं खोटं

चांगल्या विचाराला मागं सारतं …

 

मनात आलं की

सुरू करून पहावं

यश अपयशापलीकडे

प्रयत्नांच्या मार्गाने जावं …

 

ध्येय निश्चित करतानाच

यश आपलं ठरतं

कसं पोहचायचं तिथंवर

इतकचं पहायचं असतं…

 

मार्ग मिळतो चालता चालता

संधी वाटतो प्रत्येक अडथळा

यशापेक्षा प्रयत्नांचा काळ मोठा

अनुभवरुपी यशास नसे तोटा….

 

मोजमाप यशाचे

आपणच असते करायचे

नेहमीच परिपूर्ण असणे

कसे बरे जमायचे…?

 

आपण आपलं चालत रहावं

पाऊल एक एक टाकत रहावं

कळणार नाही आलो कुठंवर

ध्येयापलीकडेही खूप दूरवर…..

 

यशापलिकडेही चालावंच लागतं

एका यशानंतर जगणं का संपतं?

नव्या ध्येयासाठी मन पेटून उठतं

ठरवूनही तिथे मग थांबता न येतं ….

 

यश असतो एक मुक्काम

तिथे संपतं नसतं आपलं काम

ध्येय जगण्याचं सर्वात मोठं

आयुष्याच्या शेवटीच तिथं पोहचता येतं….

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ये मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्‌ । 

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४-११ ॥ 

*

भजताती मला पार्था मीही त्यांना भजतो

मनुजप्राणि सर्वथा मम मार्ग अनुसरतो ॥११॥

*

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः । 

क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४-१२ ॥ 

*

मनुष्यलोके कर्मफलाकांक्षी देवतांचे पूजन करती 

पूजन करता देवतांचे होते सत्वर कर्मफल प्राप्ती ॥१२॥

*

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । 

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥ 

*

गुण तथा कर्म जाणुनी चातुर्वर्ण्य निर्मिले मी

कर्ता असुनी त्या कर्मांचा आहे अकर्ताच मी ॥१३॥

*

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा । 

इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥ 

*

मला मोह ना कर्मफलाचा त्यात न मी गुंततो

तत्व माझे जाणणारा कर्माशी ना बद्ध होतो ॥१४॥

*

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः । 

कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्‌ ॥ ४-१५ ॥ 

*

जाणुनिया हे तत्व कर्मे केली मुमुक्षुंनी

तूही पार्था कर्मसिद्ध हो त्यांना अनुसरुनी ॥१५॥

*

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।

तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥ 

*

कर्माकर्म विवेक करण्या संभ्रमित प्रज्ञावान

उकल करोनी कर्मतत्व कथितो मी अर्जुन 

जाणुन घेई हे ज्ञान देतो जे मी तुजला

कर्मबंधनातून तयाने होशिल तू मोकळा ॥१६॥

*

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः । 

अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥ 

*

कर्मगती अति गहन ती आकलन होण्यासी

जाणुन घ्यावे  कर्मासी अकर्मासी विकर्मासी ॥१७॥

*

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । 

स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥ 

*

कर्मात पाहतो अकर्म अकर्मातही कर्म 

बुद्धिमान योगी जाणावा करितो सर्व कर्म ॥१८॥

*

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः । 

ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥ 

*

सकल शास्त्रोक्त कर्मे ज्याची 

कामना विरहित असंकल्पाची

भस्म जाहली जी ज्ञानाग्नीत 

तो ज्ञानी असतो तो पंडित  ॥१९॥

*

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः । 

कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२० ॥ 

*

कर्म कर्मफलाचा असंग सदातृप्त आश्रयरहित

जीवनी करितो कर्म तथापि तो तर कर्मरहित ॥२०॥

– क्रमशः भाग ४ 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राम नाम जपू चला… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ राम नाम जपू चला… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

लक्ष दीप लावु चला

राम नाम घेऊ चला |

*

क्षण भाग्याचा आज उदेला

मनामनांना हर्ष जाहला |

*

मन-मंदिरही सजवु चला

भक्ती अर्पण करु चला |

*

राम त्राता जाणु चला

भगवा हाती घेऊ चला | 

*

भाव-पुष्प अर्पु चला

मोदानेही गाऊ चला |

*

‌ ‌‌राम नाम जपु चला

 धन्य होऊनी नमु चला ||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्वेश्चन मार्क…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

?जीवनरंग ?

☆ “क्वेश्चन मार्क …” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

‘चेहरा ओळखण्यापलीकडे गेलाय.

अर्धा किलोमीटर तरी ,ट्रकबरोबर घासत गेलीय बाॅडी.

भोसले , काही आयडेंटीटीफिकेशन होतंय का, बघा.

अन् बाॅडी  ससूनलाला पाठवून द्या.

अजून श्वास चालूय.

वाचेल कदाचित.’

पी. एस. आय. जमादार, पटाटा अॅक्शन घेत होते.

‘साहेब , पँटमधल्या वाॅलेटच्या चिंध्या झाल्या आहेत.

शर्टच्या खिशातल्या मोबाईलच्या ठिकर्या.

आॅफिसबॅगमधे एक बिल सापडलंय.

मोबाईल परचेजचं.

त्यावर नाव आणि अॅड्रेस आहे.

ए. ए. कुलकर्णी नाव आहे.

1763 , सदाशिव , पुणे 30 पत्ताय.’

‘ ताबडतोब त्या पत्त्यावर माणूस पाठवा.

नातेवाईकांना बोलावून घ्या.

मी चौकीवर जातोय.

आज खरं तर लवकर जायचं होतं.

लेकीचा वाढदिवस होता.

आता जमायचं नाही बहुतेक.

तुम्ही ससूनलाच थांबा.

मला तसा रिपोर्ट करा.’

जमादार टोकटोक बूट वाजवत, चौकीवर निघून गेले.

1763 ,सदाशिव , पुणे 30.

घराचं नाव सौभाग्य सदन.

आता कुठलं ऊरलंय सौभाग्य ?

सौभाग्य वाचव रे देवा , या घरचं.

तरी बरं , घराला काय घडलंय, याची खबरच नाहीये.

अरविंद आत्माराम कुलकर्णी.

वय वर्ष 63.

अक्षर प्रिंटींग प्रेसचे मालक.

गेली चाळीस वर्ष प्रिंटींगच्या धंद्यात आहेत.

या धंद्यातली ही आता चौथी पिढी.

खरं तर पहिल्यांदा वाड्यातच प्रेस होता.

आता जागा कमी पडायला लागली.

पाच वर्षापूर्वी प्रेस धायरीला हलवलाय.

सकाळी नऊ ते रात्री नऊ.

अरविंदराव मु. पो. धायरी.

दिवसभर प्रेस नाहीतर…

क्लायेंटकडे चकरा.

अॅक्टिव्हा वापरायचे.

पुढे गठ्ठे ठेवायला सोयीची.

दिवसभर दोघांचंही भरपूर रनिंग व्हायचं.

नुकताच अनुजही जाॅईन झालाय.

अनुज अरविंद कुलकर्णी.

बी. ई. ( प्रींटींग टेक्नाॅलाॅजी )

धंद्याला लागलेलं नवं ईन्जीन.

डबल ईन्जीन , डबल टर्नओव्हर.

धंदा जोरात चाललाय.

अनुजही अॅक्टिव्हाच वापरायचा.

कुलकर्णी फॅमिली, अॅक्टिव्हाचे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर होणार.

घरी गडबड.

अनुजची बायको आणि आई.

किचनमधे आॅन ड्यूटी.

पुर्या तळणं चाललेलं.

अनुज आणि आरतीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.

त्यात आरती दोन महिन्याची पोटुशी.

आनंदघन बरसायची वाट बघतायेत.

आज तरी..

नक्की.

अनुज आणि अरविंद, आज नक्की लवकर घरी येणार.

घर दरवाजाकडे डोळे लावून, दोघांची वाट बघतंय.

फोनच आला.

‘ मी धायरी पुलीस स्टेशनमधून, काॅस्न्टेबल भोसले बोलतोय.

एका अॅक्टिव्हाला डंपरनं ऊडवलंय.

ए. ए. कुलकर्णी नावाची चिठ्ठी सापडलीय.

ताबडतोब ससूनला या.

कंडीशन सिरीयस आहे.’

अनुजच्या आईनं फोन घेतलेला.

कानापर्यंत पोचलेले शब्द.

मेंदूत शिरायला तयारच नव्हते.

अनुजची आई मटकन् खाली बसली.

‘ अॅक्सीडेन्ट झालाय.’

ती एवढचं बोलली.

आरतीचं चॅनल म्यूट.

ती फ्रीजींग पाॅईंटला पोचलेली.

संवेदना बधीर झालेल्या.

ती कोसळलीच.

अनुजची आई धीराची.

शेजारी हाक मारली.

शेजारचा रवी.

त्याला बोलावला.

तो लगोलग ससूनला पळाला.

अनुजची आई , आरतीच्या ऊशाशी.

घरचा गणपती पाण्यात.

‘कोण असेल नक्की ?

अनुज का अरविंद. ?’

मेंदूचा भुगा.

‘पोरीचं सौभाग्य सांभाळ रे देवा.

मग माझं सौभाग्य दावणीला…

स्वार्थ की त्याग ?

प्रत्येक माणूस आपलंच.

डावं ऊजवं काय करणार ?

कुणी का असेना.

सिद्धीविनायका , सांभाळ रे बाबा ‘

तेवढ्यात दारातून अरविंदराव घरात शिरले.

सहज.

काहीच माहिती नसल्यासारखे.

‘ म्हणजे , अनुजला..’

आता मात्र अनुजच्या आईचा धीर सुटला.

तीनं हंबरडा फोडला.

‘ अरे , नक्की काय झालंय ?

सांगेल का कुणी ?”

भिजलेल्या अश्रूंनी ,दर्दभरी दास्तान ऐकवली.

अरविंदरावांना बघितलं अन् ..

आरतीची ऊरलीसुरली शुद्ध हरपली.

अरविंदरावांच्या हातापायातलं त्राण गेलेलं.

थांबून चालणारच नव्हतं.

‘ तू पोरीला सांभाळ.

मी ससूनला जातोय.

धीर सोडू नकोस.”

अरविंदराव दरवाजातच थबकले.

हाशहुश्श करत ,अनुज घरात शिरत होता.

त्सुनामीच आली होती घरावर.

त्यातून वाचलेलं ते चार जीव.

आई , बाबा ..

टाकलेले निश्वास.

परमेश्वराचे आभार मानणारे डोळे.

डोळ्यातून धुवाधार नायगारा.

‘ आरती , डोळे ऊघड.

अनुज आलाय.’

काळझोपेतून जागं व्हावं, तशी आरती एकदम जागी.

डोळ्यांना दिसणारा अनुज.

डोळ्यात अवघं विश्व सामावलेलं.

अनुज..

तेहतीस कोटी देवांना,

कोटी कोटी थँक्स म्हणणारे ते डोळे.

धडपडत ती अनुजच्या मिठीत शिरली.

अनुजच्या चेहर्यावरचा क्वश्चनमार्क तसाच.

काहीच कळेना.

बाबांनी सगळी स्टोरी रीपीट टेलीकास्ट केली.

” म्हणजे बनसोडचा अॅक्सीडेन्ट झालाय.

आरती , तुझ्यासाठी नवीन सेलफोन घ्यायचा होता.

मग घरी यायला ऊशीर झाला असता.

बनसोड म्हणाला , साहेब तुम्ही घरी जा.

मी घेवून येतो.

म्हणलं गाडी घेवून जा.

मी रिक्षाने जातो.

बावीस वर्षाचा कोवळा पोर.

वर्षभरच झालंय कामाला लागून.

त्याच्या आईबापाला काय तोंड दाखवू मी ?”

आता अनुज हडबडला.

पुन्हा फोन किणकीणला.

” काका , रवी बोलतोय.

हा आपला अनुज नाहीये.

दुसराच कुणीतरी.

गाडी मात्र आपलीच आहे.

पण काळजी नको.

ही ईज आऊट आॅफ डेंजर.

अनुज पोचला का घरी ?”

‘ हो..

आम्ही येतोच आहोत तिकडे “

मणभर वजनाचा क्वश्चनमार्क.

सगळ्यांच्या डोळ्यांना खुपणारा.

पुसला गेला एकदाचा.

परमेश्वरा ,

ज्याचं ऊत्तर माहीत नाही,

असा प्रश्न नको टाकूस रे बाबा , आयुष्याच्या पेपरात.

अशीच कृपा राहू दे रे देवा….

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दोन काव्ये – (१) रामलल्ला… (२) विजय सत्याचा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक आणि श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  दोन काव्ये – (१) रामलल्ला… (२) विजय सत्याचा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक आणि श्री आशिष बिवलकर ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? – रामलल्ला… – ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

( १ )

संपता वनवास श्रीरामांचा

नयनात आसवे दाटली,

स्वागतकरण्या रघुनंदनाचे 

आज अयोध्या सजली !

*

केले अंगणी सडासंमार्जन 

गुढ्या तोरणे बांधली दारी,

होता आगमन रघुरायाचे 

आनंद मावेना घरी दारी !

*

लावून मंगल दीप दारात

चला करू दिवाळी साजरी,

गोड धोड करून पक्‍वान्‍न

भेटू रामरायांना उरा उरी !

*

झाली वसुंधरा राममय

बघावे तिकडे भगवा रंग,

भान हरपूनी सारे भक्त 

भजन कीर्तनात होती दंग !

*

पूजा करुनी शोडषोपचारे

मूर्ती सुंदर मंदिरी स्थापूया,

दर्शन घेण्या रामलल्लाचे

चला अयोध्येला जाऊया !

चला अयोध्येला जाऊया !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

श्री आशिष बिवलकर   

? – विजय सत्याचा… – ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( २ ) 

पाचशे  वर्षांचा  | संपे वनवास  |

अयोध्येला आस  | श्रीरामाची ||१||

*

परकीय सारी | आक्रमण झाली |

कोणी नाही वाली | रक्षणासी ||२||

*

मुघलशाहीत | पाडले मंदिर |

वेदना बधीर  | करुनिया ||३||

*

बाबरी मशीद  | तेथेच बांधली |

अस्मिता दाबली  | सनातनी ||४||

*

पाच शतकांचा | जन्मभूमी लढा |

सुटेचीना तिढा  | रीतसर ||५||

*

सहा डिसेंबर | बाबरी पतन |

अस्मिता जतन | धर्मासाठी ||६||

*

विजय सत्याचा | धर्मा प्रती न्याय |

आयोध्येत पाय | श्रीरामाचे ||७||

*

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 214 ☆ आम्ही लेकी सावित्रीच्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 214 ?

आम्ही लेकी सावित्रीच्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

पाटी पेन्सील बाई च्या हाती?

ढोल ,ढोर आणखीन नारी,

बडविण्यात गेली जिंदगी

केली कुणी विलक्षण क्रांती?

*

हाती आली आई सरस्वती

उद्धारण्या ज्योतीबा सावित्री

उपकार त्यांचे मानू किती ?

संथ आयुष्या आली की गती !

*

शेण झेलले अंगावरती,

कर्मठांनी छळलेच अती

ताठ कण्याने उभी ठाकली

आणि उजळल्या लाखो ज्योती !

*

 आई सावित्री माझी जननी,

महिमा तिचा वर्णावा किती?

बाईपणाची घालवली भीती

केले बाईला कर्ती-सवर्ती !

*

भाग्य पालटे,एका विद्येने,

आता सन्मानाने मिरवती

सुवर्णासम लखलखती

सावित्रीच्या लेकी भाग्यवती !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ।। पैठणी ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? कवितेचा उत्सव ?

।। पैठणी ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

माप  ओलांडून येताना सासूबाईंनी भरली ओटी

भरजरी पैठणी  देऊन म्हणाल्या पुत्र येऊ दे पोटी।

ही शकुनाची पैठणी बाई आपल्या घराची  परंपरा

जप हो हिला जिवापाड  हिचा नखरा आणि तोरा  ।।1।।

झगमगणारी पैठणी पदरावर  जरीचे मोर

खरी जर चमकत होती तेजस्वी जशी चंद्रकोर

गर्द  जांभळे काठ आणि हिरवेगार अंग

गर्भरेशमी   स्पर्श आणि मुलायम रंग ।।2 ।।

अजूनही तशीच देखणी ती  तिला  काळाचा स्पर्श नाही

मोठा माझा लेक आता  दारी सून यायची बाई।

एकदा तिला दाखवली ही  सुंदर पैठणी बघ बाई

हरखून जाऊन मला विचारते ,नक्की  मला देणार ही आई?।।3

तिच्याही सुनेला ती अशीच देईल ही पैठणी ओटी

भरून  जुन्या परंपरा जपताना माझा उर येतो दाटून ।।

 पैठणी नाही,  हे तर संस्कार माझ्याकडे आलेले

सगळं सुनेकडे सोपवून मला निवृत्तीचे वेध लागलेले ।।5।……

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #221 ☆ आले राघव… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 221 ?

☆ आले राघव… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आयोध्येला पुन्हा एकदा आले राघव

अजब दिवाळी मंदिरातील घंटा वाजव

*

चूक जाहली लेखी देती करती क्षालन

मुस्लिम बांधव या गोष्टीचे करोत पालन

बाबर वंशज क्षमा मागुनी झाले मानव

*

वचनासाठी चौदा वर्षे भोगलीस तू

राजा असुनी सत्ता होती त्यागलीस तू

सत्तेसाठी धर्म त्यागती त्यांना जागव

*

हिंदू झाले तुझेच रामा वैरी काही

धर्माबद्दल त्यांचे काही वाचन नाही

कलियुगातील हेच खरेतर असती दानव

*

देशोदेशी आज चालला तुझाच जागर

जिथे पाहतो तेथे आहे तुझाच वावर

धर्म सोडुनी दूर चालले त्यांना थांबव

*

शंका नाही रामराज्य हे येइल आता

या विश्वाचा दुसरा नाही कोणी दाता

भटक्यांनाही सद्मार्गाचा रस्ता दाखव

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जननी ध्यास… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ जननी ध्यास… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीरामाविन व्याकुळ जननी

जानकी पतिव्रता जप मनी   //

*

मर्यादा पुरुषोत्तम राम

कुणी आळवी राधिकेय शाम

धन्य अयोध्या, रघुवीरे ऋणी

जानकी पतिव्रता जप मनी //

*

कौश्यलेचा सत्य’सुपूत्र

शबरी ,जांबुवंत,जटायू

हनुमान रक्षका भक्त गुणी

जानकी पतिव्रता जप मनी //

*

श्रीगणेश उद्धारित प्रारब्धे

भुलोकी रामायण पुण्य शब्दे

साकार साक्षात वाल्मिकी मुनी

जानकी पतिव्रता जप मनी //

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares