मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग दुसरा – ( श्लोक ४१ ते ५० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग दुसरा – ( श्लोक ४१ ते ५० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । 

बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्‌ ॥ ४१ ॥ 

निश्चयात्मक एकच प्रज्ञा स्थिर कर्मयोग्याची

अस्थिर अनिश्चयी बुद्धी मोही अविचारी त्याची ॥४१॥

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । 

वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२ ॥ 

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्‌ । 

क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३ ॥ 

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्‌ । 

व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥ 

दुर्लक्षून वेदार्था गहन  कर्म करीत मूर्ख

उपभोगे विषयात मानिती जे सर्वस्वी सुख

स्वर्गप्राप्ती हे ध्येय भोगात कर्मफलात रमले 

स्वर्गप्राप्ती ही केवळ श्रेष्ठ मोहातच गुंगले 

भोग आणि ऐश्वैर्य यातच राहतात गुंतून

बुद्धी स्थिर ना कर्तव्याप्रती चंचल अंतःकरण ॥४२, ४३, ४४॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । 

निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्‌ ॥ ४५ ॥ 

त्रिगुण विचेचन करती वेद भोग आणि साधन

नकोस राखू त्यांच्या ठायी आसक्ती अर्जुन 

सुखदुःखातीत शाश्वत परमात्म्याला तू जाण

निर्विकारी निरासक्त हो होऊनी स्थितप्रज्ञ ॥४५॥

यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके । 

तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥ 

प्राप्ति होता जलाशयाची कूपा नाही स्थान 

ब्रह्मज्ञाला तसेच नसते वेदशास्त्र प्रयोजन ॥४६॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । 

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥ 

फलप्राप्ती ना अधिकार तुझा आचरणे निज कर्म

फलाठायी तुज नको वासना त्यागी ना तव कर्म  ॥४७॥

योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । 

सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८ ॥ 

स्थित होउनिया योगमध्ये पार्था त्यागि वासना

सिद्धी असिद्धी समान बुद्धी जाणुन स्थितप्रज्ञा

समत्वासि रे योग जाणुनी होई कर्मबद्ध  

जाणुनी निज कर्तव्या पार्था होई कर्मसिद्ध ॥४८॥

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय । 

बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ ४९ ॥ 

समत्व बुद्धीयोग श्रेष्ठ नीच कर्म सकाम

जाणी फलहेतूसि कनिष्ठ कर्म करी निष्काम ॥४९॥

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । 

तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ ५० ॥ 

सत्कर्म दुष्कर्म त्यागितो सांप्रत जन्मी प्रज्ञावान

समत्वरूप योग कुशल ध्वंसाया कर्माचे बंधन ॥५०॥

– क्रमशः भाग दूसरा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – सगळं मला कळतं बाबा… – कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – सगळं मला कळतं बाबा… – कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सगळं मला कळतं बाबा 

खूप खूप दमलास तू 

जिद्द पुरी करता करता 

 प्रमाणाबाहेर थकलास तू. 

‘पेक्षा’जास्त ही अपेक्षा 

नकोच आता काही काळ 

तू मी,… मी तू…

आणि आपली संध्याकाळ !

कातरवेळी सांगीन गोष्ट 

उतरून जाईल सारा शीण 

मांडीवरती डोकं ठेऊन 

विसरुन सारं गाssढ नीज. 

गोष्टी मधल्या सात पर्‍या

आणतील खाऊ तुझ्यासाठी 

तुला जवळ घेऊन होईन 

तुझ्यापेक्षा थोsडी मोठी. 

 टेकीन माझे ओठ अलगद 

तुला झोप लागल्यावर

विश्वामधल्या सर्वात सुंदर 

 सर्वश्रेष्ठ चषकावर !

कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी

पुणे

२२/११/२०२३

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता माझी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ कविता माझी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

वेगे येते,ठाव ही घेते

सर्वांसाठी वेधक ठरते

 

     ‌‌ कधी सुखाचे, सडे शिंपते

      दु:खाने कधी ,मनास भिडते.

 

शब्दांचाही साज मिरविते

प्रतिभेचेही लेणे लेते.

 

    ‌‌  एकलीच मी कधी न उरते

      सांगाती ती सदाही ठरते.

 

माझी कविता,क्षणात स्फुरते

कविता माझी,सोबत करते.

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #178 ☆ संत तुकाराम महाराज… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 178 ☆ संत तुकाराम महाराज… ☆ श्री सुजित कदम ☆

माघ मासी पंचमीस

जन्मा आले तुकाराम

जन्मदिन शारदेचा

संयोगाचे निजधाम…! १

 

ऋतू वसंत पंचमी

तुकोबांचा जन्मदिन

जीभेवर ‌सरस्वती

नाचतसे प्रतिदिन…! २

 

साक्षात्कारी संत कवी

विश्व गुरू तुकाराम

संत तुकाराम गाथा

अभंगांचे निजधाम…! ३

 

सतराव्या शतकाचे

वारकरी संत कवी

अभंगात रूजविली

भावनांची गाथा नवी…! ४

 

जन रंजले गांजले

त्यांना आप्त मानियले

नरामधे नारायण

देवतत्व जाणियले…! ५

 

तुकोबांची विठुमाया 

कुणा कुणा ना भावली

एकनिष्ठ अर्धांगिनी

जणू अभंग आवली…! ६

 

सामाजिक प्रबोधन

सुधारक संतकवी

तुकोबांचे काव्य तेज

अभंगात रंगे रवी…! ७

 

विरक्तीचा महामेरू

सुख दुःख सीमापार

विश्व कल्याण साधले

अभंगाचे अर्थसार…! ८

 

केला अभंग चोरीचा

पाखंड्यांनी वृथा आळ 

मुखोद्गत अभंगांनी

दूर केले मायाजाल…! ९

 

एक एक शब्द त्यांचा

संजीवक आहे पान्हा

गाथा तरली तरली

पांडुरंग झाला तान्हा..! १०

 

नाना अग्निदिव्यातून

गाथा  प्रवाही जाहली

गावोगावी घरोघरी

विठू कीर्तनी नाहली…! ११

 

जातीधर्म उतरंड

केला अत्याचार दूर

स्वाभिमानी बहुजन

तुकाराम शब्द सूर…! १२

 

रूजविला हरिपाठ

गवळण रसवंती

छंद शास्त्र अभंगाचे

शब्द शैली गुणवंती..! १३

 

दुष्काळात तुकोबांनी

माफ केले कर्ज सारे

सावकारी पाशातून

मुक्त केले सातबारे….! १४

 

प्रपंचाचा भार सारा

पांडुरंग शिरावरी

तुकोबांची कर्मशक्ती

काळजाच्या घरावरी…! १५

 

कर्ज माफ करणारे

सावकारी संतकवी

अभंगात वेदवाणी

नवा धर्म भाषा नवी…! १६

 

प्रापंचिक जीवनात

भोगियले नाना भोग

हाल अपेष्टां सोसून

सिद्ध केला कर्मयोग…! १७

 

परखड भाषेतून

केली कान उघाडणी

पांडुरंग शब्द धन

उधळले सत्कारणी…! १८

 

अंदाधुंदी कारभार

बहुजन गांजलेला

धर्म सत्ता गुलामीला

जनलोक त्रासलेला…! १९

 

साधी सरळ नी सोपी

अभंगाची बोलगाणी

सतातनी जाचातून

मुक्त झाली जनवाणी…! २०

 

संत तुकाराम गाथा

वहुजन गीता सार

एका एका अभंगात

भक्ती शक्ती वेदाकार…! २१

 

सांस्कृतिक विद्यापीठ

इंद्रायणी साक्षीदार

प्रवचने संकीर्तनी

पांडुरंग दरबार…! २२

 

संत साहित्यांची गंगा

ओवी आणि अभंगात

राम जाणला शब्दांनी

तुकोबांच्या अंतरात. २३

 

साक्ष भंडारा डोंगर

कर्मभूमी देहू गाव 

ज्ञानकोश अध्यात्माचा

नावं त्याचे तुकाराम…! २४

 

सत्यधर्म शिकवला

पाखंड्यांना दिली मात

जगायचे कसे जगी 

वर्णियले अभंगात…! २५

 

युग प्रवर्तक संत

शिवराया आशीर्वाद

ज्ञानगंगा विवेकाची 

तुकोबांच्या साहित्यात…! २६

 

सांप्रदायी प्रवचनी 

नामघोष  ललकार

ज्ञानदेव तुकाराम

पांडुरंग जयकार…! २७

 

नाना दुःख सोसताना

मुखी सदा हरीनाम

झाले कळस अध्याय

संतश्रेष्ठ तुकाराम…! २८

 

तुकोबांच्या शब्दांमध्ये

सामावली दिव्य शक्ती

तुका म्हणे नाममुद्रा

निजरूप विठू भक्ती…! २९

 

नांदुरकी वृक्षाखाली

समाधीस्थ तुकाराम

देह झाला समर्पण

गेला वैकुंठीचे धाम…! ३०

 

फाल्गुनाच्या द्वितीयेला

पुण्यतिथी महोत्सव

संत तुकाराम बीज

अभंगांचा शब्दोत्सव..! ३१

 © श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रहस्य निळ्याचे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– रहस्य निळ्याचे… – ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

निळे निळे आकाश 

समुद्रपण निळाच

सांगू का आई रहस्य

ठाऊक आहे मलाच

 

एका जागी थांबून 

आकाश कंटाळले 

विश्व भ्रमण करायला 

ते फिरू लागले

 

अथांग समुद्राची भूल

आकाशाला पडली 

फिरताना आपली पावले 

त्यात बुडवली 

 

त्यातून ही निळाई

पाण्यामध्ये उतरली

समुद्राला मग निळी छटा आली — 

 

 तसे नाही काही 

दुसरे बाळ बोलले

 निळ्या समुद्राचे त्याने 

दुसरेच कारण सांगितले — 

 

 धरतीचे बाळ समुद्र

 थंडीने कुडकुडले

 रात्री आकाशाने त्याला

 कुडकुडताना पाहिले 

 

आले आकाश खाली

 केली विचारपूस 

म्हणे समुद्र आकाशाला

मला पांघरूण करायला

धरा आईकडे नाही कापूस

 

आकाश म्हणाले असं आहे का

करतो मी युक्ती

पळवतो तुझी थंडी

घालायला देतो तुला 

माझ्या ढगाची बंडी

 

आकाशी बंडीची 

समुद्राला झूल

समुद्र ही झाला निळा 

थंडी झाली गुल — 

 

आई म्हणते बाळांनो

 ऐका माझे जरा 

तुम्ही दोघेही बरोबरच 

पण शोध मला याचा 

लागला आहे खरा 

 

समुद्र आणि आकाश 

देवाची दोन बाळे

पिता महादेवाचा रंग घेऊन

दोघेही झाले निळे —

           दोघेही झाले निळे —

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सागर किनारा… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सागर-किनारा… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

सागरा, माझी किना-याची सीमा

ठाऊक आहे मला,

पण कधी कधी

तुझ्या लाघवी लाटा

किना-यावर उतरतात.

पावलांशी खेळ  मांडतात.

खळखळतात… फुटतात.

परत फिरताना

आत आत ओढून नेतात.

पायाखालची जमीन

कधी सुटते

कळतच नाही.

डोळे उघडतात,

तेव्हा दीसतं

 चारी बाजूला सर्वदूर

पाणीच पाणी

गलाबुडी पाणी

माथ्यावरून वाहू लागतं तेव्हा हार्पाय हलतात.

तुझ्या विक्राळ लाटांशी

झुंजतात.

किना-याशी लागते तेव्हा, क्षमाशील किनारा

पावलांना  आधार देतो. ह्रदयाशी कवळून धरतो

घट्ट….घट्ट……

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 205 ☆ तगमग ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 205 ?

तगमग ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

घराचे दार बंद,

 

काही बंधने तिनेच

घालून घेतलेली !

पण खिडक्यांना कळते ,

तिला काय हवे आहे ,

मग त्या पोहचवतात,

तिला हवा तेवढा प्रकाश

आणि ती उजळून निघते !

व्यक्त होत रहाते

इथे तिथे !

तशी ती मुक्तच आहे ,

तिने मिळवले मूठभर स्वातंत्र्य,

पण मानसिक गुलामगिरीचे काय?

आणि आमंत्रण न देता

तिच्या पर्यंत येणाऱ्या ,

त्या प्रकाशाचे तरी काय?

ही तगमग तिची तिनेच

 

पाळलेली ,

आजीवन!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #212 ☆ रुपाचा दाखला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 212 ?

☆ रुपाचा दाखला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

तुझ्यासाठी हा आरसा

किती वेडापिसा झाला

कधी येशील समोर

आहे वाटेत थांबला

 

खेळण्याला पदराशी

पहा वारा आतुरला

फडफडतो पदर

जेव्हा भेटतो वाऱ्याला

 

तुला पाहून असेल

का हा चंद्र डागाळला ?

अप्सराही देत होत्या

तुझ्या रुपाचा दाखला

 

धुके होते पेटलेले

धूर त्याचा पसरला

दव अंगाला झोंबते

त्याने देह भिजलेला

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंतर बदल… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अंतर बदल ☆ श्रीशैल चौगुले ☆

जगण्यामधले अंतर

आशेत व्यापून आहे

पुढेच पाऊले पडती

भविष्य लपून आहे.

 

झाडावरले ते घरटे

पाखरु जपून आहे

चिंताच ऊद्याची लागून

झेपेत निपूण आहे.

 

डोळे झाकून ऊघडता

दुःखच निवारुन जाते

पुन्हा जीवन ऊमलते

मार्गही सोबतीच होते.

 

बघता-बघता जीवन

क्षणा-क्षणांनी त्या सरले

ऊमेद कळ्यांची घेऊन

झाड ऋतूसंगे झरले.

 

तसेच फुलांना बहर

वसंत मनाचा फुलवा

हसताना सुरकुतला

चेहरा सुखाचा खुलवा.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दीन बालपण… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– दीन-बालपण– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

निरागस असे बालपण,

यांचे असे कसे  हरवले !

नियतीच्या जड जात्यात,

कमनशिबानेच ते भरडले !

किती निखळ हास्याचे

चेहऱ्यावर असती भाव !

कौतुक नसे त्याचे कुणा,

निर्भत्सना यांनाच ठाव !

आशाळभूत नजरेने कसे 

जगाकडे आशेने पाहती !

जुन्या-पान्या, मळक्या,

चिंध्यानीच शरीर झाकती !

उकिरड्यावर खांद्यावर

घेऊन मळक्या पोत्यात !

नशीबाचे भोग जणू ते,

एकेक करून वेचतात !

डोक्याला सुगंधी तेल सोडा,

प्रेमाने अंघोळ कुणी न घाली !

हेटाळणीच चाले चिमुरड्यांची,

म्हणे आले भावी गुंड मवाली !

कोटाला गुलाबाचं फूल लावून,

चाचांना लहान मूल फार आवडे !

अमृत महोत्सवाच्या या अमृताला,

या चिमुरड्या जीवांचे असे वावडे !

आपली मुलं खांद्यावर घेऊन

साजरा  करू बालदिन सर्वजण l

समाजात कुठे तरी जगत आहे,

हरवलेलं असं दीन बालपण !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares