मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मायमराठी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ मायमराठी… ☆ सुश्री त्रिशला शहा

सखे शेजारीण बाई

काय सांगू महती तिची

अम्रुताचे घट भरले गं

माझ्या मराठी भाषेत

*

जात्यावरच्या ओव्या गाई

दळण दळता दळता

एक एक शब्द गुंफियेला

घाली नात्यांची सांगड त्याला

*

ज्ञानेश्वर, तुकोबांनी रचल्या

अभंग आणि पोथ्या

किती संतांनीही त्यात

लिहील्या आरत्या आणि ओव्या

*

गणगौळण, पोवाडा, भारुड आणि फटका

कवीलोकांनी रचल्या किती

लोकसाहित्यातून जपला त्यांनी

मायमराठीचा बाणा

*

मिरविते गळा साज

काना, मात्रा, वेलांटीचे

तिच्या लल्लाटी शोभती

जसे सुरेख दागिने

*

कुसूमाग्रजांची, विंदांची

खांडेकर, गडकरींची

नाट्यप्रयोगात रंगली

माझी माय मराठी ही

*

अशी सुसंस्कृत आणि शालीन

राज्यभाषा गं मराठी

जयघोष तिचा चाले सारा आसमंती गाजवी

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 202 ☆ मातृशक्ती… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 202 ? 

☆ मातृशक्ती… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

जिच्या स्पर्शाने फुलते धरती,

जिच्या प्रेमाने उघडती दारं,

ती आहे सृजनाची जननी,

तीच जगाची जीवनधार.!!

*

अश्रूंमध्ये तिची शक्ती,

संघर्षांशी झुंजायचं बळ,

तिला अडवायचं का बरे सांगा?

तीच ठरविते नवे भविष्यतळ.!!

*

नाजूक म्हणुनी दुर्बल न ठरवा,

ती वादळाशीही लढणारी आहे,

स्वतःला विसरून इतरांसाठी,

जगणारी ही चंद्रचकोर आहे.!!

*

आई, बहिण, सखी, प्रिया,

प्रत्येक रूप दिव्य, प्रभा,

स्त्रीशक्तीला वंदन करूया,

तिच्या तेजाची रेखीव आभा.!!

*

स्त्री-तेजाला वंदन करावे,

सन्मान द्यावा कर्तृत्वाला,

“कविराज” गीत गातो ममत्वाचे,

देवही येती तिच्या उदराला.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नारीशक्ती… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ नारीशक्ती ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 नारी शक्ती, तुजवर भक्ती,

 साऱ्या दुनियेची !

जरी शिवाची महती मोठी,

 कीर्ती पार्वतीची!

*

 द्रौपदी, तारा, मंदोदरी त्या,

 झाल्या पुराणात!

रूपे त्यांची पुढे बदलली,

 आधुनिक काळात!

*

 झाशीची ती राणी लक्ष्मी,

 झाली‌ तडफदार!

 वीर तारा, येसू झुंजल्या!

 घेऊन तलवार!

*

 कास धरून शिक्षणाची ती,

 मनी एकच ध्यास,

 हाती घेई पाळण्याची दोरी!

 उध्दरी बालकांस!

*

 समानतेच्या सर्व संधींचा,

 घे तूच फायदा !

 नारी असशील तरी जगी,

 मिळव शक्ती, ज्ञान, संपदा!..

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभिजात भाषा-मराठी… ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ अभिजात भाषा-मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आज भाषा मराठी ठरे अभिजात

लाभे सन्मान तिला अखिल विश्वात

गीतेचे सार थोर घुमतसे जगता|

होतसे मराठी अभिमानास पात्र ||||

*

ज्ञानदेवे रचिलासे पाया

तुकयाने केला कळस

मराठीचा तो नामघोष

कळू दे आता जगास ||||

*

सारस्वत थोर-थोर

वर्णिती तिची गाथा

नतमस्तक. मी होते

मराठीचे गुण गाता ||||

*

मराठीचा परिमल दरवळे

शब्दफुले लेती लेणे

साहित्याची मांदियाळी

शब्दातुनी गाती गाणे ||||

*

मराठीचे गुण महान

गाती मुखे थोर-सान

अमृताते पैजा जिंके

मराठीची अशी शान ||||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तो…’ –  कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘तो…’ –  कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जन्माला आला तो

वंशाचा दिवा झाला 

पहिल्याच दिवशी त्याला

जबाबदारीचा शिक्का लागला 

*

थोडा मोठा झाला तो

भावंडांचा भाऊ झाला 

आपल्या खेळण्यातला

अर्धा हिस्सा वाटू लागला 

*

वयात आला तो

बहिणीचा रक्षक झाला 

रक्षाबंधनाला तर

स्वतःची मनिबॅंक ही फोडू लागला 

*

कॉलेजला गेला तो

मैत्रिणींचा मित्र झाला 

तिच्या सुख दुःखाचा

आपसूक वाटेकरी बनला 

*

लग्नामध्ये त्याच्या तो

नवरदेव झाला 

बोहल्यावरच्या रुबाबतही

जबाबदारीचा पुतळा ठरला 

*

लग्नानंतर मात्र तो

दोन भूमिकेत आला 

बायकोचा नवरा की

आईचा मुलगा यात अडकला 

*

आई बापाच्या उतारवयात

त्यांच्या काठीचा आधार झाला 

स्वतः साठी कमी अन

घरासाठी जास्त जगू लागला 

*

बाळाच्या चाहुलीने तो

बाप झाला 

छकुलीच्या हास्यासाठी

रात्रंदिवस झटू लागला 

*

छकुलीच्या लग्नामध्ये तो

वरबाप झाला 

सगळ्यांच्या आनंदासाठी

आपले अश्रू लपवू लागला 

*

नातवंडांच्या मेळ्यामध्ये तो

आजोबा झाला 

दुधापेक्षा साईला

तळहाताच्या फोडासारखा जपू लागला 

*

आत्ता कुठे त्याला

थोडा निवांतपणा मिळाला 

जोडीदाराचा हात त्याने

खूप घट्ट पकडला 

*

तो पर्यंत त्याच्या

पिंजऱ्यातील पिल्ले उडून गेली 

बायकोची आणि त्याची

हाडेही आता थकून गेली 

*

मनात असतानाही तो

मनाप्रमाणे जगला नाही 

ठाम मते असतानाही

मत आपले मांडले नाही 

*

आज देवाकडे तो

साथ फक्त मागतो आहे 

बायकोच्या आधी ने मला

देवाला म्हणतो आहे 

*

आजपर्यंत आयुष्यभर तो

घरासाठी झटला आहे 

स्मशानात जाताना मात्र

रित्या ओंजळीने जातो आहे 

*

ओंजळ रिकामी असली तरी

मन त्याचे भरले आहे 

अंत्यविधीची गर्दी पाहून

माणुसकीचे फळ मिळाले आहे 

*

जाता जाता सगळ्यांना

एकच तो सांगतो आहे 

– – पैशापेक्षा माणसांना किंमत द्या म्हणतो आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सहावे इंद्रिय… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ सहावे इंद्रिय… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

पंचेंद्रियाचे शरीर आपले

सहावे इंद्रीय जडले गेले

हातामधूनी प्रवेश करूनी

मेंदुवर सत्ता करते झाले

*

हे नवे सहावे इंद्रिय

 मन देहावर गारूड करते

 नुकसान होते कळे मेंदूला

अवयवास कळते नच वळते

*

 मेंदूला प्रवृत्त करण्यासाठी

 सतत नवनव्या आणि गोष्टी

 खिळवुन ठेऊन आपल्याशी

 चांगुलपणाची करतो पुष्टी

*

विचार करूनी वापर करता

 उपयुक्तपणा पुष्कळ आहे

 अती तिथे माती म्हणीचा

 प्रत्यय या इंद्रियाही आहे

*

सहावे इंद्रिय मानलेच तर

दुज्या इंद्रिया हानी नसावी

शरीर मनाच्या आरोग्यास्तव 

इंद्रियांची वागणूक असावी

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्वास उरले मोजके प्राणात माझ्या… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ श्वास उरले मोजके प्राणात माझ्या… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

लाजली थोडी गझल श्वासात माझ्या

शब्दही पडलेत ना प्रेमात माझ्या

*

ओळखू येतील माझे मित्र सारे

वेदने तू येत जा घरट्यात माझ्या

*

मी न लिहिल्या पुस्तकांच्या भव्य राशी

दोन ओळी जीवना बोटात माझ्या

*

पांढऱ्या भाळावरी नव्हतीच लाली

रंग हिरवा आडवा रस्त्यात माझ्या

*

प्रीत मी मागू कुणाला सांजवेळी

श्वास उरले मोजके प्राणात माझ्या

गझलनंदा

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन☆ श्री अनिल वामोरकर ☆

भवसागर

भरती ओहोटी

सुख दुःखाची

आजन्म…

*

ज्ञानसूर्य

तळपला शिरी

झाले दु:खाचे

बाष्प…

*

गेले गगनांतरी

परिवर्तीत जलमेघ

काळेकभिन्न, परी अमृत

मानवाचे…

*

भवसागर हा संसार

ज्ञानसूर्य ते सदगुरु

दु:ख जाई लया, सुख येई फळा

कृपेचा पाऊस…

*

चिंब चिंब मग

तन मन चित्तही

आत्मानंदात मी

सदैवचि…

*

रहाटगाडगे हे

जनन मरण निरंतर

मधले ते जीवन

आनंदी.. सुंदर…!

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 243 ☆ सुखी संसाराची छाया ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 243 – विजय साहित्य ?

☆ सुखी संसाराची छाया ☆

(अष्टाक्षरी रचना)

परंपरा संस्कृतीत,

नारीशक्ती आहे वसा.

कर्तृत्वाची पराकाष्ठा,

संयमाचा दैवी ठसा…! १

*

गाते भुपाळी अंगाई,

नारी दळते दळण.

घर स्वच्छता पहाटे,

जमा करी सरपण…!२

*

लागे जीवनाचा कस,

होई सासुरासी जाच.

कसे जगावे जीवन,

सांगे आठवांना वाच…!३

*

पिढ्या पिढ्या राबतसे,

घर संसारात नारी.

पती मानुनी ईश्वर,

घेई कर्तृत्व भरारी…!४

*

कष्ट,त्याग, समर्पण

नाते संबंधांचा सेतू.

नारीशक्ती कर्मफल,

घरे जोडण्याचा हेतू…!५

*

माती आणि आभाळाशी,

नारी राखते इमान.

संगोपन छत्रछाया,

नारीशक्ती अभिमान…!६

*

नारी कालची आजची,

जपे स्वाभिमानी कणा.

कष्ट साध्य जीवनाची,

नारी चैतन्य चेतना…! ७

*

बदलले जरी रूप,

नाही  बदलली नारी.

अधिकार कर्तव्याची,

करे विश्वासाने वारी…!८

*

नारी आजची साक्षर,

करी कुटुंब‌ विचार.

सुख ,शांती, समाधान,

करी ऐश्वर्य साकार…!९

*

नर आणि नारी यांचा,

नारीशक्ती आहे बंध.

जाणिवांचा नेणिवांशी,

दरवळे भावगंध…!१०

*

देई कुटुंबास स्थैर्य,

नारीशक्ती प्रतिबिंब.

रवि तेज जागृतीचे,

जणू एक रविबिंब..! ११

*

नारी संसार सारथी,

नारी निजधामी पाया.

तिची कार्यशक्ती आहे,

सुखी संसाराची छाया…!१२

(महिला दिनानिमित्ताने‌ केलेली रचना)

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्त्री… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

स्त्री… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

 

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

अबोल होते माझी वाणी

बाल्य अवस्था गोजिरवाणी

कशी मोठी झाली  फुलराणी

 *

भाग्य लाभले स्त्री जन्माचे

समर्पित भाव भोगण्याचे

उजळीत पणती सौभाग्याची

गायलीस तू ती पण गाणी

 *

तुझ्या उदरी रामकृष्ण ही

तुझ्याच कुक्षी छत्रपती ही

झाशीची तू लढलीस राणी

तूच लिहली तुझी कहाणी

 *

कधी कधी मग ह्रदय द्रवते

काळीज आतून का फाटते

निर्भया रस्त्यात जिवंत जळते

जीवन होते मग अनवाणी

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares